15 November
नरेन्द्रायण
narendrayana
By भागवत तावरे
  • 526 View

नरेन्द्रायण 

मोदी मोदी हा घसातान मंत्र भारतासह जगातल्या काही निवडक व्यापारी देशातून सूर आवळला म्हणा किवा आळवून घेतला . जो अदयाप मीडियात जरी असला तरी वास्तवात निवळू लागला आहे . मला त्या घोषणेशी देणे नाही परंतु एक नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदी यांच्या विषयीची विस्वासहर्तता कमी होत आहे हे तितकेच सत्य .मंदीतून बाहेर पडण्यासाठी थेट परकीय गुंतवणुकीचा निर्णय सरकारने घेतला असला तरी त्यामुळे दुकानदारीवर अवलंबून असणारी कुटुंबे मात्र संकटात सापडतील, हे देखील सरकारने लक्षात घ्यायला हवे. खरंतर, आपल्या देशातील वातावरण बाहेरील गुंतवणुकीला पोषक नसल्याचे माझे मत आहे. साधारणतः कृषी क्षेत्रातील आर्थिक उलाढालींचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. पण आपल्या देशात शेतीमालाच्या पडत्या बाजारभावामुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत उत्साह नाही. त्यातच शेतकऱ्यांची क्रयशक्ती घटल्याने बाजारात मंदी आहे. गुंतवणुकीला प्रेरणा देणारी सरकारची दिशा नाही. म्हणूनच शेती क्षेत्रासोबत उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीलाही नैराश्याने ग्रासले आहे. गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकारकडून निर्णय होत नाहीत. या साऱ्याचा परिणाम म्हणूनच वाहन खरेदीत घट व सोन्याची खरेदीही ६० टक्क्यांनी कमी झाली असल्याचे आपल्याला दिसून येते. या गुंतवणुकीसंदर्भात सोव्हियत रशियाचे उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे. पूर्वी सोव्हिएत रशियातील वस्तूंच्या किमती सरकार ठरवत असे. मात्र तेथील सरकारनेच ‘बाजार ठरवेल तीच किंमत’ असे धोरण स्वीकारल्याने प्रचंड महागाई वाढली. एका वर्षात सोव्हिएत रशियाचे तुकडे होऊन पंतप्रधान गोर्बाचेव्ह यांची सत्ता गेली. त्याउलट चीनने डाव्या विचारसरणीची चौकट न सोडता उद्योगवाढीला चालना दिली. आज भारतात रिटेल क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला दरवाजे सताड उघडे केल्याने चिनी कंपन्यांचे प्राबल्य वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या राज्यकर्त्यांनी रिटेल क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे. सोव्हिएत रशियाच्या पंतप्रधानांनी कम्युनिस्ट तत्त्वे बाजूला ठेवून आपल्या देशाला ताकदवान बनवण्याच्या नादात अर्थव्यवस्था खुली केल्याने भांडवलदारांची मुजोरी वाढून पुढे या देशाचे दहा तुकडे झाले. आपल्या सरकारनेही तसेच निर्णय घेतल्यास आपल्या देशाचीही तीच गत होईल की काय, अशी भीती मला वाटते.

भारतीय पंतप्रधान आणि विश्व यांच्यात नेहमीच मिडिया गंभीर राहिला आहे त्यासाठी भारतीय लोकसंख्या हि बाजारपेठ म्हणून पाहितली असेल अथवा व्येक्ती म्हणून पंतप्रधान पात्र राहिले असतील , पंडित जवाहर नेहरू , लाल बहादूर शास्त्री , इंदिरा गांधी , राजीव गांधी , आणि आता नरेंद्र मोदी हे वैश्विक कीर्तीस गवसणी घालणारे ठरले आहेत . पंतप्रधानाची राजकीय मुल्य कमीअधिक झाली असतील मात्र त्यांचे व्येक्ती म्हणून अवमूल्यन कधीच झाले नाही हारतुरे जरी मिळाले नाही तरी शिव्या शाप देखील त्यांच्या नशिबी नव्व्त्या मात्र मोदी त्यास अपवाद ठरले , वेगाने विदेशी सीमा मागे टाकत लोकप्रियतेचे शिखरे मागे टाकणारा हा माणूस हल्ली निषेदाचे फलक पहात आहे , यासाठी कुणी जबाबदार नाही तर त्यास आपण केलेले भम्पक वक्त्यव , अतार्किक महत्वकांक्षा , या गोष्टी अंगलट आल्या आहेत कालचेच घ्या पंतप्रधान इंग्लंड मध्ये बोलत होते त्यांनी भारत आता प्रगती साधत असल्याचे सांघीतले मग १८००० गावात विद्दुत खंबा नाही हे सांघत असताना प्रगती कुठली साधली ? आम्हाला कुठल्या मदतीची गरज नसल्याचे ठणकावताना आपल्या देशातल्या स्वौचालाय इतर देशातून आलेल्या मदतीतून उभे राहिले आहेत हे सांघताना आपण कुठल्या स्वावलंबनाविषयी आपण बोलत आहोत हेच ते विसरले होते कि काय हाच प्रश्न मोठा गमतशीर आहे

जे चांगले आहे त्यासाठी आपण आणि आपले सरकार जबाबदार व देशातल्या इतर समस्याविषयी आपल्या अगोदर चे सरकार हा अत्यंत अशोभनीय प्रकार वर्तमान भारतीय पंतप्रधान करत आहेत . काल अत्यंत महत्वाची त्यांनी गांधी विषयी टिपणी केली त्यांनी इंग्लंड च्या संसदे समोर असणार्या महात्मा गांधी यांच्या पुतळा असण्याविषयी आनद असल्याचे सांघीतले असो त्यांनी यानंतर जगाला गांधी किती गरजेचे असल्याचे सांगितले जर मोदी यांच्या भाजपचे खासदार साक्षी महाराज गांधीला मारणाऱ्या नथुराम गोडसे ला देशभक्त सम्भोदु शकतात तर मोदींचे गांधी वचन किती खरे आहे ? , जर असे होत असेल तर मोदींच्या वक्तव्यावर कसा विस्वास कुणी ठेवावा , भारत एक मोठी बाजारर्पेठ् आहे म्हणून पंतप्रधानाचे कुणी गोडवे गात असतील म्हणून काय भारतात कुणी मोदी स्तुती सुमने गाणार नाही त्याचा प्रतय बिहार निकालातून समोर आला आहे . भारतीय पंतप्रधांनाना जो भाव मिळतो तो त्यांच्या भाषेत " सवासो करोड " भारतीयांचा आहे हे कुणीतरी धाधंत मिडीयाला आणि मोदींच्या पाठीराख्यांना सांघने गरजेचे आहे

ज्याप्रमाणे मोदी आणि त्यांची विदेश नीती दोन्ही हात पसरून जगाला कवेत घेऊ इच्छित आहे त्यावरून तरी हा फक्त प्रसिद्धीचा खेळ आहे . यात सवासो करोड ची फसगत होत नाही ना याचा कुणी तरी विचार करावा . म्हणजे काल परवा पवारांनी जी खंत बोलून दाखवली ती विचार करण्यासारखी आहे

ताजे लेख

बारामतीच्या मळ्यात देवेंद्र फुलले 

परवा राम कदम कलागौरव  पुरस्कार प्रदान करताना गाडगीळांनी शरद पवारांची मुलाखत घेतली ...

शिवसेनेला ते उमजले आहे  

स्व बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला ज्या शिवसेनेचे रोपटे लावले होते त्याचे बीज ...

बाबांच्या लेकीचे पुन्हा पतन 

दोन संघर्ष यात्रा काढून मतदारांना लोकनेत्याचा वारसा पुरवण्याची हमी देणाऱ्या ...

तर राज ठाकरेंचे  दिवस पुन्हा येतील

जबाबदारीने लिहतोय,  त्याबाबद विश्वसाहार्य नसलो तरी एकूण पक्षांची राजकीय वाटचाल ...

रयतेचा राजा आहे तुमचा इव्हेंट नाही 

शिवाजी हे फक्त कुठल्या राजा - व्यक्तीचे नाव नसून ते एक लोककल्याणकारी राज्यनिर्मितीस ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

काय चुकले आमिरचे 

काय चुकले आमिरचे ?  मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत ...

Close

satta king