20 March

भाजपला आनंद कशाचा 

what about happynes of bhajpa
By भागवत तावरे
  • 5133 View


काल सुरेश धसांचे एका पत्रकाराशी बोलणे झाले . त्या संभाषणात माजी आमदार धस स्पष्ट म्हणाले कि, मी जे काही करत आहे ते अजित पवार यांच्या भल्यासाठी , असाच त्यांचा रोख होता . त्यांना कुणीतरी 'फसव्या' म्हटल्याचे बरेच खटकले होते, असेच त्यांच्या बोलण्यातून दिसले  . स्व गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभा लढवण्यासाठी कुणाची हिम्मत होत नसताना मी पक्षाच्या मदतीला धावून गेल्याचे उपकार देखील धसांनी काल अनेकांना बोलून दाखवले .  प्रश्न हा आहे कि ,स्व गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात लोकसभा लढणे अन जिल्ह्यातील वर्तमान आखाड्यात राष्ट्रवादीच्या विरोधात  ना. पंकजा मुंडे यांच्या सोबत जाने याचा संबंध  काय ? आ अमरसिह पंडित अन धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन त्यांचावरूनचा  रुसवा जगजाहीर झाला, म्हणून त्याच्या खुलाश्यात धस मोकळ्या आवाजात काल बोलत होते . शरद पवार यांच्या मुत्सदेगीरीला देशात तोड नाही म्हणतात , त्यांच्या करंगळीला धरून लोक पंतप्रधान होतात हे देखील सर्व जाणून आहेत . त्या पवारांच्या राष्ट्रवादीची जिल्ह्यात वाताहत व्हावी, म्हणजे पवारांना खजील होणे सारखे आहे . म्हणजे हि पवारांची त्यांच्या लाडक्या चेल्याकडून थट्टा ठरावी,  असाच तो प्रकार म्हणायचा . सुरेश धसांनी भाजपला मते देऊन राष्ट्रवादीला झेडपीत धूळचाट  करण्यास भाग पाडायचे, अन त्यांनी त्यावर  आपण खरे राष्ट्रवादी म्हणवून घ्यायचे, हे जरा सर्वसामान्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यास जड जावे असेच आहे . गुरु शरद पवारांनी कुणा कुणाला नाही त्या चकल्या देऊन गुलालाचे धक्के दिलेले आहेत, असे असताना त्यांच्या तालमीतला एखादा लाडका मल्ल त्यांचीच चाल त्यांच्या विरोधात खेळेल अन तडीस नेईल,असे कुणाला स्वप्नात तरी वाटले असेल काय ?  मात्र तसेच काहीसे घडताना दिसत आहे . म्हणजे तूर काढून नेली कि जसे मागे धसकटे राहतात अन मागावरून जाणारांना ती खुचतात असाच तो प्रकार आहे . शरद पवार यांनी इतरांच्या हातावर आज तागायत ज्या तुरी दिलेल्या आहेत त्याच तुरीचे धसकट बीड जिल्ह्यात वापले आहे .अन तो मल्ल बीड मधील सुरेश धस ठरत आहेत . धक्कातंत्राचा अवलंब करून सत्ताकारणाच्या तहात माप पदरात पाडून घेताना यश लाभले कि तसेच वागून पोळी भाजून घ्येण्याची लत कशी लागते याचे जिवंत उदाहरण म्हणजे सुरेश धस अन त्याचे राजकारण होय . सुरेश धस यांनी राष्ट्रवादीची दृष्टीक्षेपात आलेली खुर्ची गायब केली, अन थेट पंकजा मुंडे यांच्या समोर मांडली . बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून मोठा पराभव स्वीकारणाऱ्या ना पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांना नामोहरम करण्याची हि संधीच आहे, असे समजून त्यांनी त्यांच्या बाबांना अतीव दुखः देणाऱ्या सुरेश धसांसोबत तह केला ?  विशेष हे कि निष्ठावंताना हे पाहताना किती दाह वेदना असह्य पातळीवर  होत आहेत ? राजकारणात आकस असावा असे मत अजिबात नाही., मात्र दगा फटका करणारास पुन्हा सदर देऊ नये, असे मानणारया लोकनेत्याच्या वारस असल्याने ना पंकजा मुंडे  ' दूरगामी ' विचार न करता असे काही करू शकतील , हे राजकीय दृष्ट्या सयुक्तिक वाटत नाही . 
 सुरेश धसांच्या बंडात धनंजय मुंडे यांच्या बाबत कमालीची नाराजी दिसली . मागे एकदा अजित पवार यांनी एका टी व्ही च्या कट्ट्यावर बोलताना आ धनंजय मुंडे हे माझ्या मागे लागले असल्याचे वक्तव्य करून शिळ्या कडीला उत आणला होता अन त्याच वेळी स्व गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेवरून वाद ओढवून घेतला होता . अजित पवारांनी धरण , लाईट गेल्यावर काय होते , यासारखी बिनकामाची अन पक्षाची वाताहत करणारी वक्तव्ये  करून राष्ट्रवादीला मेटाकुटीस आणलेले होते . अजित पवार केव्हा काय बोलतील अन राष्ट्रवादीसाठी कुठले संकट ओढवून घेतील हे  सांगता येत नव्हते . राष्ट्रवादीला मराठ्यांचा पक्ष म्हणून हिणवले जात होते, अश्या परिस्थितीत पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून सोबत असणारे छगन भुजबळ तुरुंगात गेल्याने  पक्षाकडे ओबीसी नेत्याची निकड पढली . आ जयदत्त क्षीरसागर हा एक निष्ठावंत चेहरा होता, मात्र अनेक दृष्टीने त्यांना मर्यादा येत होत्या . अश्या परिस्थितीत थेट स्व गोपीनाथ मुंडे यांना सोडून धनंजय मुंडे राष्ट्रवादीत दाखल झाले . कसलेल्या तालमीत बनलेल्या धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीला आपल्या रूपाने ओबीसी चेहरा मिळवून दिला . राज्यात धनंजय मुंडे या वक्त्याने राष्ट्रवादीच्या घडीची टिकटिक वाढवली . एवढेच काय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठी सभा धनंजय मुंडे यांनी धसांच्या उमेदवारासाठी घेतली . स्व गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत सुरेश धस यांना परळी तालुक्यात ७१ हजार मते मिळवून दिली, ज्याचा विसर धस यांना पडल्याचे दिसत आहे . राजकीय विश्लेषकांच्या नजरेत धनंजय मुंडे कमालीचे पुढे येताना दिसू लागताच त्यांच्या समोर पडलेली बूम पाहून अनेकांच्या पोटात बूम झाले .त्यातून धनंजय मुंडे विरुद्ध मळमळ पक्षात वाढली . नेमक्या याच पॉइंट वर ना पंकजा मुंडे यांनी आपला राजकीय जुगार यासाठी लावला कि धनंजय मुंडे त्यांच्या पक्षातील कुरकुरीने नामोहरम होत आहेत . धनंजय मुंडेकडून झालेला कमळाचा पराभव असा त्या भरून काढणार असतील तर मात्र काही बोलायचा लागच नाही . कारण तसे करण्यासाठी त्या अश्या लोकांना सोबत घेणार असतील ज्यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते अनवाणी फिरले, तर मात्र त्यांच्या राजकीय कौटिल्याचे कौतुकच करणाराने करावे . आजचा सारा सारीपाट सुरेश धस यांच्या कृपेने अन काडीने होत असताना , जे घडत आहे ते जादूच्या कांडीमुळे असे स्वत:ला समजून घेण्यास काय म्हणावे ? म्हणूनच आज दुपार नंतर भाजपचे कार्यकर्ते उत्साहात नाचतील , सत्ता आली म्हणून पेढे देखील वाटतील यास काय म्हणावे . बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना होताना पाहितला  आहे., मात्र आज भाजपला दिवाना होताना पाहण्याची वेळ आली तर तो बीड जिल्ह्यातील राजकारणातील मोठा विनोद ठरणार आहे  . चार चार सदस्य निवडून आणणारे तालुक्याचे नेते जिल्ह्याला गरागरा फिरवत आहेत, अन २० सदस्य निवडून आणणारा भाजप त्यांच्या हातचे बाहुले बनत आहे, अशीच वर्तमान परिस्थिती आहे . पंकजा मुंडेना हि वाताहत दिसत नाही त्यांना फक्त धनंजय मुंडे हरत आहेत याचा वैयक्तिक आनंद असावा मात्र त्यांनी हे देखील जाणून घ्यावे की धनंजय मुंडे यांचा पराभव भाजप नाही तर सुरेश धस करत आहेत . आज होणारे राजकीय नाट्य हे पंकजा मुंडे यांच्या जादूच्या "कांडीने" नाही तर सुरेश धसांच्या "काडीने" होत आहे . म्हणजे ना पंकजा मुंडे यांनी हे देखील उमजून घेतले पाहिजे कि, साहेबांना दुखावणाऱ्या धसांना म्हणजे चक्क साहेबांना उपोषणास बसवणारा नेता भाजपला मानणारा मतदार  उद्या मान्य करणार आहे काय ? स्व.गोपीनाथ मुंडे यांना दैवत मानणाऱ्या समाजमनाचा रोख समजून घेणे अन त्यानुरूप आपले राजकीय पाऊले टाकणे, वारसदार म्हणून पंकजा मुंडे यांचे कर्तव्य आहे : मात्र तसे काही त्या करत आहेत वा करतील असे वाटत नाही . २००५ ला ही धसांनी भाजपला फसवलेच ( श्री धस यांच्या संभाषणातील म्हणण्याप्रमाणे ) होते. अन आताही तसेच करत आहेत . पण तेव्हा साथ सोडून तर आज साथ देऊन फसवत आहेत . फसवणे हि या दोन्ही प्रसंगांमधील सामान्य घटना आहे . पण यावेळी धसांची मदत घेऊन फसायचे का नाही हे ठरवण्याचा अधिकार मात्र पालकमंत्री पंकजा मुंडे यांना आहे .   

ताजे लेख

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king