01 January

गडावरून महंतांची कोंडी

 Gadavaruna mahantanci dilemma
By भागवत तावरे
  • 8570 View

गडावरून महंतांची कोंडी

आजच्या  विषयावर  वेगळे काही लिहावे या हट्टभावनेने  काही लिहित नाही मात्र  जि काही चर्चा महंत नामदेव शास्त्री  आणि भगवान गडावरून  हल्ली  चालू आहे त्या मध्ये महंताची जी वैचारिक आणि वैयक्तिक घुसमट होत असेल त्याबाबद  कुणी अद्यापतरी अवाक्षर काढलेले नाही . १२ डिसे २०१५ रोजी  गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचौत्य साधून गोपीनाथ गड या स्मारकाचे  लोकार्पण झाले.  ज्या नंतर मोठा खल मागेपुढे चालू असताना काल परवा पुन्हा  शास्त्रींनी  आपण पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करूनच तो निर्णय घेतल्याचे सांगितले .

         स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर  राजकीय भूमिका समर्थ पेलणाऱ्या त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी स्मारकास गड संबोधने अनेकांना खटकलेले होतेच फक्त अवधी होता घंटा  कुणी बांधायची , तो तर्कशुद्ध घाव अखेर नामदेव शास्त्रीनीच  घातला , जो नैतिक आणि अधिकाराने त्यांचा हक्क आणि कर्तव्य होते  .  नामदेव शास्त्री हे गडाचे तिसरे मठाधिपती जे  वर्तमान काळात मोठ्या धर्म पेचात आहेत . बीड जिल्ह्यातल्या नारायण गडाचे मानिकबाबा यांचे शिष्य असणारे भगवान बाबा हे नारायण गडाचे उत्तराधिकारी म्हणून कर्मसीद्ध्ता करताना  स्थानिकांच्या जातीय समीकरणाने डोके वर काढले आणि वंजारा- मराठा या वादातून भगवान बाबांना त्रास होऊ लागला . ज्यातून पुढे भगवान गड भक्त गणास  आशीर्वाद  देण्यास सज्ज झाला हा इतिहास बहुतेकांना ठाऊकच असावा , ज्या समीकरणातून भगवान बाबा नारायणगडावरून पायउतार झाले, आरोप करणारांनी चक्क चोळीचा आंरोप करत माणिक बाबांच्या मनात भगवान बाबासाठी संशय निर्माण केला ,त्याच आरोपातून नाठाळाची तोंड बंद करण्यासाठी रागाच्या  भरात बाबांनी  लिंग कापून टाकले ज्याचा माणिक बाबांना यासाठी खेद होता कि एवढ्या टोकाचा आरोप भगवान बाबा वर व्हावा आणि त्यासाठी बाबा ना अशी परिक्षा द्यावी लागावी ,  त्यावेळी थेट निजामाचा हस्तक असल्याची तक्रार काही लोकांनी क्रांतीसिह नाना पाटलाकडे केली ज्या मुळे बाबां हतबल झाले नाहीत मात्र जातीवादाचे मुळे त्याच काळात रुजली हे हि तितकेच सत्य . बीड जवळ असणाऱ्या नारायण गडावरून भगवान बाबा जेव्हा पाय उतार झाले , तेव्हा बाबांचा  पर्यायी गड निर्माण होण्या अगोदर खोकरमोह  येथे थापी ४० एकर जमीन आणि शिवारातील हवेली सोना व बाबू मिसाळ यांनी देऊ केली मात्र बाबांना तो पर्याय रुजला नाही . ज्यानंतर  १९५१ ला नगर जिल्ह्यात धौम्म्यगडाची मुहूर्तमेढ रोवली  , भगवान बाबांनी नारायण गड सोडल्यानंतर अनेक लोकांना घेऊन वारकरी पताका तिथे जोमाने उभा राहिली ,त्या वेळचे शेवगावचे आमदार बाळासाहेब भारदे स्वत  त्या गडाच्या पायाभरणीचे अध्यक्ष राहिले .धौम्म्य डोंगरावर गडाची उभारणी सुरु झाली जी लोकांनी आपल्या तन मन धनाने पार पाडली .१ मे  १९५८ रोजी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण यांच्या हस्ते भगवान गड असे धुम्म्या गडाचे नामांकरण झाले यावेळी लाखोचा समुदाय गडावर होता ,ज्याची आठवण नामदेव शास्त्रींनी गोपीनाथ गडाच्या लोकार्पनावेळी दिली आणि गड कसा सर्वव्यापक भावनेतून उभारला होता हेच सांगितले ,   नारायणगडावरून पायउतार होताना जो अपमान भगवान बाबांचा झाला तो अत्यंत निंदनीय होता ज्याचा खोलवर परिणाम आज हि वंजारा समाजात पाहायला मिळतो .  बाबा इतका वंजारा समाज धीरगंभीर नव्हता आणि असण्याची अपेक्षा हि धरणे चुकीचे कारण बाबांकडे त्यांच्यावरील आरोप झेलण्यासाठी वैराग्य आणि सय्यम जेवढा होता तेवढा  वंजारा समाजाकडे होता असे नाही त्यातूनच  स्व .गोपीनाथ मुंडे हे राजकीय नेत्रत्व आणि भगवान गडाचे महत्व वाढले हे कुणालाही नाकारता येणार नाही .  भीमसिह महाराज असे पर्यंत जो गड सर्वांचा होता तो त्यांच्या नंतर फक्त वंजारा समाजाचा अशी   बिरुदावली रूढ झाली जी स्व .गोपीनाथ रावांच्या राजकीय विकासाच्या पथ्यावर पडली , दरम्यान च्या काळात मिळालेली सत्ता संधी स्व. मुंडेंनी गडाच्या आणि समाजाच्या प्रगतीस कारणी लावल्याने  भगवान गडाच्या भीती अधिकच राजकीय आणि जातीय रंगाने रंगल्या जे काळाच्या ओघातच आले , जे सयुक्तिक हि  मानले गेले , मात्र  असे  समीकरण बाबानी  भगवानगडावर कधी चढू दिले नव्हते , विशेष म्हणजे ज्याचा अधिक त्रास त्यांनाच झालेला असताना , त्यांनी जातीवाद कधीच होऊ दिला नाही . यातून भगवान गड हे कुठल्या एका जातीचे व पंथांचे न राहता अठरापगड जातींना एका सुतात बांधणारा ठरला  होता  जो नंतर दुर्दैवाने राहिला नाही हे मान्यच करावे लागेल  .   नामदेव शास्त्रींनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून देताना भगवान गड मोकळा श्वास घेईल असा उलेख करत गोपीनाथ गड स्थापनेत आपला मानस काय हे दाखवले ज्यातून शास्त्रीजी यांना गोपीनाथ गड अपेक्षित नव्हता काय असाही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे , त्यातून दोन गोष्टी मोठ्या ताकतीने बाहेर पडल्या एक तर गड हा शब्द अनेकांना खटकला कारण त्यातून थेट भगवान गडास अप्रत्यक्ष्य  आव्हान दिले जाते  स्व .गोपीनाथ मुंडे यांची समाजातील किंमत जरी अतुलनीय असली तरी ती थेट भगवान बाबाच्या पंगतीत यावी  एवढी नक्कीच नव्हती याबाबद वंजारी समाजात देखील शंका नसेल , म्हणूनच भगवान गड जसा गर्दीने फुलतो तसा गोपीनाथ गड  त्या जवळ हि पोहचू शकला नाही हे हि सत्यच  , भगवान बाबा आणि  स्व. गोपीनाथ मुंडे यांची वेगवेगळी किंमत वंजारी समाज ठेऊन होता  मात्र  पंकजा मुंडे च्या ठरू शकणाऱ्या चुकीने गल्लत झाली आणि थेट वंजारी समाजात गड या शब्दावरून संभ्रम तयार झाला यावर महंत जे बोलले  त्यातून तर त्या सुप्त शंकेला हवाच मिळाली  . गोपीनाथ गड जरी प्रेरणा वा आधुनिक विचाराचा प्रवर्तक  आहे असे सांगत पंकजा  ताईनी किती हि ठासून  सांगितले तरी गोपीनाथ गडास  गड संबोधने  यातून  गड  या शब्दामागचे राजकीय इप्शीत लक्षात येतेच . ज्यालाच  न्यायाचार्यांनी अधोरेखित केले आहे

      नामदेव शास्त्री यांना एक व्यक्ती म्हणून गोपीनाथराव यांचा मोठा सहकार लाभला ज्यातून नामदेव शास्त्री मठाधिपती  झाले आणि सिद्ध हि , अठरा पगदडाचा  गड क्षीमित होताना शास्त्रींनी मोठ्या कष्टाने सहन केला असावा म्हणूनच गोपीनाथ गडाच्या लोकार्पनात त्यांनी त्या भावनेस वाट मोकळी करून दिली , पंकजा मुंडे यांनी आपली राजकीय भूमिका आता गोपीनाथ गडावरून घ्यावी अशी आधिकारिक तंबी देत भगवान गडाची सुटकाच गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वलयातून केली  काय  ? असा खुलासा समोर येत आहे , म्हणजे ज्याअर्थी  शास्त्रींनी पूर्वी गड सर्वांचा होता असे म्हणणे म्हणजे वर्तमान परिस्थितीत नव्हता असेच काय ? आणि जरा बाजूला येऊन पाहितले तर ते खरेच होते गड विशिष्ट जातीचा आणि नेत्रत्वाच्या राजकीय दिशा भूमिकेचा व्यासपीठ म्हणून वापरला गेला म्हणूनच गोपीनाथ रावांना  दिल्ली मुंबई इथूनच दिसल्या आणि मिळाल्या देखील , गडाचे उत्तराधिकारी म्हणून शास्त्रीची खद खद अत्यंत सयुक्तिक असताना त्यांना एका मोठ्या मानसिक पेचातून जावे लागत असावे कारण स्व .गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती अंत त्यांच्या अंतर्मनावर खोलवर परिणाम करून गेला होता ज्यातून  शास्त्रींनी गोपीनाथराव  ज्या  ओट्यावरून  भाषण करायचे तो ओटा पाडला यासह अन्य घटना आहेत ज्यातून शास्त्री आणि गोपीनाथ रावांचे सख्य दिसून येते , यातूनच गोपीनाथ राव यांच्या पश्यात  शास्त्रींनी पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभा राहणे हा सख्यधर्म आणि मठाधिपती म्हणून गड सर्वव्यापक आणि सर्वांचा ठेवणे हा राजधर्म परंतु पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गड स्थापन करून कुणाची नाही तेवढी शास्त्रींची अडचण केली , नामदेव शास्त्रींना गोपीनाथ मुंडे या नेत्रत्वाचे समर्थन करता आले परंतु त्यांच्या नावाने गड करता येणार नव्हते हे  गोपीनाथ गडाच्या उद्घाटना वेळी  शास्त्रीजींच्या बोलण्यातून समोर हि आले . ज्यानंतर  वंजारी समाजात देखील सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या , सर्वात मोठी घटना अशी कि ज्या भगवान बाबाचे नाव घेत स्व.गोपीनाथ मुंडे एवढे मोठे झाले कि खुद्द  स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने गड उभारावा , त्या भगवान बाबांचा साधा फोटो पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या मागच्या पत्रिकेवर लाऊ नये याची दखल मिडिया ने देखील घेतली ज्यातून पंकजाचा गड हा शब्द प्रयोग का ?याचे प्रयोजन दाखवतो ज्यानंतर  वंजारी समाजात नाराजी आली जी सयुक्तिकच . अगदी जाणकार मंडळी पंकजा मुंडे यांच्या गड हट्टावरून हिरमुसली , जरी कुणी स्वीकारले नाही तरी  स्व . गोपीनाथ मुंडे यांना  भगवान बाबांच्या बाजूला बसवण्याचे पातकच जणू पंकजा मुंडे यांच्या कडून झाले , अश्याच  भावना कधी नाही त्या वंजारी समाजातून समोर आल्या , या दरम्यान खिंडीत अडकले ते नामदेव शास्त्री  त्यांची परिस्थिती त्या भीष्म-द्रोणाचार्य यांच्या सारखी  झाली आहे , सत्य असताना पांडवा च्या बाजूने उभा राहता आले नाही आणि इच्छा नसताना कौरवाच्या बाजूने कुरक्षेत्रात उतरावे लागले , पंकजा मुंडे यांच्या बाजूने समाज बांधून राहावा यासाठी गरीमे बाहेरचा यत्न करायचा आणि उत्त्तराधिकारी म्हणून भगवान बाबांचा वारसा जो सगळ्यांना घेऊन चालवायचा आहे  तो पाळायचा . व्यक्ती म्हणून शास्त्री जरी  स्व .गोपीनाथ मुंडे यांच्याशी बांधले असले  तरी भगवान गड म्हणून त्यांना पंकजाचे काही देणे नसावे ? आणि शक्य आहे भगवान गड सर्वांचा आहे हे सिद्ध करण्याचा मानस याच मार्गाने जाऊ शकेल आणि तसे झाले तर पंकजा मुंडे यांचा संघ मोठा लोकाश्रय गमावून बसेल ? धर्म सत्ता हि राजसत्तेशी  स्नेह ठेऊन असते मात्र त्यास जी मर्यादा आवश्यक असावी  ती भगवान गडावर स्व .गोपीनाथ मुंडे यांनी ओलांडली होती काय म्हणून भगवान गडाचा श्वास कोन्धल्याची सल शास्त्रींना बोलून दाखवावी लागली जर तसे असेल तर वंजारी समाजाच्या भूमिकेत  मोठी राजकीय उलथा पालथ दिसणे शक्य आहे गोपीनाथ मुंडे यांच्या हयातीत त्यांच्या माणसांना फोडण्याचे राजकारण करणारे पवार कुटुंबीय आता भगवानगडासारख्या  प्रतिकांनाही गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीपासुन वेगळं करण्याचे हे षडयंत्र आहे काय? अशीही चर्चा बीड, नगर, परभणी परिसरात अनुयायांमध्ये होत असुन त्यांच्या तीव्र रोषाचा सामना गडाच्या पदाधिकारी मंडळींना आगामी काळात करावा लागेल अशी चिन्हे आहेत हे हि नाकारता येणार नाही .

राष्ट्रसंत भगवानबाबा हे या अनुयायांचा प्राण आहेत तर गोपीनाथराव मुंडे हे स्वाभिमानी श्वास आहेत.त्यांच्या दसरा मेळाव्यामुळे गडाचा श्वास कोंडल्याच्या भावना या वैयक्तिक आहेत.. गडाच्या अनुयायांच्या नाहीत. असा युक्तिवाद करणारे कमी नाहीत कुणास ठाऊक ते पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून अधिक भावनिक असतील . परंतु एक मात्र मान्यच करावे लागेल गोपीनाथ गडाच्या शीला या भगवान गडाच्या समोर आव्हान म्हणूनच रोवल्या आहेत , त्यासाठीचे सूचक विधान खुद्द भगवान गडाच्या मठाधीपतीने करून बऱ्याच शंका सत्य होऊ शकतात हेच अधोरेखीत  केले आहे . एक बाब अस्पष्ट आहे ती म्हणजे पंकजा मुंडे यांनी स्मारकाला गड असे का संबोधले ? जर ती चूक म्हणून मान्य केली तर प्रश्न हा हि आहे कि चूक जाणीव पूर्वक केली का अनावधानाने  झाली ? याच्या उत्तरास अवधी आहे

ताजे लेख

मोदी-शहांचा गांधीकोट लोक गायब शाही शिल्लक, जुगाराचा संघ

एकाच वेळी अनेक जागांवर जुगार खेळण्याचा अवसानघातकी खेळ मोदी खेळत आहेत , पेशंट थेट ओटीला घेण्याचा ...

जोगव्यासाठी ‘भगवा’ राज मुद्रेत मोदीशाहीचा नवा भोई

मुंबईत काल दोन राजमुद्रा होत्या एक ध्वजावर आणि एक डायसवर, सेक्युलर इंजिन बाजूला काढून ‘कृष्णकुंज’ने एक रंग ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king