11 August

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

Shastri 's correct stomach and ABP
By भागवत तावरे
  • 5570 View


 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ इंची डबक्यात . अनेकदा अनेक प्रश्न वेगळ्याच चर्चेला जन्म घालतात आणि धर्मपीठ राजकीय शक्तीपिठाच्या अधीन असल्याचे समोर येते . नगर जिल्ह्यातील भगवानगड हा कधी काळीचा बहुजनी भक्तीचा केंद्रबिंदू होता , ग्रामीण भागातील सर्व जातीचे लोक इथे आस्थेने यायचे अन त्यातून सामाजिक अभिसरण साधले जायचे म्हणून नगर-बीड जिल्ह्यातील अनेकांचे श्रद्धास्थान आणि आत्मबळ देणारे भगवानगड केंद्र होते . भगवान बाबा नारायणगडावरून पायउतार झाल्यानंतर धुम्या गडाच्या पायाभरणी पासून ते त्यानंतर च्या राजकीय घडामोडीपर्यंत मी या अगोदर जागर केलेला आहे. म्हणून मी फार भूतकाळात जाणार नाही . मात्र ज्या अर्थी स्व .गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावरून दिल्ली मुंबईचा राजवेध साधला त्या अर्थी त्यांच्या वारसदारांना ती रि खुणावणार नाही हे अशक्यच होते मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या एका राजधारेचे दोन वाहते प्रवाह तयार झाले आणि कुणाचीच नाही तेवढी भगवानगडाची कोंडी झाली .जी मठाधिपती म्हणून महंतांना सहन करावी लागत आहे . स्व गोपीनाथ मुंडे यांनी सत्तेतून गडाचा विकास अन गडावरून सत्तेचे समीकरणे रेखाटली आणि अमलात आणली त्याच धर्तीवर साहेबांचा कौल मिळालेला वारसदार म्हणून पंकजा मुंडे यांनी पित्याचा कित्ता गिरवण्यास सुरवात केली , मुख्यमंत्री ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गडावर आणून भक्तांचा महापूर भाजपच्या रंगात दाखवला . पूर्वी अश्या गर्दिअडूनच्या नेमधारी ध्येयास कुणाचा अडसर नसायचा मात्र हे सर्व जवळून ज्ञात असलेले मात्र रात्रीतून अर्जुनाचे एकलव्य झालेले धनंजय मुंडे खपवून घेतील , हे शक्य नव्हतेच. यातच त्यांनी एकदा बाबांच्या दर्शनाचा घाट घातला आणि गडावर अनुचित प्रकार घडला पुढे तक्रारी झाल्या , महंत नामदेव शास्त्रीनी थेट एकेरी भाषेत धनंजय मुंडे यांचा पत्रकार परिषदेत खुरपूस घेतला. मात्र त्यातून  कधी नाही तेवढा राजकीय दृष्ट्या भगवानगड समोर आला . मात्र यावेळी टीका होती भगवान गडावरून राजकारण होते याची. वैराग्य आणि भक्ती केंद्र असलेला भगवानगड आणि महंत कुठल्या राजकीय व्यक्ती वा पक्षाचे प्रवाहक बनले आहेत काय अश्या शंका समोर आल्या . धनंजय मुंडे या दरम्यान बारामतीच्या पूर्ण विश्वासातील शिलेदार ठरले होते , कधी नाही ती संधी राज्यातील अनेकांना मिळाली आणि भगवानगड काही प्रमाणात का होईना राजकीय रंगाने डागाळला हे मान्यत्व होऊ लागले . मग मात्र नामदेव शास्त्री यांनी आपले ज्ञान पाजळून घेतले म्हणा वा भगवानगडाच्या भक्तीला दिलेले राजशक्तीचे आव्हान म्हणा , महंतांनी गडाचे राजकीय कवच उधळून लावायचे ठरवले कारण दोन्ही प्रवाहातले आळीपाळीने महंतांनाच रडारवर घेऊ लागले यातून महंतांना बाहेर निघायचे होते.  पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगड स्थापन करून महंतांना आयती संधी दिली आणि ती शाश्त्रीने साधली . " पंकजा मुंडे या भगवान गडाच्या कन्या आहेत त्यांनी आपली राजकीय भूमिका गोपीनाथ गडावरून घ्यावी " आणि "भगवान गडाचा श्वास मोकळा झाला " असे दोन वाक्य गोपीनाथ गडाच्या उद्घाटन प्रसंगी बरेच बोलून गेले आणि हेच अधोरेखित झाले कि भगवानगडाचा श्वास कोंदला होता आणि तो पंकजा मुंडे वा त्या अगोदर स्व गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीत .  नामदेव शाश्त्रींनी फक्त सुटका करून घेतली नाही तर भूतकाळातील चुकांना देखील संमती देऊन त्या पुन्हा होऊ देणार नसल्याचे सांगितले अन साहेब प्रेमींची नाराजी ओढवून घेतली . खुद्द नामदेव शास्त्री यांनी गडावरून च्या राजकारणाची पुष्टी देताच दशकभर उघड्या डोळ्यांनी पाहणारे गडावर तोंडसुख घेऊ लागले , गडाला सर्वाधिक मानणारा वंजारा समाज काही इकडे काही तिकडे अस्या पातळीवर पोहचला , प्रतिक्रिया अत्यंत टोकदार येऊ लागल्या , सोशल मीडियात तर शाश्त्रीना एकेरी घेणारे पोस्ट समोर आले , नामदेव शास्त्री यांच्या समोर लोटांगण घेणारा आणि आपली आस्था श्रद्धा व्यक्त करणाऱ्या समाजातील काही लोक राजकीय भूमिकेतून प्रभावित झाली आणि थेट 'नाम्या म्हणे' सारखे अभंग लाखोल्या वाहू लागले . 
    पुढे सबुरीने म्हणा वा धाडस करून म्हणा  नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना राजकीय वक्तव्यास मज्जाव दर्शवला , ज्या दसरा मेळाव्यात स्व गोपीनाथ मुंडे यांनी आपली राजकीय कारकीर्द दाही दिशेला विकसित केली आणि तिचे संचलन गडावरून केले त्या दसरा मेळाव्यास आज नामदेव शास्त्री विरोध करत आहेत आणि त्या बदल्यात साहेब प्रेमींच्या शिव्या खात आहेत . धनंजय मुंडे आणि त्यांचे समर्थकांना नामदेव शाश्त्रीची सदरील भूमिका हि राजकीय दृष्ट्या अनुकूल असली तरी त्यास त्यांचा काही प्रयत्न नाही , नामदेव शाश्त्रींना झालेली ती उपरोक्ती आहे . भक्ती श्रद्धा आणि आस्थेच्या जागेवर राजकीय भूमिका  आणि धोरणे आली आहेत आणि ती गडाच्या अधिष्ठानाला शोभणारे आणि परवडणारे नाही . यातून पंकजा मुंडे यांना त्यांनी दसरा मेळावा घेण्यास मज्जाव शाश्त्रींनी केला आहे तसा तो विरोध गोपीनाथ गडावर इथून पुढे पंकजा यांनी भूमिका मांडावी असे सांगितले तेव्हाच निश्चित झाला होता पण दसरा नेटात आल्याने अधिक स्पष्ट होत आहे .
   याच संदर्भात राज्यातील आघाडीची वृत्तवाहिनी एबीपी माझा ने एक फोन नामदेव शास्त्री यांना केला आणि पंकजा मुंडे यांना भगवान गडावर का बोलू देत नाहीत असे विचारात बातमीदारी सोडून वकिली केली . प्रश्न कर्त्या महिला पत्रकाराने किमान ५ वेळेस पंकजा मुंडे या राजकीय भाष्य करणार नसतील तर त्यांना भगवानगडावर दसरा मेळावा घेऊ देणार का असे विचारतात . मास्याला जर पाण्यात सोडले आणि अपेक्षा केली कि तो पोहणार नाही तर ते शक्य नाही मासा आणि पाण्याचे नाते आहे आणि पोहणे त्याचा धर्म . पंकजा मुंडे या राजकारण करतात त्यांनी भगवान गडावर अभंग जरी गायले तरी त्यातून राजकीय अर्थ हेच एबीपी वाले काढतील आणि अभंगाची गोडी राजकीय घोड्यावर बसवतील आणि चौफेर उधळतील . त्या एबीपी माझा ने तीन तीन वेळा शाश्त्रींना का नको का नको असे विचारले , ज्या अर्थी ज्यांनी अगोदर मुक्तांगण दिले तेच जर आता कुपाटी लावत असतील तर त्यास कुणी का रोखावे , भगवान गड हे तीन पिढ्याचे संस्थान आहे , लाखो लोकांचे गुरु असणारे नामदेव शास्त्री हे आचार साहितेत आरोपी झाले , एका व्यक्तीने सभेत पेटवून घेतले , भगवान गड प्रश्न मांडण्याचे ठिकाण नसून ,
गोपीनाथ रावांचा जन्म झाला नव्हता तेव्हा पासून गड असल्याचे सांगून तर शास्त्रीनि सारेच पाश उधळून लावले , उद्या पंकजा चा मुलगा म्हणेल मला बोलू द्या मग आम्ही काय करणार असा सवाल उभा करत पंकजा यांच्या गडावरच्या भूमिकेला राजकीय नकार दर्शवला . शास्त्री पंढरपूर पैठण आणि आळंदी चे दाखले देऊन भगवानगडावर राजकीय मेळावे नको असे सांगतात मात्र एबीपी ची बाई मात्र अराजकीय भाषण केले तर का नको असा सूर आळवतात तेव्हा मात्र कीव आणि किळस येते त्या दांभिक पत्रकारितेची , ( एखाद्या टी व्ही विशेष एबीपी च्या पत्रकाराने वरील दोन तीन वाक्य वाचले तर जड जातील कारण मी ही ते लिहावेत असे नाही मात्र , नाठाळाच्या माथी काय मारायचे हे आम्ही एबीपी वर पाहितलेले आहे . म्हणून ) काही घटना चुकीच्या घडल्या म्हणून सावधानता म्हणून मज्जाव करत असल्याचे नामदेव शास्त्री सांगत असताना ती प्रश्नकर्ती पत्रकार कुठले राजकारण साधत होती हे त्यांनाच ठाऊक . लोकांच्या मतातून हा निर्णय असून आणि तो पंकजा मुंडे यांना देखील सोयीचा असल्याचा  सांगितले जात होते , पंकजा मुंडे या गडाच्या कन्या असल्याचे सांगितले कि टी व्ही वाल्या मावशी थेट कन्येला बेदखल का करताय असा प्रश्न करून खडा टाकतात , मग हा समाजाला भडकवण्याचा प्रकार म्हटले तर एबीपी ने सहन करावे . सर्वात मोठा कफल्लक पणा एबीपी वाल्याचा हा होता कि गोपीनाथ मुंडे यांची परंपरा जपायला त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडे आल्या तर काय अडचण आहे , त्यावर शाश्त्रींनी टी व्ही वाले भांडणे लाऊ नका म्हणणे म्हणजे सणसणीत चपराक होती तरी मावशी का का का नको चा पाढा वाचत होत्या . एक अत्यंत नेटका खुलासा या दरम्यान शाश्त्रींनी केला तो म्हणजे पूर्वी राजकारण होते म्हणून लोक बोलायचे आता ते मी बंद करत आहे तर तुम्ही बोलत आहात म्हणजे पत्रकाराने वाद लावायचे काय असाच तो रोख होता . आणि मुंबईतून त्या एबीपी ला सामाजिक रोष येणार हे कळाले देखील म्हणून पंकजा मुंडे कुठल्याही परिस्थितीत गडावर गेल्याच पाहिजेत त्यांच्या व्याख्यातले अराजकीय भाषण केलेच पाहिजे असा तो एबिपिचा आव निंदनीय असाच होता . एबीपी च्या बाई साहेब तर समाज आंदोलन करणार असा कयास लाऊन मोकळ्या झाल्या तेव्हा तर टीव्हीत घुसून जाब विचारावा वाटला . समाजाचा हवाला देऊन शाश्त्रींना घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एबीपी वकालतीचा समाचार भगवानगडाला विरोध करणारा वंजारा नसतो आणि तो जन्माला यायचाय असे ठणकावत शाश्त्रींनी शेवटी एबीपीची बोलती बंद केली आणि माजी सुटका झाली जसी तुमची अशी आता झाली , त्यामुळे टी व्ही जपून पहावी एवढेच ....... थकला असताल वाचून तरी प्रतिक्रिया द्या .      

ताजे लेख

मोदी-शहांचा गांधीकोट लोक गायब शाही शिल्लक, जुगाराचा संघ

एकाच वेळी अनेक जागांवर जुगार खेळण्याचा अवसानघातकी खेळ मोदी खेळत आहेत , पेशंट थेट ओटीला घेण्याचा ...

जोगव्यासाठी ‘भगवा’ राज मुद्रेत मोदीशाहीचा नवा भोई

मुंबईत काल दोन राजमुद्रा होत्या एक ध्वजावर आणि एक डायसवर, सेक्युलर इंजिन बाजूला काढून ‘कृष्णकुंज’ने एक रंग ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king