04 March

पारदर्शकतेच्या पहारेकरयांना द्रांक्षे आंबट 
देवेंद्राचे माघारास्त्र 

DEVENDR ON FIRE
By भागवत तावरे
  • 268 View


देवेंद्र फडणवीस पक्के राजकारणी अन त्यातले धुरंधर बनले आहेत असे मान्य करायला कालपासून हरकत नाही . घसा ताणून सेनेला पळता भुई थोडी करण्याची कुठलीच संधी न सोडणारे, वेळी पाणी पिवून सेनेला दामटीनारे देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईच्या सारीपाटातून कमळाला अनपेक्षित वॉक आउट केले . म्हणजे सेनेला मोकळे रान दिले नाही , जरी सेनेला वाट मोकळी केली असली तरी त्या वाटेवर आपला एक मुकादम नेमण्याचे राजकारण भाजपने केले आहे विशेष हे कि लोकायुक्त  स्वायत्त असणार आहे . म्हणजे गाडी जरी सेनेच्या स्वाधीन केली असली तरी आपल्या अधीन असणारा उपलोकायुक्त त्या गाडीचा गाडीवान म्हणून बसवला आहे .   काल सेनेनी मुंबई जिंकली अशी भावना अनेकांची झाली असावी मात्र वरून सत्य असणारे ते आतून कसे फडणवीसांनी पोखरले आहे हे लक्ष्यात यावे एवढे ते सरळ आहे . त्यासाठी कालचे देवेन्द्रांचे माघारास्त्र (पत्रकार परिषद) समजून घ्यायला हवे . बहुमत नसल्यामुळे कोणत्या तरी एका पक्षाची मदत घ्यावी लागणार होती. तसे संकेत मिळत होते. त्यावर कोअर कमिटीने विचार केला. मुंबईच्या जनतेने पारदर्शकतेला कौल दिला आहे. त्यांचा अनादर करणार नाही. त्यामुळे मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. याशिवाय स्थायी, बेस्टसह इतर समित्या आणि प्रभागांची निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून आम्ही महापालिकेत जबाबदारी पार पाडणार आहोत असे म्हटले मग असे होते तर गीता गवळी यांना मुख्यमंत्री कुठल्या कारणी आर्जवे करत होते हा प्रश्न कळीचा होऊ शकतो .  मात्र तो विचारण्याची हिम्मत कुणी करावी . फडणवीस अन त्यांचा पक्ष एखाद्या पिशाच्च्या सारखा सत्तेच्या मागावर लागला नाही काय ? ८ महापालिका राखून देखील मुंबई खेचण्याचे कुठले प्रयत्न करायचे फडणवीसांनी सोडले होते काय  ? म्हणून त्यांना देणारे वैगेरे म्हणवून घेता येणार नाही वरून त्यांना सत्ता मिळत नसल्याने त्यांनी ती सोडून दिल्याचे बडवून घेत आहेत .  ते सत्य नसून आंबट द्रांक्षाची ( लबाड कोल्हा ) गोष्टच बरोबर असल्याचे मान्य करावे लागेल.मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नेमणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी हा उपायुक्त्य तम्बाखुतल्या बंबू सारखा मध्येच कसा खोवला हे देखील समजून घेणे गरजेचे आहे कारण भाजपने माघारीच्या बदल्यात सेनेच्या सत्तेत खुट्टी मारण्याची जी नामी संधी साधली आहे त्यावरून माघार घेणे म्हणजे देवेंद्राचे माघाराअस्त्रच असल्याचे मान्य करावे लागेल . म्हणजे शिवसेनेच्या कारभारावर भाजपचा मुकादम नेमून देण्याचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी केलेच . सत्ता सोडली मात्र सहज नाही हुक टाकूनच नाव सोडणारे फडणवीस चांगलेच चाकरमानी ठरले आहेत . 
   पारदर्शक हा शब्द कमी होता म्हणून भाजपला महान असल्याचे दाखवताना देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एक नवीन सूत्र अभूत असे समोर आणले आहे .राज्यातील दहा महानगरपालिकांच्या कारभारात पारदर्शकता यावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज त्रिसदसिय समितीची घोषणा  केली . म्हणजे लोकशाही राजदंड हाती येत नसल्याचे पाहून राज्यसत्तेचा वापर ( गैर ? )  फडणवीसांनी केला असेच म्हणावे लागेल .  सेवानिवृत्त सनदी अधिकारी गौतम चॅटर्जी, शरद काळे व रामनाथ झा यांची हि समिती राज्यातील महानगरपालिकेत पारदर्शकता कशी अंत येईल या विषयावर आभास करणार असून तीन महिन्यात आपला अहवाल सरकारकडे देईल व सरकार या शिफारशी स्वीकारेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली . तर मुंबईच्या शिवसेनेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने लोकायुक्ताच्या जोडीला मुंबईसाठी उपलोकायुक्त हे नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय आज सरकारने घेतला मुंबईसाठी संस्थात्मक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपला हा निर्णय असून हे पद स्वायत्त आहे हे सांगण्यास मुख्यमंत्री विसरले नाहीत. मुंबई महापालिकेत लोकायुक्त घोषित करताना मुख्यमंत्र्यांने इतर ८ ठिकाणी लोकायुक्त नेमले आहेत का हे फडनविसांना कुणी विचारण्याचे गरजेचे आहे . मुंबई हातची जाताना आपले शेपूट जोडणारी भाजपा इतर ठिकाणी आपले महापौर स्वैर सोडणार आहे , तिथे पारदर्शकता नको आहे का ? असे कुणी देवेन्द्रांना विचारयला पाहिजे . कारण जनता पारदर्शक व्हायची अन भाजपा सत्ताभक्षक. सव्वा दोन वर्षापुर्वी या तरूणाची मुख्यमंत्री पदासाठी निवड झाली, तेव्हा पक्षापाशी पुर्ण बहूमत नव्हते आणि कुठलीही जुळवाजुळव न करता सरकार स्थापन करण्याचा जुगार खेळला गेला होता. दुखावलेल्या मित्र शिवसेनेला अंगावर घेऊन सरकार स्थापलेले होते आणि प्रशासनासह कुठल्याही पाताळयंत्री राजकारणाचा अनुभव नसलेल्या तरुणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास दाखवला होता. शरद पवार व कॉग्रेस अशा दोन बिलंदर राजकीय विरोधकांसह, शिवसेनेचा दुखावलेला वाघही त्याच्या समोर उभा होता. त्यामुळेच फ़डणवीस आपली कारकिर्द किती यशस्वी करतील, यापेक्षाही ते किती काळ सरकार टिकवू शकतील; याचीच शंका व्यक्त केली जात होती. पण या दोन वर्षात अनेक वेड्यावाकड्या प्रसंगांना समर्थपणे सामोरे जात आणि अडचणीतून वाट काढत, फ़डणवीसांनी मोठा पल्ला गाठला आहे. त्यातला पहिला अडथळा त्यांच्या पक्षातच होता. आणखी चारपाचजण मुख्यमंत्री व्हायला उत्सुक होते आणि त्यांना संभाळून घेत व त्यांच्यावरच मात करीत, आपले बस्तान बसवण्याचे आव्हान या तरूणासमोर होते.  नितीन गडकरी व नाथाभाऊ खडसे अशा दोन दिग्गजांना नाकारून, या तरूणाला नेतृत्व देण्यात आले होते. त्यांच्याखेरीज पित्याचा वारसा म्हणून जनमानसातील मुख्यमंत्री अशी भाषा करणार्‍या पंकजा मुंडेही समोर होत्याच. दुसर्‍या फ़ळीतले विनोद तावडेही शर्यतीत होते. त्यांना संभाळत कारभार करताना, शिवसेनेचा विरोध व धुसफ़ुस सहन करत कारभार हाकणे सोपे काम नव्हते. पण सर्कशीसारखी कसरत करतानाही मुख्यमंत्र्यांनी आपला तोल व संयम ढळणार नाही, याची पुरेपुर काळजी घेत, आपण बिलंदर असल्याचे व कारभारात काटेकोर असल्याचे अनेक दाखलेच सिद्ध केले. ताज्या मिनी विधानसभा निवडणूका त्यावरचा कळस मानता येईल. कारण त्यात त्यांनी विरोधकांसह पक्षांतर्गत विजय संपादन केला आहे.
तसे बघितले तर अकस्मात मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले ते पहिलेच मुख्यमंत्री नाहीत. पण गाठीशी कुठलाही प्रशासकीय अनुभव नसलेले मोजकेच आहेत, त्यापैकीच  एक अशी फ़डणवीसांची नोंद करणे भाग आहे. २००१ सालात नरेंद्र मोदी यांची स्थिती यापेक्षा भयंकर होती. नवखा असताना  इतक्या जबाबदारीच्या पदावर आरुढ होण्यातला मोठेपणा कुणाला नको असतो . मात्र  त्यातून येणारा जबाबदारीचा बोजा संभाळणे सोपे नसते. तितके सुखदायक नसते. त्यात पुन्हा विविध राजकीय कारस्थाने व उलथापालथींना सातत्याने सामोरे जावे लागते अन तसे आपण करावे देखील लागते अन ते फडनविसांना चांगले जमू लागल्याचे दिसून येत आहे . खाजगी जीवनावर तुळशीपत्र ठेवावे लागत असते. एकप्रकारचे ते अग्निदिव्य असते. त्यातून उडणारी तारांबळ आपण अनेक मुख्यमंत्र्यांची बघितली आहे. मोठे मुरब्बी व कुशल नेतेही हात टेकताना बघितले आहेत. त्यांच्या तुलनेत फ़डणवीस यांनी दोन वर्षात एकाही भानगडीत न सापडता केलेला कारभार, लक्षणिय मानावा लागेल. पण असे असले तरी त्यांच्याकडे त्यांच्याच पक्षातला निर्विवाद नेता म्हणूनही बघितले जात नव्हते. मग संपुर्ण राज्याचा एकमुखी नेता अशी गणती होणे दूरची गोष्ट झाली. खडसे वा गडकरीही तितका पल्ला मागल्या तीन दशकात मारू शकलेले नव्हते. म्हणून तर शरद पवार यांचेच नाव आजवर घेतले जात होते. या निकालांनी फ़डणवीसांना त्या शंकेतून मुक्त केले आहे. कारण त्यांनी आता पक्षावर पक्की मांड ठोकली आहेच. पण मिळवलेल्या विजयामुळे राज्यातला लोकप्रिय नेता, अशी त्यांची ओळख झाली आहे. भाजपाची सत्ता असलेल्या विविध राज्यातील समर्थ मुख्यमंत्र्यांच्या पंक्तीत आता हा तरूण जाऊन बसला आहे जे सेना राष्ट्रवादी अन कॉंग्रेस ने समजून घेतले पाहिजे . तरच त्यावर मात्रा सापडेल ...

ताजे लेख

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

सॉरी महाराज  आज किडक्यासाठी टकमक टोक नाही 

पारतंत्र्य वाढले कि गुलामीची भावना वाढते अन अधिकचे स्वातंत्र्य ...

चोळीबंद  मोदी 

शेतीच्या बांधापासून ते दिल्लीच्या कनॉट प्लेसपर्यंत ...

आमच्यात सुद्धा दानवे आहेत 

व्यापारी  रावसाहेब , नौकरदार रावसाहेब , पाच रुपयाची कोतमिर थेट रुपयाला मागणारा रावसाहेब , शेतकरी ...

 भृष्ट  न्यायधीश आणी मरणासन्न लोकशाही   

कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला जेल होण्याची ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

Close

satta king