05 June

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

attack on pankjaa
By भागवत तावरे
  • 5658 View


धी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर आ.भीमराव धोंडे यांच्या संस्थेत कर्मचारी राहिलेले राम शिंदे राज्याचे जलसंधारण आणी आता ओबीसी खात्याचे मंत्री होण्यात काही वावगे नाही . मात्र त्यांना मंत्री करून जे सुप्त अन गुप्त हेतू साध्य केले जाणार असतील अन त्यातून ना पंकजा गोपीनाथ मुंडे यांची कोंडी होणार असेल तर मात्र खल करण्याचा विषय आहे . पंकजा मुंडे यांचा राजकीय अनुभव कमी असला तरी त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत हे सरकार चालवणाऱ्या संघास चांगले ठाऊक आहे. त्या काहींच्या मनातल्या मुख्यमंत्री देखील आहेत हे  रेशीम बागेतल्या बाग फुलवणाऱ्या लोकांना चांगलेच  ठाऊक आहे . म्हणूनच शिंदेचे प्रमोशन म्हणजे पंकजा मुंडे साठी आव्हान ठरावे  , यावर दुमत नसावे .    
       स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय उत्कर्षात  बेदरकार अन निर्दयी  असे दोन निर्णय अन साल आहेत ज्यातून गोपीनाथ मुंडे लोकनेते गोपीनाथ मुंडे बनले . बेदरकार हा त्यांच्या स्वभाव मात्र त्यामुळे त्यांचा परीघ विस्तारला त्या दोन घटना म्हणजे १९९२ ला विरोधी पक्षनेते होणे अन १९९९ ला मुख्यमंत्री मला करताल तर सत्ता नाही तर नाही असे स्व बाळासाहेबांना सांगताना मातोश्री बद्दल असणारा आदर बाजूला ठेवणारा तो नेता होता . पंकजा मुंडे या त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत , माणसाला आपण ज्याचा वारसा चालवत आहोत त्यानुसार वागावे बोलावे अन करावे लागते . पंकजा मुंडे यांना त्याच बेदरककरीचा वारसा चालवायचा आहे हे पक्के माहित असल्यानेच पेशव्यांच्या पुण्यात मनातल्या मुख्यमंत्री असल्याची गोळी सोडली असावी . संघ जो पुढच्या हाका ऐकण्यात सक्षम आहे , यातुनच पंकजा मुंडे यांचा राजकीय परीघ अधिक वाढू नये याची काळजी घेण्यास सुरवात केली . विरोधक वाढवण्यापेक्षा समर्थक काढून घेण्यात संघाच्या चाली कामी  आल्या अन त्यात त्यांनी राम शिंदे नावाच्या  गोपीनाथ मुंडे या निस्स्मिम भक्तास गळाला लावले .
        आ .भीमराव धोंडे यांच्या संस्थेत कर्मचारी असणारे राम शिंदे भटके विमुक्त चे जिल्ह्यापुरते काम करायचे , नगर जिल्ह्यातले रहिवाशी असले तरी बीड कडे त्यांचा अधिक संपर्क असायचा . यातून त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्य झाल्या अन नशीब बलवत्तर म्हणून त्यावेळी पंचायत समिती सभापती , अश्या प्रकारे सत्तेच्या केंद्रस्थानी पती म्हणून शिंदे यांना सत्ता लाभली . असे असताना त्यांच्या गावची ग्रामपंचायत शिंदेंना जिंकता आली नाही असे असताना त्यांच्या नशिबाने पुन्हा एक संधी त्यांच्या साठी आणली , २००९ ला जामखेड मतदार संघ राखीव होता तो खुला झाला अन पाशा पटेल यांच्या विनंतीवरून स्व गोपीनाथ मुंडे यांच्या कोठ्यातून भाजपचे विधानसभेचे तिकीट मिळाले . मुंडे यांनी एका ग्रामपंचायत हरलेल्या राम ला आमदार केले असे तेव्हा लोक म्हणत . राम शिंदे यांच्या राजकीय उत्कर्षात असे एकच नाव आहे ज्यास पर्याय नाही , ते म्हणजे स्व गोपीनाथ मुंडे . म्हणूनच जामखेड चे सुभेदार म्हणून राम शिंदे कालपर्यंत परळीच्या नाथाचे निस्सीम भक्त म्हणून गणले अन पहिले जायचे . मी जाणीवपूर्वक आज म्हटलो नाही कारण तेच राम शिंदे  आज त्याच नाथाच्या वारसाला आव्हान दिले जात असताना त्याचे निमित्त ठरत आहेत . मुख्यमंत्री एकीकडे गोपीनाथगडावरून सरकार स्व मुंडेच्या विचाराने चालते असे म्हणायचे मात्र त्याच धर्तीवर मुंडेच्या वारसाची कोंडी करायचे राजकारण करायचे हे मुंडे गटास अन मतदारास वेदनादायी ठरावे .  
दोन विदेश वाऱ्या आणि राम शिंदे 
पंकजा मुंडे विदेशात गेल्या अन राम शिंदे यांना जलसंधारण खाते देण्यात आले , ताई चे खाते काढून दिल्याने मुंडे गट दुखावला याची जान ना शिंदेना असल्याने, जोवर ताई येणार नाहीत तोवर कार्यभार स्वीकारणार नसल्याचे सांगितले  अन मग नंतर ताई आल्या अन पुढील सोपस्कार झाले . खरे तर संघाने पंकजा मुंडे यांचे पंख छाटन्यासाठी शिंदेंची निवड करण्यात देखील राजकारण आहे . सामाजिक दृष्ट्या चौंडीची सुभेदारी शिंदे यांनी हिसकावलीच आहे , पुढे त्यांनी सामाजिक नेतृत्व अधिष्ठान असणारे अन पंकजा मुंडे यांचे भाऊ जानकर देखील करावेत ज्यामुळे ओबीसी च्या मोठीसाठी सवड अन बळ मिळणार नाही याची खबरदारी घेतली. दुसऱ्या विदेश वारी देखील पंकजा मुंडे यांच्यासाठी पंख छट करणारी ठरली , ओबीसी मंत्रालय राम शिंदे यांनाच दिले यावेळी मात्र त्यांनी कार्यभार घेण्यास टाळले नाही रातोरात कार्यभार घेतला , गोपीनाथ गडावर मात्र येण्याचे टाळले ? 

 वार संघर्षकन्येवरच 
ज्या राम शिंदे यांची राजकीय व्याप्ती जामखेड सोडली तर कुठेच नाही त्या राम शिंदे यांना राज्याच्या ओबीसीचा चेहरा करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न म्हणजे पंकजा मुंडे यांच्या राजकीय परिघास संकुचीत करण्यासाठीची पहिली चाल ठरावी . विशेष म्हणजे वर्तमान ओबीसी मध्ये नांदत असलेले राम शिंदे एस टी मध्ये जाण्यासाठी आग्रही आहेत , असे असताना ओबीसीचा कासरा ते कश्याला हातात घेत आहेत . म्हणजे ते एकतर धनगरांना घुमजाव करत आहेत अथवा राजकारण करत आहेत .ज्या लोकनेत्याच्या राजकारणाचा वसा वारसा अन कासरा पंकजा मुंडे यांच्याकडे आहे , त्या राजकीय शक्तीपीठाचे भक्त  महाराष्ट्रातील ५४ विधानसभा मतदार संघात आहेत अश्या लोककन्येला सत्तेची केंद्र मिळणे नागपूरकरांना राजकीय हिताचे वाटले नसावे . म्हणून ज्यांना पंकजा मुंडे भाऊ मानतात त्यांनाच पुढे करून वरील राजकारण साधले गेले आहे . भगवान गडाच्या परिघात राम शिंदे येत असल्याने आणी त्यांच्या हातून महादेव जानकर यांना देखील मर्यादित केले जाऊ शकते या सुप्त ध्येयाने ,मोठ्या दोन प्रस्थाला छाटण्यासाठी राम शिंदे प्यादे बनवले असावे . विशेष म्हणजे वर्तमान ओबीसी मध्ये नांदत असलेले राम शिंदे एस टी मध्ये जाण्यासाठी आग्रही आहेत , असे असताना ओबीसीचा कासरा ते कश्याला हातात घेत आहेत . म्हणजे ते एकतर धनगरांना घुमजाव करत आहेत अथवा राजकारण करत आहेत .
 

सुरेश धसांची उपयुक्तता वाढली 
      जर मुंडे भक्त राम शिंदे ना पुढे करून मुंडेंच्या वारसाला चेक AND BALANCE करणार असतील तर त्याच प्याद्याला चेक AND BALANCE करण्यासाठी पंकजा मुंडे यांना राजकारण करावे लागेल . त्यासाठी जामखेड ची नगर पंचायत हिसकावणारे सुरेश धस राम शिंदे या दुखण्यावर जालीम मात्रा ठरतील . तोपर्यंत पंकजा मुंडे यांनी शिंदेंना माफ करण्याचा प्रश्नच येत नाही .  
 

ताजे लेख

मोदी-शहांचा गांधीकोट लोक गायब शाही शिल्लक, जुगाराचा संघ

एकाच वेळी अनेक जागांवर जुगार खेळण्याचा अवसानघातकी खेळ मोदी खेळत आहेत , पेशंट थेट ओटीला घेण्याचा ...

जोगव्यासाठी ‘भगवा’ राज मुद्रेत मोदीशाहीचा नवा भोई

मुंबईत काल दोन राजमुद्रा होत्या एक ध्वजावर आणि एक डायसवर, सेक्युलर इंजिन बाजूला काढून ‘कृष्णकुंज’ने एक रंग ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king