03 March

बारामतीच्या मळ्यात देवेंद्र फुलले 

frunt on baramati devendr sucsess
By भागवत तावरे
  • 424 View


परवा राम कदम कलागौरव  पुरस्कार प्रदान करताना गाडगीळांनी शरद पवारांची मुलाखत घेतली , यावेळी पवारांनी  अनेक कंगोरे उलगडून दाखवले . लोकांना परिवर्तन भावते याचा प्रतय पुणेकरांनी नुकताच दिला असे त्यांनी म्हटले त्यांचा रोख पुण्यात भाजपच्या जिंकण्याकडे होता. (भाजपला चांगले बोलता येते ते लोकांना आवडते हे पुणेकरांनी सिध्द केलय असे ते शरदरावांचे वाक्य होते )  शरद पवारांना आव्हान म्हणून बाळासाहेब, महाजन, मुंडे वा विलासराव अशा नेत्यांची एक मोठी फ़ळी महाराष्ट्रात होती. ती  अलविदा करत असताना दुसर्‍या पिढीतले म्हणुन अशोक चव्हाण व अजित पवार आणि राज, उद्धव ठाकरे यांची नावे घेतली जात होती. पण त्यांना मागे टाकून फ़डणवीसांनी जबरदस्त झेप घेतली आहे असे मान्य करायला हरकत नसावी. अधिक कशाला, संपूर्ण राज्यातील मोठी फळी विरोधात असताना या नवख्या मुख्यमंत्र्याने नागपूर वरून येऊन थेट बारामतीच्या अंगणात बस्तान बसवावे म्हणजे क्षमता सिद्ध करणे नव्हे काय ? सत्ता वा मुख्यमंत्रीपद हाती आल्यास होतकरू माणूस किती मोठा पल्ला गाठू शकतो, याचा दृष्टान्त म्हणून देवेंद्र फडणवीस वर्तमान वानगी ठरावेत  . म्हणजे खरच पुण्यात रिकाम्या खुर्च्यांनी इतिहास केला हे मान्य करावे लागेल . अन तो हि अर्धे पुणे खिशात घालून फिरणाऱ्या बारामतीच्या छातीवर . 
  पुणे महापालिकेच्या एकूण 162 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी 1,090 उमेदवार रिंगणात आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 41 प्रभाग , समोर आलेला निकाल भाजप ९४ राष्ट्रवादी काँग्रेस -४० शिवसेना –१० काँग्रेस –११ मनसे –२ इतर –१ असा आहे . पेशव्यांची राजधानी कलमाडी काकडे करत काळ कमळाच्या अधीन झाली . तेथील रिकाम्या खुर्च्याची चर्चा राज्यभरात झालेली असताना देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिंकले .पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण 128 जागेसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारत एकहाती वर्चस्व मिळावलं तेही ७८ जागा खेचत. सत्ताधारी राष्ट्रवादी तिकडे ३५ वर कोलमडली .विशेष हे कि कुठला वरचा नेता न आणता . म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांचेच ते यश गृहीत धरले तर त्यांनी मनपाच्या मोहिमेत मोठी शिकार केल्याचे मान्य करावे लागत आहे . निकटची  स्पर्धा करणारी सेना ९ पट मागे टाकत रजपटलावरच्या वजीराला नामोहरम केले आहे . शरद पवारांना पुण्यात दिलेली मात हि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याला मान्यता मिळवून देते . मागची मनपा पाहता  राष्ट्रवादी ५४ काँग्रेस २९ मनसे २८ शिवसेना १५ भाजप २६  आरपीआय२ यावेळी भाजप २६ वरून थेट ९४ तर सेना मनसे मिळून ५७ पैकी फक्त २१ जागा मिळवते आहे . राष्ट्रवादी ५४ ची ४० वर आलेला असून १४ जागेची हानी पवारांना सहन करावी लागली . इथे लक्ष्यात घेण्यासारखी बाब म्हणजे भाजपचे समविचारी पक्ष रोखून भाजपचा ऐरावत समोर आला आहे . मागच्या खेपेपेक्षा ३६ जागा सेना मनसेच्या कमी झाल्या आहेत . म्हणजे शिवसेनेसोबतची रक्ताळलेली लढाई देखील फडणवीसांनी जिंकली आहे. १० पैकी ८ मनपा भाजपने जिंकल्या आहेत जे निव्वळ फडणवीसांच्या पारदर्शकतेचे यश आहे हे मान्य करावे लागेल. 
 आधी प्रजासत्ताकदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या मैदानावर युती संपल्याची घोषणा केली, त्याच जागी दोन दिवसांनंतर भाजपाच्या मेळाव्यात शिवसेनेची कौरव अशी संभावना करून, भाजपाने युती फ़ुटण्याचे स्वागतच केले होते. त्याच सभेत आवेशपुर्ण भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांचा आवाज बसला आणि त्यांनी पाणी पिता पिता खालच्या आवाजात बजावले होते, ‘आज पाणी पितोय,२१ तारीखला पाणी पाजणार आहे.’त्यांची तेव्हा खु्प टवाळी झालेली होती, तेव्हा अनेकांनी फ़डणवीसांची खिल्ली उडवली होती. पण आज त्यांनी त्यांचे  खरे करून दाखवले असेल तर त्यांना गुण देणे भाग आहे. माणूस काय करतो वा कशी मांडणी करतो, यापेक्षाही त्याच्या मांडणीतील बांधीलकी महत्वाची असते. त्या दिवशी फ़डणवीस यांचा घसा बसलेला असेल, पण त्यांच्या मनातला निर्धार पक्का होता आणि नंतरच्या चार आठवड्यात त्यांनी त्याची प्रचिती आणून दाखवली आहे. पाणी पाजणार वा अन्य शब्दप्रयोग हे काही आशय व्यक्त करीत असतात. त्याचा शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो, त्यामागचा आशय समजून घेण्याची गरज असते. या तरूण नेत्याचे भाषण आवेशपुर्ण असते आणि त्यात आशयही असतो. तसे नसते तर नंतरच्या चार आठवड्यात आपल्या अत्यंत धावपळीच्या दिनक्रमातून सवड काढीत मुख्यमंत्र्यांनी इतक्या सभा व दौरे केले नसते. मोहिमेवर असल्याप्रमाणे त्यांनी सभांचा झपाटा लावला होता आणि त्यात यशही मिळवून दाखवले आहे. या निमीत्ताने आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्य़ाची व प्रस्थापित करण्याची अपुर्व संधी असल्याचे हेरूनच फ़डणवीस धावपळ करीत होते. त्यात ते कमालीचे यशस्वी झाले असून, आपली झालेली निवड त्यांनी योग्य ठरवून दाखवली आहे. मला हे देखील आठवत आहे कि शरद पवारांनी फडणवीसांना संपूर्ण महाराष्ट्र तरी माहित आहे का असी कोपरखळी मारली होती आज त्याच फडणवीसांनी पवारांच्या पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर सारखे ठाणे देखील पाडले . नोटबंदी नंतर जनतेचा प्रक्षोभ पाहता लोक कमळाच्या पाकळ्या चुरगाळतील कि काय असे वाटत होते मात्र लोकांचा प्रक्षोभ मशीन पर्यंत जाऊ नये यासाठी प्रतिबंधक सर्व ते प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस कौतुकास पात्र आहेत . निवडणुकीचे राजकारण वेगळे असते , ते जेव्हा शरद पवारासारख्या हिमालयासोबत असेल तर मात्र पात्र गड्याचाच निभाव लागतो , अन फडणवीसांचे यश त्यांची पात्रता सिद्ध करते थेट बारामतीच्या अंगणातून 

ताजे लेख

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

सॉरी महाराज  आज किडक्यासाठी टकमक टोक नाही 

पारतंत्र्य वाढले कि गुलामीची भावना वाढते अन अधिकचे स्वातंत्र्य ...

चोळीबंद  मोदी 

शेतीच्या बांधापासून ते दिल्लीच्या कनॉट प्लेसपर्यंत ...

आमच्यात सुद्धा दानवे आहेत 

व्यापारी  रावसाहेब , नौकरदार रावसाहेब , पाच रुपयाची कोतमिर थेट रुपयाला मागणारा रावसाहेब , शेतकरी ...

 भृष्ट  न्यायधीश आणी मरणासन्न लोकशाही   

कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला जेल होण्याची ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

Close

satta king