10 January

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

why talk nikhil wagle
By भागवत तावरे
  • 6960 View


 मराठयांना का डिवचता 

भारतीय राज्यघटनेच्या भाषेत सांगायचे तर अभिव्यक्तीचे अधिकार मान्य केले असताना कुणी कुणाला कुठल्या विशेषनामुळे दुखायचे कारण नाही , जिथे गल्ली बोळात दादा भय्या , अण्णा , पुराव्याशिवाय असतात.  तिथे ज्या छत्रपतींनी अवघी रयत सुखी केली त्यांच्या तेराव्या वंशजाला कुणी राजे म्हणत असेल तर निखील वागळे यांच्या पोटात का दुखायचे होते . ‘वाद अंगावर ओढवून घेण्य़ात वागळेंना मजा येते. त्यातील नितीमूल्यांसाठी झगडण्याचा आव धादांत खोटा असतो, हेही सांगितलेच पाहिजे.’अतिरेक अन कट्टरता नेहमी विध्वंसाला कारणी पडते . कुठल्याच वृत्तवाहिनीने कामावर ठेवण्याची लायकी गमावलेला ना लायक समजलेले निखील वागळे यांच्या जन्म फक्त वाद लावण्यासाठी झाला आहे काय असाच प्रश्न पडतो. भिडे , भीमा कोरेगाव प्रकरणात जातीय तेढ वाढत असल्याचे माहित असताना उदययन राजे भोसले यांना आपण राजे का म्हणावे , अथवा त्यांच्यावरील गुन्हे बाबद बोलले . आता प्रश्न हा आहे घटनेने बोलण्याचा अधिकार दिलेला असला तरी वागळे यांची वटवट याच वेळेला का बाहेर पडली . निखील वागळे सारख्या पत्रकाराला हे माहित नाही का कि भारतीय समाजात प्रेरक व्यक्तीमत्वे समाजाचे संचालन करतात . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून प्रकाश आंबडेकर यांचे चरणे धरली जातात , बाबासाहेब ज्या गाडीने प्रवास करून गेले त्या गाडीला आन आम्ही प्रेरणा मानतो , छत्रपती शिवरायांचे किल्ले म्हणजे काही दगड मातीची ढिगारे नाहीत , आज हि रायगड चढताना डोंगर नाही तर स्वराज्य दिसते अन धमन्या ताणल्या जातात , गावागावात छत्रपतीचा जागर केला जातो . सातार च्या दरी खोऱ्यात पाहितले तर आज हि घोड्यांचा टापा ऐकू येणारे शिवप्रेमी कोटीच्या घरात आहेत . असे असताना निखील वागळे त्या कोटी समाजाच्या अस्मितेच्या प्रतीकाला का म्हणून खिजवत होते ?  तेरावे वंशज म्हणून उदयन राजेच्या वागण्या बोलण्यावरून मतप्रवाह असू शकतात मात्र जिथे आपल्या परिघात उदार कर्णाची वृत्ती अन झोकून देण्याची पृवृत्ती  ज्या खासदारांनी जपली आहे त्यांना बोलताना वागळे यांनी तारतम्य ठेवायला हवे होते . अश्या वक्तव्याने मोठ्या समाजाचा अहम दुखावणार हे निखील यांना माहित नसेल काय ? असे असताना असे बोलणे म्हणजे एक प्रकारे तणाव जन्माला घालण्यासारखेच आहे . राज्यात ५८ मोर्चे काढून शांतता प्रस्थापित करणारे मराठे भीमा कोरेगाव प्रकरणात कमालीचे संवेदनशील राहिले म्हणून अनर्थ टळला मात्र त्या नंतर देखील वागळे सारखे कट्टर पुरोगामी समाजात तेढ पेरत असतील तर शब्दाने तोंड फोडले पाहिजे . कुठल्या एका वृत्तवाहीनीत कधी टिकला नाही यांचा तोरा , निवेदक होते का भांडणखोर असी चर्चा करणारे निखील कायम तक्रारीचे धनी . 
       खालचा सारा शब्दसंचय वाचून तर अवाकच व्हावे ,आपल्या उथळ व सनसनाटी माजवण्याच्या हव्यासामुळे निखील काही प्रमाणात लोकांचे लक्ष वेधून घेतो. पण जेव्हा त्याच ओरडाआरड्यात तोचतोचपणा येऊ लागतो, तेव्हा लोकही तमाशाला कंटाळतात आणि निखीलकडे पाठ फ़िरवतात. मग काहीतरी करून पुन्हा लोकांचे लक्ष वेधून घेण्य़ासाठी निखील कुरापत काढतो आणि मुद्दाम वाद अंगावर ओढवून घेतो. त्यातही यश आले नाही, मग  मच्छीका पानी  कुणाच्या तरी अंगावर सांडून आपल्यावर हल्ला होईल, अशी योजना निखील शिजवतो आणि अंमलात आणतो. अलिकडेच त्याच्या ‘मी मराठी’ वाहिनीवरील कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि निखील परत शेफ़ारला. सहाजिकच त्याकडे लोक दुर्लक्ष करू लागले. मग पुन्हा लोकांची सहानुभूती वा लक्ष खेचण्यासाठी निखीलचे नाटक सुरू झाले आहे. हे निखीलतंत्र काय आहे? कपील पाटिलच्या शब्दात सांगायचे तर... अठरा वर्षापुर्वी कपिल पाटिलचा  " आज दिनांक '   बंद पडला, तेव्हा त्याच्या दु:खावर चोच मारण्यातला विकृत आनंद घेताना निखीलने लिहीलेल्या लेखाला उत्तर देणारा लेख ‘सांज दिनांक’ या नव्या दैनिकात कपीलने लिहीला होता. त्यात त्याने निखीलचे संपुर्ण वस्त्रहरण करून टाकले होते. त्यातच उपरोक्त विधान आलेले आहे. पण पुढे खुलासा करताना निखीलने त्याचा कधीच प्रतिवाद केलेला नव्हता. इथेही जे कोणी अनिरुद्ध जोशी आहेत, त्यांच्याशी बोलताना कोण मुद्दाम खाजवून खरूज काढतो आहे व अंगावर घ्यायला उतावळा झालेला आहे, त्याचे प्रत्यंतर सहज येऊ शकते. त्यात ‘मच्छीका पानी’ घेऊन कोण अंगावर जातो आहे, ते नुसत्या शब्दातून लक्षात येऊ शकते. मध्यंतरी ‘मी मराठी’    वाहिनी पहिल्या क्रमांकावर पोहोचलेली होती आणि त्याचे श्रेय अर्थातच निखीलने ‘पॉइंन्ट ब्लॅन्क’ आपल्याकडे घेतल्यास नवल नाही. पण त्यामुळे शेफ़ारला आणि अतिरेक सुरू केल्यावर लोकांनी तिकडे पाठ फ़िरवली. परिणामी त्या वाहिनीची घसरगुंडी झाली. मागल्या आठवाड्यातच पहिल्या पाच मराठी वाहिन्यातही मी मराठीचा नंबर नव्ह्ता. मग निखील आपल्या मू्ळ स्वभावाकडे आल्यास नवल कुठले? वाद व हल्ले ओढवून घ्यायचे आणि त्यातून प्रसिद्धीझोतात रहायचे, हीच निखीलची मागल्या दोन ०- तीन दशकातील कारकिर्द राहिली आहे. कपिल त्याच्या सोबत तीन वर्षे महानगरी पत्रकारीता केल्यावर लिहीतो.....‘महानगरचा खप प्रचंड घसरला आहे. हे मुंबईतला कोणताही पेपेरस्टॉलवाला सांगेल. खपाचा आकडा घसरला की वागळे वाद उकरून काढतात.’ हा हा हा यावेळी देखील त्याने तेच केले फक्त यावेळी त्यांनी आगीत हात घालून कोळसा काढण्याचा भाजील प्रयत्न केला आहे . 
.......

 

ताजे लेख

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king