03 June

विस्कटले  सारे  मागे तुज्या 

distrubute all behind you
By भागवत तावरे
  • 3028 View


विस्कटले  सारे , मागे तुज्या 
  गोपीनाथ पांडुरंग मुंडे हे एक असे  गारुड ज्याने जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात उडी घेत तुरुंगाच्या सळाया डोळ्यासमोर उभ्या असताना  आणि सहन करणारा एक विद्यार्थी , उद्याचा लोकनेता होईल असे क्वचितच कुणाला वाटले असावे , वर्गात एक हि मुलगी  नसणाऱ्या वाणिज्य शाखेत शिकणारा   पुढे तो प्रेमविवाह करत आणि मग नाथरा ते दिल्ली प्रवास करतो हे  सर्वपरीचितच , तसे ते फक्त राजकीय व्यक्तिमत्व नव्हते एक हुरहुन्नरी आणि अजातशत्रू  म्हणूनच  ओळखले गेलेलि  मराठवाडी आसामी ,  ज्याने राजकारण आणि समाजकारणातील अनेक टप्पे पाहितली ,  आपल्यापैकी बहुतेकांनी गोपीनाथ मुंडे यांच्या बद्दल  सविस्तर आणि मनसोक्त वाचले असेल म्हणून आज  मी काही  आजचे काही बोलतो 
एकमेकाकडे पाटी असणारे एकमेकात पोट घालून सत्तेच्या पाळण्यात झुलावण्याच्या कसब असणारा आणि त्यातून महायुतीचे बारसे करणारा विलासरावाचा जिगरी जाऊन दोन वर्षे झाली हे सांगून हि न पटावे असे सत्य . महाजनांच्या बोटाला धरून राजकारणाचा श्री गणेशा करणाऱ्या एका बहुजनी नेत्याने  बहुआयामी होत लोकनेता व्हावे म्हणजे देशातले एकमेव उदाहरण असावे ,  शेटजी - भटजी चा पक्ष म्हणून ओळख असलेला भाजपा खेड्यापाड्यात घेऊन जाणारा  आणि डोंगर दर्यात कमळ फुलवणारा राज्यातला बहुजनी चेहरा बनला , मराठवाड्यातल्या रस्त्यावर फिरणारी पोर आमदार झाली ती याच जादूच्या कांडीने , नाहीतर  आष्टीच्या चौकात भीमराव धोंडेच्या मित्रमंडळाचा अध्यक्ष्य  सुरेश धस धोंडेनाच पाडून आमदार झाले असते का , बब्रुवान खंदाडे , गोविंद राव    केशव आंधळे , एका पंडिताला तर मंत्री पदाचे बदाम खायला मिळाली ज्यातून मिळालेल्या शक्तीने त्याची सदर अद्याप हिरवीगार असते . सारखी अनेक जन आमदार झाली असती  काय  ? अडगळीला पडलेल्या अनेक घराण्यांना सत्तेची तोरणे बांधणारा हा अवलिया अनेकदा खंजीराचे पाटीवर वणे घेऊन  जगला तो शेवटपर्यंत , ती एक शोकांतिकाच .  कधीकाळी डोंगर दर्यात राहणारा , आयुष्याचा फड उसतोडणीस लावणारा ,कोयत्याचा शिलेदार समाज गोपीनाथ रावांनी विकासाच्या मुख्य वा त्याहि पुढे आणला . लोकसंपर्क, अन्यायाविरुद्ध संघर्षाची नुसतीच तयारी नव्हे तर जिद्द, नवा विचार, नवे तंत्रज्ञान एकूणच जे नवे चांगले ते हवे, असा उत्साह असलेल्या गोपीनाथ मुंडे या तरुणाने भाजपला जनमानसात स्थान मिळवून दिले आणि विशेषतः उपेक्षित-शोषित वर्गात एक विश्वास निर्माण केला, असे समजले जाते. त्यांना राजकारणातील अनपेक्षितपणा, अपयश आणि जीवघेणी स्पर्धा याचा सामना करावा लागला. या संघर्षमय पार्श्‍वभूमीमुळे गोपीनाथ मुंडे मराठवाड्याच्या सीमा ओलांडून मुंबईत गेले. या बळावरच ते राष्ट्रीय नेतेपदापर्यंत पोहोचले. इतकेच नाही तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत गोपीनाथ मुंडे यांना आपले विचार मांडायची संधी, त्यांच्या एकसष्टीच्या पूर्वसंध्येला मिळाली. भारत सरकारनेही त्यांच्या चार दशकांच्या राजकीय तपश्चर्येचा सन्मान केला होता . 
. आणि यातूनच  मुंडे आणि वंजारा हे एक अजोड आणि अपूर्व समीकरण बनले जे अद्याप कायम आहे हे त्या समाजाच्या देव्हाऱ्यात गेल्यावर समजते . एखाद्या संघात  चांगल्या धावा काढून देखील त्यास त्रास व्हावा तसा भाजपात अधून मधून साहेबांना चिमटे बसलेले होते ज्याचा वेध कधी राज्याच्या त्या टोकाला  तर  कधी कोकणच्या  बाजूला , मात्र पर्याय शोधले , संघर्षाचे एक एक पर्व उभे राहत गेले ज्यातून बनला बालाघाटातला हिमालय गोपीनाथ मुंडे . 
  जाड जुड राजकारण्याच्या कळपात  स्वताचे फक्त अस्तित्व नाही तर मेरु उभा करणे म्हणजे विनोद नव्हता काळ्या मातीत आयुष्य वेचणाऱ्या  सादरीवरचे नाही तर  दारातल्यांना सोबत घेऊन नाथ बनलेल्या गोपीनाथरावांना दग्याची फटके हि बसले ज्यातून होरपळलेले मन जाकेट मुळे बहुतेकांना दिसले नसावे मात्र आपली बोटे धरून राजपटलावर आलेल्या आपलेच पाय खेचावेत आणि  तेहि कायमच्या राजकीय विरोधकाच्या उसन्या अवसानावर , हे दुख पचवणारा  आज  आपला वसा पार पाडण्यासाठी जनतेच्या झोळीत दोन पोरीचे दान देऊन गेला ज्याचा वारसा दिल्लीपासून मुंबई पर्यंत समर्थ पणे पेलण्याचा प्रयत्न चालू  आहे .  १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकांत मुंडेंनी भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिले. गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार उघडलेली आघाडी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला. भाजप-शिवसेना युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजप–सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा १४ मार्च इ.स. १९९५ रोजी शपथविधी झाला. इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकीक होता. त्यांनी महाराष्ट्रात ऊर्जा व गृह यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी सांभाळली. गोपीनाथराव उपमुख्यमंत्री म्हणून अत्यंत यशस्वी झाले. राज्यातील लोकांच्या हिताचे प्रश्‍न मांडणारा तडफदार आमदार म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांनी गुन्हेगारीकरनावर अंकुश लावला. वीजनिर्मिती वाढविण्यावर भर दिला. सर्व खात्यांना मार्गदर्शन करून, रचनात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता दाखवली आहे. प्रशासन पध्दतीवर त्यांनी एक वेगळी छाप पाडली आहे. तसेच सरकार समोरील समस्यांचे समाधान करण्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. मुंडे यांनी प्रशासनावर चांगली पकड बसवली आहे. उत्कृष्ट प्रशासक होण्यासाठी समस्यांचा अभ्यास, स्वतःचे मत, प्रशासकीय यंत्रणेवारील पकड, योजनेच्या अमलबजावणीतील उणीवा दूर करणे, लाभार्थीशी संपर्कसाधने, योजनेच्या अमलबजावणीसाठी साधनांची जुळवाजुळव करून ती योजना यशस्वीरित्या राबविणे याबाबत गोपीनाथ मुंडे यशस्वी झाले आहेत. हे उपमुख्यमंत्रिपद सर्वार्थाने गाजवले आणि युतीचे सरकार गेल्यावरही ते जिद्दीने काम करत राहिले
   खंत म्हणून एकच  ज्या महायुती नावाच्या समीकरणातून  राज्यातून ४२ खासदार निवडून आणण्याचे दिवाकर्म मुंडेनि साधले त्या महायुतीच्या धुरांधराचे  हाल होतात याचे . मेटे जानकर शेट्टी आठवले एक एका तुकड्यासाठी दारात ताटकळत ठेवले जातात हे कुणालाही नाकारता येयील का ,  सत्तेची दुपार होत  आली तरी राज्य भर घरची भाकर खाऊन भाजपला माळी समाजाची शिदोरी वाहणारे कल्याण आखाडे अद्याप कुठल्यातरी महामंडळाची वाटच पाहत आहेत , आपल्या पाठीराख्यांना बळ देण्यासाठी , जानकर यांची खद खद  चव्हाट्यावर येत आहे म्हणून त्यांचे दंड आता थेट भाजपशी द्वंद्व करण्यास उत्सुक आहेत , चक्क  मानसपुत्र मानलेल्या महादेवाचे हाल होत असल्याने गोपीनाथ मुंडे यांची उणीव अधिकच अधोरेखित होते ,  मंत्रिमंडळात देखील अनेक खोडसाळ  कावे  होतात  ज्यातून अनेक नाथांची गोची होते , काहींनी मागेच सोड्नामा दिलेला होता आता राहिलेल्यांना  संघातच चिमटे बसत आहेत , म्हणूनच  एकनाथ खडसे  राज्याच्या राजधानीत साहेबांच्या फोटो चा आधार घेतात आणि कसे विस्कटले आहे मागे तुज्या याचीच जाणीव करून देतात .  खडसे यांच्या पुण्यातील कथित जमीन  घोटाळा अद्याप सिद्ध नाही मात्र त्यांची बत्ती गुल करण्याच्या हालचाली म्हणजे अनाथाची कोंडी आहे .  आज जिल्ह्या पासून राज्यात बहुजनी मालिका  संघाच्या अंगणात असुरक्षित आहे म्हणूनच  तो अपघात नसता तर हा घात नसता अश्या भावना खडसे पासून ते बीड च्या स्थानिक कार्यकर्त्या पर्यंत अनेकांची  आहे आणि दुर्दैवाने घडी विस्कटली असे म्हणावे लागेल , लाडाच्या लेकीने जेव्हां बाबाच्या आणि पाठीराख्याच्या वारसात संघर्ष पुकारला तेव्हा त्याची मुख्यालयीन परवानगी कशी अडकवली होती जी यात्रेची दिशा बदलण्याच्या इशाऱ्यावर मिळाली यातूनच घड्या पुढे विस्कटल्या जातील याची ती पेरणी समजली जाते . नाती गोती पूर्वीच सोयीने परप्रकाशी झाली होती हे कमी होते म्हणून कि काय हल्ली कधी काळी जी जी म्हणत होती ती ताई ला नाही नाही म्हणत आव्हाने उभी करत , घरातला आहेर ठेवत आहेत . मनरेगा नंतर देशाला दुसरा उपहार राज्याने ताईच्या कल्पनेतील  वास्तव जलशिवार दिला जावा  हा उर भरावा  असा क्षण असला तरी साहेबांच्या मागे तो सन्मान त्यांच्या वारसदाराला मिळतो का ? 
 मन मागेच दुभंगली होती आता गडकरी समाज हि त्या मार्गावर आहे , गडापासून ते गडावरल्या माणसापर्यंत  वाटे पडले किवा पाडले म्हणा परंतु नाथा मागे तुज्या सारे विस्कटले आहे हे कुणालाच नाकारता येत नाही , बाळकडू घेतलेल्यांनी तुजा वारसाच बळकवला तर आश्चर्य नको कारण कुणास ठाऊक महंताचे शक्तीपीठ उद्या त्यांच्याच भाकरी शेकून देतील आणि विस्कटल्याची सल सर्वज्ञात होईल . ........ 

 

ताजे लेख

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

सॉरी महाराज  आज किडक्यासाठी टकमक टोक नाही 

पारतंत्र्य वाढले कि गुलामीची भावना वाढते अन अधिकचे स्वातंत्र्य ...

चोळीबंद  मोदी 

शेतीच्या बांधापासून ते दिल्लीच्या कनॉट प्लेसपर्यंत ...

आमच्यात सुद्धा दानवे आहेत 

व्यापारी  रावसाहेब , नौकरदार रावसाहेब , पाच रुपयाची कोतमिर थेट रुपयाला मागणारा रावसाहेब , शेतकरी ...

 भृष्ट  न्यायधीश आणी मरणासन्न लोकशाही   

कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला जेल होण्याची ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

Close

satta king