07 March

बाळाचा बाप ब्रह्मचारी यांत्रिकी'करण'

unmarried father mshiankaran
By भागवत तावरे
  • 306 View


ए कहा आ गये हम ,वात्सल्याच्या मुळावर वीज्ञानाचे यांत्रिकी'करण'
भारतात मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून अनेक अवाकी कायदे पारीत झाले आहेत ज्यामुळे भारतीय गरीमेच्या कक्षा कमालीच्या रुंदावल्या आहेत . मी नोटबंदी बाबद बोलत नाही तर सरोगसी या प्रकाराबाबद चिंतीत आहे . लग्न न करता बाप बनण्याची संधी विज्ञान अन आपल्या  सरकार ने उपलब्द करून दिली आहे .(सरोगेसी रेगुलेशन बिल 2016 ) यानुसार नुकताच करण जोहर ( माणसात नसलेला, असे बोलले जाते ) अस्याच प्रकारे बाप झाला . लग्न न करता दोन लेकराचा पिता बनलेला करण भलताच खुश होता . त्याच्या माता पित्याचे नाव त्याने त्या लेकरास दिले असून त्याच्या आई वडिलांना मात्र या कार्यकर्तत्वाचे काय वाटले असेल ते देवच जाणो . प्रगती तंत्रज्ञान महत्वाचेच मात्र मानवीय मर्यादा हक्क संवेदनाचे जर यांत्रिकीकरण होत असेल तर मानवीय परस्पर सन्मान मर्यादा धुळीस मिसळून जग फक्त शरीराची भाषा बोलेल अन चार्वकाच्या कल्पनेतील जग मूर्त स्वरुपात येऊन नैतिक मूल्याचा रास होईल याबाबद शंका नाही . महिलांचा गर्भ किरायाने घेतला जातो त्यात पुरुषाच्या शुक्राणूच्या वापराने गर्भ रोपित केला जातो . नऊ महिन्यांनतर ती महिला आपल्या गर्भातून एका बाळाला जन्म देते नंतर ती महिला त्या बाळाची आई नसते ते बाळ कायद्याने अन विज्ञानाने फक्त त्या शुक्राणू वाल्या बापाचे असते , म्हणजेच त्या मुलास आई नसते , वात्सल्य आणि जगातल्या सर्वात पहिल्या मोठ्या गुरूपासून  ते मुल वंचित राहते , आई अन आईची माया त्याला मिळत नाही कारण त्याचा जन्म माईच्या उदरातून नाही तर किरायाच्या कोक मधून झालेला असतो . म्हनुणच सरोगसी हा प्रकार एकूण आई या संकल्पनेला पुसून टाकणारा आहे . आई एक मोठे साम्राज्य आहे जे मोदी यांच्या निर्णयाने उध्वस्त होत आहे . कुणाच्या आयुष्यात आईचे महत्व काय हे सर्वांनाच ठाऊक आहे मात्र विज्ञान अन अगतिक माणसात नसणाऱ्या लोकांनी महिलेचे अर्धे विश्वच संपून टाकले नाही काय ? 
       बॉलिवूडमधील प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक करण जोहर बाप झाला आहे. सरोगसीच्या मदतीने करणला एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी अपत्यप्राप्ती झाली आहे. सरोगसीद्वारे सिंगल पेरेंट होणारा करण हा नजीकच्या काळातला दुसरा सेलिब्रेटी ठरला आहे.मुंबईच्या अंधेरी भागातील मसरानी रुग्णालयात 7 फेब्रुवारीला या दोन बाळांचा जन्म झाल्याची माहिती आहे. मात्र महिन्याभरापासून जोहर कुटुंबाने ही गोष्ट उघड केली नाही. वडील म्हणून करणच्या नावाची नोंदणी करण्यात आली असून आईच्या नावाचा उल्लेख नाही. करण जोहरने यापूर्वी अनेक वेळा पिता होण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यामुळे करण लग्न करणार असल्याची अटकळ बॉलिवूडसह तमाम चाहत्यांनी बांधली होती. मात्र सरोगसीच्या माध्यमातून सिंगल फादर होत करणने या सर्व चर्चांना छेद दिला आहे. भारतात 2002 पासून सरोगसी कायदेशीर आहे, मात्र आई किंवा वडील यांपैकी एक जण दाता असणं बंधनकारक आहे. गेल्या वर्षी अभिनेता तुषार कपूरनेही सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाला जन्म दिला होता. त्याचा कित्ता गिरवत करण जोहरनेही आपली इच्छा पूर्ण केली. ज्याच्यावर महिला अन विचारवंतातून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. करण जोहर चे चोरी चोरी चुपके चुपके काय होते याच्याशी  
गोष्ट किरायाच्या गर्भाची , महिलांचे मातृत्व वात्सल्य विक्री आहे.  सरोगसीचे दोन प्रकार आहेत एक फक्त पित्याचे शुक्राणू एका किरायाच्या महिलेच्या गर्भात टाकले जातात ज्यातून सदरील महिला एका बाळास जन्म देते ज्याचा अनुवांशिक संबंद फक्त त्या शुक्रानुवाल्या पुरुषाशी असतो त्या बाळामध्ये आईचे कुठलेच गुण अथवा अनुवंशकता नसते म्हणून ते बाळ फक्त त्या पित्याचे असते . माय नसणारे ते बाळ असते . दुसरी पध्दत एखादे जोडपे म्हणजे पुरुष आपले शुक्राणू अन महिला अंडाणु किरायाच्या गर्भात वाढवतात ज्यातून मुल जन्माला येते . त्या मुलाचे अनुवांशिक माता पिता  ते शुक्राणू अंदाणु देणारे स्त्री पुरुष असतात . जन्मेलेल बाळ जिला आई म्हणते तिच्या उदरातून मुलाचा जन्म झालेला नसतो . अन कुठलाही संबंद नसताना जिच्या उदरातून मुलाचा जन्म झाला ती त्या मुलाला आपले बाळ म्हणू शकत नाही . काय शोकांतिका आहे आई या विश्वाची किती मोठी थट्टा विज्ञानाच्या मदतीने आपण करत आहोत अन माणसात नसलेले करण सारखे हिजडे , अन फिगर चांगली रहावी यासाठी काही महिला  त्याचे अनुकरण करून एकूण महिलेचे विश्वच उध्वस्त करू पाहत आहेत . दुर्दैवाची अजीब अन धक्कादायक गोष्ट हि भारतात सर्वाधिक किरायचे गर्भ उपलब्ध आहेत . संस्कार अन संस्कृतीची भूमी समजल्या जाणाऱ्या भारतात नात्याची माउली संपवली जात आहे . मातृ या देवतुल्य व्यक्तीरेखेला चक्क भाडोत्री गर्भाशय  बनवले जात आहे . जगातल्या ५०० सरोगसी पैकी ३०० सरोगसी फक्त भारतात होतात . कुटुंब नाते मर्यादा सर्व धुडकावून नात्यांचा बाजार होत असताना खेदच वाटावा .  कधी काळी संस्काराची योगभूमी समजल्या जाणाऱ्या भारताकडे सरोगसीसाठी स्वस्त स्थळ म्हणून पाहितले जाते . करण जोहर ने चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातील कहाणी प्रत्यक्षात स्वताच्या आयुष्यात उतरवून एकूण मातृत्वाचा अपमान केला आहे . अमीर खान शाहरुख खान तुषार कपूर आणि आता करण जोहर यांनी किरायाच्या गर्भातून पुत्रप्राप्ती करून घेतली आहे . भावना चेंगरून गर्भाशयाला मात्र एका मशीन प्रमाणे ग्रहीत धरले जाते , भारतात हा एक मोठा व्यापार ठरत असताना गंभीर बाब आहे . 
..
कळाले मला तू सरोगेट आई 
किती लावला सांग ना रेट आई 

किती काळजी गं तुला कातडीची 
कधी आतड्यापासुनी भेट आई 

हवी कागदाची विमाने नि होड्या 
कुठे मागतो गिफ्ट रॉकेट आई ?

तुझे ते करीयर नि शूटिंग, दौरे 
किती काळ नाही गळाभेट आई !

तुझ्या गोधडीची हवी ऊब मजला
तुला प्रीय पण 'रेड कार्पेट' आई ...

खरे एक आयुष्य, 'रीटेक' नाही 
न येई पुन्हा लावता 'सेट' आई … 

ताजे लेख

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

सॉरी महाराज  आज किडक्यासाठी टकमक टोक नाही 

पारतंत्र्य वाढले कि गुलामीची भावना वाढते अन अधिकचे स्वातंत्र्य ...

चोळीबंद  मोदी 

शेतीच्या बांधापासून ते दिल्लीच्या कनॉट प्लेसपर्यंत ...

आमच्यात सुद्धा दानवे आहेत 

व्यापारी  रावसाहेब , नौकरदार रावसाहेब , पाच रुपयाची कोतमिर थेट रुपयाला मागणारा रावसाहेब , शेतकरी ...

 भृष्ट  न्यायधीश आणी मरणासन्न लोकशाही   

कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला जेल होण्याची ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

Close

satta king