19 April

राजकारणाचे हस्तांतरन 

pol tranfer
By भागवत तावरे
  • 1590 View


भगवानगड ते गहिनीनाथ  व्हाया नारायणगड 

धर्मसत्ता अन राजसत्तेचा समन्वय असला पाहिजे , संत तुकोबा अन छत्रपती शिवरायातील सुसंगत सुसवांद सुखी रयतेसाठी गरजेचाच . आज सोळावी पिढी महाराष्ट्रात याच  सूत्राने काम करत आहे .तुकोबा -शिवबातल्या भक्ती -शक्तीचे रूपांतरण राजकीय लाभ अन भक्तांच्या भावनेचे मताधीकरनात झाला आहे काय ? विषय क्लिष्ट नाही मात्र कुणी बोलायला धजावत नाही म्हणून कोंदलेल्या अनेकांच्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी जागरचा हा शब्दप्रपंच . 
     
  गुरुवर्य भगवानबाबांनी १९५१ साली आषाढी वद्य द्वादशीच्या दिवशी नारायणगड सोडला. १९५१ साली दसऱ्याच्या दिवशी भगवा झेंडा रोऊन भगवानगडाची स्थापना केली.  बीड तालुक्यातील नारायणगडावरून तत्कालीन गडाचे महंत भगवानबाबा यांना अपमानित होऊन गडउतार व्हावे लागले, असे बोलले जाते. यातून पुढे भगवान बाबांनी  पाथर्डी तालुक्यात वैष्णव धर्माच्या प्रचार अन प्रसारासाठी एक गड उभा केला ज्याचे पुढे महाराष्ट्र राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव यांनी भगवानगड असे नामांकरण केले . वारकरी संप्रदायाचा वारसा चालवताना समाज जोडायचा अन जागृत ठेवायचा या हेतून भगवानबाबा अन त्यांच्यानंतर आलेल्या महंतांनी आपला कार्यभार तडीस नेला आहे . १९९० पर्यंत गड अन अध्यात्म असाच  धर्मसत्तेचा रतीब असायचा . मात्र १९९० नंतर इथली भक्तसंख्या अन जनसंग्रह राजसत्तेला खुणावू लागला . भगवानबाबा अन त्यांच्यावर असणाऱ्या निस्सीम भक्तीचा ठामपणा राजकारणात परावर्तीत झाला तर कमालीचा राजकीय लाभ शक्य होता , हे कुणाला तरी उमगले होते . पुढील काळात  स्व गोपीनाथ मुंडे अन त्यांच्या वाढलेल्या राजकीय परीघातून हेच सिद्ध होते . 
        परवा गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताह सांगता प्रसंगी ना. पंकजा मुंडे यांनी भगवानगडासोबत असेलेले वितुष्ट संपून टाकायची मनीषा व्यक्त केली . स्वताला भगवानगडाची कन्या वदवून घेणाऱ्या पंकजा मुंडे यांनी त्या गहिनीनाथ गडावरून सदरील वक्तव्य करणे म्हणजे एक प्रकारची शोकांतिकाच म्हणावी लागेल . ज्या भगवानगडाच्या पिताप्रेमाची हूर हूर ना पंकजा मुंडे यांना लागली आहे ,त्यांना बहुदा हे ठाऊक नसावे की गहिनीनाथ गडाच्या पायथ्याला, म्हणजे बावी गावात असणाऱ्या भगवानगडाच्या नारळी सप्ताहात  लोक कमी जमावेत वा जमुच नयेत यासाठी कुणी कुणी प्रयत्न केले?  अन कुणाच्या सांगण्यावरून , कुणासाठी केले ? पंकजा मुंडे यांनी ज्यांना जिल्हा परिषद चा लाल दिवा दिला ते जीपअध्यक्ष पती विजय गोल्हार हे स्वत भगवानबाबा भक्त असताना अन स्वतच्या गावात बाबांचा सप्ताह असताना का उपस्थित राहू शकले नाहीत ?  भगवानबाबांच्या भक्तासमोर व्यासपीठावर सन्मान कुणाला हवा होता अन नसेल दिला जाणार तर त्यामुळे  कोण कोण येणार नव्हते  हे स्पष्टच झालेलं आहे . 
     पंकजा मुंडे यांना भगवानगडाची आठवण नारायणगड अन गहिनीनाथगडाच्या दोन्ही नारळी सप्ताहात आली . गहिनीनाथ गडाच्या सप्ताहात ना मुंडे यांनी चक्क "माघार" हा शब्द वापरला ज्याची आठवण सुद्धा त्यांना दसऱ्याला झाली नव्हती . लाठ्या काठ्याची तयारी करून गडाला आपल्या राजकीय पायऱ्यासाठी वरद म्हणून कारणी पाडण्यासाठी, पंकजा मुंडेंनी काही कमी तयारी केली नव्हती ?  प्रचंड आदरणीय असलेले कधी काळीचे नामदेव शास्त्री कार्यकर्त्यांना एकेरी वाटले होते ते पंकजा मुंडे यांच्या  मूकसंमतीशिवाय शक्य होते काय ? गडाच्या पायथ्याला झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे अन त्यांच्या मानलेल्या भावाने शाश्त्रीचा कमी पानउतारा केलेला नव्हता ? ज्या गडावरून आपल्या पित्याला मुंबई दिल्ली दिसली त्या गडाला परास्त करण्यासाठीच पायथ्याचा मेळावा नव्हता काय ? राजसत्तेचे लाभार्थी पायथ्याच्या मोहिमेत कश्याला माणसे गाड्यात ठासून आणत होते ? कुठल्याही परिस्थितीत धर्मसत्ता राजसत्तेला शरण यावी म्हणून कुठले प्रयत्न पंकजा मुंडे यांनी केले नव्हते ?
       भगवानगड वंजारी समाजाची अस्मिता असल्याचे अन वंजारा समाज आपल्या राजकीय भूमीचा मुख्य आधार असल्याचे पंकजा मुंडे यांना बाळकडू घेतानाच ते लक्ष्यात आलेले आहे .  पंकजा यांना  नारायणगड अन गहिनीनाथ गडावरील गर्दी भगवानगडाची सर करणारी नाही हे बहुदा लक्ष्यात आले असावे ,म्हणूनच माघार घेत कन्या आजोबा,चुलत्यानंतर  पुन्हा पित्याचा आश्रय अपेक्षित करत आहे . बावी येथील भगवानगडाच्या नारळी सप्ताहात अपेक्षित प्रवेश मिळत नसल्याचे पाहून पंकजा मुंडे यांनी आपल्या भक्तीभावाचे विस्थापन आ .विनायक मेटे यांच्या मदतीने नारायणगडाच्या सप्ताहात केले .  मात्र त्यांना शिवाजी महाराजांच्या भाविकात नामदेव शाश्त्रीचे भक्त दिसले नाहीत, जे भक्त कम मतदार ज्यादा आजपावतो ठरलेले आहेत ,मूळ इथेच भगवानगडाची आठवण येण्यास वाव आहे . पंकजांना बहुदा हे लक्ष्यात आले असावे, इकडे गर्दी आहे मात्र ती गडाची आहे.  पंकजा वा तत्सम राजकारणी पुढाऱ्यांना भाविक नाही त्यांची मते हवी असतात ? ज्याचे राजकीय भांडवलीकरन करून आपले राजकीय संस्थान वाढवायचे असते . राज्यातील जवळपास ७५ विधानसभा मतदार संघात भगवानगडाचा निस्सीम भक्त विखुरलेला आहे .गोपीनाथ मुंडे समाजाची राजकीय अस्मिता म्हणून आपला अंतिम कौल देणारा तो भक्त होता  , त्यातुनच गोपीनाथरावांची राजकीय उंची बेजोड बनली  . पंकजा मुंडे यांना ठाऊक होते नारायणगड - गहिनीनाथ गड येथील गर्दी त्यांच्या  कामाची नाही , तिथल्या गर्दीत आपल्या राजकीय मशागतीस वाव असणारी बीजे नाहीत म्हणूनच  त्यांना भगवानगड आठवला असावा ? 
        ही अध्यात्मिक शोकांतिका आहे की अलीकडे  गड -संस्थाने राजकारण्यांचे बटिक झाली आहेत , वैष्णव - भगवत धर्माची पताका फडकावत, धर्म प्रचार अन प्रसार करण्यासाठी गड - संस्थाने  केंद्र असावीत.  हा प्रचार प्रसार करण्यासाठी भव्य वास्तू , बांधकाम , महागड्या गाड्या कश्याला लागतात , एक भगवे वस्त्र देखील जगाला धर्म शिकवू अन वाढवू शकते हे स्वामी विवेकानंदाने सिद्ध केले नाही काय ? भगवानबाबा यांनी स्वत निवारा सोडला तर फक्त विचारांचा जागर केला अन संतपदाला पोहचले नाहीत काय , त्यासाठी काय त्यांनी कुठल्या नेत्याला वा त्याच्या पक्षाला कुठली मदत केली काय ? मुळात वैराग्य हे मूळस्वरूप असणारी महाराज मंडळी  ऐहिक सुख- सन्मानाच्यासाठी कुणा राजकारण्याचे हस्तक व्हायलाच नको होते मात्र दुर्दैवाने तसे घडत आहे ? संत तुकोबारायांना जेव्हा शिवरायांनी माणिक मोती भेट दिले तेव्हा तुकोबा म्हणाले होते
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
शब्दांचीच वस्त्रे यत्ने करु ||
शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन |
शब्द वाटे धन जनलोका ||
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |
शब्देचि गौरव पूजा करु ||

हे तुकोबांच्या वारसांना  आठवणीत राहिले नसावे म्हणून सरकारी तिजोरीतून चार भिंती उभ्या  करणाऱ्या पुढाऱ्यांची राजकीय इमले उभे करण्यासाठी महंत अन महाराज मंडळी राजकीय गवंडी बनत असावेत ,गडावरील भक्तीभावा पेक्षा बांधकामे अधिक प्रभाव करू लागली आहेत , ज्यांना देवच मान्य नाही ,वा वारकरी म्हणून आवश्यक ती एकही पात्रता नसणारे लोक गड संस्थानावरून आपले राजकीय अश्व उधळवत आहेत . गडावर भगवान बाबाच्या समाधीवर माथा टेकायला बुलढान्यावरून येणाऱ्या आजोबांना अन  वायबटवाडीच्या आजीबाईला माहित नसते की त्यांच्या भक्तीभावावर कुणी राजकीय फासा टाकलेला आहे , गर्दीने फुलून गेलेला भगवानगड भक्तांना काय देतो हे भक्तांनाच ठाऊक मात्र वर्ज्य आहार घेनारांना देखील काय काय देऊ शकतो हे उभ्या महाराष्ट्राने पाहितले आहे. समाधानाची बाब की भगवानगडावरील नामदेव शास्त्रीनी त्यास नकार देऊन एका नव्या अन पूर्ववत असणाऱ्या पायंडाला पुनर्जीवन दिले आहे . अपेक्षा हीच की ते त्यास कायम जागतील . कारण नामदेव शास्त्री राजसत्तेला शरण न गेलेले  एकमेव असावेत कारण त्यांना गड आंदन दिल्याचे शल्य अन खंत असावी . 
      अलीकडे भगवान बाबांना वर्ज्य अशी  कर्म करणारी मंडळी बेगडी भक्तीची झूल घेऊन गडावर चाल करु लागली असेल तर त्यास प्रतिबंदच .  मांस खाण्यास कुणी प्रतिबंध करूनये मात्र जिथे गडाच्या अन वैष्णव धर्माच्या अजेंड्यात जो प्रकार वर्ज्य आहे , तिथे मांस खाणारे गडाच्या नात्यात येउच कसे शकतात  ? अन त्यानात्यातून  हंबरडा कसा काय फोडतात ,हा खलाचा विषय आहे ?  

ताजे लेख

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

सॉरी महाराज  आज किडक्यासाठी टकमक टोक नाही 

पारतंत्र्य वाढले कि गुलामीची भावना वाढते अन अधिकचे स्वातंत्र्य ...

चोळीबंद  मोदी 

शेतीच्या बांधापासून ते दिल्लीच्या कनॉट प्लेसपर्यंत ...

आमच्यात सुद्धा दानवे आहेत 

व्यापारी  रावसाहेब , नौकरदार रावसाहेब , पाच रुपयाची कोतमिर थेट रुपयाला मागणारा रावसाहेब , शेतकरी ...

 भृष्ट  न्यायधीश आणी मरणासन्न लोकशाही   

कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला जेल होण्याची ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

Close

satta king