23 January

पुन्हा निशब्द पंकजा

 Push the mute again
By भागवत तावरे
  • 11999 View

 
 " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "  
     कायद्याचे काही कलमे आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क देतात मात्र व्याभिचाराचे नाही , खाजगी जरी असले तरी आपण जेव्हा सार्वजनिक आयुष्य जगत असतो तेव्हा आम्ही काही नैतिक बंधने स्वीकारलेली असतात . लोकशाही मध्ये जेव्हा तुम्ही लोकांचे प्रतिनिधित्व करत असतात तेव्हा तर तुम्हाला जवाब देही स्वीकारावी लागते , तुम्हाला ती नाकारता येत नसते , मोदींना देखील ती चुकत नाही मग भले काहीच जन प्रश्न विचारत असले तरी .

             माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकीय प्रवासात देखील असीच काही प्रकरणे आहेत जेव्हा त्यांचे उत्तर देण्याचे दायित्व त्यांच्यावर असताना,   एकतर त्या गप्प राहिलेल्या आहेत अथवा त्यांनी विषयाला बगल दिलेली आहे . जेव्हा एक नेता लोकनेता होत असतो ,तो माध्यमात सोयीच्या बातम्या करून नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकांचा विश्वास जिंकून . लोकनेता बनण्याचा   परिपाक घरातच असताना पंकजांना ते उमजू नये , हे दुर्दैवी ठरावे  .
      काल बीड जिल्ह्यातील टपरी टपरी वर निगेटिव्ह सारखी एक क्लिप व्हायरल झाली. त्या क्लिप मधील दोन व्यक्ती कोण आहेत हे सर्वज्ञात आहे . नक्कीच चार भिंतीच्या आत त्या पुरुष नेत्याने त्या महिला नेत्यास बाहूपाशात घेणे , चुंबनांचा वर्षाव करणे हा खाजगी विषय आहे . कुणाचे  विवाह बाह्य संबंद असू देखील शकतात , आणि सर्वात महत्वाचे त्यावर कुणाचा आक्षेप घेण्याचे अजिबात कारण देखील नाही .दोन्ही जीवांना ते मान्य असेल तर  प्रश्न असूच शकत नाही . मात्र हा भारत आहे इथे नरेंद्र मोदी जगाला योग देतात भोग नाही .   जेव्हा तुम्ही एका विधान सभा क्षेत्राचे  प्रतिनिधित्व केलेले  असता,लाखो लोकांनी तुम्हाला सार्वजनिक जीवनात प्रतिनिधित्व दिलेले असते तेव्हा तुम्हाला खाजगी आयुष्य राहिलेले नसते , तुमचे जीवन तुमच्या पाठीराख्यांची प्रेरणा आणि आदर्श असत. त्यामुळे खाजगी आयुष्य सार्वजनिक झाले कि मग तुम्हाला त्यावर खजील व्हावेच लागते . ते आमचे खाजगी आयुष्य आहे म्हणून समाजातले तोंडे बंद केले जाऊ शकतात मात्र त्या क्लिप मधील उभयंताच्या वैवाहिक जोडीदारास म्हणजे त्या महिला नेत्याच्या पतीने ती क्लिप पाहितली , त्यांच्या मुलांने पाहितली तर त्यावर तर उत्तरे द्यावे लागतील . अहो तुम्ही तर त्यांना बहिण मानत होता असा सवाल  त्या नेत्याच्या पत्नीने विचारला तर उत्तर द्यावेच लागेल ना . एकवेळ समाजाच्या नजरा चुकवतील  मात्र ज्या पती वा पत्नी सोबत आयुष्य घालायचे आहे त्यांच्या नजरेत नजर कधी घालू का याच उत्तर उभय रंगबाजांना स्वतला  द्यावे लागणार नाही का ?
     उभय दोन्ही नेते भाजपचे असल्याचे बोलले जात आहे आणि तसे असेल तर  यावर भूमिका घेण्याचे राजकीय - सामाजिक दायित्व पंकजा मुंडे यांच्यावर आहे . पंकजा मुंडे या राज्यातील नामांकित महिला नेत्या असून माजी महिला व बालकल्याण मंत्री आहेत . विधान सभेच्या प्रचारातील कथित क्लिप मुळे  त्यांना विधान सभेच्या प्रचार सभेत आलेली भोवळ महाराष्ट्राला माहित आहे , एका महिले बद्दल चुकीचा शब्द प्रयोग केल्याचा संशय  त्यांना पार खचवून गेला होता . आता जेव्हा अशी क्लिप जिल्ह्यात व्हायरल होत आहे अन त्या उभय नेत्यांचा जर आपल्या पक्षाशी वा आपल्या राजकारणाशी संबंद असेल तर त्यांनी यावर गप्प राहणे म्हणजे आपला तो बाब्या पद्धतीचे आहे ? भले त्या क्लिप मधील महिला नेत्या आपल्या मर्जीने समर्पण दाखवत असतील तरी आम्हाला याचा विचार करावाच लागेल कि उद्या महिलांना राजकारणात त्यांचे कुटुंबीय येऊ देतील का ? सोबत फिरणारे कार्यकर्ते नेत्यांचा असा फायदा उचलणार असतील तर उद्या आपल्या महिलांना किती सुरक्षित समजावे . महिला नेतृत्व म्हणून जेव्हा पंकजा मुंडे राज्यात नेतृत्व करतात त्यांनी अश्या प्रकरणावर बोलले पाहिजे होते , महिला राजकारणात अश्या घटना आणि क्लिप एक धक्का ठरतो .
    मागे विठ्ठल तिडके या माणसांने पंकजा मुंडे यांचे समर्थन शब्दबद्ध करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल असवेदनशील  शब्द वापरले तेव्हा देखील पंकजा मुंडे काहीच बोलल्या नाहीत , त्यावरून बीड मध्ये मोठा तणाव वाढला होता,  तेव्हा त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या , त्या यावर शब्द बोलल्या नव्हत्या , त्या पालकमंत्री असताना बीड जिल्हाधिकारी कार्यालयात दादासाहेब मुंडे या कॉंग्रेस नेत्यावर गटाने हल्ला केला होता , तेव्हा पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी कारवाई केली का शाबासकी दिली होती हा देखील प्रश्न आहे . पाटोदा तालुक्यात धनंजय मुंडे सत्तेत आले म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मस्ती देखील निंदनीय आणि शासन होण्या सारखीच आहे . नामदार झालेल्या धनंजय यांनी देखील अश्या वेळी भूमिका घेऊन जर समर्थक असतील तर भूमिका घेतली पाहिजे . मात्र पाटोद्याच्या प्रकरणावर tweet करणाऱ्या पंकजा दादा मुंडेंच्या वेळी निशब्द का होत्या हा सवाल देखील पंकजा यांच्या राजकारणाच्या सीमा अधोरेखित करणारा आहे . हा प्रकार तुमच्यातल्या नेतृत्वाला खुजे आणि  गटाचे करतो .     लोकनेत्याचा वारसा चालवताना पंकजा यांनी व्यापक दृष्टीकोन ठेवला पाहिजे . नाहीतर अमुक पत्रकार प्रश्न मांडतो म्हणून "विरोधात लिहतो काय बघा रे ," या भूमिकेत जाण्याचे काही कारण नाही . यातून एक पत्रकार संपू शकतो मात्र आपले नेतृत्व कदापी लोकसंमत होऊ शकणार नाही याची वेळीच जाणीव संबधितांना होणे त्यांच्या फायद्याचे ठरू शकते . आपण एखाद्या घटनेवर बोलले नाही म्हणजे समाज ते पाहत नसतो असे नाही . सदरील व्हिडीओ मधील अश्लील चाळे सार्वजनिक जीवनाला , राजकारणातील महिला सहभागाला आणि सत्तेची संधी देण्याच्या मापदंडांना अंतर्मुख करणारी आहेत . मतदार कृष्ण कर्त्यांची नोंद ठेवत असतो . एखादा पत्रकार विरोधात लिहतो " मग बघा रे त्याच्याकडे"  म्हणण्या पेक्षा अधिक गरज आहे कि, तोच पत्रकार आपले कौतुक शब्दबद्ध करील असा कृतीबद्ध कार्यक्रम कार्यकर्त्यांना देण्याची . सहा दिवसावर जिकरीचा लढा आलेला असताना आपल्या मुख्य सरदारात असे रंग उधळले जात होते हे जर खरे असेल तर ते अधिक चिंतनीय आहे , याचा विचार ज्याने त्याने केला पाहिजे . एक पत्रकार खूप लहान असतो तो आपला भाड्याच्या घरात राहत असतो , गमवायला त्याच्याकडे असतेच काय ? मात्र आपण जेव्हा एक दैदिप्यमान वारसा चालवत असतो लाखोंची माता ठरण्याचा इमानी इतबारे प्रयत्न करणार असू तर मग आम्ही समाजातील सर्वात शेवटच्या सिंगल व्यक्तीचे मत देखील लक्ष्यात  घेतले पाहिजे . इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असे वातावरण असताना देखील काही आवाज दबले नाहीत , ते तुरुंगात गेले मात्र हटली नाहीत , पुढे तीच आवाजे लोकनेता झाली , महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाली , तीच आवाजे जी सायकल वर दौरे करायचे पुढे हेलिकॉप्टर ने जिल्ह्यात- राज्यात फिरू लागली . हे घडले तेव्हा ,जेव्हा त्यांनी लहानातला लहान आवाज ऐकला  . कुठल्याही पत्रकाराने विरोधात बातमी लिहली म्हणून त्याचा आकस लोकनेत्यांनी ठेवला नाही उलट फोन केला " छान बातमी केली , बरे केले माझ्या लक्ष्यात आणून दिले , लिहित रहा अधिकार आहे तुमचा "  म्हणून बीडच्या पत्रकारांनी नेत्याचा लोकनेता केला आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले . गुंडांपुंडांना सोबत घेऊन व्यक्ती गुंडाराज घडवू शकते लोकराज नाही , अन गुंड कितीही मोठा असला तरी दाऊद ला देखील मुंबई सोडायला  लावली जाते हे  गोपीनाथ मुंडे यांच्यातल्या गृहमंत्र्यांनी दाखवून दिले आहे . आपण किती जनाचे कितीवेळा तोंड बंद करू शकणार आहात ,या पेक्षा आपल्या परिघात नैतिक शिस्त आणि मर्यादापालन करून घेणे एका लोकनेत्याच काम कायम  राहिलेले आहे . शोसल मीडियात अश्लील शब्द वापरून टीका करणे यामुळे आपले मत वाढत नसते उलट ते ३० हजाराने कमी होत असते हे समजून घेतले पाहिजे .
       महात्मा गांधी म्हणायचे " हमे ,तब हि बोलना चाहिये जब वो मौन से प्रभावी हो " सय्यम मोठे आयुध आहे , मात्र असा सय्यम पंकजा मुंडे यांनी किती वेळा दाखवला पाहिजे होता याचे एक वेगळे विश्लेषण होऊ शकते . भगवान गडाच्या वादात पंकजा मुंडे यांच्या  सरळ धमकी वजा क्लिप देखील समोर आलेल्या आहेत . सत्ता ही सूज असते ते बल नसते म्हणून कुणी त्यावर तेव्हा आक्षेप घेतला नसेलही  मात्र आज काय परिस्थिती आहे , परळीत पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झालेला आहे . भगवानगडावर धनंजय मुंडे यांच्या सोबत न्याय झालेला आहे , त्यांच्या स्वतच्या पक्षात  स्वतवरून रिंगण करत राजकारणाला मर्यादित करून ठेवले आहे . कुणी कसे राजकारण करावा हा नेतृत्वाचा अधिकार असला तरी लोकशाहीत काम करताना आपले मन नाही तर लोकांचे मत अधिक महत्वाचे ठरलेले आहे . निंदकांचे घर शेजारी मागणारे संत वेडे नव्हते त्यांना ठाऊक होते एक निंदकच असतो  जो आपल्याला अधिक दोषरहित करणारा मार्गदर्शक ठरतो  , बाकी खुशामतदार अन त्यांच्या लीला कायम अडचणीत आणणाऱ्या ठरल्याचा इतिहास आहे, याची काळजी देखील ज्या त्या नेतृत्वाने घेतली पाहिजे . प्रश्न कुठून ना कुठून येतीलच ते नैसर्गिक असतात , त्यामुळे माध्यमांचे तोंडे बंद करण्या पेक्षा काही सीसी टीव्ही बंद करण्याची काळजी ज्याने त्याने का घ्यायला नको होती . मग खाजगी खाजगीच राहिले असते त्यावर सार्वजनिक लेख प्रपंच करण्याची गरज अजिबात नसती पडली .      बहिरवाडी जिल्हा परिषद निवडणुकीत केवळ नृत्य करण्याचा एक व्हिडीओ आला आणि शयर्तीत असलेला उमेदवार एका क्षणात मागे पडला , हे राजकीय परिणाम ते त्यांचे खाजगी आहे म्हणून टाळता आले नाहीत . त्यामुळे या  दोन नेत्यांचे चाळे संबधित पक्षाच्या गरिमेला आणि पक्षातील महिलांच्या स्थानाला हलवून ठेवणारे आहे .
 हा समाज व्येश्येला देखील सन्मान देणारा आहे , गणिकेच्या लेकीला देखील संत कान्होपात्रा असी मान्यता देणारा  हा समाज आहे, मात्र वान पतीवृतेचा आणि चाळ शिंदळीचा समाजाला खटकतो . मोठ्या  कुंकूवाने आणि खांद्यावर चढलेल्या  पदराने कुणी सोज्वळ दिसू शकते मात्र असूच शकते का , हा संशय वाढवणारी  ती क्लिप आहे .
 क्लिप मधील  नेत्या ज्या वाटत आहेत जर त्याच असतील तर ,त्यांच्या संबदीच्या भूतकालीन अनेक अफवांना क्लिप मुळे वास्तविकतेचा पदर लोकमान्य होऊ शकतो  . त्यांचे नेतृत्व करणाऱ्या किवा राजकीय पालन करणाऱ्या नेतृत्वाने याची काळजीच केली पाहिजे .  उभयंताचा तो केवळ कौटुंबिक द्रोह नाही तर सामाजिक देखील ठरतो , त्या क्लिप मधील कलाकार ज्यांच्या पिक्चर मध्ये साईड हिरो असतील त्यांच्या चित्रपटावर देखील परिणाम होऊ शकतो , याची काळजी संबधित चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केली पाहिजे . विषय चौका चौकात पोहचला आहे , लोक पाहत आहेत बोलत आहेत हसत आहेत काही जन लिहित आहेत .  घटनेच्या प्रतिक्रियावर चिंता करायची का सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या क्रियांची,  हा  नेतृत्वाचा स्वायत्त  विषय आहे .
.......... क्लिप काढणे व्हायरल करणे हे चूकच मात्र ती क्लिप कुणी उपलब्ध केली का केली आणि याच वेळी का प्रकाशित केला याचा विचार इतर कसे करणार. 
राजकारणात काही महिलांना रातोरात संधी मिळते , ती कशाच्या बदल्यात मिळते या बद्दल अनेक महिला नेतृत्व उघडपणे बोलत आलेले  आहेत . म्हणजे चळवळीत शून्य सहभाग असताना देखील अनेक पैरेशूट मतदारसंघात  उतरतात आणि थेट विधान भवनात जातात ,असी उदाहरणे कमी नाहीत . अलीकडे अश्याच महिलांना तिकीट, सत्ता मिळते असा संशय देखील आहे , यामुळे राजकारणात वेगळ्याच मापदंडाची चर्चा रंगू लागल्याने चारित्र्यसंपन्न महिलांनी राजकारणात यावे कि नाही असा प्रश्न पडलेल्या राजकीय परिघाला आणि लोकविश्वासाला परवडणारा नाही .  या  मुद्यावर चळवळीत काम करणाऱ्या वकील हेमाताई पिंपळे यांच्याशी लेखकांनी चर्चा केली तेव्हा त्यांनी क्लिप प्रकरणावर बोलण्यास नकार दिला मात्र एकूण राजकारणावर खालील मत व्यक्त केले " कुठली क्लिप आहे कुठल्या नेत्यांची आहे मला माहित नाही मला त्यावर बोलायचे नाही . मात्र चळवळीतील महिलांना  राजकारणात संधी आणि सत्ता मिळाली पाहिजे , कुठलाही संघर्ष न करताना मिळणारी संधीचे मुल्य नसते . त्यामुळे राजकीय पक्षांनी संधी देताना किवा आमदार, खासदार, मंत्री करताना त्या महिला नेतृत्वाने कुठला संघर्ष केला आहे . किती लोकांचे प्रश्न सोडले आहेत याचा अहवाल पक्षाने घेतला पाहिजे . लोकप्रश्नाची जान असनाऱ्या महिलांची  सेवा करू इच्छीनाऱ्या महिला नेतृत्वांना संधी दिली पाहिजे"  असे सर्व पक्षांना विनंती सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रमाता जिजाऊ एकपात्री नाटिकेच्या व्याख्याता  हेमाताई  पिंपळे यांनी केली .  
 टीप -  लिखाण स्वायत्त आणि वास्तव रेखाटणारे आहे . सदरील लेखातून सामाजिक जाणीवेला शब्दबद्ध केले आहे . कुणाच्या भावना दुखावल्या किवा आवडले नाही तर त्यांनी यातल्या प्रश्नावर उत्तरीत व्हाव विरोधाला विरोध करू नये . शोसल मीडियात लेखकाच्या आई बहिण पत्नीवर केलेली शेरेबाजी हा काम करत असलेल्या संघटनेचा नेतृत्वाचा आणि कौटुंबिक संस्काराचा भाग समजला जाईल . 


 

ताजे लेख

मोदी-शहांचा गांधीकोट लोक गायब शाही शिल्लक, जुगाराचा संघ

एकाच वेळी अनेक जागांवर जुगार खेळण्याचा अवसानघातकी खेळ मोदी खेळत आहेत , पेशंट थेट ओटीला घेण्याचा ...

जोगव्यासाठी ‘भगवा’ राज मुद्रेत मोदीशाहीचा नवा भोई

मुंबईत काल दोन राजमुद्रा होत्या एक ध्वजावर आणि एक डायसवर, सेक्युलर इंजिन बाजूला काढून ‘कृष्णकुंज’ने एक रंग ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king