04 March

साईड टू पंकजा

side to pankja
By भागवत तावरे

 


भाजपच्या चित्रातली पूजा -  एक चक्रव्यूह

          कुठल्याही नेत्याच्या राजकीय आयुष्याची सायंकाळ  दिल्लीच्या  वाटेवर जाते असा  रिवाज आहे  , म्हणुनच  किमान महाराष्ट्रातल्या तरी नेत्यांची पसंती हे प्रादेशिक राजकारण राहिलेले आहे . राष्ट्रीय सचिव करून पंकजा मुंडे यांना दिल्लीत मान पान असला तरी राज्याच्या राजकारणात आणि चर्चेत त्या फारश्या दिसत नाहीत , राजकारणात उणी - अधिक कुठलीही चर्चा घडावी लागते असे म्हणतात मात्र गेल्या काही महिन्यात पंकजा यांना भाजपने साईड केल्याचे स्पष्ट चित्र आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या राजकीय भविष्याची वाटचाल कशी आणि कुणीकडे असेल हा चिंता आणि मंथनाचा विषय ठरू शकणार आहे . 
 भाजप आणि मुंडे या नात्यात अनेकदा तडे गेलेले आहेत अगदी टोकाला , गोपीनाथ मुंडे सोनिया गांधी यांच्या   अकबर रोड वरील पायरी चढून आलेले?  एकदा नाही दोन वेळा गोपीनाथ मुंडे आणि भाजप यांच्यात थेट सामना झालेला , मात्र लोकमनाचा लोकनेता म्हणून गोपीनाथरावांना थेट अंगावर घेणे राजकीय दृष्ट्या परवडणारे नसल्याने दोन्ही वेळा पक्षाने गुडघे टेकले , जळगावला रिक्षात बसून मुंडे साहेब रुसले तेव्हाचे कारण कुणी मान्य केले नसेल मात्र
देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र हीच ती घोषणा होती ज्यात भाजपने मुंडेंना मागे टाकण्याचा सांघिक डाव साधला होता , महाराष्ट्रातील ४० मतदार संघात निर्णायक मते आणि ओबीसीच्या माधव सूत्राने मुंडेंनी आपला राजकीय दबदबा अन पक्षीय लॉबिंग साधलेली होती , त्यात गडकरी मुंडे हा गटवाद  होताच , नागपूरचे " गडकरी देवेंद्र " हे मुंडेच्या बहुजनवादी चेहरा व राजकारणाला पर्याय म्हणून पसंतीक्रमांक एकचे नेते होते . उदाहरणच पहायचे असेल तर मोदींच्या पहिल्या मंत्री मंडळात मुंडेंच्या  अगोदर गडकरी यांनी शपथ घेतली आणि मुंडेंचे नावच आहे कि नाही अशी शंका होती .  मुंडे यांच्या चमूतील एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आहेत तर अनिल गोटे भाजप पासून दूर , दस्तूर त्यांच्या वारस असलेल्या पंकजा मुंडे कुठे आहेत . १२ डिसेंबर २०१९ ला खडसे यांना गोपीनाथ गडावर बोलावून वडिलांचा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न पंकजा यांनी केला मात्र दिल्लीत सत्तेत असलेल्या भाजप ने त्यांच्या कुठल्याही नाराजी आव्हानाला प्रतिसाद दिला नाही या उलट देवेंद्र भाजप हीच राज्याची भाजप असल्याचे सिद्ध केले , खडसे पक्ष सोडून गेले पंकजा देखील प्रदेश भाजपच्या नामफलकावरून व बैठका पासून दूर राहू लागल्या , पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार एकतर्फी निवडून आला ज्यासाठी पंकजा यांची उदासीनता आरोपी म्हणून पाहण्यात आली . भाजप कडून पंकजा यांना मुख्य प्रवाहात घेतले जात नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसात दिसत असताना त्यांच्या राजकीय कक्षा देखील जिल्हा मर्यादित करण्यात आल्याचे चित्र आहे , अगदी काल त्या राज्यपालाकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सरकार राजकारण करत असल्याची तक्रार घेऊन गेल्या ( तसे पंकजा यांनी  जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत सत्ता बेछूट वापरलेलीच होती असो ) 
 राज्याच्या आणि भाजपच्या राजकारणात सर्वाधिक खळबळ उडवून दिलेल्या पूजा चव्हाण प्रकरणात पंकजा मुंडे शांत होत्या अगदी मुलगी परळीची असताना देखील , पूजा प्रकरण आत्महत्या कमी आणि राजकीय प्रकरण अधिक होते , संजय राठोड यांचा राजकीय बळी घेण्यासाठी पूजा आत्महत्या प्रकरणाचा खांदा करण्यात आला , भाजपने या प्रकरणात हात धुवून राजकारण केले , भाजपने केवळ राठोड घरी बसवायचे राजकारण केले नाही तर आणखी एक राजकीय चाल खेळली  , मुलगी पंकजा मुंडे यांच्या मतदार संघातली असताना  पंकजा मात्र चर्चेतून बाहेर ठेवल्या , चित्रा वाघ यांना पूर्ण रसद पुरवून पूजा प्रकरणाचा टीआरपी चित्रा वाघ यांच्या पदरात घातला , देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेदेत चित्रा वाघ यांना बाजूला उभा करून राजीनामा यशाच्या पहिल्या मानकरी चित्रा वाघ असल्याचे जाहीर म्हटले , चित्रा वाघ देखील कुठल्याही सभागृहाच्या सदस्या नाहीत , उलट त्या राष्ट्रवादीतून भाजप मध्ये आलेल्या , भाजपने पंकजा यांच्या मतदार संघातील प्रकरणावर नेतृत्व करण्याची जबाबदारी मुंडेताईला नाही तर चित्रा ताईला दिली , राजीनामा आल्या नंतर पंकजा यांना स्वत वरून प्रतिक्रिया द्यावी लागणे आणि त्यासाठी भाजपच्या कुठल्याही नेत्याने समर्थन देऊ नये म्हणजे अगदी केवीलवाना प्रकार ठरला . धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा हि तर पक्षाची भूमिका असे सांगून पंकजा यांनी चोरचिमटा जरी काढलेला असला तरी त्याला एक वृत्तवाहिनी वगळता इतरांनी फारसे महत्व तर दिलेच नाही , गंमत म्हणजे भाजप कडून देखील पंकजा यांना कुणी कव्हर फायर दिलेला नाही . सभागृहात नसल्या तरी पंकजा मुंडे यांना चर्चेत आणि प्रवाहात ठेवताना भाजप काळजी घेत असल्याचे चित्र आहे . पंकजा मुंडे यांच्या राजकीय भविष्यात भाजपची अनुकूल प्रतिकूल कुठली भूमिका राहणार आहे हे भविष्यालाच ठाऊक , दिल्लीच्या भाजपच्या पाईपलाईन मध्ये बीड मधील काही नावे आहेत , तसे असेल तर पक्षाने पर्याय शोधला पंकजांनी शोधावा असाच तो संदेश समजावा ? 
 
पूजा प्रकरणाच्या निमित्ताने चित्रा वाघ यांना पुढे करणे , उसतोड कामगारांच्या प्रश्नी आ. सुरेश धस यांना अधिकृत कार्यक्रम देणे , अर्थातच पंकजा यांना तो निरोपच आहे , अगदी संजय राठोड प्रकरणी पंकजा शांत असताना बीडची भाजप राठोडांचा पुतळा प्रदेश आदेशाने जाळत होती . 
 
बीड डीसीसी बँक प्रकरणी तक्रार करण्यासाठी पंकजा मुंडे यांना राज्यपालाकडे जावे लागले , जिल्ह्यातले दोन आमदार सोडले तर पक्षाचा एकही व्यक्ती त्यांच्या सोबत राजभवनात आलेला दिसला नाही , देवेंद्र फडणवीस लहान लहान मुद्दे घेऊन मुख्यमंत्र्यांना सभागृहात भांडत असताना डीसीसी चा एक प्रश्न का विचारत नाहीत . भाजपच्या चित्रात पंकजा आता केवळ नावाला उरलेल्या दिसत आहेत . प्रादेशीक विभागीय सोडा , जिल्ह्याचे प्रश्न देखील सभागृहात मांडता का येऊ नयेत , आ लक्ष्मण पवार वाळू साठी भवनाच्या दारात उपोषण करतात आणि त्यांच्या सोबतीला  देवेंद्र येऊन उभे राहतात मात्र पंकजा यांच्या सोबत कोशारी यांच्याकडे कुणी का येत नसावे ? भाजप ने पंकजा यांना साईड केल्याचे वर्तमान  चित्रातून स्पष्ट दिसत आहे . एका बाजूने धनंजय मुंडे राज्यातील प्रभावी नेत्यात जाऊन बसलेले असताना पंकजा मुंडे यांचे राजकारण आणि समज मर्यादित होत असल्याचे चित्र आहे

ताजे लेख

साईड टू पंकजा

  भाजपच्या चित्रातली पूजा -  एक चक्रव्यूह      

विषयांतर व वेशांतर बस तुम यही कर सकते हो

एक...दो....तीन...पास वा रे सरकार , डोनाल्ड अमेरिकेचे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांना तेथील प्रेस कोर्ट ने ...

आत्महत्यांचे वर्गीकरण सुशांत ते राम , आता मिडीयाच्या तोंडात बोळा

तुम्हारा मरणा मरणा है और हमारा मरणा मरणा नही , सुशांत गांजा पिऊन आत्महत्या करून मेला तर अवघी देशाची ...

अंबानी बोकांडी गणिताचा तास चालू असताना मोदी चहा विकत होते ?

१९७५ ला एक कॉफी ५० पैश्याला मिळत असल्याच हॉटेल बील सर्वत्र व्हायरल झाले तरी १९५९ ला मोदीजी २ रुपयाला ...

सब नंगा सी मोदींच्या डोळ्यातले पाणी शेतकऱ्यांच्या बोकांडी

गोव्याच्या भूमीत रडलेले मोदी भले मिडीया विसरली असेल मात्र हुंदका देऊन मुझे पचास ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king