05 January

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

 Lahore bhetitaca of Pathankot niranjana vijhali
By भागवत तावरे
  • 25501 View

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली 
२६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह मोदींनी का केला' हा लेख लिहला होता ज्यात मी स्पस्ट असे म्हणालो होतो 
......
"महत्वाचा हा हि प्रश्न आहे कि ज्या शांततेचा विचार मोदी आणि शरीफांच्या एकल मनात असेल तो पाकिस्तान मधील जैस ए मुहम्मद ,लष्कर ए तोयबा वा हाफिज सारख्या आतंकवादी लोकांना पटणार नाही म्हणजे पर्यायाने शांततेचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ती संघटन आपल्या आतंकी कारवाया गतिमान करतील आणि नसता उद्योग पाक व भारतासमोर येयील ? जर असे घडले तर त्यास मोदींचा आतातायी पणा जबाबदार असेल कारण असाच प्रयत्न  किवा यापेक्षा हि सावध प्रयत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी समजोता वेळी केला मात्र त्यातून कारगिल सोडून दुसरे काही बाहेर पडले नाही म्हणून एक वेध म्हणून काळजी वाटते कि मोदींचा हा लोहोर हट्ट कुठल्या कारवाई ची नांदी ठरू नये ?"

मला त्यावेळी ती घटना एक भारतीय म्हणून अत्यंत खटकली कारण भारताला नेहमी शांतेतेसाठीचे प्रयत्न अंगलट आलेले आहेत. म्हणजे प्रयत्न करू नयेत असे नाही मात्र त्या प्रयत्नाच्या विरोधी गटांचा नायनाट केल्याशिवाय कुठलाच प्रयत्न यशस्वी होईल याबाबद मला शंका आहे .  कारण लोहोर भेट हे एक आव्हान होते आणि त्यातूनच पठाणकोट चे पाट लाल झाले असतील ? ५६ इंच का सीना कसा लाहोर च्या जमिनीवर उतरला असी दवंडी पिटववणारे मोदी अंधसमर्थकांची आता मला कीव येते कारण त्यांच्या मोदीच्या हट्टाने आमच्या जवानाचा जीव गेला आणि इथपर्यंत ७ घरातल्या निरंजनी विझल्या ? अशीच एक चूक आम्ही कंदहार विमान अपहरण वेळी केली आणि तीच चूक आम्हाला संसदेवर हल्ला स्वरुपात भोगावी लागली ? इंडियन एरलाइन्सच्या आयसी ८१४ विमानाचे, काठमांडु (नेपाळ) ते दिल्ली (भारत) या प्रवासादरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांकडुन २४ डिसेंबर १९९९ रोजी १७८ प्रवाशांसोबत अपहरण करण्यात आले. आयसी ८१४ हे एरबस ए-३०० जातीचे विमान होते. २४ डिसेंबर १९९९ रोजी ते नेपाळची राजधानी काठमांडुतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाहुन , दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले. भारतीय प्रमाणवेळ १७:३० च्या सुमारास सशस्त्र दहशतवाद्यांनी विमानाचा ताबा घेतला. दिल्ली या नियोजित गंतव्याऐवजी विमानाला अमृतसर, लाहोर, दुबई मार्गे अफगाणिस्तानात कंदहर येथे उतरवले. दरम्यान दहशतवाद्यांनी एका प्रवाशाची हत्या केली तर काही जणांना जखमी केले. अफगाणिस्तानात त्यावेळी तालिबानची सत्ता होती. यामुळे भारताला अपहरणकर्त्यांसोबत वाटाघाटीं दरम्यान अडचणींचा सामना करावा लागला. भारतीय सशस्त्र दलांनी काही कारवाई करू नये यासाठी तालिबानी दहशतवाद्यांनी विमानाला घेराव घातला. अखेर ७ दिवसांनी भारतातर्फे ३ दहशतवाद्यांना सोडून दिल्यावर हे अपहरण नाट्य संपले. भारताने सोडून दिलेले ३ दहशतवादी पुढील प्रमाणे -- मुश्ताक अहमद झरग‍र, अहमद ओमार शेख, आणि मौलाना मसुद अझहर. अखेर पंतप्रधान वाजपेयींनी घोषणा केली की नवीन वर्षात कोणीही (अपहृत) बंदी असणार नाही,यावेळी नवीन वर्षाला केवळ काही दिवस बाकी होते. अखेर ३१ डिसेंबरला भारताने ३ दहशत वादी सोडण्याची घोषणा क‍रत हे अपहरण नाट्य संपले. मुश्ताक अहमद झरग‍र , ओमार शेख आणि मौलाना मसुद अझहर यातिघांना घेउन भारताचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग कंदाहारला गेले. हे तीनही अतिरेकी तेथून लवकरच गायब होऊन काही दिवसातच पाकिस्तानातच वावरु लागले.कोण आहे माहिती का हा अझर हा पाकिस्तानी मुजाहिदीन संघटक असून काश्मिराच्या पाकिस्तान-प्रशासित भागात सक्रिय असलेल्या जैश-ए-मोहम्मद संघटनेचा संस्थापक व नेता आहे याने भारतावर कुठले संकट लावले हे आपणास सर्वांनाच ठाऊक आहे , मला हेही म्हणायचे नाही कि १६२ प्रवासी वाचवणे सरकार चे कर्तव्य होते आणि तेच अटलजी आणि जसवंत सिह यांनी केले मात्र प्रश्न हा आहे कि कुठपर्यंत आपण या लोकांना जिवंत ठेऊन शांततेसाठी प्रयत्न करणार आहोत . मला शरीफ यांच्या बाबद आज तरी शंका नाही मात्र त्या शरीफांच्या हातात पाकिस्तान ची सूत्रे किती आहेत म्हणून मोदींनी पाकिस्तान ला त्यांच्या गळाभेटीत पठाणकोट ची ब्लुप्रिंट तयार करण्यास प्रवर्त करावे ? ज्या पाकिस्तान मध्ये दहशतवादी संघटन स्वताला तिथले प्रशाशक मानतात , तिथले लष्कर नेहमी बंडखोरीच्या पावित्र्यात असते , तिथले तीन पंतप्रधान अंतर्गत बंडाळीत गतप्राण झालेले आहेत , खुद्द बेनझीर भुत्तो ३ लाख लोकात असताना उडवल्या ते पाकिस्तानातच हे काय मोदी शरीफांना ठाऊक नाही काय ? एवढेच काय खुद्द शरीफांना तितल्या कुठल्या परवेज नावाच्या लष्कर शाह ने नजरकैद केले नव्हते काय वा पिटाळून लावले नव्हते काय ?अस्या देशाच्या प्रमुखांना कसले निर्णय घेण्याचा अधिकार ? याचा विचार सामान्य लोक हि करतील , दुर्दैव हे का हा विचार मोदी करत नाहीत . 
        अनेक मोदी भक्तांना पठाणकोट हल्ल्यानंतर मोदी कसे यशस्वी झाले असे डोहाळे लागतील पहा आपण कसे शांततेसाठी लाहोर ला गेलो तरी पाकिस्तान हल्लेखोर आहे हे आपण इतर देशांच्या लक्ष्यात आणून दिले , असा तो स्वबचाव कांगावा असेल मात्र त्यातला त्यांचा विसर किती निंदनीय आहे कि ज्यात त्यांना त्या सात अबला दिसल्या नाहीत ना तो निरंजन ज्याने आपला जीव गमावला आणि त्याच्या चिमुकलीने पित्याचे क्रपाछत्र . 
फक्त सहा-सात दहशतवादी घुसवून पाकिस्तानने आपल्याविरुद्ध युद्धच पुकारले आहे? हवाई दलाच्या पठाणकोट  तळावर दहशतवादी जोरदार हल्ला करतात आणि 72 तासांनंतरही हे युद्ध संपत नाही. हे प्रकरण फक्त चिंता करण्यासारखे नाही तर आपल्या प्रचंड लष्करी सामर्थ्याचे जे ढोल आपण वाजवत असतो ते ढोल फोडणारा हा भयंकर प्रकार आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत व देशाची अंतर्गत सुरक्षाही साफ कोसळल्याचा हा पुरावा आहे’ पंतप्रधान मोदी हे आठ दिवसांपूर्वीच स्वत:च लाहोरला जाऊन पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पाहुणचार घेऊन आले. त्यावेळीच सामनातून इशारा दिला होता, त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका. धोका होईल. पहा, भयंकर धोका झाला! मोदी यांची पाठ वळताच जैश-ए-मोहंमदच्या म्होरक्यांनी हिंदुस्थानच्या हवाई तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांचा पाकिस्तानने म्हणे निषेध केला. निषेध करण्याचे ढोंग का करता? हिंदुस्थानशी संबंध खरोखरच सुधारायचे असतील तर पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मौलाना मसूद अजहरला भारताच्या  हवाली का करू नये अश्या प्रतिक्रिया आता येतीलच .आणि त्या कुठल्या मोदी भक्तांना नाकारता येतील  ? हल्ल्यातील दहशतवादी प्रशिक्षित होते व त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे व दारूगोळा होता, त्यामुळे हानी पोहोचवण्याची त्यांची क्षमता जास्त होती. ही चकमक त्याचेच निदर्शक असल्याचे मानले जाते. एकातरी दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचे प्रयत्न आहेत. पहाटे साडेतीन वाजता शिफ्ट बदलत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यामुळे सात सुरक्षा जवान मारले गेले. एनएसजीच्या एका लेफ्टनंट कर्नलचा स्फोटके निकामी करताना झालेला मृत्यू दुर्दैवी होता. २००८ च्या मुंबई हल्ल्यापेक्षा आताचे दहशतवादी प्रशिक्षित होते. हीच मोठी काळजी पाकिस्तान बाबद आहे कारण हि सारी रसद त्यांना पाकिस्तान मधून मिळते .  मोदी या नावाने देशातल्या सर्व यंत्राना स्वकेंद्रित केल्या आहेत त्यांना आणि त्यांच्या वलयाला पोषक जे -ते सर्व काही करणार सगळे काही धाब्यावर बसवून ? हीच समस्या आहे कुठल्या महत्वकाक्षा पोटी मोदी स्वैर झालेत हे अद्याप तरी सांगता येणे कठीण आहे , देशात मोदी  जे करतील ते बरोबरच म्हणणार्यांची गर्दी आहे .या गर्दीत माज्यासारख्यांचा आवाज दडून आणि दडपून जाऊ शकेल ? परंतु कुठेतरी देशभक्त असतील ते हेरतील मला काय म्हणायचे आहे ते  ? 
      दोन हप्त्यापुर्वी  संघ प्रवक्ते राम माधव यांनी तर जो कहर केला एखाद्या लहानग्याला देखील हास्यास्पद असावा फक्त 60 वर्षांपूर्वी वेगळे झालेले भारताचे हे भाग पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास राष्ट्रीयस्वयंसेवक संघाला वाटत असल्याचं राम माधव यांनी अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.संघाचा सदस्य म्हणून हे मत व्यक्त करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.परस्पर सामंजस्य आणि सहकार्यातून कुठल्याही युद्धाविना हे शक्य असल्याचा विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला. आता राम पठाणकोट वर आणि तिथे विझलेल्या निरंजनेवर काही बोलणार आहेत का ? कुणी यांना नथुरामाचे  वारस म्हणून हिणवले तर त्यात काय वावगे  ? 
    दुख याचे आहे कि राष्ट्रीय भविष्य व्यक्ती केंद्रित नेत्रत्व आणि  त्या मानसिकतेच्या  हाती जात आहे ज्याची मुळे हुकुमशाहीच्या अंगणात उगवतात .

ताजे लेख

मोदी-शहांचा गांधीकोट लोक गायब शाही शिल्लक, जुगाराचा संघ

एकाच वेळी अनेक जागांवर जुगार खेळण्याचा अवसानघातकी खेळ मोदी खेळत आहेत , पेशंट थेट ओटीला घेण्याचा ...

जोगव्यासाठी ‘भगवा’ राज मुद्रेत मोदीशाहीचा नवा भोई

मुंबईत काल दोन राजमुद्रा होत्या एक ध्वजावर आणि एक डायसवर, सेक्युलर इंजिन बाजूला काढून ‘कृष्णकुंज’ने एक रंग ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king