09 November
 बिहार निकालाची शहानिशा
Verify the result of Bihar
By भागवत तावरे
  • 473 View

 'बि 'हार निकालाची  'शहा'निशा  

२ नोवेंबर २०१५ रोजी भाजपचे कल्याणमस्तू या अग्रलेखात मी सरळपणे हे सांगितले होते कि भाजपच्या बिहार निकालावर शिवसेनेच्या वाघाचे वागणे ठरणार ,  त्यानुसार अत्यंत सूचक प्रतिक्रियेतून राउतांनी गुगली टाकली , अगदी महाभारतातल्या संजय ने जे रेखाटले त्याप्रमाणेच सेनेच्या राजरेषा ते आखतात ,  त्यांचे रोख ठोक बोलणे शिवसेनेच्या भविष्याचा वर्तमान असतो म्हणूनच बिहार च्या बाहुबली कडून मोदींना सडकून आसमान दिसल्याबरोबर शिवसेनेच्या गुदगुल्या समोर आल्या ,तस्या त्या अपेक्षितच म्हणा परंतु त्यालगत संजय राउत यांनी शिवसेना बिहार प्रमाणे राज्यात सत्ता मिळवेल असे सांगणे म्हणजे भाजपचा पुरा फडशा पाडण्याचा बेत शिवसेनेचे वाघ आखून आहेत . उद्धव ठाकरेंनी नितीश कुमारांना फोन करणे हे राज्य भाजपा आणि करवीरकरांच्या जावयाला पचणारे नाही . परंतु बारामतीचा पाहुणचार आणि घरचे लुगडे नेसून नटून बसलेल्या नवरीच्या झोकातली बारामती जोपर्यंत साबरमती शी चिटकून आहे तो पर्यंत वाघ पंजा उचलणार नाहीत म्हणजे राज्यात बिहार करायला शिवसेना पवारांचा होकार मिळेपर्यंत गप्पगोळी सहन करेल हे मान्य करावे लागेल . शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे बिहारी बाबू जे मोदी शहा या जोडगोळी नि अंतरावर ठेवले त्यांनी या निमित्ताने मोदी वर तोंडसुख घेतले हे संजय राउत सारख्या गोटातल्या मित्राला मोठी ताकत देतात . बिहार चे निकाल आणि त्यातून निघणारा अर्थ फक्त विजय आणि पराभव या दरम्यान मर्यादित नाही , बिहारचे निकाल देश्याच्या राजकारणावर परिणाम करणारे ठरतील कारण जर यदा कदाचित भाजप बिहार मध्ये जिंकले असते तर माध्यम आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी तो विजय मोदी नावे वर्ग केला असता आणि मोदी मोदी मोदी अशी पिपाणी वाजवली असते या मनभेदी घोषणात भाजपची एखादी दुसरी आरोळी संघातल्या एखाद्या कार्यकर्त्याने दिली असती म्हणा . म्हणजे विजय एका व्येक्तीचा झाला असे दाखवत राजकारण आणि सत्ताकारण व्येक्तीकेंद्रित म्हणजे लोकशाहीला न शोभणारे ठरले नसते ,

या उलट नितीश यांचा विजय हा लालू , राहुल सह महागटबंधन यांच्यात विभागला यामुळे मोदी व नितीश विजयातल्या फरकात प्रश्न व्येक्तीकेंद्रित राजकारण आणि लोकशाहीभीमुख राजकारण हा होता म्हणून नितीश यांचा विजय मोदींच्या पराभवापेक्षा अधिकपट समाधानकारक आहे म्हणूनच दिल्ली तून केजरीवाल आणि मुंबई तून उद्धव यांनी अभिनंदन केले . बिहार च्या निकालात आणखी एक प्रश्न निकाली निघाला आहे तो म्हणजे सहिष्णुतेचा , विरोधकांनी केलेले आरोप म्हणून नाही परंतु देशभरातून जो बुद्धीजीवी नि आवाज उठवला त्यात तथ्य असल्याचा निर्वाळा या निमित्ताने झाला आहे , हो प्रमाण कमीअधिक असेल मात्र देशात्र धर्मवाद आहे आणि लोकांना तो नको आहे हे समोर आले . म्हणजे आपले खोटे ठरते कि काय असे अनुपम लोकांना वाटेल आणि ते त्यांचे दुख असेल असो त्याच्याशी आपल्या विषयाचा फारसा सबंद नाही परंतु या निम्मिताने भाजपला सणसणीत बसली आणि लवकरच साक्षी महाराज , योगी आदित्यनाथ सारख्यांना वेळीच आवर घातला नाही तर यांची टीव टीव मोदींच्या भाजपला गंगा तट दाखवेल या बाबद शंका नसावी . .

मोदी म्हणजे व्हिसा एटीएम कार्ड, अशी काहीशी समजूत शहा व भाजपाच्या अनेक नेत्यांनी करून घेतली. मग मोदींना सभेत आणून उभे करायचे, की शेंदुर फ़ासलेला कुठलाही दगड निवडून येणार, अशा मस्तीत मागले दहा महिने भाजपा वावरतो आहे. म्हणून तर कालपरवाच आपण युती तोडण्याचा पराक्रम केला, असे एकनाथ खडसे कसे छाती फ़ुगवून सांगत होते ना? बिहारमध्ये त्याचीच किंमत मोजावी लागली आहे. कारण इथे झाले, तेच बिहारमध्ये केले. जीतनराम मांझी यांना सोबत घेताना आधीपासूनचा लोकप्रिय दलित नेता मित्र, रामविलास पासवान यांना अंधारात ठेवल्याने तेही नाराज होते. पण शहांना आवरणार कोण? उलट दुसरीकडे आपले अहंकार बाजूला ठेवून दोन दशकांची दुष्मनी गुंडाळून लालू व नितीश एकत्र आले होते. आपले ११६ आमदार असताना त्याहीपेक्षा कमी जागी लढायला नितीश राजी झाले. इतकेच नव्हेतर लालूचे २२ आमदार असताना त्यांना शंभर जागा देण्यापर्यंत नितीशनी लवचिकता दाखवली. पण अमित शहा मात्र जराही झुकायला राजी नव्हते. त्यांची अखंड मनमानी चालू राहिली. महाराष्ट्र वा दिल्लीतल्या अनुभवातून काहीही शिकायचे नाही, असाच त्यांचा होरा होता  शत्रूमध्ये मित्र शोधायचे आणि मित्रांमध्ये शत्रू निर्माण करायची, नवी रणनिती  बिनबोभाट राबवली गेली. बिहारमध्ये निकाल त्याच रणनितीचा लागला. बिहारच्या निकालाची 'शहा'निशा करताना एक अत्यंत महत्वाची बाब अभ्यासावी लागेल ती म्हणजे नितीश विजय पाकिस्तानात साजरा झाला आणि तो तिथल्या जियो नामक टीवी वरून दोन तास दाखवला , प्रचारादरम्यान शहा यांनी " नितीश यांचा विजय पाकिस्तानात साजरा होयील "असा जावई वेध घेतला या ठिकाणी मी त्यांचे अचूक अंदाज बांधल्यामुळे कौतुक करणार नाही कारण त्यांनी तो अंदाज बांधला नवता तर आपल्या टकलातून मतदारांना पाकिस्तानकडे बोट दाखून मते गोळा करायची शक्कल त्यांनी लढवली होती जी पूर्ण फसली हे मला सांगायचे आहे . पाकिस्तान ला शिव्या देऊन त्यांना हिंदू मतांचे केंद्रीकरण करायचे होते जे साधले नाही याचाच आनंद पाकिस्तान ने साजरा केला ज्याचे मी तरी समर्थन करील कारण नितीश यांच्या विजयाचा आनंद पाकिस्तान ने साजरा का करावा ? 

 या निमित्ताने निमित्ताने मोदींचा बेगडीपणा देखील अधिक स्पस्ट झाला असे म्हणायला हरकत नाही , म्हणजे आपली प्रतिमा सोज्वळ दाखवण्यात येशस्वी  ठरलेल्या मोदींची बिहारमधली सत्तालालसा त्यांचातला सत्तापिसाच दाखवते ' नितीश यांच्यावर टीका करताना थेट मुशायेरा करणारे असा उल्लेख केला ज्यातून बिहारी जनतेच्या अस्मिता जाग्या झाल्या अन त्या का नाही होणार . या उलट नितीश यांनी अत्यंत विनम्र भाव दाखवला ज्यामुळे भविष्यात नितीश मोदींना सक्षम पर्याय म्हणून समोर आले तरी वावगे वाटण्याचे कारण नाही 

ताजे लेख

बारामतीच्या मळ्यात देवेंद्र फुलले 

परवा राम कदम कलागौरव  पुरस्कार प्रदान करताना गाडगीळांनी शरद पवारांची मुलाखत घेतली ...

शिवसेनेला ते उमजले आहे  

स्व बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला ज्या शिवसेनेचे रोपटे लावले होते त्याचे बीज ...

बाबांच्या लेकीचे पुन्हा पतन 

दोन संघर्ष यात्रा काढून मतदारांना लोकनेत्याचा वारसा पुरवण्याची हमी देणाऱ्या ...

तर राज ठाकरेंचे  दिवस पुन्हा येतील

जबाबदारीने लिहतोय,  त्याबाबद विश्वसाहार्य नसलो तरी एकूण पक्षांची राजकीय वाटचाल ...

रयतेचा राजा आहे तुमचा इव्हेंट नाही 

शिवाजी हे फक्त कुठल्या राजा - व्यक्तीचे नाव नसून ते एक लोककल्याणकारी राज्यनिर्मितीस ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

काय चुकले आमिरचे 

काय चुकले आमिरचे ?  मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत ...

Close

satta king