05 April

स्वप्नाचे राजकारण 

 Dream politics
By भागवत तावरे
  • 1555 View


 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज 
दत्ता प्र्भाळे बीड 


    १९७५ च्या काळात बीड रल्वे आली पाहिजे हा विषय समोर आला . त्यावेळी स्वातंत्र्यसैनिक , बंसीधर जाधव आणि काही पत्रकारांनी  संघर्ष समिती स्थापन केली यात शेकडो नावे घालता येतील   , रल्वे अर्थ संकल्प असला कि निवेदने दिले जाऊ लागले  , बबन ढाकणे दिल्लीत मंत्री झाले तेव्हा या प्रश्नाला राजकीय  हवा मिळाली. पुढे  अत्तर बाबर , सुशीला मोराळे जनार्धन तुपे राजेंद्र जगताप यांनी आपल्या स्तरावर आणि क्षमतेवर प्रश्न चर्चेत ठेवण्यात यश मिळवले . . १९९१ स्व लोकनेत्या काकूंनी प्रश्नाला गती मिळवून दिली आणि १९९६ ला भूमीपूजन केले . नंतर माजी खा  रजनी पाटील यांनी सुरेश कलमाडी यांना आणून भूमीपूजन केले .   २००७ कृती समिती निर्माण झाली अशोक तावरे , अमोल गलधर, भाऊसाहेब डावकर , आघाव या युवकांनी आंदोलनाची उंची वाढवत ती भाजी मंडईतल्या टोवर मार्गे चढवलीआणि वाढवली   .  . विलासराव सरकारच्या काळात दोन मोठे आंदोलन झाले आणि रेल्वे राजकीय मानसिकतेतून लोकभावना म्हणून समोर आली . बीड नगर परिषदेच्या नगरसेवकांनी झुक झुक आगीनगाडी तयार करून चर्चेतले आंदोलन केले .  राज्य सरकारने मातीची कामाच्या जबाबदारी घेतली . भूसंपदान किचकट असल्याने गतिमान झाली नाही . पंतप्रधानाची सावली म्हणून काम करणारे प्रमोद महाजन यांना देखील बीडच्या रल्वे साठी काही करता येऊ नये हे राजकीय दुर्दैव देखील बीड ने पाहितले . पुढे स्व गोपीनाथ मुंडे यांनी आंदोलकांची हवा संसदेत नेली . २०१४ नवे सरकार आले आणि देशातील सर्वच अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे पावले उचलण्यात आले . यातच बीड देखील आला . जेव्हा एखाद्या प्रकल्पात गुंतवणूक झाली कि मग त्या प्रकल्पाला पूर्णत्वाला घेऊन जाने हि अपरिहार्यता असते आणि याच नीती नियमाने बीड रेल्वे काम अधिक गतीने अंग धरू लागले . कुठल्या एका पक्षाने किवा नेतृत्वाने हा प्रश्न सोडवला म्हणणे जुन्या आंदोलकांची प्रतारणा ठरेल . म्हणूनच मुंडे बहिणींनी रेल्वे प्रश्न हा फक्त बाबांचे स्वप्न म्हणणे आणि फक्त आपण रल्वे आणली म्हणून रेल्वेताई म्हणवून घेणे म्हणजे रेल्वे आंदोलनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची प्रतारणा ठरते .   राजकीय लाभासाठी केविलवाणा प्रयत्न म्हणून रेल्वेताई या संकल्पनेकडे पाहितले जाऊ शकते .

 
      बीड च्या रेल्वे स्वप्नाची ८ टक्के परिपूर्तता झालेली असताना ना पंकजा मुंडे यांनी १०० टक्के आनंद साजरा करण्याची घाई दाखवली ती केवळ एक राजकारण होते , हे सांगायला चाचणी हा एकमेव पुरावा काफी आहे. एकूण प्रकल्पातील अंतर पाहता अन नगर सोलापूरवाडी पोत झालेली झुकझुक पाहता रेल्वे ८ टक्के रुळावर आहे . भूसंपादनाचे काम गतीने पूर्ण झाले आहे हे कुणाला नाकारता येणार नाही मात्र भाजपच्या उभय सरकार ने हवा तेवढा निधी बीड ला दिलेला नसताना मोठे आकडे जिल्ह्याच्या माथी मारून भाजपने रल्वेच्या रुळावरून राजकारण गतिमान करण्याचे साधले आहे काय ? हे समजून घेतले पाहिजे . 
        १९९७  मध्ये या प्रकल्पाची किंमत रु.३५०  कोटी रुपये , विभागाची एकूण लांबी २६१  किमी असेल. आज ४५०० कोटीचा झालेला आहे . २०१० ला तत्कालीन विलासराव सरकारने ५० टक्के कामाचा वाटा उचलण्याचे पाउल टाकले ज्या नंतर कामाला गती मिळाली . गत ५ वर्षात २८०० कोटीची तरतूद झाली असून एकूण २६१  किमी चा प्रकल्प १४ किमी रेल्वे चाचणी पर्यंत आलेला आहे .   २०११ मध्ये  प्रस्तावित अहमदनगर-बीड-पारली रेल्वे मार्गाच्या १५ किमी लांब लांबीवर ८ टक्के मातीची कामे आणि ओव्हरब्रिजेस बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे आणि पश्चिम मार्गच्या 'प्रगती ओळ' म्हणून ओळखले जाणारे नवीन मार्ग अपेक्षित आहे. २०१५  पर्यंत तयार होईल असा कयास होता . 
२००९ मध्ये परळी - बीड - नगर या रेल्वे मार्गाची किमत होती १००० करोड मंग २०१५ मध्ये हि किमत झाली ३००० करोड. आता किमत अशी कशी वाढली हे आपण समजून घेऊ चक्रवाढ व्याज पद्धतीने.   आता विचार करा जर दरवर्षी परळी - बीड - नगर या रेल्वे मार्गाची किमत दरवर्षी २०% वाढत जात आहे. 
म्हणजेच जर हा प्रकल्प एक वर्षात पूर्ण केला तरच हा ४५००  करोड मध्ये पूर्ण होईल नाही तर याची किमत वाढत जाईल. 
आताच सरकार म्हणत आहे . हॉटेल नीलकमल मध्ये ना . पंकजाताई मुंडे यांच्या पत्रकार परिषदेत डॉ प्रीतम मुंडे यांनी रेल्वेचे काम २०१९ मध्ये पूर्ण करूच अशी हमी भरली आहे जी केवळ राजकीय घोषणा आहे . कुठल्याही स्थितीत २०१९ मध्ये रेल्वे येण्याची शक्यता चालू कामाच्या गतीवरून आणि निधीवरून दिसत नसताना फक्त मतासाठी मुंडे बहिणी मुद्द्याचे राजकारण करत असल्याचे कागदावरून स्पष्ट होत आहे . याच वेळी प्रीतम मुंडे यांना रेल्वे ताई म्हणणे निव्वळ थट्टा ठरते . 

 

वर्ष मुद्दल (करोड) व्याजदर (२०%) नवीन मुद्दल  (करोड) 
२०१५ २९८५.९८ २०% २९८५.९८ x १.२ = ३५८३.१८
२०१६ ३५८३.१८ २०% ३५८३.१८ x १.२ = ४२९९.८२
२०१७ ४२९९.८२ २०% ४२९९.८२ x १.२ = ५१५९.७८
२०१८ ५१५९.७८ २०% ५१५९.७८ x १.२ = ७१५१.७४
२०१९ ७१५१.७४ २०% ७१५१.७४ x १.२ = ८५८२.०९
२०२० ८५८२.०९ २०% ८५८२.०९ x १.२ = १०२९८.४८
२०२१ १०२९८.४८

( वरील आकड्यात लहानसा फरक शक्य ) 

        मागे  सरकारने २८३६ करोड रुपये (खरच) दिले आहेत अशी पत्रके छापवून आणण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला , तर मग  परळी - बीड - नगर हा रेल्वे मार्ग एक वर्षात पूर्ण करायला सरकारला काय अडचण आहे? का पुढच्या निवडणूक साठी  हा मुद्दा अर्धवट ठेवणार आहेत? का आता केलेली जाहिरात फक्त लोकांना पुढच्या इलेकशन परेंत शांत करण्याचा प्रयत्न  आहे? आता  सांगा जर परळी - बीड - नगर हा रेल्वे मार्ग एक वर्षात पूर्ण नाही केला आणि २०२१ परेंत ढकलला तर हि जी काही वाढलेली किमत (१०२९८ करोड) हि कोण देणार? आणि खरच बीडमध्ये रेल्वे येईल का अजून एक पिढी बरबाद होईल?मित्रानो वरती मांडलेले उदाहरण सत्य होईल जर सरकारने परळी - बीड - नगर हा रेल्वे मार्ग एक वर्षात पूर्ण नाही केला तर. आणि बीडला रेल्वे कधीच चालू होणार नाही. आता सरकारनी स्वतःचे डोळे उघडावेत आणि स्वतःला आणि जनतेला मुर्खात काढण्यापेक्ष्या का मार्ग एक वर्षात किंवा जास्तीत जास्त १ जानेवारी २०१७ परेंत पूर्ण करावा. नाही तर बीडला रेल्वे हि कधीच येणार नाही आणि हि बीडच्या जनतेची फसवणूक असेल.
       रेल्वे हि सरकार आणि व्यवस्थेची प्रासंगिक गरज असताना ती बीड साठी स्वप्न ठरावी हीच मुळात शोकांतिका आहे . देशभरात वाढलेले रेल्वेचे जाळे हे काही आंदोलनामुळे नाही तर तेथील आद्योगिक करन आणि अर्थकारणामुळे आहे . गेल्या पाच वर्षात दोन्ही मुंडे बहिणीकडून कुठला मोठा प्रकल्प जिल्ह्यात आणला गेलाय का हा मूळ आणि अपयश अधोरेखित करणारा सवाल आहे . १९ च्या प्रचारात ज्या अर्थी भावनिक साद समोर आलेली आहे त्यावरून पालकमंत्री विकासाचे राजकारण करू शकल्या नाहीत हे वास्तव समोर आणत आहेत . आज तारखेला बीड रेल्वे प्रकल्पात झालेली सरकारचे म्हणजे जनतेची गुंतवणूक पाहता त्या प्रश्नात राजकीय श्रेय घेण्याची तेवढी संधी नाही मात्र पालकमंत्री बाबांचे स्वप्न म्हणून रेल्वेला आणि रेल्वे आंदोलनाला संकुचित करत आहेत . रेल्वे हि लोकभावना जरूर आहे मात्र ती पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकीय प्रवासाचे वाहन बनण्याचे काही कारण नाही . 

ताजे लेख

मोदी-शहांचा गांधीकोट लोक गायब शाही शिल्लक, जुगाराचा संघ

एकाच वेळी अनेक जागांवर जुगार खेळण्याचा अवसानघातकी खेळ मोदी खेळत आहेत , पेशंट थेट ओटीला घेण्याचा ...

जोगव्यासाठी ‘भगवा’ राज मुद्रेत मोदीशाहीचा नवा भोई

मुंबईत काल दोन राजमुद्रा होत्या एक ध्वजावर आणि एक डायसवर, सेक्युलर इंजिन बाजूला काढून ‘कृष्णकुंज’ने एक रंग ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king