16 May

चोळीबंद  मोदी 

modi in braa
By भागवत तावरे
  • 371 View


शेतीच्या बांधापासून ते दिल्लीच्या कनॉट प्लेसपर्यंत एखादे नाव परिवर्तनाचा केंद्र बिंदू ठरावे असे गेल्या तीन दशकात घडले नाही . मात्र नरेंद्र मोदी नावाने अवघा देश ढवळून काढला , नमो स्तवनात कार्यकर्ते कधी भक्त बनले कळलेच नाही , पेंगू लागलेली लोकशाही एकाएक हवेत उडू लागल्याचा भ्रम होऊन मोदी अन त्यांची भाजप सत्तारूढ झाली . गुळमट गप्पाची मन कि बात झाली अन भाई नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले . न्यूयार्क ते लंडन मोदी मोदी ऐकताना सिंधुनायक विश्वनायक होतोच  आहे असे वाटत असताना भाजपच्या घरची लक्ष्मी जाऊन अवदसा येते आहे काय , असी शंका येत आहे कारण गेल्या तीन वर्षात कधी हि निरुत्तर न झालेला  वा कुठल्याच धुरंधर विरोधकाच्या तावडीत न सापडलेला ५६ इंच चा सीना एका जवानाच्या पत्नीने चोळीत कैद केला आहे , ज्यावर भाजपेयी सोडा थेट मोदींना देखील चकार शब्द काढण्याची सोय नाही . 
      देशातील प्रत्येक धुरंधर ज्या राजकीय नायकाच्या समोर गुडघे टेकून आहे , तूर्तास विरोध करण्यात अर्थ नसल्याचे जाणून नमोरथ दुरून पाहत आहे , राहुल गांधी , मुलायम सिंग , लालू प्रसाद यादव , ममता बनर्जी , मायावती , शरद पवार , अरविंद केजरीवाल , सारख्या  मंडळींना जे नरेंद्र मोदी एका शब्दात गठ्ले नाहीतत्या  नरेंद्र मोदीचा सीना  एका जवानाच्या पत्नीने ब्रा मध्ये कैद केला आहे .भारतीय भविष्याचा हवाला देत अन १२० कोटी लोकांना विश्वास देत देश पुढे घेऊन जाणाऱ्या नरेंद्र मोदींनी जो जो निर्णय घेतला तो लोकांनी मान्य केला अगदी जीव द्यावा लागला तरी . मोदींच्या नोटबंदीत १०० लोक शहीद झाले , लाहोरला जाऊन गुलगुले खाणारे मोदी कधीकाळी पाकिस्तान हल्ल्याचा निषेध करताना मनोमोहन सिंगांना लव्ह लेटर लिखना बंद करणा चाहिये असे म्हणत होते . विशेष हे कि लाहोर मध्ये शुरकुर्मा पिणारे मोदी भारतात येऊन चार दिवस होत नाहीत तो पर्यंत पठाणकोट ला आमच्या सैनिकांची निरंजनी विझली , भारतीय सैनिकांचे शव तोडली जात असतील तर तेव्हाची टीका करणारी , मोदी स्वराज मंडळी सत्तेत असताना आज मुग गिळून गप्प आहे , तत्कलीन कॉंग्रेस वर असणारी नाराजी पाहता लोक भाजपचे वाढील ते पचवून घेत असल्याचे भाजपेयींना ठाऊक आहे , म्हणून ते कधी नोट बंद करतात तर कधी तोंड , भाईयो ओर बहिणो म्हणणारे मोदी म्हणजे मृगजळ आहेत , असी चर्चा होत आहे . मोदी म्हणजे यशाचे समीकरण समजले जात असताना मोदी टीकेचे धनी होत आहेत , सर्वांना पुरून उरणारे मोदी एका विरांगनेनी चोळीबंद केले आहेत . ५६ इंच लांबीचा ब्रा मोदींना देणे हि साधी बाब नाही , ज्या ५६ इंच सिन्याने जग जिंकत आणले आहे. त्या ५६ इंच सिन्याला ब्रा चढवून मोदीना निरुत्तरित करून अवघा भाजप तोंडघशी पाडला आहे .    आजपर्यंत कुणालाच भारतीय जवानांवर पाकिस्तानी सैन्याकडून आणि पाक-पुरस्कृत दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले होत आहेत, त्यात आपले जवान शहीद होत आहेत, पण केंद्र सरकार पाकविरोधात कुठलीही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीए. त्यावरून देशभरात संताप असताना, एका निवृत्त जवानाच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५६ इंचांचा ब्लाऊज भेट म्हणून पाठवून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. 'भाजप सत्तेत आल्यास भारतीय जवानांवर हल्ला करण्याची हिंमत पाकिस्तान करणार नाही, असं आपण २०१४ मध्ये निवडणूक प्रचारावेळी ठणकावून सांगितलं होतं. पण सद्यस्थिती अत्यंत वाईट आहे, आता कुठे गेली तुमची ५६ इंचांची छाती?', असा प्रश्न सुमन सिंह यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. सुमन सिंह या निवृत्त जवान धरमवीर सिंह यांच्या पत्नी आहेत. धरमवीर सिंह यांनी १९९१ ते २००७ या काळात लष्करात सेवा बजावली होती. आपल्या पत्नीनं मोदींना एक निषेधाचं पत्र आणि ५६ इंचांचा ब्लाऊज पाठवल्याची माहिती त्यांनीच पत्रकारांना दिली. लोकसभा निवडणूक प्रचारावेळी मोदींनी आपल्या ५६ इंचांच्या छातीचा उल्लेख केला होता. परंतु, सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी त्यांची ५६ इंची छाती काहीच कामाची नसल्यानं सुमन सिंह यांनी त्यांना त्या मापाचा ब्लाऊज पाठवल्याचं धरमवीर म्हणाले. 'कुठलीही महिला आपल्या मुलाला, भावाला, पतीला देशाच्या सीमेवर शिरच्छेद व्हावा म्हणून पाठवत नाही. पण त्यांच्या रक्षणासाठी सरकार काहीही करत नाहीए. हेमराजसारखा कुठल्याही जवानाचा शिरच्छेद यापुढे होणार नाही, असं काही करण्याआधी दहशतवादी दहा वेळा विचार करतील, असं आम्हाला २०१४च्या निवडणुकीवेळी वाटलं होतं. पण दहशतवादी अगदी निर्दयीपणे आजही शहिदांच्या मृतदेहांची विटंबना करत आहेत, अशी उद्विग्नताही सुमन यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. सरकारने सीमेवरील जवानांना 'फ्री हँड' द्यावा,  अशी मागणी विरोधक नाही तर सामान्य लोक करत असतील तर केंद्रीय सत्ता लोकविश्वास गमावू लागली आहे असेच समजले पाहिजे . 
 तीन वर्षात नरेंद्र मोदी यांनी ५६ विदेश वाऱ्या केल्या आहेत ज्यात १००० कोटीच्या घरात देशाचा खर्च झाला असावा , अंतराष्ट्रीय संबंध वैगेरे हे विषय असतातच मात्र शेजारचा देश आमची उरी पठाणकोट करत असताना मोदी बाहेर देशात फिरून कुठले रान मागे टाकत होते हा सर्वसामान्य प्रश्न अनुत्तरीत रहातो . २०१४ तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या टक्के ६२ पर्यंत वाढल्या आहेत . शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू म्हणणारे सरकार जेव्हा उत्पादन दुप्पट झाले तेव्हा मात्र वर हात करणारे निघाले . तूर सोयाबीन खरेदी करताना सरकारी अपयश नाकारता येणार नाही . मन कि बात करणारे सरकार काम कि बात करत नाही हे दुसरे तिसरे कुणी नाही तर मित्रपक्ष शिवसेना म्हणत आहे हे महत्वाचे आहे . 
 उना फरीदाबाद दादरी सरहनपूर या घटना मोदी सरकारसाठी गोंडस चेहऱ्यावरच्या डागासारख्या आहेत. गाय वाचवताना कसून यत्न करणारे सरकार सीमेवर सैनिकांना वाचवू शकले नाही असे म्हणायला हरकत नाही कारण मनमोहन सिंग सरकारच्या तुलनेत सहीदांची संख्या अधिक तर आहेच मात्र मोदी काळात शहिदांच्या शवांची विटंबना होते ते वेगळेच . मोदींना दिलेली चोळी त्याच्यातला संताप आहे , जो मोदी सरकारच्या पायाखालच्या वाळूला गरम करतो . 

ताजे लेख

सॉरी महाराज  आज किडक्यासाठी टकमक टोक नाही 

पारतंत्र्य वाढले कि गुलामीची भावना वाढते अन अधिकचे स्वातंत्र्य ...

चोळीबंद  मोदी 

शेतीच्या बांधापासून ते दिल्लीच्या कनॉट प्लेसपर्यंत ...

आमच्यात सुद्धा दानवे आहेत 

व्यापारी  रावसाहेब , नौकरदार रावसाहेब , पाच रुपयाची कोतमिर थेट रुपयाला मागणारा रावसाहेब , शेतकरी ...

 भृष्ट  न्यायधीश आणी मरणासन्न लोकशाही   

कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला जेल होण्याची ...

राजकारणाचे हस्तांतरन 

भगवानगड ते गहिनीनाथ  व्हाया नारायणगड 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

भाजपला आनंद कशाचा 

काल सुरेश धसांचे एका पत्रकाराशी बोलणे झाले . त्या संभाषणात माजी ...

Close

satta king