01 March

शिवसेनेला ते उमजले आहे  

shiwsena know that
By भागवत तावरे
  • 808 View

स्व बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला ज्या शिवसेनेचे रोपटे लावले होते त्याचे बीज संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आहे . सर्वसामान्य माणसाच्या मुलभूत गरजा लक्ष्यात घेऊन त्यांच्या भावना राजकारणात परावर्तीत करून संतुलित संघटन उभे करण्यात आले . कुठलीही घाई गडबड नाही अत्यंत सावध अन मजबूत मुळे उखडून टाकण्यासाठी लोकांच्या मनात हात घालून एक एक मन बाळासाहेब या माणसाने गोळा केली . मुंबईचा तीर वाडी वस्त्यापर्यंत येऊन पोहचला . सेना कालानुरूप मजबूत बनत गेली मात्र ती सत्तालालची अन त्यातून कुठलीही तडजोड न करणारी पार्टी म्हणून पुढे आली . धारणा अन भावना यावर अवलंबून असणारे धोरण शिवसनेने सत्तेसाठी कधी मुरड घालून बदलले नाही किवा भावनेला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा कमालीचे टोक घेऊन आपणच धनुष्य घेऊ शकतो हे सिद्ध केले . अयोध्याचा खेळ झाला तेव्हा होय जर माझ्या सैनिकांनी ते केले असेल तर त्यांचा अभिमान जाहीर वाटून घेत निखारे अंगावर घेणारे बाळासाहेब तेव्हा मुंबई राज्य ओलांडून देशात पोहचले अन मग त्यांनी हिंदुत्वाला गवसणी घातली अन तिथेच भाजप सेनेत भावकीचे वितुष्ट पेरले . खरे म्हणजे एकाच फळावर दोघांनी तीर ताणला असेल तर त्यांचे ऐक्य विनोद ठरावा , याहून मोठा विनोद हा कि त्याचे आयुष्य २५ वर्षे असावे . बाबरीच्या समयी जेव्हा कल्याणसिहाचे सरकार मुग गिळून मी नाही त्यातली म्हणत होते तेव्हा मुंबईचा रिमोट कंट्रोल एस मीच असे म्हणत होते . त्यातूनच भाजप सेनेत भविष्यकालीन स्पर्धेची पेरणी झाली. भाजपला सेना नकोच होती फक्त काही काळ ती गरज म्हणून अन बम्बा म्हणून वापरायची ज्यातून  महाराष्ट्रात साखर कमवायची असाच कमळा च्या सूर असावा. म्हणूनच महाराष्ट्रात बऱ्यापैकी कमळाची शेती फोफावली कि भाजपला बटईदार जड जावू लागला . आमचे आम्ही कसु म्हणूनच २०१४ च्या विधानसभेत वरच्या नरेंद्राने खाली देवेंद्र उभा केला अन शिवाजीचे नाव घेऊन महाराष्ट्र जिंकला . हे येवढ्या चपखलपणे निर्विघ्न पार पडले कि सेनेची पापणी लवण्याच्या आता अहमदाबाद ची बुलेट मुंबईत घुसली . म्हणूनच महाराष्ट्रावर गुजराथी आमदारच नाही मंत्री बघण्याची पाळी आली . भाऊ तोरसेकर यांना युती तोडून सेनेला खिंडीत भाजपने पकडले कसे म्हणणारे राजीव प्रताप रुडी उमजेपर्यंत उशीर झाला होता . सेनेला हे कळून चुकले होते कि आपण भाजपचे संसारिक नसून भावकी आहोत सेना मिळेल तो आखाडा स्वत लढू लागली मात्र व्यवहार देखील लक्ष्यात घेऊन जिथे कुठे सत्ता लाभेल तिथे तडजोड करू लागली . उद्धव ठाकरे कडे भाजपचा बीमोड झाला तरी चालेल अशी भावना असली तरी त्या टोकावर गुलाल न मिळाल्याने सेनेला थोडे ऐकून घ्यावे लागत आले आहे . 
 शिवसेना भाजपचा पुरता वध करण्याच्या तयारीत असताना बारामतीने घरचे लुगडे घेऊन तयारी दाखवली म्हणून सेनेकडून एक पाउल मागे घेतले . वर्तमान मुंबईचा आखाडा देखील निम्मा निम्मा सुटला असला , तरीही सेनेकडून निर्वाणीची लढाई सुरु झाल्याचे सुतोवाच आहेत कारण त्यांना उमजले असावे कि भाजप मुळावर उठले अन फुलले देखील आहे . शिवसेना भारतातील एकमेव असा पक्ष आहे जो सत्तेच्या यज्ञात भावना स्वाहा करतो. मात्र भाजपप्रमाणे  काश्मिरात मुंफ्ती सोबत सत्तेसाठी तत्वाला मुरड घालत नाही उलट आपल्या मराठी बाण्यासाठी प्रतिभा पाटलांना राष्ट्र्पती करवताना हातभार लावला , मागे देखील जर शरद राव पंतप्रधान होणार असतील तर आम्ही सोबत राहू असे दस्तूरखुद्द बाळासाहेबच बोलले होते. परवा नारायण राणे ,काल राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी उद्धव सत्ता सोडू शकत नाहीतअसे  दाखवून देताना सेनेला  चिथावत आहेत मात्र तसे करण्याची गरजच काय जिथे भाजपने शिवसेनेचा बीमोड करायचे ठरवल्याचे मातोश्रीस ठाऊक असताना . दोन दिवसाच्या सत्तेसाठी पन्नास वर्षाची शिवसेना स्वताचे अस्तित्व अन भविष्य धोक्यात घालू शकत नाही  तेव्हा उद्धव ठाकरे यांना निर्वाणीचे पाउले उचलावी  लागतील हे त्यांना स्वतला चांगले ठाऊक आहे . 
  भाजपचे काळजीवाहू लेखक आहेत भाऊ तोरसेकर काहीही असो भाजपच्या गरजेचे काय भाजपने कसे बरोबरच केले आहे यासाठी त्यांची लेखणी अहोरात्र कष्ट उपसत असते , चूक होतेच या नियमाला भाजप अपवाद आहे , ते कसे भाऊंना विचारावे एवढे ते चपखल संदर्भासहित असते असो , मला त्यावर अधिक बोलायचे नाही मात्र त्यांनी शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्या सोबत मातोश्री ने चांगली वागणूक दिली नाही अन दिली असती तर १२ जागा शिवसेनेच्या वाढल्या असत्या असा अभ्यास मांडला . उत्तर प्रदेश च्या भाजपच्या यशस्वी चालीचा दाखला देऊन मुंबईत सेना कशी फसली अन उद्धव कसे चुकतात हेच त्यांनी दाखवून दिले होते मात्र महत्वकांक्षा अर्ध्यात राहिलेले लोक सोबत घेणे किती अगतिक अन धोक्याचे असते हे उद्धव ठाकरेंना कुणी सांगण्याची गरज पडली नाही अन त्यांनी बाळ नांदगावकर यांना रिकाम्या हाती धाडले . 
    भाजप हे शिवसेनेच्या मुळावर आलेले संकट आहे हे सैनिकांच्या मनात उतरवत त्यासाठी कुठलाही त्याग अन संघर्ष करण्यास त्यास सज्ज करण्यास उध्वंवांना कमालीचे यश आल्याने भाजपसोबत तह नाही तर युद्धास सेना सज्ज आहे . म्हणूनच हा सारा स्वार्थ सेनेकडून धुडकावला गेला असावा . 25 पैकी जळगाव, चंद्रपूर, वर्धा, लातूर, गडचिरोली या पाच जिल्हा परिषदांवर भाजपची स्वबळावर सत्ता आली आहे. तर रत्नागिरीत शिवसेनेची सत्ता आली आहे. त्यात शिवसेनेशी युती केली तर 25 पैकी 12 ठिकाणी सत्ता स्थापन करता येणार आहे.


युतीच्या धर्तीवर खालील सत्ता सेना धुडकावत आहे . 
नाशिक - शिवसेना अध्यक्ष, भाजप उपाध्यक्ष
बुलढाणा -  भाजप अध्यक्ष, शिवसेना उपाध्यक्ष
यवतमाळ - शिवसेना अध्यक्ष, भाजप उपाध्यक्ष
औरंगाबाद - भाजप अध्यक्ष शिवसेना उपाध्यक्ष
जालना - भाजप अध्यक्ष शिवसेना उपाध्यक्ष
हिंगोली - शिवसेना अध्यक्ष भाजप उपाध्यक्ष

ताजे लेख

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

सॉरी महाराज  आज किडक्यासाठी टकमक टोक नाही 

पारतंत्र्य वाढले कि गुलामीची भावना वाढते अन अधिकचे स्वातंत्र्य ...

चोळीबंद  मोदी 

शेतीच्या बांधापासून ते दिल्लीच्या कनॉट प्लेसपर्यंत ...

आमच्यात सुद्धा दानवे आहेत 

व्यापारी  रावसाहेब , नौकरदार रावसाहेब , पाच रुपयाची कोतमिर थेट रुपयाला मागणारा रावसाहेब , शेतकरी ...

 भृष्ट  न्यायधीश आणी मरणासन्न लोकशाही   

कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला जेल होण्याची ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

Close

satta king