09 October

भाजपचा माधव फंडा मराठ्यांच्या मुळावर

bhajap planed against maratha
By भागवत तावरे
  • 1020 View

 

गाभारा भगवानगड वादाचा

लोक गुळाने सुद्धा मारले जाऊ शकतात, गळे केसाने सुद्धा कापले जातात असा ही इतिहास आहे . खरे म्हणजे मी सकाळी वर्तमानपत्र वाचताना हे लक्ष्यात आले की कुणाचे तरी 'षड'यंत्र चांगलेच यशस्वी झाले आहे याची खात्री पटली की भगवान गडाच्या वादात कुणाकुणाच्या पोळ्या आहेत . स्वताला दिशाकर्ते समजणाऱ्या  माध्यमांची गठ्ठे देखील कसे कसे कफल्लक ठरून जातात याची कीव आली . विविध शोधवार्ता काढून समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी माध्यमे देखील कसी स्वताच्या डोळ्यात धूळ सहन करतात याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे भगवानगड वाद, होय माध्यमांच्या डोळ्यात धूळ फेकणारा ठरला भगवान गड वाद  . भगवानगड वादाचा अन भाजपचा थेट संबंद असेल का नाही , वा पंकजा मुंडे या भाजपच्या प्यादा म्हणून काम करत आहेत का हे कळायला आणखी थोडा अवधी लागेल. मात्र हे सत्यच आहे की भाजपच्या माधव भंडारी यांनी भाजप पंकजा च्या पाठीशी आहे असे सांगून भगवानगड वादावर जुगार लावला आहे. होय सत्य हे आहे की लाखोचे मोर्चे भगवानगड वादाच्या भोवऱ्यात फिरवले जात आहेत अन सामाजिक अन माध्यमांच्या अवधानास गडाच्या वादावर केंद्रित केले जात आहे ? जिल्हानिहाय लाखोचे मोर्चे मूक करण्याचा हा परशुरामी इलाज भाजपने काढला आहे अन त्यासाठी ओबीसीचे मोहरे वापरले जात आहेत काय हे शोधले पाहिजे . कारण धनगर समाजाचे महादेव जानकर काल प्रतिक्रिया देताना असे म्हणतात मी पंकजाताई यांच्या सोबत गडावर जाणार आहे . त्यांचे धनगर आरक्षणाचे घोंगडे जे भिजते आहे त्यांनी ते भगवानगड वादात कसे फडकून घेतले .हेच यातून समोर येते . पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाला अद्याप उघड पाठींबा दिला नाही मात्र त्याच कालखंडात त्या त्यांच्याच सरकारने भृष्टचारात तुरुंगात टाकलेल्या छगन भुजबळ यांना भेटतात , ओबीसी ऐक्याच्या प्रचारात त्यांचा फोटो सर्रास वापरला जातो हे मराठा समाजाला लक्ष्यात येणार नाही एवढे मोठे ते गुपित नाही.
   भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्य नामदेव शास्त्री अन ना.पंकजा मुंडे यांच्यातला वाद का अन कश्यामुळे आहे यासाठीचा आवश्यक तेवढा खल मी या पूर्वीच केला आहे म्हणून पुन्हा ते गाणे वाजवणार नाही मात्र भाजपचे षड्यंत्र मराठ्याची क्रांती दुमडून कशी भगवानगड वादाच्या गाभाऱ्यात कैद करत आहेत  हे सांगायचे आहे .
    पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणा अथवा त्यांच्या राजकीय प्रस्थाचे लाभार्थी गेल्या आठवड्यात १०० च्या आसपास चारचाकी घेऊन भगवानगडावर  विनंती करायला, ते  देखील कुणी १०० गाड्या घेऊन ,  माझा पहिला अनुभव आहे असे पाहण्याचा तसा नामदेव शास्त्रीना देखील एवढे भक्त का येत आहेत याचा गर्भित अर्थ कळाला म्हणून त्यांनी देखील तेवढेच वा त्यापेक्षा अधिक भक्त आपले ओळखू यावेत म्हणून गुलाल लावून गडावर तयार ठेवले अन पुढे काय झाले हे सर्व ज्ञात आहेच .( शास्त्री समर्थकांनी ताई समर्थक ज्या माजी आमदार केशव आंधळे अन दशरथ वनवे सारखे चांगला चोप देऊन पाठवले ) मला फक्त एवढे सांगायचे आहे की जिथे एकदा फटकाफटकी झालेली आहे अन काय होईल सांगता येत नाही तिथे भाजपने आपली माधवगिरी का करावी ? माधव भंडारी यांनी कालची बेडूक उडी मारली ती उगाच नाही , भगवान गडावरचा वाद वाढावा, तिथे शी पन्नास गेले तर गेले मात्र वाद वाढला म्हणजे मराठ्यांचे मानगुटीवरले भूत आपोआप उतरते. हा शोध काढून त्यावरची मात्रा म्हणजे भाजपचा हा फंडा असे मला तरी वाटते .
   मुख्यमंत्री अन जानकर यांच्या भगिनी असणाऱ्या पंकजा मुंडे यांना गड या विषयावरून चालत असलेला धुडगूस थांबवन्यास विनवणी केली जाऊ शकत होती . विनवणी हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला कारण फडणवीस जर स्वायत्त असते तर त्यांनी आजपर्यंत पंकजा मुंडे यांचा राजीनामा घेतला असता . ते घेऊ शकले नाही मला त्याच्याशी देणेघेणे नाही मात्र मला हे स्पष्ट करून सांगितले पाहिजे की "बडे बडे शहरो मे छोटी  छोटी  बाते होती है" असे म्हणणारे आबा ४०७ टेम्पोत सामान घेऊन आम्ही तासगावला पाठवले होते अहो त्यांनी तर तंटामुक्ती , गाडगेबाबा योजना , बारबंदी असे कितीतरी ऐतिहासिक कामे केली अनेक गरिबांच्या घरात आबा चे फोटो आहेत कारण त्या घरातला मुलगा आबा मुळे पोलीस झाला आहे , असे असताना देखील त्यांच्या असंवेदनशील वक्तव्याने त्यांना खुर्ची सोडावी लागली . चला कुणाकडे होता ओ पुरावा आबा तसे म्हटल्याचा, कुणाकडेच नाही तरी दिला त्या महात्म्याने राजीनामा, त्याला म्हणतात नैतिकता, उलट पंकजा मुंडे यांनी काल खोटे गुन्हे अन कसे तडीपार करतो याचा जाहीर खुलासाच दिला मग सत्तेन्द्रांनी घेतला का राजीनामा, नाही . दुसरे प्रकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्वेतपत्रिका काढली होती , चुलता शरद पवार सारखा सहयाद्री असताना गपचीप त्या पुतण्याने राजीनामा दिला ते पण दादाच आहेत मात्र त्यांनी संवेदना जाग्या ठेवल्या पुढे निर्दोष सिद्ध झाल्यावर त्यांची घरवापसी झाली . ही उदाहरणे एकीकडे अन खुर्चीला घट्ट पकडून बसलेल्या पंकजा मुंडे दुसरीकडे असे हे चित्र समजून घेण्याची गरज आहे.
  भावना अन राजकारण हे वेगवेगळे मुद्दे असतात मात्र भावना मिक्स करूनच राजकारण करण्याचा पंकजा मुंडे यांचा हट्ट राज्य पाहत आहे. यापेक्षा त्या मराठ्यांचा रोष स्वीकारत आहेत ,ही मोठी राजकीय चूक आहे.  गेली २५ वर्षाची खदखद व्यक्त करणारा मराठा समाज आपले मुकमोर्चे काढत आहे आपल्या  जखमा  सरकारला दाखवत आहे अन त्याच सरकारातल्या मंत्री पंकजा मुंडे सरकारच्या आरोपीला भेटून कुठले राजकारण करत आहेत ?काय पाप केले मराठ्यांनी , अनेक मराठा सरदार खपली आहेत स्व.गोपीनाथ मुंडे हे प्रस्थ उभे करण्यास , असा प्रश्न मराठा समाज विचारेल तेव्हा पंकजा यांच्याकडे त्याची उत्तरे नसतील . अखंड राष्ट्रवाद गाणारा संघ हे का पाहत नाही कि त्याचे अपत्य भाजप कसे जाती जातीत तेल ओतत आहे ?
   माधव भंडारी यांना भगवान गड वा नामदेव शास्त्री वा हे का चालू आहे वा कधी स्व मुंडे साहेबांनी देखील पायथ्याला मेळावा घेतला होताका हे लक्ष्यात आहे का ? त्यांना भगवान बाबा कोण होते , नामदेव शास्त्री यांच्या अगोदर तिथे कुठले मठाधिपती होते ? भीमसिह महाराज कोण होते त्यांची माहिती भंडारी यांना आहे काय ? नाही, कारण त्यांना त्याच्याशी काही देणे नाही त्यांना फक्त अनेक आरोप असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या पाठीशी भाजप उभे करायचे आहे, शी पन्नास माणसे गारद करायला ?
     वारे भाजप इथे  मराठ्यांच्या जगण्याला बळ द्यायचे नाही अन कुठे भगवान गडाच्या वादाला पंकजा मुंडे यांना  सहकार्य करून माणसे गारद करायची हाच आहे का भाजपचा चेहरा ? नामदेव शास्त्री हे राज्यातले एकमेव न्यायाचार्य आहेत , ज्या रामदेव बाबाच्या मागे पुढे भाजपचे चार भंडारी अन चार माधव फिरतात ते रामदेवबाबा नामदेव शास्त्रींना वाकून कुर्निसात घालतात, का तर शास्त्री ते ज्ञान अन उंची राखून आहेत म्हणून. त्या नामदेव शास्त्री यांना एकेरी , आसारामाची कोठडी दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नेत्या पंकजा मुंडे यांना भाजप कसे सहकार्य करू शकते हे माधव भंडारी यांना कुणी समजून सांगावे ? असो माधव अन त्यांची भाजप असे का करतेय यापेक्षा त्यांना मराठ्याचे मोर्चे भगवान गडाच्या गाभाऱ्यात गतप्राण करावयाची आहेत काय अन पंकजा मुंडे यांचा राजीनामा कुठल्या युक्तिवादाने रोखला आहे हे लवकरच स्पष्ट करावे लागेल. नसता मराठ्यांचे मोर्चे बोलके होतील अन भाजपला अन त्यांच्या सर्वच गडकर्यांना सत्तेत मूक व्हावे लागेल हेच अन हेच सत्य. भाजपचा "माधव" जातीवादाची नांदी ठरू नये याच साठी हा शब्दप्रपंच

बाकी बहिण भावाचे नेहमीचे सख्य हे थेट मुख्यमंत्री होणे इथपत टिकून असते अगदी रासप विरुद्ध भाजप असा सामना असला तरी , आता हे भाजपला कळते का ? का वळत नाही हे भागवत जाने

 

....प्रतिक्रिया द्या   

ताजे लेख

बारामतीच्या मळ्यात देवेंद्र फुलले 

परवा राम कदम कलागौरव  पुरस्कार प्रदान करताना गाडगीळांनी शरद पवारांची मुलाखत घेतली ...

शिवसेनेला ते उमजले आहे  

स्व बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला ज्या शिवसेनेचे रोपटे लावले होते त्याचे बीज ...

बाबांच्या लेकीचे पुन्हा पतन 

दोन संघर्ष यात्रा काढून मतदारांना लोकनेत्याचा वारसा पुरवण्याची हमी देणाऱ्या ...

तर राज ठाकरेंचे  दिवस पुन्हा येतील

जबाबदारीने लिहतोय,  त्याबाबद विश्वसाहार्य नसलो तरी एकूण पक्षांची राजकीय वाटचाल ...

रयतेचा राजा आहे तुमचा इव्हेंट नाही 

शिवाजी हे फक्त कुठल्या राजा - व्यक्तीचे नाव नसून ते एक लोककल्याणकारी राज्यनिर्मितीस ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

काय चुकले आमिरचे 

काय चुकले आमिरचे ?  मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत ...

Close

satta king