24 November
काय चुकले आमिरचे 
What is wrong Amir
By भागवत तावरे
  • 5005 View

काय चुकले आमिरचे ?
 मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत से कयामत  तक येउन गेला ,तो आमीर खान, देशाचा सरफरोशी बनला तर कधी सत्य मेव जयते मधून चळवळ उभी करणारा खरा खुरा नायक . पापा कहते है म्हणत म्हणत बडा नाम करणारा , त्याने काल प्रचंड गदारोळ माजवणारे वक्त्यव्य केले ,‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमिरने  मन मोकळे केले. तो म्हणाला की, या देशाचे नागरिक म्हणून आपण वृत्तपत्रामध्ये बातम्या वाचत असतो. काय घडते आहे, ते पाहतो. जे घडते आहे, त्यामुळे मी चिंतीत झालो, हे नाकबूल करणार नाही. अनेक घटनांनी मी व्यथित झालो आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून असुरक्षिततेची भावना वाढते आहे. आपण भारत सोडू या का, असा प्रश्न पत्नी किरणने मला विचारला. हा विचार तिच्यासाठी फारच मोठा आहे. तिच्या मुलाची तिला काळजी वाटते आहे. आमच्या सभोवताली काय वातावरण असेल, याचीही तिला भीती वाटते. तिला रोजचे वृत्तपत्र उघडण्याचीही भीती वाटते. कुठल्याही समाजात सुरक्षेची भावना असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन करताना आमिर खान याने राजकारण्यांवरही निशाणा या वेळी साधला. आपली काळजी घेण्यासाठी आपण निवडून दिलेल्या लोकांनी खंबीरपणे पावले उचलणे अपेक्षित असते. पण ते होत नसल्यामुळे असुरक्षिततेची भावना वाढत चालली असल्याचे त्याने सांगितले. . कधी एक रुपडं हि देशासाठी  कधी न लावणार्यांनी आमिर ला थेट देश सोडण्याचा सल्ला दिला  मला सर्वात मोठा प्रश्न हा पडला आहे कि त्याला जो विरोध होत आहे तो मुस्लीम असल्यामुळे कि त्याच्या व्क्त्यव्या मुळे  कारण देशात धर्मवाद वाढला आहे हे फक्त आमीर म्हणत नाही त्यात हिंदू असणारे देखील अनेक आहेत मग कुणी त्यांना देश सोडण्याचे रामदासी सल्ले का नाही देत आमीर जे बोलला ते इतरजन हि अगोदर बोलले आहेत अमीर कुठल्याही राजकीय उधेश्याने बोलला नाही मात्र त्याच्या प्रतिक्रिये नंतर प्रतेक जन राजकीय भूमिका आणि परिणाम याचा सारासार विचार करून शब्द फेक करत आहे, आज आमिरखान राज्याच्या जलस्वराज्य योजनेचा प्रचार दूत आहे तो हि निशुल्क त्याने सत्य मेव जयते हा प्रबोधन कार्यक्रम मोफत केला मग त्याचे  सामाजिक भान त्या लोकानी काय पहावे ज्यांनी कधी एक रुपया देशासाठी खर्च केला नाही , रवीना टंडन नावाची नायिका म्हणजे रवीना थडानी यांनी आमीर बद्दल मोठीच आवई दिली म्हणे असे लोक देशाला बदनाम करतात त्याने देशाला बदनाम कुठे केले त्याने जे केले ते तुमच्या शाहीर संभाजी भगत ने ही  केले , जे त्याने केले ते तुमच्या बी जी कोळसे पाटलांनी केले मग आमीर बोलला कि लगेच आरडा ओरडा . आमीर च्या सत्य मेव जयते ने देशात एक चळवळ उभी केली भ्रस्टचारच्या विरोधात , स्त्रीभरून हत्येच्या विरोधात  त्या वेळी कुणी आमीर चे कौतुक करायला नाही आले , आमीर गेला तर म्हणे भारताची लोकसंख्या कमी होईल असे योगी आदित्यनाथ कसे काय म्हणतात , आमीर च्या घरासमोर हिंदू महासभेचे कार्यकर्तेच कसे काय निदर्शने करतात , मला फक्त एवढेच म्हणायचे आहे कि तो बोलला कि हल्लाबोल मग ते शास्त्रमहाभाग आणि लेखक ज्यांनी आपले पुरस्कार परत केले त्यांचे काय ? हि लोकशाही आहे जेवा येकपेक्षा जास्त लोक कुठल्या मुद्द्यावर एकत्र येतात त्यावेळी सत्यता असते फक्त प्रमाण कमीअधिक असते . आणा हजारे ज्यावेळी दिल्ली मध्ये उपोषणास बसले होते त्यावेळी हाच अमीर खान मुबई वरून दिल्ली ला गेला आन्नाना विनंती केली कि तुमची देशाला गरज आहे मग जो आणा हजारेची देशाला गरज दाखून देऊ शकतो मग तो देश सोडण्याच्या भावनेपर्यंत कसा आला याची विचार करण्याची गरज आहे , राहिला प्रश्न आमीर वर नेटवाल्यांचा राग  या नेट वाल्यांना तेवढे गांभीर्य असते का ? असेल तर सनी लिवोनि ला १००० लायिक आणि महात्मा गांधीला किती असतात हे तपासून पहा , असो २०१४ मध्ये म्हणे भारतात नेट वर सनी लिवोनि ला नरेंद्र मोदी पेक्षा जास्त  लोकांनी पाहितले मग आपण सनी मोदिपेक्षा सरस असे म्हणायचे का ?अस्या नेटकर्याकडून आमीर ची काय कसोटी होणार ? म्हणून इंटरनेट वाल्यांच्या प्रतिक्रिया खूप काही म्ह्नणावर घेण्यासारखा नाही .मी पूर्णपणे आमीर चे कौतुक करत नाही मात्र आमीर असा का बोलला याचा विचार करायलाच कुणी तयार नाही . निषेधाची प्रतिक्रिया दिली म्हणजे तुम्ही खरे भारतीय  का ? ज्या धर्मवादातून हे येऊ घातले आहे त्या धर्मांनी वासुदेवक्म कुटुंबकम  हि कल्पना देखील दिली आहे याचे भान या मानवतावादी भारताला नसावे का ? रामदास कदम आमीर ला पाकिस्तान ला जा म्हणाले ते नेपाळ भूतान अमेरिका  दुसर्या कुठल्या देश्यात का म्हणाले याचा विचार जरी आम्ही नाही केला तरी या देशातले देशभक्त मुस्लीम करतात , आमीर चुकला हे असुडोद्दिन वोवेसी ने देखील बोलून दाखवले मात्र त्यानंतर च्या प्रतिक्रिया म्हणजे असहिष्णुता होय आणि ती कुणालाच नाकारता येणार नाही . हल्ली अनुपम खेर मोठ्या मोहिमेवर आहेत देशात सर्व मस्त आहे हे दाखवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे त्या अनुषंगाने आमीर वर त्यांनी बौनसर टाकला हि आहे त्यांच्या शब्दात म्हणायचे तर आमीर ला अतुल्य भारत कधी असहिष्णू वाटला ? ठीक मग शोधा कारण आमीर हा सुधा सामाजिक भान असलेला आहे , याचे भान आपण हि ठेवावेच लागेल न ? किती कमाल आहे तिथे तो संजय लीला भन्साळी आपल्या बाजीराव मस्तानी मध्ये थेट बाजीरावाच्या बायकोला नाचवतो ते तुम्हाला चालते त्यावर कुणी आमचा इतिहास बाटवाला असे कुणी म्हणत नाही नशीब बाजीराव चा दिग्दर्शक संजय आहे वासिम , आमीर , सलमान , इम्तियाज नाही असता तर कुणास ठाऊक त्यात हि धर्म आणून आजच्या सारख्या तिखट खारट तुरट प्रतिक्रिया दिल्या असत्या ?गोमांसाच्या नुसत्या भक्षणाच्या संशयावरून दादरी येथे झालेल्या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीच्या हत्येनंतर सरकारविरोधातील भावनांचा उद्रेक झाला. या पार्श्वभूमीवर, विकासासाठी आवश्यक सुधारणांची चर्चा होण्याऐवजी ती भलत्याच दिशेला वळत आहे.अपेक्षित विकासदर गाठण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुधारणांच्या मार्गात ही बाब अडचणीची ठरू शकते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनीही या देशात प्रत्येकाला सुरक्षित वाटणे आवश्यक आहे. तसे झाले तरच देशाचा सर्वागीण विकास, प्रत्येक समाज घटकाचा विकास करणे शक्य होईल, असे मत त्यांनी नुकतेच व्यक्त केले. मग नारायण मूर्तीचे चूक का याचे हि उत्तर रवीना करीना आणि अनुपम ने द्यावे . राहिला प्रश्न त्या लेखकांचा ज्यांनी पुरस्कार परत केले ,कोणत्याही आंदोलनात जेव्हा-जेव्हा साहित्यिक उतरले, तेव्हा त्या आंदोलनाला एका वैचारिक बैठक निर्माण झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाची सुरुवात १९४६ साली बेळगावच्या साहित्य संमेलनात असाच ठराव मांडून झाली होती. हा ठराव त्यावेळचे प्रख्यात कादंबरीकार आणि नंतरचे पत्रकार गं. त्र्यं. माडखोलकर यांनीच मांडला होता. १९७७च्या आणीबाणीनंतर जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पु. ल. देशपांडे प्रचारात स्वत: उतरले. तेव्हाही वातावरण तयार झाले होते. आता मोदी सरकारविरुद्ध पुन्हा एकदा साहित्यिक मैदानात उतरलेले आहेत. कवी, लेखक, मैदानात उतरलेले आहेत. महाराष्ट्रातल्या लेखकांनी त्यांना शासनाने दिलेले विविध पुरस्कार परत करण्याची भूमिका घेतली. त्यात पुरुष लेखकांच्या बरोबर आमच्या प्रज्ञा दया पवार सुद्धा हिरीरीने उतरल्या. अशोक वाजपेयींसारख्यांनी सुद्धा प्रतीकात्मक निषेध नोंदवून पुरस्कार परत केले.?पण या सगळय़ा निषेधात्मक प्रतिक्रियांना मोठे बळ मिळाले आहे ते प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आणि प्रख्यात कवी गुलजार यांनी पाठिंबा दिल्यामुळे.

आओ सारे पहन  ले आईने 

सारे देखेंगे अपना हि चेहरा 

सबको सारे हसी हि लगेंगे 

गुलजार यांनी या वातावरणाच्या विरुद्ध बोलण्याची मोठी गरज होती आणि अतिशय स्पष्टपणे गुलजार यांनी पुरस्कार परत करण्याचे समर्थन केले आहे. आज स्पष्ट बोलणारी माणसे नाहीत. निर्भीड लिहिणारे पत्रकारही नाहीत. ‘होय बा’ची गर्दी आहे. लाचारांची चलती आहे. या रांगेमध्ये गुलजार यांच्यासारखा मोठा लेखक, कवी उभा राहणे शक्य नाही. त्यांना ते सहन होणार नाही आणि सहन न होऊन गुलजार यांनी लेखकांच्या हत्येबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्याची दखल सरकारला घ्यावीच लागेल. खोमिनीने असेच केले होते. बुद्धिमंतांचे शिरकांड केले, शास्त्रज्ञांचे शिरकांड केले, संशोधकांचे शिरकांड केले. आज या असहिष्णुतेच्या प्रवृत्तीमध्ये खोमीनी विचारच दडलेला आहे.?त्यामुळे समस्त साहित्यिकांना मोठा धक्का बसला आहे. पुरस्कार परत करणे हे मामुली वाटत असले तरी बुद्धिमंतांना आपला निषेध अन्य कोणत्या मार्गाने व्यक्त करता येईल?गुलजार यांनीच तो प्रश्न विचारलेला आहे. यापूर्वी या देशात इतकी धार्मिक असहिष्णुता कधीही निर्माण झालेली नाही. अन्य धर्मियांबद्दलचा अनादर यापूर्वी या देशात झाला नव्हता.या सर्व बाबी नेटवाल्यांनी नाही तर जाग्रुकांनी लक्ष्यात घ्याव्यात  आणि हो नागड्या चित्रपटातील सनी लीविनी ला संस्कृती प्रधान भारत वेलकम देत असेल तर सत्य मेव जयते वाल्या आमीर ने देश सोडू नये तर काय करावे ? याचे उत्तर आजच्या उथळ टीकाकारांनी द्यावे अथवा महान नेटीझंन्स  ने ....

ताजे लेख

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king