12 December

निमताळा आत्मघात

hows the fight
By भागवत तावरे
  • 1190 View

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ? 

       फक्त १० मिनिटे बोला असे माजीमंत्री पंकजांचे फर्मान असताना नाथाभाऊंचे भारुड वगा सारखे लांबले , राजकीय शिष्टाचाराचे लक्तरे टांगून त्यांनी टाळ्या कमावल्याही   मात्र पक्षीय राजकारणात  पुरती वाट लावून घेण्याचे आणि आणखी एकाची लावण्याचे आत्मघाती स्फोटच  त्यांनी केले . पंकजा मुंडे यांनी आपल्या पित्याची जयंती  राजकारणात वापरून घेताना अघोरी मात्र तितकीच धाडसी कृती केली काय ? असा प्रश्न का न पडावा कारण भाजप ला थेट बोट दाखवून त्यांनी नवे आव्हान स्वीकारले आहे . साध्या भाषेत ये रे उद्योगा म्हणता येऊ शकते असे  . मुंडेंच्या भाषेत सांगायचेच झाले तर "  हम तो डूबे सनम लेकीन तुमको लेकर " सारखा प्रकार नाथा भाऊ यांनी केला . राजकारणात आत्मविश्वास आणि अहंकार याच्यात किंचित रेषा असते आम्हाला तो फरक उमजला कि मग  आमचा शरद पवार होणार का देवेंद्र फडणवीस हे ठरत असते . पंकजा मुंडे यांना नेमकी तीच रेषा उमगली नसावी , नसता खडसेंचे पडसे त्यांनी गडावर शब्दबद्ध होऊ दिले नसते .
       लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने १ डिसेंबर पासून भाजपच्या अंतर्गत राजकारणाला सुरवात झाली , न बोलता आपण टीव्हीवर होतो याचे स्व कौतुक असल्याचे पंकजा मुंडे यांनीच   सांगितले . व्यक्ती पेक्षा पक्ष नेहमीच मोठा असतो हाच संस्कार सर्व पक्षात जोपासला जातो . वैयक्तिक आकांक्षा आणि मतभेद समोर करत पक्षावरचे वार आजवर यशस्वी झालेले नाहीत .  लोकनेते स्व. मुंडे यांचीच दोन बंड त्याचे सोदाहरण ठरतात , त्यांनी केलेल्या पहिल्या बंडात ८० टक्के पदाधिकाऱ्यांनी राजीनामे फिरकावले होते अन दुसऱ्या बंडात खडसे फुंडकर शिवाय असे कुठले महत्वाचे चेहरे सोबत तरी होते का ? हे सगळ एकनाथ खडसे यांना माहित नाही असे नाही , मात्र एकट्याच्या जीवावर भाजप गिनत नाही हे लक्ष्यात आल्यावर एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे  यांना घेऊन गत महिन्यात बंडाची उडी घेतली आहे . मात्र ज्या एकनाथ खडसे यांना स्वतचे तिकीट घेता आले नाही त्यांनी ६ तिकीट , स्वतचे आणि मानलेल्या भावाचे एक असे दोन कैबीनेट , हट्टाने आ विनायक मेटे यांना मंत्री पदापासून रोखणे , प्रचंड निधी आणि स्वायत्ता घेऊन ५  वर्षे सत्तेत राहणाऱ्या पंकजा मुंडे  यांना स्वतच्या मापात घेणे सयुक्तिक कसे ? 
     काल पंकजा मुंडे बोलत असताना आपल्याच युक्तिवादाला खोडत होत्या , त्यांचेच  वक्तव्य होते दबाव करणे माझ्या रक्तात नाही , मेळाव्याच्या अगोदर चंद्रकांत दादा यांना ४० मिनिटे चार भिंतीत घेऊन दबाव वाढवला  नव्हता असे कुणी म्हणेल का ? भाजपच्या प्रदेश अध्यक्षा समोर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी भाजपला थेट आव्हाने दिली ती पक्षाच्या निरक्षणात आले नसतील काय ? देवेंद्र फडणवीस यांना दोन्ही नेतृत्वाने एकेरी शब्दात उल्लेखित करणे हा आकस सिद्ध करतो , राजकारणात स्पर्धा मान्य मात्र आकस कायम अंगलट आल्याची उदाहरणे आहेत . शेवटच्या रो मधला गुबगुबीत पहिल्या सफ मध्ये कसा आला याचा अभ्यास केला पाहिजे . मनातले मुख्यमंत्री होण्या पासून खडसे आणि मुंडे हेच एकमेकांचे स्पर्धक नव्हते काय ? कालच मनातल्या मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवरच, त्यांच्याच पित्याचे नाव घेऊन एकनाथराव काय म्हटले , तर  खडसे मुख्यमंत्री असते असे म्हटले नाहीत काय ? आज पक्ष सत्तेत नसल्याने समदुखी बनलेले खडसे - मुंडे दोन्ही संस्थाने सवते स्वप्ने बघणारी नव्हते काय ? खडसे मंत्री बनून जेव्हा गडावर आले होते आणि मंत्री नसताना आले तेव्हा त्यातला फरक समजून घेण्यासारखा आहे . चंद्रकांत दादा यांनी उद्या पक्ष यशस्वी झाला तर अपराधी पणा वाटू नये याचे भान ठेवण्याचे सांगणे हा दोन्ही बहुगुणी नेतृत्वांना इशारा नाही काय ? विशेष म्हणजे दादा जेव्हा म्हटले तेव्हा खड्सेंचे भाषण झाले होते, पंकजा मुंडे यांचे भाषण होणार होते , मात्र त्यांनी इंजेक्शन दोन्ही नेत्यांना दिले  , याचा अर्थ पंकजा मुंडे काय बोलतील याचा पूर्ण अंदाज चंद्रकांत दादांना आलेला होता .  नशीब पंकजा यांनी सुरवातीला आपल्या सद्गुणी कार्यकर्त्यांना सांगितले कि दादा प्रदेश अध्यक्ष आहेत कुणीही काहीही अप्रिय बोलू नये , याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा कि जर चंद्रकांत दादा बोलण्या पूर्वी पंकजा यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले नसते तर दादांना काय काय काय ऐकावे लागले असते हे पंकजांना नक्की माहित असावे , असो . 
     पंकजा मुंडे यांच्या भाषणाचा अभ्यास केला तर त्यांना नेमके काय बोलायचे होते ,का मग काहीही बोलायचे होते ? हा प्रश्न पडतो . बंड आपण करणार नाही  मग बंडखोरीचे कौतुक कसे केले ,  भाजप आपल्या बापाचा पक्ष आहे  मी सोडणार नाही मात्र पक्षातून  काढा म्हणणे याचा अर्थ काय  , भाजप सोडणार नाही मात्र मशाल गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान नावाने फिरवणार याचा अर्थ काय ? कोअर कमेटीत ठेऊ नका असे म्हणणे याचा अर्थ काय ? देवेंद्र यांच्यासाठी एकलव्य व्हायला तयार असणाऱ्या पंकजा मुंडे गेल्या दोन बैठकांना कुठल्या दुखण्या मुळे गैर हजर होत्या ?  एकनाथ खडसे यांचे भारुड वेगळे आहे मात्र त्यात पंकजा मुंडे यांनी सुरात सूर मिळवणे भाजप साठी द्रोह ठरावा .    मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला आ विनायक मेटे यांनी केवळ हार काय घातला तर स्वतच्या पक्षाच्या विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र यांचा काय पान उतारा केला हे बीड च्या रेस्ट हाउस च्या भिंतींना ठाऊक नाही काय ? देवेंद्र फडणवीस यांची गोची करण्याची कुठलीही संधी त्या दोन दिवसात सोडली नाही , पाहिजे ते मिळवून घेणाऱ्या पंकजा मुंडे यांनी गेल्या ५ वर्षात सत्तेचा पूर्ण लाभ घेतला नाही काय ? जिल्ह्यातील राजकारणात लाभ मिळवून देणारे  किती निर्णय त्यांनी फिरवले , सत्तेचा पूर्ण वापर करून स्व जातीय अधिकारी मानाच्या अर्थपूर्ण खुर्च्यावर बसवले नाहीत काय  , महादेव जानकर आमदार म्हणून कुठे निवडून तरी येतील का मात्र तरीही पंकजा यांचा भाऊ म्हणूनच मंत्री झाले नव्हते काय ?    भगवान गडावरून पाय उतार झाल्यावर पहिल्या दसरा मेळाव्यात  पंकजा मुंडे यांचे भाषण आठवले तर लक्ष्यात येईल कि जानकर , खोत , शिंदे  यांचे नाव घेऊन त्या म्हटल्या होत्या यांना मंत्री कुणी केले , संगीता ठोंबरे पासून भीमराव धोंडे यांच्या आमदारक्याचे मातृत्व देखील त्यांनी आपल्याकडे घेतले होते , मग हे सर्व मंत्री आणि आमदार देवेद्र सरकार मध्येच होते हे खडसे यांना माहित नाही काय  . जानकर यांनी महंत नामदेव शास्त्री यांना वर्षात बदलू म्हटल्याची वल्गना , आम्ही खोट्या केस करतो म्हणणे हे संदर्भ पंकजा मुंडे यांच्या सत्तेच्या राजकारणातले आहेत . त्यामुळे पंकजा यांनी पक्षाकडे अन्याय झाल्या सारखी भावना व्यक्त करणे अतार्किक आहे . 
    लोकनेते  गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वा बद्दल कुणाच्या मनात संशय असण्याचे काही कारण नाही मात्र त्यांच्या नावाची प्रेरणा नाही तर भांडवलीकरण हा त्यांचा अवमान ठरावा , एकनाथ खडसे यांनी तरी त्याचे भांडवल का करावे . स्व गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी नेते दर्शन नाही तर बंद खोलीत राजकीय तह करत नव्हती काय ? 
        धनंजय मुंडे सारखा सक्षम पर्याय बीड आणि समाजाला मिळतोय हे पंकजांच्या अस्वस्थतेचे मुख्य कारण नसेल कशावरून , तब्बल ३० हजाराने पराभूत झालेल्या पंकजा यांनी आपण पराभवाने खचणारे नसल्याचे सांगितले मग हा सारा सारीपाट कशासाठी आहे , देवेंद्र यांनी जसा विरोधी बाक स्वीकारला  तद्वत त्यांनी देखील भूमिका घेणे  अपेक्षित असावे  ? मात्र भाऊ पुढे गेलाच नाही पाहिजे असेच त्यांना वाटत असावे ? १० हजार समीप मुंडे भक्तांच्या म्हणजे हक्काचे मावळे एकत्र करून त्यांनी मोदी शहांच्या भाजपला आव्हान दिले आहे ?  समोरच्या टाळ्या पाहून आणि एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याला दाद पाहून हे स्पष्ट आहे कि परळीच्या पराभवात आरोपी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहितले जात आहे , मात्र पराभव ३० हजाराचा आहे हे कुणी लक्षात घेताना दिसत नाही ,   देवेंद्र फडणवीस यांनी ३० कोटी परळीला पाठवल्याचा आरोप काहीजण करताना ऐकिवात आहे . रिकी पोंटिंग के बल्ले मे स्प्रिंग थी अशीच  मानसिकता परळी निकाल संदर्भात भक्तात दिसून आली . पराभव शिकण्यासाठी असतो , विरोधात बसून लोकांचे प्रश्न उचलून राज्याचा चेहरा होता येते  वडिलांनी आणि भावाने सिद्ध केले आहे . मात्र खडसे यांच्या भांडणात आपला पाय टाकून पंकजा मुंडे यांनी आपला राजकीय आत्मघात केला आहे काय असा संशय येतो . पंकजा मुंडे यांचे राजकीय भविष्य संतुलित असेल याची शाशंकता वाढलेली आहे , येणाऱ्या काळात त्यांनी ओढावून घेतलेली जोखीम त्यांचे पेच वाढववेल  आणि प्रगल्भतेच्या उणीवेची जाणीव होईल असे वाटते आहे . 

पंकजा मुंडे यांच्या भाषणाचे बारीक निरक्षण केल्यास पंकजा मुंडे यांनी आपली आई जनतेत म्हणजे व्यासपीठाच्या खाली बसल्याचे सांगताना त्या  महाजनाच्या  आहेत  असा उल्लेख का केला याचा ठाव गरजेचा ठरतो . वडिलांचा पक्ष सांगताना त्यांनी हेडगे वार ते मोहन भागवत यांचे नाव घेऊन आपले संघ कनेक्शन सांगितले आहे मग असेच असेल तर त्यांचे पुरोगामीत्व आणि त्यावर त्यांच्या बहीण खा प्रीतम मुंडे यांचा रोख परस्पर विरोधी ठरतो .

टीप - लेख लिहणे संपेपर्यत पंकजा मुंडे यांच्या फेसबुक च्या कव्हर पेज मध्ये चक्क कॉपी पेस्ट केलेली जनसंख्या दाखवण्यात आल्याचे समोर आले 

ताजे लेख

मोदी-शहांचा गांधीकोट लोक गायब शाही शिल्लक, जुगाराचा संघ

एकाच वेळी अनेक जागांवर जुगार खेळण्याचा अवसानघातकी खेळ मोदी खेळत आहेत , पेशंट थेट ओटीला घेण्याचा ...

जोगव्यासाठी ‘भगवा’ राज मुद्रेत मोदीशाहीचा नवा भोई

मुंबईत काल दोन राजमुद्रा होत्या एक ध्वजावर आणि एक डायसवर, सेक्युलर इंजिन बाजूला काढून ‘कृष्णकुंज’ने एक रंग ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king