11 March

आज खुश तो बहोत होंगे तुम नेताजी 

today netaji be happy
By भागवत तावरे
  • 165 View


     वीस कोटीच्या उत्तर प्रदेशात तब्बल दोन कोटी यादव आहेत .अखिलेश यादवांचा सफाया फक्त भाजपचे यश नाही . सणात सत्यनारायण उरकनाऱ्या मुलायम यादव अन शिवपाल यादव यांच्या देखील आत्मिक सुखासाठीच्या पराकाश्ठेचे चीज झालेले कालच्या यशात पाहायला मिळू शकेल .
" कई कार्यकर्ता मेरे पास रोए कि चिन्ह बचा लीजिए और पार्टी बचा लीजिए। मैं चुनाव आयोग से अपनी गुजारिश कर चुका हूं। उन्होंने आगे कहा, 'यदि हमें 'साइकिल' नहीं मिलेगी तो किसी चुनाव चिन्ह से चुनाव लड़ेंगे। आपलोग सहयोग करें और पार्टी की सरकार बनाइए। हे वाक्य होते समाजवादीचे महामहीम नेताजी मुलायम सिह यादव यांचे . अन कुणाच्या विरोधात तर मुलाच्या . चाचा भतीज्याच्या वादात नेताजीच्या वारसाची मोठी फरफटच  झाली . कुठलिही कसर न सोडणाऱ्या अखिलेश यादवांचा सफाया झाला तो फक्त याच हेक्डीत बाकी जे भाजपने कमवले आहे ते फक्त समाजवाद्यांकडून विस्कटलेले आहे .
 उत्तर प्रदेशातील जातनिहाय मतदार पाहता सामान्य वर्ग-20.94, अन्य पिछड़ा वर्ग-54.05, अनुसूचित जाति-24.95 व अनुसूचित जनजाति वर्ग-0.06 , अल्पसंख्यक-14.6 ( मुस्लीम ) यादव 10.46, मध्यवर्ती पिछड़ा वर्ग-10.22 अत्यंत पिछड़ा वर्ग-33.34  हा अत्यंत महत्वाचा अन निर्णायक मतदार आहे .  निषाद/मछुआरा-12.91, मौर्य/कुशवाहा/शाक्य/काछी-8.56 , कुर्मी/पटेल-7.46, लोध-किसान-6.06 प्रतिशत, पाल/बघेल-4.43, तेली/साहू-4.03, कुम्हार/प्रजापति-3.42, राजभर-2.44, नोनिया/चौहान-2.33, विश्वकर्मा/बढ़ई-2.44, लोहार-1.81, जाट-3.7, गूजर-1.71, नाई/सविता-1.01 व भुर्जी  कांदू-1.43  मी सदरील आकडेवारी यासाठी देत आहे कि कुठलाही एक मुस्लीम उमेदवार न देता नेमका संदेश देऊन काल भाजपने निवडणूक जिंकली आहे . आकडेवारीत कॉंग्रेस ने ३ विरुद्ध २ असा ५ राज्याचा सामना जिंकला असला तरी ८० खासदार अन ४०० आमदारांचा युपी भाजपने राखण्याला अनन्यसाधारण महत्व आहेच कारण तिथून दिल्ली जवळ आहे . उत्तर प्रदेशात सर्वाधिक ३३.३४ मतदार पिछडा वर्गातून आहेत त्यातून स्वतंत्र देव सिंह (कुर्मी), धर्मपाल सिंह (लोधी), प्रकाश पाल (बघेल/गड़ेरिया/धनगर), केशव प्रसाद मौर्य  या चेहऱ्यांना पुढे करून भाजपने उत्तर प्रदेशात मोठा मतदार केव्हाच मिळवला होता .पंतप्रधान आणि भाजपच्या नेत्यांनी या निवडणुकीकडे पूर्ण लक्ष केंद्रित केल्यामुळे व एका बाजूला भाजप तर दूसऱ्या बाजूला तीन वेगेवेगळ्या संघटना. यात मायावती  स्वतंत्र लढल्या , समाजवादी पक्ष व काँग्रेस एकत्र लढलीअसली तरी अजित सिंग यांचा पक्ष स्वतंत्र लढला, त्यामुळे सहाजिकच भाजपला फायदा होणार, यात शंका नव्हती अन तसेच झाले . ज्या यादवांच्या 10.46 टक्के मतदारावर मोठी मदार अखिलेश यांची होती , तो यादव मुलायम अन शिवपाल यांचा प्रचारविटाळाने विस्कळीत झाला.15.30 टक्के अतिपिछ्डी जातीचा मतदार यावेळी मोठी भूमिका निभावणारा होताच . मुलायम शिहांनी सुरवातीला शिवपाल मोठे नेते असल्याचे सांगत मुलाला आपले सहकार्य नसल्याचे सांगितले . शिवपाल यांनी मुलायम सिह यादव यांना देशाचे नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करताना बिहार मध्ये जुगाड लावल्याचे सांगत आपण इमानदार असून अखिलेश हा आपल्या पित्याच्या विरोधात असल्याचे सांगितले . यातूनच रडारडी गंगा शपथ पुढचा इतिहास आपल्याला ठाउकच आहे . अनेकांना ठाऊक असेल के अखिलेश नेहमी म्हणायचे मै आधा मुख्यमंत्री हु म्हणजे कौटुंबिक असमन्वय होता . अखिलेशच्या आडून सर्व चाचा मंडळीने सत्ता भोगली . बदनामी अखिलेश अन बाकी आरोपांचे समालोचक हे गेली सहा महिने चालू होते .  या सर्व घटनेत एक व्यक्ती आहे ज्याला आपण विसरू शकत नाही ते म्हणजे अमरसिह २०१० मध्ये समाजवादी मधून हकालपट्टी केलेले अन २०१६ मध्ये पुन्हा पक्षात आणलेले यांनी कुठल्या चुलत्याच्या बाजूने मोहरे खेळली हे देखील महत्वाचे आहे. अमरसीहांना  अखिलेश यांची गच्छन्ति गरेजेची वाटत होती . नरेंद्र मोदी यांच्यावर अखिलेश यांनी केलेले आरोप किती चुकीचे आहेत हे सांगताना अमर कुठेच कमी पडले नाही .असो मला फक्त अखिलेश यादव यांचा पराभव अन त्या पराभवात पिता मुलायम किती हा विषय अधिक स्पष्ट करायचा आहे . अखिलेश यांच्या पराभवावर बोलताना शिशुपाल काय बोलले ? हा समाजवाद्यांचा पराभव नाही हा अहंकाराचा पराभव आहे ,आता अहंकार कुणाचा हे सांगण्याची गरज नाही .अनेकांना असे वाटू शकते कि बापलेकाच्या भांडणाचा फटका बसेल देखील मात्र सव्वा तीनशे कमळ म्हणजे यात भाजप अन मोदी यांची जादू असायलाच हवी . असू शकेल लोक सत्तेकडे झुकतात मात्र त्यासाठी त्यांना तसा पर्याय उपलब्द नसावा लागतो अन तेच काम यादवीतल्या भावकीने केले . लोकांना भाजपच आहे असे वाटले अन त्यांनी अडेवेडे घेतले नाहीत . मायावतींचे सारे पिछडे बिथरले सत्ता आणायला त्यांच्याकडे कुठले कांशीराम उपलब्ध नव्हते मात्र त्यांचे हाल इथपर्यंत होतील असे वाटले नव्हते . आणखी एक महत्वाचे एक हा विजय मोदिलाटेचा विजय नाही आणि कॉंग्रेसचा पराभव देखील नाही कारण लाट जिंकली असती तर कॉंग्रेस पंजाब मणिपूर गोव्यात जिंकायचे काही कारण नव्हते . कोल्हापूरचे जावई गुलालात माखले असले तरी त्यांच्या अभ्यासातून हि गोष्ट चुकणार नाही .सध्या ते ट्वीटर वर प्रचंड बीजी आहेत . उत्तर प्रदेशात अयोध्या काशी यासह काही ठिकाण असल्याचा फायदा भाजपला झाला नाही असे कुणालाच म्हणता येणार नाही . 
  अखिलेश यांच्याकडे सत्ता होती मात्र पक्ष नव्हता यामुळेच पक्षाचा मोठा पराभव करण्यास  भाजपला वाव दिसला अन तोच डाव साधला .सोबतीला ७२ खासदार जे नियोजनाच्या पोथडी घेऊन वर्षभरापासून उत्तरप्रदेश साठी दिवसरात्र एक करण्यासाठी अमित शहांनी पिटाळले होते . अन त्याच दरम्यान  ४४ वर्षीय अखिलेश कुटुंबातील वादात घेरला गेला. यामुळे भाजपा अन बसपा मध्ये थेट लढत अपेक्षित होती मात्र अखिलेश यांच्या बरोबर राहुल गांधी आल्याने अन अखिलेश यांच्या जाहिरातीच्या माऱ्याने चर्चा अन बातम्या सपा विरुद्ध भाजपा अस्या राहिल्या . चित्र मात्र तसे नव्हते भाजपच्या विरोधात पर्याय नव्हता, लोकांनी सहज माना टाकल्या अन सदरील जनमत भाजपच्या विकास अन सुशासनला असल्याचे सांगण्यास भाजपला मुभा मिळाली . जिंकण्यासाठी निर्णायक मते लागतात मात्र कुणाला पाडण्यासाठी १० टक्के मते असली तरी चालतात अन मान्य करावे लागेल किमान २०० मतदार संघ असे असतील जिथे शिवपाल मुलायम किमान १० टक्के मते राखून आहेत . पुन्हा भाजपच्या ३२५ उमेदवार किती मताधिक्क्याने आली हे देखील पहावे लागेल . भाजपने मिळाली संधी कुठल्याही परिस्थितीत सोडायची नाही असे ठरवताना आपला संपूर्ण संघ कामाला लावला होता अन त्यांच्याच मशागतीतून ३०० च्या वर कमळे फुलली ज्यात अवजारे घरात घेऊन बसलेल्या समाजवाद्यांनी भाजला मदतच केली . 
  अखिलेश यादव यांचा प्रचंड झालेला पराभव पाहता अन त्यांच्या चुलत्याकडून ( शिवपाल यादव ) आलेल्या टोमन्यावर माजी मुख्यमंत्री दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा सवांद मनातल्या मनात म्हणतील . आज खुश तो बहोत होंगे तुम. ... नेताजी 

 

ताजे लेख

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

सॉरी महाराज  आज किडक्यासाठी टकमक टोक नाही 

पारतंत्र्य वाढले कि गुलामीची भावना वाढते अन अधिकचे स्वातंत्र्य ...

चोळीबंद  मोदी 

शेतीच्या बांधापासून ते दिल्लीच्या कनॉट प्लेसपर्यंत ...

आमच्यात सुद्धा दानवे आहेत 

व्यापारी  रावसाहेब , नौकरदार रावसाहेब , पाच रुपयाची कोतमिर थेट रुपयाला मागणारा रावसाहेब , शेतकरी ...

 भृष्ट  न्यायधीश आणी मरणासन्न लोकशाही   

कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला जेल होण्याची ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

Close

satta king