जागर - ज्याची गरज कधीच संपत नाही 
				       नमस्कार, ‘जागर  डॉट कॉम‘ नावाचा ब्लॉग आम्ही सुरु करतोय.
				एका क्लिक वर जगाच्या कुठल्याही कोपर्यात चोर्खेळ आणि पोरखेळ पाहू शकणारे आम्ही नशीबवान जगवाशी , कधी कधी तत्वमुल्यांच्या शोधत निघतोच , अनेगदा आपणास घटनेतला , घटनेमागचा नेमकेपणा , विस्तृत वृतांत हवा असतो , अनेक अनाकलनीय असे काही ज्याची उकल गरजेचे आणि आम्हा कर्तव्याचे असते . 
				वर्तमान काळातील राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , संस्क्रतिक , धार्मिक घडामोडीचे आकलन , संकलन करून भविष्याचा वेध घेणारा शब्दप्रपंच प्रत्येकाला हवा असतो . 
				समाजमनाचे  भान - अवधान यांचे समिक्षण करणारा एखादा स्तंभ अडगळीला जरी असला तरी त्यास वाचणारे जिज्ञासू वाचक कमी नाहीत .
				म्हणून हा ब्लॉग तुमच्या पदरी घालत आहे . 
				पळणाऱ्या जगाला निशब्द , स्तब्द करणे आजच्या ४ जी च्या गतीत अवघड आहे मात्र  जो थकेल त्यास विचारामृत पाजण्याचे काम हा ब्लॉग करेल .
				या आणि त्या सारया पळापळीचा , सर्वसामान्य धावफळीचा , राजकारणी कुरघोड्यांचा , सावध नेम धरणाऱ्या धर्मसंस्थांच्या मुकादमी पाठीराख्यांचा हा स्तंभ वेध घेईल कधी कधी त्यांच्या षड्यन्त्रांचा शब्द शस्त्राने वध हि करेल . दगदगीतलि धग अन कास्तकार्यांची रघ इथे शब्दबद्ध होईल .
				नुसता शब्दकलोळ नसेल , असेल फक्त मळभेखालचे सत्य जे कुणीतरी दडवत असेल ?
					
						
"नाठाळाच्या माथी काठी मारणारे वार-करी बनूया चला "
					…… यासाठीच हा ब्लॉग आहे .