19 May

सॉरी महाराज 
आज किडक्यासाठी टकमक टोक नाही 

sorry maharaj
By भागवत तावरे
  • 4323 View


पारतंत्र्य वाढले कि गुलामीची भावना वाढते अन अधिकचे स्वातंत्र्य मिळाले की व्याभिचार ,मग तो कधी वागण्यात येतो  तर कधी बोलण्यात . असाच एक विठ्ठल तिडके नावाचा व्यक्ती परवा मिळालेल्या स्वातंत्र्यातून तोंडी व्याभिचार करताना दिसला . जगाच्या कुठल्याही भाषेत प्रांत प्रदेशात ज्या अपूर्व शोर्याची गाथा प्रेरणा म्हणून गायली ऐकली जाते. त्या  युगछत्रपती बाबद त्यांनीच निर्माण केलेल्या स्वराज्यात  तिडके नावाची भृष्ट वाचाळ नरकाडी करताना आढळणे म्हणजे महाराष्ट्राची शोकांतिका आहे . 
  शोशल मिडिया  नावाचे आयुध हाती आलेल्या पिढीने आपले प्रश्न विचार सुचना भावना जगासमोर जरूर मांडल्या पाहिजेत मात्र त्याच आयुधाने जग जिंकायचे सोडून स्वताच्या आईची हत्या करणार असताल तर ते हात त्या धडावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावून बसतात. हे देखील आजच्या पिढीने समजून घेतले पाहिजे .  तिडके या व्यक्तीचा एक सवांद ( वाद ) काल संपूर्ण राज्यात फिरला अन ऐकणाऱ्या प्रत्येक डोक्यात संतापाची लहर लाव्हा बनली.  जो तो कानातून शीशे पिलेला व्याघ्र संताप व्यक्त करू लागला .  विठ्ठल तिडके याने थेट निष्ठेच्या गाभाऱ्याला बोट लावले. कुणी आपल्या राजकीय दैवताची  खुशाल भक्ती करावी मात्र ज्यांच्या सह्याद्रीचा उर भरून यावा असा संघर्ष उभा करून ज्या राजाने स्वराज्य स्थापिले, ज्या स्वराज्यातला  मुक्त श्वास आजही  जगवत आणि जागवत आहे , लोकशाहीचा आराखडा देणारा आमचा राजा छत्रपती ज्याची अवघ्या जगात कीर्ती असताना तिडके नावाचा आस्तिनमधील  जनावर बनत असेल ,राजकीय स्वामी निष्ठा दाखवताना बोकडा प्रमाणे बिथरणार असेल  तर  त्यावर कुणी अंकुश ठेवणारा पाईक आहे का नाही असा प्रश्न पडतो . कुठली जात वा धर्म या पलीकडे ज्यांच्या कार्याची महती अन कीर्ती असते तेव्हा ती अस्मिता प्रादेशिक नाही तर जनसामान्याची बनते , असे असताना कुठला एक माथेफिरू उठतो अन त्याला अपेक्षित नसलेल्या कृतीला प्रतिक्रिया देतो , आलम जनतेच्या देव्हाऱ्याला बोट लावतो ,तेव्हा मात्र अस्या वृत्ती कायद्याच्या राजदंडाने मोडून झोडून काढल्या पाहिजेत असे वाटते . कारण जर वचकच संपणार असेल तर देश कुठली प्रगती सोडा तर सामाजिक अस्थैर्याला सामोरे जाईल याचा विचार झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या विश्वाचे अनुमोदन प्राप्त असे प्रजादक्ष राजे आहेत . असे असताना त्यांच्या नावाने तोंड नरकाडीत घालणारे नराधम याच स्वराज्यात जन्मतात हि आमची शोकांतिका आहे . कालच्या चर्चेतून जो संताप आम जनतेतून व्यक्त होत आहे त्यात गैर काहीच नाही उलट तो एक अर्थी सय्यम म्हणावा लागेल कारण ज्यांच्या अंगी नितीमत्ता आहे त्यांना ते शब्द ऐकताना समोरच्याचा फडशा पाडू वाटावा असेच ते किडकी बोल आहेत . अवघी पुरोगामी चळवळ असो वा मग अध्यात्माचा श्वास वारकरी सांप्रदाय असो छत्रपती शिवराय सर्वांना शिरसावंद राहिलेले आहेत , डॉ बाबासाहेब आंबडेकर , महात्मा फुले , शाहीर अण्णाभाऊ साठे , यांच्या चीकत्सक वृतीला पटणारे जे स्वराज्य आदर्श वाटले ते निर्माण करणारा शिवाजी राजा पृथ्वीवरच्या प्रत्येक राजाला आदर्श राहिलेला आहे . लढा करणीशी करणारा मात्र कर्त्याशी वितुष्ट न ठेवणाऱ्या राजाला त्याच स्वराज्यात आपली राजकीय निष्ठा दाखवन्यासाठी जर कुणी आपल्या जिभेने लाखोल्या वाहत असेल तर या काळातले टकमक टोकच त्याला दाखवले पाहिजे नाही काय ?  अनेकांना त्याला मारायचे आहे , अनेकांना त्याची जीभ कापायची आहे , अनेकांना त्याला शिव्या देऊन समाधान प्राप्त होत असेल मात्र आम्हाला त्याच्यातल्या वृत्तीचे असणेच मान्य नाही , म्हणजे शिवाजी महाराजाच्या शब्दात बोलायचे झाले तर  हात छाटा त्याचे असेच म्हणावे लागेल . आमच्या गल्लीतले उस्मान इसाक इरफान आणि मुसा छत्रपती शिवाजी महाराज म्हटले कि जय म्हणतात मात्र त्याच राज्यात विठ्ठल नावाचा वाचाळ काय नाही तो खातो , खालची माती देखील खातो अन इकडे तिकडे थुंकून घाण पसरवत असेल तर मोदींच्या राज्यात तो स्वच झाला पाहिजे . बाकी त्याच्या जिवंत राहण्याशी आम्हास वावगे नाही मात्र त्याला शिस्त अन भिस्त समजली पाहिजे अशी अपेक्षा आहे . शिव्या दिल्या म्हणजे राजकीय निष्ठा सिद्ध होणार असेल वा त्या गोतावळ्यात तशी रीत असेल तर त्यांनी ती रीत स्वकीयात वापरावी, त्यासाठी आलम जनतेची देव्हारे कशाला शिवताय ? म्हणजे हे त्यांना ठाऊक असले पाहिजे छत्रपती शिवराय हे तिसऱ्या नेत्राचे उपासक अन तळपत्या तलवारीने दानव कापणाऱ्या भवानीचे भूत्ते होते , यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवभक्त काय असेल यावर शंका नको . उद्या तो निष्ठा सिद्ध करायला निघाला तर अनेकांचे राजकीय संस्थाने उलथी पालथी होतील ज्याची इतिहासाला देखील कल्पना असणार नाही . शिवाजी महाराज कुठल्या एका जातीच्या अस्मितेत नाही तर महाराष्ट्राच्या कणाकणात अन मनामनात रुजलेले बीज आहे  ज्याचा वटवृक्ष अन त्याची छाया आज कुणाला जात पात नाही तर माणूस म्हणून सावली देते . म्हणून विठ्ठल तिडके नावाच्या व्यक्तीचे बोल हा आईशी केलेला व्याभिचार ठरतो ज्याचा फक्त निषेदच नाही तर अंतरिक संताप होतो संताप संताप अन संताप . 

गुण दोष तो त्यांच्या नोव्हे ...
वैज्ञानिक दृष्टीकोनातून माता पित्याच्या अनुवंश मुलात अवतरीत होतात . म्हणजे संत तुकोबारायांच्या अभंगात " गुण दोष तो त्यांच्या नोव्हे , आई बाप वेळ नसावी " असा जो युक्तिवाद केलेला आहे तो आजच्या विज्ञानाकडून देखील संमत होणारा आहे . म्हणून विठ्ठल तिडके यांच्यासंदर्भात असाच निष्कर्ष काढला पाहिजे , जर त्याला व्यवस्थित संस्कार मिळाले असते तर राजा अन स्वराज्य त्याला आज सांगायची गरज पडली नसते . 
षडयंत्र कुणाचे 
रावसाहेबांचा साला  राज्यभर शिव्या खात आहे , शेतकरी रोज मरतो आहे मात्र सरकार कर्जमाफी द्यायला तयार नाही , रोजगार नाही , हक्काचे पैसे घ्यायला देखील भिकारी बनून एटीएम समोर रांगेत उभे राहावे लागत आहे , भर रस्त्यात खून होत आहेत , संपूर्ण राज्यात त्राहीमाम त्राहीमाम चालू असताना यावर कुठला निर्वाळा निर्णय होत नाही , असे असताना लोकअवधान वेगळ्याच मुद्द्यावर घेऊन जाने अन वरील प्रश्न अडगळीला टाकण्यासाठी तर हे षडयंत्र नसेल ना यावर देखील विचार झाला पाहिजे , तसे असेल तर वरील प्रश्नावर संघर्षास सज्ज झाले पाहिजे .  

पंकजा मुंडे यांचा अबोला बोलका 
19 मे हा दिवस पंकजा मुंडे कधीच विसरू शकणार नाहीत कारण त्यांच्या राजकीय पिलावळीने त्यांची राजकीय कबरखोदनीचा श्री गणेशा त्या दिवशी केलेला आहे तसे भूमीपूजनाचे कार्यक्रम अनेक जागेवरून यापूर्वी साधले गेले आहे . छत्रपती शिवाजी शहाजी भोसले महाराज या शब्दात काय ताकत असते हे बाबासाहेब पुरंदरे नंतर पंकजा मुंडे यांना कळलेली असेल , असो विषय समजून घेऊया , म्हणजे हात तोडा , हारामखोरला शोधून काडा , जीभ हासडा , बघताच असे तसे करा असे म्हणून मला विषय चगळायचा नाही. या विषयाचा निर्माता करविता अन अभयदाता  समोर येणे गरजेचे आहे .
समजून घेऊया तिडके नामक माणसाने महाराज बद्दल आपशब्द वापरले हे पंकजा मुंडे यांना दुपारी एक पर्यंत कळाले असेल जर त्याची यंत्रणा दक्ष असेल तर , नसेल जरी संध्याकाळ पर्यंतचा धूर त्यांच्या सपक यंत्रणेला दिसला असावा , जेव्हा पंकजा मुंडे यांचे नाव व बाजू घेऊन थेट महाराजांना अपशब्द वापरले गेले तेव्हा त्याचा संबंध थेट पंकजा मुंडे यांच्याशी जातो तेव्हा तात्काळ त्यावर आपला खुलासा देणे गरजेचे होते . मात्र पंकजा मुंडे वा त्यांच्या यंत्रणेकडून खुलासा न देणे म्हणजे तिडके यास अनुमोदन असल्याचे निष्पन्न होत नाही का ? या पूर्वी भगवान गड महंतांच्या विरोधात पंकजा समर्थक गरळ ओकायचे त्यात पंकजा शांत राहायच्या अन समर्थकास आपण निष्ठा सिद्ध करतोय याचा अविर्भाव यायचा , पंकजांना देखील याचा आनंद तर होत नाही ना कि आपले कार्यकर्ते किती कडवे आहेत , राजकारणात कडवे कार्यकर्ते असणे चांगलेच असते मात्र ते भडवे निघायला नको असतात . निघाले तर त्याचे भुगतान नेत्याला द्यावे लागते ?  मलिक , जितेंद्र आव्हाड अस्या अनेकांना अंगावर घेऊन अनेकदा अनेकांनी  वाचाळ वीरांनी पंकजा कडे राजकीय निष्ठा सिद्ध केलेली आहे ?  इथेच पंकजा मुंडे यांची गफलत झालेली आहे कि बगल बच्छाना एक वाईट सवय लागू  दिली , त्यांनी तिडके सारखी वाचाळ पोसली , कार्यकर्त्यांना  देखील असे वाटू लागले की आपन ताईकल्याण साधतो आहोत , असे करत करत ही मंडळी निर्धास्त झाली की त्यांच्या तोंडातल्या जिव्हा रायगडाच्या जगदिश्वराच्या शिखरावर आपल्या लाव्हा फेकू लागल्या , पंकजा मुंडे यांच्या दिल्या गेलेल्या मूकसंमतीने त्यांची कथित मंडळी राजकीय कबर खोदून बसली? तिडके स्पीकर आहे त्याचा माईक थेट पंकजा मुंडे यांच्या हातात आहे असे कुणी म्हटले तर त्याला कुणी उत्तर देणारे आहे काय ? अन असेल तर अद्याप समोर का येत नाही ? हा प्रश्न शिवप्रेमींना का पडू नये ? आज पर्यंत मिळालेली भोकण्याची  मुभा आज रायगडाच्या तट बंदीला खेटली हे चूक नाही काय ? असे असताना आपल्यासाठी कुणी थेट रायगडावर लाखोल्या वाहणार असेल तर पंकजा मुंडे यांनी आपला त्याच्याशी संबंद नसणे हे सांगणे गरजेचे असते , त्या मंत्री आहेत त्या सर्व सामान्य तिडके काय म्हणतो यावर बोलू नये मात्र जेव्हा तिडके महाराजांना जिजामातेची आठवण करून देणार असेल तर पंकजा मुंडे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असतील , खुलासा अपेक्षित आहे . त्या ते करू शकत असताना तसे त्यांनी करू नये याचा शिवप्रेमींनी काय अर्थ लावायचा ?  जनसंताप जेव्हा  राजकीय प्रस्थाला जेव्हा भस्म  करतो कि काय असे वाटले तेव्हा त्यांची शोशल गल्लीत तत्व वाटणारी मंडळी समोर आली अन सौम्य भाषेत महाराजांच्या बाजूने उतरत पंकजा मुंडे यांची सोडवणूक करू लागली. मग हि मंडळी सोडवणुकी साठी जसी आली तसी निषेधाला का नाही ?   पंकजा मुंडे संभाजी राज्यांना भाऊ मानतात अस्या पोष्ट समोर आणल्या गेल्या , भाऊ मानता तर समोर येऊन का सांगतिले नाही तिडके भाऊ आहेत का संभाजी महाराज .  बहुजन जनतेला पटणार नाही की महाराजांच्या अवमानात पंकजा मुंडे या नावाचा संबंद नाही  .  असो आता पंकजा मुंडे शिवाजी महाराज म्हणजे काय जानतील,  जातीवाद वैगेरे का नाही भगवान बाबा सर्वांचे होते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाचे ब्रीद शिवाजी महाराज होते मात्र पंकजा मुंडे या दोन्ही पित्याचा वारसा विसरल्या आहेत काय अशी शंका येते ? कारण तसी संधी त्यांनी टीकाकारांना अन शिवप्रेमींना उपलब्ध करून दिली आहे . 

 

ताजे लेख

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king