18 March

हिंदुत्वाकडून रामाकडे सद्र्ष्य कूच 

from hindu to lord rama
By भागवत तावरे
  • 286 View


 अखंड अनंत हिंदुत्ववादी विचाराने प्रेरित होऊन सावरकरांच्या हिंदुत्व संकल्पनेला आयुष्य अर्पित करणाऱ्या अडवाणी वाजपेयी यांच्या भाजपचा वर्तमान काळ सुवर्णमयी आहे . मोदी नावाचा परीस त्यांच्या पुढच्या पिढीचे नेतृत्व करताना कमालीचे यशस्वी ठरत आहे . नियत अन नित असे दोन्ही जुळून आल्यास काय घडू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे वर्तमान देशातील कमळाची फुललेली बाग. लोकशाहीच्या आखाड्यात भाजप फक्त जिंकत नाही तर आपल्या समोरील विरोध करू शकणारे बळ देखील शिल्लक ठेवत नाही . कर्मठ अन निर्धास्त हिंदुत्वाचे प्रवर्तक म्हणून ठाम मात्र सोयीने वावरणारे भाजपेयी सत्ता आल्यानंतर कसे ठाम असतात याची प्रचीती काल योगी आदित्यनाथ यांच्या निवडीतून स्पष्ट जाणवली . योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करताना भाजप सहज नव्हते , योगी असणाऱ्या आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री होताना पाहून कुणाला काय वाटेल याची पूर्ण जाणीव भाजपच्या दिल्ली मधील मंडळीना असताना निर्धास्त पणे लखनौ मध्ये योगींना बसवले आहे . भाजपने या निमित्ताने आपला मूळ अजेंडा समोर मांडला आहे . विकास अन प्रगतीचे गीत गायन करून सत्ता मिळवणारे मोदी देखील भाजपच्या मूळ भूमिकेला छेद देऊ शकत नाहीत अन भाजप मध्ये व्यक्ती नाही तर तत्व अन संघटन चालते हे सिद्ध करणारी योगीची निवड प्रतिक आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे यात सर्वाधिक कुठल्या बाबीस नाकारले असेल तर ती व्यक्तीनिष्ठा , मोदी प्रचारक होऊ शकतील मात्र तेच भाजपच्या रथाचे सारथ्य करतील असे नाही. संघ वगळून भाजप अन भाजपचे निर्णय होत नसतात हे सिद्ध करणारी घटना म्हणूनच योगीनिवडीकडे पाहितले पाहिजे . बीएस्सी असणारे योगी हिंदुत्ववादी जरी दिसत असले तरी त्यांच्याकडे गेली ५ वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा अनुभव आहे, हे विसरता येणार नाही . गढवाल विश्वविद्यालयातून त्यांनी बीएससी ते गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत असा संगम असल्याने भाजपला देखील त्यांच्या नावावर मोहोर लावणे जिकरीचे वाटले नाही अन सहज योगी पर्वास अनुमोदन देण्यात आले . 
 गेल्या ३५ वर्षापासून राम हि व्यक्तिरेखा एका कार्यकर्त्यासारखी भाजप च्या कामी अन कारणी पडलेली आहे . आता मात्र या कार्यकर्त्याचे काम पक्षाला करावे लागणार आहे . लाखो स्वयंसेवकाला राममंदिर आपले ध्येय वाटते अन त्यासाठी ते भाजपला विनामोबदला मते मिळवून देत आली आहेत . देशभारत आवश्यक तेवढा जनाधार अन सत्ता आज भाजपकडे आहे पाहिजे तेवढी मंदिरे उभारताना त्यांना सर्वत्र सेवक उपलब्ध होतील मात्र त्यांना किमान अयोध्येचा निकाल अपेक्षित आहे . बाबरीच्या ढिगाऱ्यात भाजप यावेळी शेतू टाकेल यावर आता एकमत होताना दिसत आहे . भाजपला देखील राम आमचा मुद्दा नाही तर धेय्य आहे हे दाखवायला यापेक्षा चांगला वेळ नसेल . म्हणूनच योगी यांची निवड त्या कारणी लागेल असेच दिसून येत आहे . उत्तर प्रदेशात भाजपने उमेदवारी देताना सामाजिक समतोल न राखता प्रखर हिंदुत्व रेटून नेले , एक मुस्लीम उमेदवार देऊन समतोल किमान दाखवण्याचा प्रयत्न देखील भाजपने केला नाही . यातुनच्या झाकीचा पिक्चर म्हणूनच आदित्यनाथ यांच्याकडे पाहितले जाऊ शकते . भाजप आता हळू हळू रगेल झालेली दिसली तर आश्चर्य वाटू नये . कारण तशीच अपेक्षा देखील त्यांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या कार्यकर्त्यांची असेल . यावेळी राम टाळता येणार नाही . मुद्दा जिवंत ठेवताना भाजपने सवड काढली तर येणाऱ्या काळात भाजपची बाग करपून जाईल ज्याचे भान रेशीम बागेला नक्की असेल . 
 दुसरे हे की भाजप मध्ये संघ किती वजन राखून आहे हे, अन  त्यांच्याकडे कसे अंदाज असतात हे सिद्ध करणारा १८ मार्च हि तारीख सांगून जाते . योगी उद्याचे भाजपचे राष्ट्रीय चेहरे बनले तर आश्चर्य नको , मोदींना निर्वाणी देताना संघाने आपले वर्चस्व सिद्ध केले . मोदींना भाषणे देण्याची मुभा असू शकते मात्र निर्णय संघच घेईल अन घेत राहील  हे अंतिम सत्य दाखवून देण्यात आले आहे . ज्याची चाहूल काल उत्तरप्रदेशात झाली आहे . 


 

ताजे लेख

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

सॉरी महाराज  आज किडक्यासाठी टकमक टोक नाही 

पारतंत्र्य वाढले कि गुलामीची भावना वाढते अन अधिकचे स्वातंत्र्य ...

चोळीबंद  मोदी 

शेतीच्या बांधापासून ते दिल्लीच्या कनॉट प्लेसपर्यंत ...

आमच्यात सुद्धा दानवे आहेत 

व्यापारी  रावसाहेब , नौकरदार रावसाहेब , पाच रुपयाची कोतमिर थेट रुपयाला मागणारा रावसाहेब , शेतकरी ...

 भृष्ट  न्यायधीश आणी मरणासन्न लोकशाही   

कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला जेल होण्याची ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

Close

satta king