11 April

ताई हा जातीवाद कुणाचा 

casteism of
By भागवत तावरे
  • 4283 View

 माध नावाचा राजकीय कावा ? 

लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

 माधव चे नाव घेऊन निवडणुकीचे विजयी सूत्र निर्माण करणारा सूत्रधार होता यात न जाता फक्त त्यामागचा कावा आहे काय हे समजून घेऊयात , माधव फक्त मतांना असतो बाकी पहिल्या बैठकीत धनगरांना आरक्षण फक्त गाजर ( टीस ) असते , महात्मा फुले सावित्राबाई फुले यांना भारत रत्न देण्यासाठी माधव ची जबाबदारी कधीच नसते . कष्ट उपसायला मा + ध आणि सत्तेचा लाभ घ्यायला फक्त   असाच प्रकार जिल्ह्यात पाहायला मिळत आहे काय  . मग न्यायलयातील सरकारी वकील नेमणूकी असो वा मग सनदी शाहीत वाढलेली विशिष्ट नावे असो .अश्याच काही नेमणुकाचा घेतलेला निर्भीड वेध 

                कुठल्या एका अफवेने लोकसभेचा निकाल बदलू शकतो याचे उदाहरण आपल्याला बीड मध्ये पाहायला मिळते ? तत्कालीन वाजवा तुतारी हटवा वंजारी अशी अफवा ओबीसींना एकवटून गेली अन कुठल्या एका नेत्याचा लोकविजय होऊन गेला . पुढे जाऊन अनेकांनी या बाबद सांगितले कि सदरील घोषणा मराठा समाजातील कुणी नाही तर जिंकणाऱ्या नेत्याने आपल्या यंत्रणे मार्फत  फिरवली . ज्यामुळे मराठा समाजाचा बागुल बुवा करून ओबीसी एकवटले आणि वापरून निघाले  . मराठा समाजाने न केलेल्या चुकीने, वातावरण जातीय बनले . या धर्तीवर निवडणूक विकास या मुद्द्यावरून जातीवर येते . समाजातील सलोखा धोक्यात घालून राजकीय विजय संकल्पित होतात अन तडीस जातात देखील . म्हणूनच पंकजा मुंडे देखील आपल्या डोक्यात जातीचे समीकरणे रचतात काय याची चर्चा होऊ लागली आहे . मराठा समाजाचा द्वेष करून ओबीसींचा राजकीय उपयोग करून घ्यायची हि पिढीजात पद्धत त्यांच्या गुलालाच्या राजकारणाचा अविभाज्य घटक बनलाय का ? वंजारी समाजाच्या मुठीच्या मतात अनेक मतदार संघात निर्णायक भूमिका घेताना गोपीनाथ रावांनी देखील आपल्या कुळामुळाच्या मतदारांचा उपयोग करून घेतलेला आहे . ओबीसीच्या नावाने भाषणे होतात मात्र लाभ केवळ स्वतच्या जातीला मिळवून दिला जातो . हे आता बहुदा ओबीसीच्या वंजारा उत्तर जातींच्या लक्ष्यात आले असावे . मग ओबीसीने पंकजा यांच्या राजकीय लढाईची घोंगडी का खांद्यावर घ्यावी , मराठा समाजाकडे बोट दाखवून ओबीसीचे मते लाटायची हे एक षड्यंत्र आहे काय , ना पंकजा यांनीच जातीवादाचे ढग दाटवून लहान लहान पाखरे राजकीय खोप्याकडे खुणावले आहेत काय ? असा प्रश्न आता समोर येतोय . बीड लोकसभा निवडणुकीत जातीवाद हा शब्द सर्वात पहिल्यांदा भाजप कडून समोर आलाय ? 

           स्वतला ओबीसी नेतृत्व म्हणायचे मात्र सत्तेचा लाभ केवळ वंजारी समाजाला द्यायचा मग निवडणूक आली कि साळी माळी कोळी धनगर , डोक्यावर दुरडी भाजी विळा , घोंगडी सर्व काही येते . माळी समाजाचे कल्याण आखाडे मेरा परिवार भाजपा परिवार करत आहेत मात्र त्यांना साधे मंडळ देण्यात पंकजा मुंडे कमी पडतात मात्र तेव्हाच पंकजा मुंडे वंजारी समाजातील प्रवीण घुगेंना बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष पद दिले जाते , बाल चळवळ उभी करणारे  दत्ता जाधव ,मनीषा तांगडे  तत्वशील कांबळे यांना नाही मात्र  बालसमिती डॉ अभय वनवे यांना अर्धन्यायिक पद दिले जाते . एकाच व्यक्तीला दोन समित्या देण्याचे काम बीड मध्ये कुणी केले अन ती व्यक्ती कुठल्या जातीची आहे हे ओबीसींना कुणी सांगणार आहे काय ?  वंजारी समाज आपल्या पासून दूर नाही  हे दाखवण्यासाठी  डॉ भागवत कराड वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे काय ?  . विदर्भाचे म्हणजे बुलडाना जिल्हायचे शंकरराव नागरे   औरंगाबाद वैधानिक मध्ये संधी कशासाठी दिली . विमान तळावर सतीश नागरे जे कर्तव्य बजावतात त्याचीच हि बक्षिसी आहे काय ? माळी समाजाचा केवळ वापर केला जात नाही का ? पक्ष म्हणून भाजपने सावित्रा बाई फुले यांना भारत रत्न देण्याची भूमिका घेतली नाही तेव्हा आपण ओबीसी नेत्या तर का आवाज उठवला नाही . राष्ट्रवादीच्या खा सुप्रिया सुळे यांनी संसदेत भारतरत्न साठी प्रश्न उपस्थित केला तेव्हा प्रीतम मुंडे यांनी टाळ्या तरी वाजवल्या बाकावर हात बडवून . सावरगाव च्या मेळाव्यात जी घोषणा केली होती कि उस तोड कामगार मुलांना उच्य शिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल . याचा लाभ दिलेले ७ लाभार्थी वंजारी समाजाचे आहेत काय , मग इतर कुणी ओबीसी ऊस तोडत नाही का मग वंजारी सोडून इतरांना लाभ द्यायचा नाही काय  . कायम जात डोक्यात ठेऊन पंकजा मुंडे राजकारण करत असतील तर इतर ओबीसींनी त्यांचे राजकीय भांडवल व्हायचे काय ? एकीकडे मराठा समाज आपणास विरोध करतो म्हणायचे मात्र सत्तेत सर्वाधिक लाभार्थी चेहरे जे पंकजा मुंडे यांच्याकडे आहेत ते मराठा आहेत . हे ओबीसींना कळणार नाही काय ? बीड जिल्हा परिषद मध्ये समाज कल्याण सभापती कोण असावा याचे संकेत आपण विसरलात अन हंगेंना पद दिले , खुल्या प्रवर्गासाठी अध्यक्ष पद असताना आपण ओबीसीच्या नावाखाली विजय गोल्हार यांच्या पत्नीस खुर्चीवर बसवले ते फक्त त्या वंजारी आहेत म्हणून का ? गयाताई कराड राज्याच्या 

 शिवाजी बांगर  ज्यांना जिल्हा परिषद मध्ये खुर्ची देताना कुठला नियम डावलला ? बांधकाम विभागात हनुमान सानप हे त्यांचेच मेव्हणे ना ?   बीड पोलीस मधील एल सी बी चे मुख्य घनश्याम पाळवदे यांची बदली झाली तरी कुणी थांबवली  ? नियमाने पाळवदे हे एल सी बी सारख्या अर्थपूर्ण खुर्चीसाठी पात्र आहेत काय  ? जील्हा परिषद बांधकाम मध्ये शिवाजी बांगर जे आज निवृत्त आहेत  त्यांना न बसणाऱ्या जाग्यावर बसवण्यात कुणाचे आशीर्वाद  होते , महावितरण मध्ये देखील सानप कुणाच्या आशीर्वादाने आपले कर्तव्य बजावत आहेत ? जिल्ह्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ पालवे यांच्या कारकिर्दीत रोगाने अंथरवन पिंपरीत शेळ्या मेंड्या दगावल्या त्यात कुणी आशीर्वाद देऊन प्रकरण शांत केले ? न्याय व्यवस्थेत देखील   राख  तांदळे  दराडे यांना ना . पंकजा मुंडे  यांनी अर्थपूर्ण मानाच्या खुर्च्या दिल्या अशी चर्चा लोक उगाच करतात काय ? मंगेश पोकळे यांनी या ठिकाणी शिफारस लाभली नाही ती फक्त ते मराठा आहेत म्हणून काय ? ( निवडी नियमानेच  असतील मात्र त्या निरागसच आहेत हे मान्य करायला अनेक नकार आहेत )  बीड जिल्हा परिषद मध्ये जी वकिलांची निवड असते त्यात  किरण जाधवर , विठ्ठल चाटे , standing कौन्सिल  मध्ये असल्याचे बोलले जाते . वकील शारदा चाटे , भागीनाथ बोडखे , रामचंद्र निर्मळ . मोरे , अविनाश आघाव . यांच्या नेमणुका पाहितल्या इथे काय महत्वाचे आहे यावर सवाल उपस्थित होतो . 

   उपनिबंदक कार्यलयात डी.डी.आर . बडे यांना तीन वर्षे अधिक ना पंकजा यांचीच राजकीय अभय लाभले  नाही काय ? बीड जिल्हा रुग्णालयात शल्य चिकित्सक असलेले डॉ . नागेश चव्हाण यांना जिल्ह्यातून बाहेर जाताना त्यांना त्यांची जात आडवी आली काय असे देखील बंजारा समाजातील काहींना वाटते आहे . 

       वीधी मंडळ सदस्यांच्या बैठकीत  मराठा आरक्षणाच्या विरोधात भाषण केले अशी चर्चा आहे म्हणून मराठा समाज पंकजा यांच्यावर वैयक्तिक नाराज आहे अश्या वेळी त्या नाराजीस मराठा विरुद्ध ओबीसी चित्र का म्हणून तयार व्हावे ? राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री असताना कोपर्डी येथील चिमुकलीच्या घरी भेटायला वेळ मिळाली नाही का ती मुलगी मराठा समाजाची होती म्हणून गेला नाहीत काय ? विठ्ठल तिडके नावाच्या मुलाने जेव्हा शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरले ज्यात तिडके यांनी ना पंकजा मुंडे यांच्या बद्दल सहानुभूती दाखवत ते शब्द वापरत होता तेव्हा पंकजाताई गप्प राहिल्या त्यातून मराठा द्वेष दिसला ज्यांना त्यांना तो जातीवाद वाटणार नाही काय ? होळ येथील शिवाजी महाराजांच्या नावाने निर्माण चौक वेशीवरून कुणी का वाद केला हे पंकजाताई  यांना माहित असताना त्यात काय केले ? 

गुत्तेदारांची यादी काढली अन त्यांचे आडनाव काढली तर असे वाटते एकाच जातीची मक्तेदारी आहे ? 

        योगिनी जायभाये / थोरात यांना जिल्हा परिषद चे अध्यक्ष पद आपण देऊ शकला असता ज्या जन्माने वंजारी आहेत मात्र त्यांचे सासर मराठा आहे म्हणून त्यांना डावलले हि चर्चा खरी आहे काय ? जिल्ह्यातील महत्वाच्या खुर्च्यावर वंजारी समाजचेच अधिकारी हा आग्रह तुमचा नसतो हे सिद्ध करता येईल काय ? लोकसभेच्या धाम धुमीत एक संदेश कमालीचा फोरवर्ड होत आहे जो आपल्याला जश्याला तसा देत आहोत 

ताई शप्पथ तुम्ही जातीवादी नाहीत? 

 पंकजाताई तुम्ही ओबीसीच्या नेत्या म्हणवता पण सत्तेचं लाभाचं झुकतं माफ फक्त वंजारा समाजालाच का? जि.प.मध्ये सत्ता मिळवतांना मराठा समाजाला डावलले याला आमची हरकत नाही, (तो राजकारणाचा भाग समजू हवं तर) परंतू सविता गोल्हार ऐवजी दुसरी ओबिसी महिला तुमच्याकडे खरचं नव्हती का?, शिवाजी बांगर सारखा शाखा अभियंता तुम्ही थेट कार्यकारी अभियंता बनवलात, जिल्ह्यात प्रशासनातील 60 टक्के महत्वाच्या पदावरील अधिकारी हे वंजारा समाजाचे आणून बसवलेत, (सानप, केकान, नागरगोजे, पालवे, फड) यांच्यासह अनेक नावं आहेत जी महत्वांच्या खात्यावर ठाण मांडून बसवलीत. समाजकल्याणचं खातं पेलवू शकेल असा एकही दलीत कार्यकर्ता तुमच्याकडं खरचं नव्हता का ?ओबीसी म्हणजे फक्त वंजारा आहे का? मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद देतांना कराड ऐवजी तुम्हाला तुमच्यासाठी दिवसरात्र झटणारा कल्याण काका आखाडे का आठवला नाही, ज्या निधीच्या तुम्ही गप्पा मारता त्याच निधी वाटपात तुम्ही भेदभाव केला नाही का? 2515 च्या निधी वाटपाच्या यादीवर एकदा तुम्ही नजर टाका, वंजाराबहूल गावांमध्ये 500 लोकसंख्या असतांना तुम्ही 50 लाखांच्या पुढे निधी दिला, मात्र ज्या गावात माळी,धनगर, बंजारा, सुतार, लोहार, कुंभार आदींसारखे ओबीसी समाज तीन हजारांच्यावर आहेत अशा गावांमध्ये तुम्ही 2 लाख 99 हजारांचा निधी दिलात असं का? हा जातीवाद नाही का? दुसर्‍यांच्या डोळ्यातील कुसळ बघतांना ताई तुमच्या डोळ्यात रुतून बसलेलं जातीवादाचं मुसळ आदी बाजूला काढा हो...

       बीडच्या जिल्हा परिषदेत बिंदू नामावलीत अफरा तफर करुन आलेल्या हजाराच्या वर आपल्या जातभाईंना वाचवण्यासाठी किती आटापिटा करणार आहात. नियमानुसार अख्ख्या जि.प.मध्ये वंजारा समाजाचे 275 पेक्षा जास्त शिक्षकांची पदे नाहीत, अशावेळी बीड जिल्ह्यात कार्यरत असलेले 3300 शिक्षक कुणाच्या जागा गिळून बसलेत. धनगर, माळी, बंजारा, कुंभार, सुतार, लोहार यांच्यासह दलित व खुल्या प्रवर्गातील मराठा समाजांवर अन्याय करतांना तुमच्यातील जातविरहीत भावना का जागी होत नाही. उच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही केवळ आपल्या जातीतील शिक्षक आहेत म्हणून मंत्रालयातून आदेश काढणार्‍या तुम्ही जातीवादीत नाहीत का हो? तुमच्या जातीच्या माणसांना जिल्ह्याबाहेर नोकरी करतांना अडचणी येतात. मग गेल्या वीस वीस वर्षापासून आपली माय-बापं, लेकरं बाळं सोडून काळजावर दगड ठेवून जिल्ह्याबाहेर नोकरी करणार्‍या अन्य जातीतील शिक्षकांचं, नोकरदारांच काय? ती तुमच्या जातीची थोडीच आहेत नाही का? ताई बोलण्यासारखं खूप आहे हो पण आमच्याच काही औलादी फंद फितूरी करणार्‍या आहेत म्हणून तुम्हाला दोष देण्यात अर्थ नाही. विनंती फक्त एकच आहे, की वंजार्‍यांच्या गावात जावून प्रखर जातीवादी भाषणं करतांना, ओबिंसीबरोबर गुप्त बैठका घेतांना तुम्ही जी विखारी व जातिवादी भाषा वापरता ना तो जातिवाद नाही का? हे तुमच्या अंतरमनाला विचारुन पहा. स्व. बाबांची शप्पथ घेवून फक्त एकदा म्हणा की तुम्ही जातीवादी नाहीत, छत्रपतींची शप्पथ घेवून सांगतो आम्ही घरातील ज्वारी विकून तुमचा प्रचार करुत... फक्त यासाठी तुमच्यातील जातीवाद आधी बाजूला करा... लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी अवस्था तुमची झालेली आहे. म्हणून आधी नसानसात ठासून भरलेला जातीवाद बाजूला सारा, मराठ्यांना, वंजारा वगळता अन्य ओबिसीं, दलितांन दिली जाणारी वागणूक बदला आणि मगच मत मागा ऐवढीच अपेक्षा.   खासदार प्रीतमताईनी बीड शहरात मुस्लीम मुलींचे वसतीगृह बद्दल कुठलीच भूमिका न घेणे हे मुस्लिमांबद्दलचा आकस दाखवते काय ? मराठवाड्यात मुस्लीम बहुल समाज बीड मध्ये असताना उर्दू घराची मागणी आपल्याकडून दखल घेणे इथपत देखील नाही काय ? युपीएससी मध्ये   क्रीमिलीयर माहिती नसल्याने अनेक ओबीसी विध्यार्थ्यांना त्रास झाला . तेव्हा खासदार प्रीतम मुंडे यांनी या समितीच्या कुठल्या बैठकीला हजेरी लावली आहे काय ? नसेल तर ओबीसी म्हणून आपली कर्तव्यचूकच नाही काय ?

   भगवान गड व दसरा मेळावा या आयोजन तणावात  ना पंकजा मुंडे यांचे संभाषण जे वृत्त वाहिन्यावर प्रसारित झाले ते ऐकल्यावर देखील त्यांच्या एकांगी दृष्टीकोणाची चाहूल लागते . 

ताजे लेख

मोदी-शहांचा गांधीकोट लोक गायब शाही शिल्लक, जुगाराचा संघ

एकाच वेळी अनेक जागांवर जुगार खेळण्याचा अवसानघातकी खेळ मोदी खेळत आहेत , पेशंट थेट ओटीला घेण्याचा ...

जोगव्यासाठी ‘भगवा’ राज मुद्रेत मोदीशाहीचा नवा भोई

मुंबईत काल दोन राजमुद्रा होत्या एक ध्वजावर आणि एक डायसवर, सेक्युलर इंजिन बाजूला काढून ‘कृष्णकुंज’ने एक रंग ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king