02 April

धर्म भाजपची अपरिहार्यता 

 Religion indispensable to the BJP
By भागवत तावरे
  • 1399 View

लोकांच्या घशात  जातीचा काढा   
             राजकारणाचा एक धर्म आहे , म्हणून धर्माचे राजकारण झाले पाहिजे असे अजिबात नाही ,चाणक्याने म्हटलेले आहे " वारांगना नैव नित्य नित  निपुण " राजनीती वारांगना प्रमाणे वेश्याप्रमाणे आहे नेहमी नव्या ओठांना शिवते , मात्र तसे नाही असे म्हटले नाही पाहिजे . हा युग धर्म आहे . इथूनच महासत्ता होण्याचा मार्ग चालू होतो . अयोग्य लोकांना निवडून दिले तर तो मार्ग लांबनीचां ठरू शकतो . योग्य लोकांना सत्तेत पाठवले तर तो मार्ग गती नीतीने जवळ करता येणार आहे . 
    कुठल्या राजाला अहंकार झाला तर त्याला सत्तेच्या खुर्चीवरून खाली खेचण्याचा प्रत्येक चाणक्याला अधिकार आहे . राजकारण हा युग धर्म आहे .म्हणून वर्तमान दिल्लीचा आखाडा आम्ही समजून घेतला पाहिजे . भाजप सत्तेत आहे अनिर्बंद व निर्विवाद , संपूर्ण बहुमताचे पाच वर्षे भोगून भाजप निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहे .  १४ ची आश्वासने पूर्ण केल्याची साक्ष किवा खुलासा करण्या ऐवजी ,मोदी पासून ते स्थानिक नेतृत्वांनी जातीचे उमाळे सुरु केले आहेत . म्हणजे विकास वेडा झालेला ऐकिवात होते आता मात्र तो  गायब होऊन त्याची जागा धर्म जातीने अन वैयक्तित टीकेने घेतलेली आहे . कालच्या वर्ध्यातील सभेत नरेंद्र मोदी यांनी नेहमी विकासाच्या चर्चा नाही तर  हिंदू आतंकवादावर सर्वाधिक वेळ घातला.

       राज्यातील सर्वच जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारांनी एकतर्फी जातीच्या राजकारणाचा मुद्दा पुढे आणत लोकांच्या डोक्यात जातीचा किडा वळवळ करायला लावला आहे . नरेंद्र मोदी यांनी आपल्या चार वर्षातील योजना उपलब्धी किवा या पुढील नियोजनावर भाष्य करण्या पेक्षा त्यांनी धर्माचा "कोट" केला . इकडे बीड मध्ये देखील भाजपच्या उमेदवारांच्या संपूर्ण सभात जातीचा पाढा वाचला जातोय , त्यात आव्हान जरी वरून दिसत असले तरी त्या आव्हानात असलेली मूळ अपेक्षा वेगळी असल्याचे नाकारता येणार नाही . विकासाच्या निकषावर सरकार राफेलसह फेल ठरल्याचे आता दस्तूर सत्ताधाऱ्यांनी मान्य केले असावे कि काय म्हणून सरकारनेच आता विकासाच्या मुद्यांना बगल देत हिंदुत्व स्वीकारले आहे . वर्धा येथील सभा गर्दीच्या दृष्टीने हाफ असली तरी मोदींचा रोख फुल समजून सांगणारी होती . भाजप पुन्हा हिंदुत्व पुढे करून मतांचे आकुंचन करण्याची खेळी खेळत आहे . बीड सारख्या ठिकाणी देखील भाजप दोन दिवस केवळ जातीचे मुद्दे अधोरेखित करून ओबीसींना निशब्द संदेश देऊ पाहत आहे . येथील जातीय समीकरणात मराठा समाजाकडे बोट केले कि ओबीसी आपोआप झोळीत मते टाकतात असा समज असणारी भाजपा जाणीवपूर्वक निवडणूक जातीच्या गल्लीत घेऊन जाते कि काय अशी शंका आहे . सरकारच्या कारकिर्दीत ओबीसी म्हणून अनेक निर्णय हे निराशा जनक राहिलेले आहेत . ओबीसी केंद्रीय समिती मध्ये असणारे सदस्य हे भाजप चे खासदार आहेत त्यांनी या समिती मध्ये ओबीसीचे कुठले प्रश्न निकाली काढलेले नसताना फक्त मराठा समाजाकडे बोटे दाखवून ओबीसीचा उपयोग साधायचा असेच हे राजकारण ठरणार आहे ? बीड जिल्ह्याच्या पातळीवर चर्चा केल्यास उसतोड कामगार संदर्भात महाराष्ट्र शासनाने कामगारांची प्रचंड फसवणूक केलेली आहे . पंकजा मुंडे यांनी प्रचंड इच्छाशक्ती लावली तरी भारतीय जनता पार्टीला उसतोडकामगारांचे भले करणारे महामंडळ देता आलेले नाही त्या मुळे  उसतोड कामगार भाजपला मते देताना कधी नव्हे डोके खाजवताना दिसत आहे . अश्या वेळी म्हणूनच जातीय आकुंचन हा सोयीचा मुद्दा भाजप ठरवू शकते . जिल्ह्यातील शिंचन प्रकल्प नवीन सोडा मात्र पूर्वीच्या मान्यता असलेले कागदावर आटल्याची चर्चा आहे . रेल्वे संदर्भात अजून हि फक्त आवाज ऐकून समाधान मानावे लागत आहे . गेल्या पाच वर्षात ना. पंकजा मुंडे  पत्रकारांना खूप कमी वेळा भेटल्या त्यात त्यांची वैयक्तिक फक्त एकच पत्रकार परिषद  . काल निवडणुकीच्या धर्तीवर त्यांनी बीड येथील नीलकमल वरील पत्रकार परिषदेत उत्तरे देताना त्यांना बरीच दमछाक लागली . पत्रकारांचे प्रश्न निरुत्तर राहिले तर प्रश्न शिल्लक असताना शेवटचा प्रश्न विचारा असे फर्मान सुटले . यावरून भाजप ला निवडणूक मुद्द्यावर लढवायची आहे काय असा सवाल या निमित्ताने समोर येत आहे . 
 २०१४  साली झालेल्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे मोठ्या फरकाने विजयी झाले होते. या निवडणुकीमध्ये त्यांना ६  लाख ३५  हजार३३५  मते मिळाली होती. मात्र केंद्रामध्ये नवे सरकार आल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांचं अपघाती निधन झालं.२०१४ साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या डॉ . प्रीतम मुंडे यांना भाजपाची उमेदवारी मिळाली. प्रीतम यांना ९  लाख २२  हजार ४१६  मते मिळाली आणि त्यांनी एक विक्रमच प्रस्थापित केला.त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या अशोक पाटील यांना २  लाख २६ हजार ३५ मते मिळाली होते. पोटनिवडणुकीतील या निकालामुळे बीड मतदारसंघाकडे देशातील सर्वच राजकीय विश्लेषकांचे लक्ष गेले.यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र तशी स्थिती नसल्याचे संकेत मिळू लागले आहेत. प्रीतम मुंडे यांनी खासदार निधी पूर्ण खर्च न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्याचे पडसाद सर्वच राजकारणावर उमटूलागले.प्रीतम मुंडे यांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्नही केला. बीड जिल्ह्याच्या वेशीवर रेल्वे आणल्याचा उच्चारही केला.2014 साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या. आता मात्र अशी लाट नाही, 
....
पत्रकार वसंत मुंडेंचे डोळस विश्लेषण 
 बीबीसी साठी प्रतिक्रिया देताना  वसंत मुंडे म्हणतात, "खासदार निधीचा वापर पूर्णपणे न केल्याची माहिती प्रसिद्ध झाल्यावर गेल्या सहा सात महिन्यांमध्ये अनेक कामांना मंजुरी मिळाली आहे. आता ही कामं सर्व प्रशासकीय मंजुरी मिळून प्रत्यक्षात यायला काही कालावधी लागेल. तसंच जिल्ह्यामध्ये लोकांशी संपर्क कमी असणं हासुद्धा प्रीतम यांच्यादृष्टीने अडथळा आहे. बीडच्या जिल्हास्तरावर त्यांचं कार्यालय नाही. सर्व कामकाज परळीमधून चालवलं जातं."2014 साली पोटनिवडणुकीमध्ये अशोक पाटील यांना सव्वा दोन लाख मतं मिळाली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तेव्हा आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा केला नव्हता याचीही आठवण वसंत मुंडे करून देतात.अशोक पाटील यांनी फारसा प्रचार केला नव्हता तरीही त्यांना इतकी मतं मिळाली होती याचाच अर्थ प्रीतम यांच्याविरोधात तेव्हाही मतदान झाले होतं, असं ते सांगतात
.....
पत्रकार संजय मालानीं यांना बजरंग वाटतात मजबूत 
राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये उमेदवारी दिलेले बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष आहेत. सोनवणे आणि त्यांची पत्नी जिल्हापरिषदेचे सदस्य आहेत.
त्यामुळे जिल्हयाच्या राजकारणात त्यांचं सर्वत्र नाव आहे. अशी माहिती स्थानिक पत्रकार संजय मालानी यांनी बीबीसी मराठीला दिली.मालानी म्हणाले, "सोनवणे यांना पक्षांतर्गत विरोधक नाहीत. लोकसभेसाठी ते नवखे असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात ते नवखे नाहीत.येडेश्वरी हा साखर कारखाना ते चालवतात. या कारखान्यामुळे केज आणि परळी दोन तालुक्यांवर त्यांचा प्रभाव आहे. प्रस्थापित नेत्यांविरोधात लोकांमध्ये असंतोष असतो. सोनवणे यांचा चेहरा त्या अर्थाने प्रस्थापित नाही. ही निवडणूक अटीतटीची होईल असं वाटतं.
 वरील दोन्ही पत्रकार बीड मधील नामवंत व लोकमान्य विश्लेषक आहेत . 

.............................

ताजे लेख

मोदी-शहांचा गांधीकोट लोक गायब शाही शिल्लक, जुगाराचा संघ

एकाच वेळी अनेक जागांवर जुगार खेळण्याचा अवसानघातकी खेळ मोदी खेळत आहेत , पेशंट थेट ओटीला घेण्याचा ...

जोगव्यासाठी ‘भगवा’ राज मुद्रेत मोदीशाहीचा नवा भोई

मुंबईत काल दोन राजमुद्रा होत्या एक ध्वजावर आणि एक डायसवर, सेक्युलर इंजिन बाजूला काढून ‘कृष्णकुंज’ने एक रंग ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king