09 March

मरायला गावच बरा 

village good for death
By भागवत तावरे
  • 286 View


संवेदना हरवलेल्या शहरांच्या अपार्टमेंट पेक्षा गावातल्या गल्ल्या संपन्न अन श्रीमंत आहेत .
प्ले स्टोअर मध्ये सोल्यूशन शोधणाऱ्या तरुणाईला गावाकडची सुख-दुख वाटून घेणारी संकृती शिकवण्याची आज गरज आहे.   मागच्या पंधरवाड्यात औरंगबाद मधील  अपार्टमेंट मध्ये हरवलेल्या सवेदनांचे प्रतिक म्हणून एक घटना घडली . मृत व्यक्तीचे शव अपार्टमेंट मध्ये आणण्यास मज्जाव केला अन राज्यभरात त्या अपार्टमेंट मधल्या लोकावर प्रचंड टीका झाली . त्या लोकांना दुषणे देताना एक वेगळी बाब लक्ष्यात आली कि अशी घटना खेड्यात , गावात का होत नाही , तिथे शहरासारखे आधुनिक शिक्षण नाही प्रगती नाही तरी तिकडचे लोक परोपकार, माणुसकी, मानवीय परस्पर स्नेह आदर कशी जपतात .जर शहरात राहून शिकून सवरून शहरवासीय मानवीय सद्भाव जपत नसतील तर  किती कमाल आहे नाही . शहरातला कितीही हि मोठा शेठजी परलोकी पोहचला कि त्याला वाट लावायला सी दोनशे लोक असतात मात्र गावाकडे बिनकामाच जरी तरफडल तरी हजार दोन हजार लोक अग्निडागाला काम बुडवून उपस्थित असतात. हा फरक मोठा अंतर्मुख करणारा आहे .  पदराने डोळे पुसनाऱ्या माता माउल्यांची सर शहरातल्या अपार्टमेंट मधील बाईसाहेबांना कधी यायची . ग्लिसरीनचे नाही तर खरे आसवे गाळून जणू आपल्या कुटुंबातीलच कुणी गेल्याचे दुख व्यक्त करताना गावकरी जेवढे निरागस असतात तेवढे शहरात भाड्याने तरी लोक मिळतील का ? म्हणूनच खेडी  शहराच्या तुलनेत भावनेत  कमालीची श्रीमंत असतात असे दिसून येते . 
     हात्मा गांधीनी खेड्याकडे चला असा संदेश देऊन खेडी भारताचा आत्मा असल्याचे कधीच सांगितले आहे मात्र चकाचक शहरातील झगमगाटात सुख शोधणाऱ्या इंडियाला बी प्रक्तीकल होताना आपण पाहत आहोत . फुले शाहू आंबेडकर यांच्या जयंत्या साजऱ्या करून त्याचे फोटो पेपरात छापून आणून विचाराचा जागर करणाऱ्या समाज व्यवस्थेत भावना देखील बेगडी झाल्या आहेत . जिवंत माणसाचे मूल्य समजून जपणारी भावना मेलेल्या माणसासाठी संपलीच आहे . शहरे बाह्यअंगाने सर्वांगसुंदर झाली आहेत बंगल्यांना खिडक्या आहेत मात्र त्याला आविर्भावाचे पडदे लागल्याने बाहेरचे जग बंगल्यात राहणारांना दिसेनासे झाले आहे . बाजूला राहणारा कोण कसा याच्याशी त्याला देणे घेणे नाही खेड्याकडे मात्र याकडच्या तुकाराम ला त्याकडच्या सखारामची फिकीर असते . बांधावरून ते मोरीचे पाणी दारात आल्यावरून गावाकडे कुरुबुरू होतात नाही असे नाही मात्र निम्या रात्रीला कुणाच्या झोपडीतून नुसता धूर जरी दिसला तरी प्रत्येक घरातून घागरी ,कळस्या पाणी भरून विझवायला निघतात.  शहरात विझवतात का शिलगावतात यावर काही न बोललेले बरे . शाश्वत आनंदाचा शोध घेतला तर तो शहरातील कॉफी पोइंट वर नाही तर गावाकडच्या चावडीवर पारावर शेरीच्या आकरावर मिळेल कारण माणूस शहरात येणारा जिव्हाळा सोडूनच शहरात दाखल होतो कारण बीड मधील ज्या अपार्टमेंट मध्ये मृत शरीरास प्रवेश नाकारला ती लोक देखील शिकून सवरून खेड्यातून शहरात आलेली आहेत.  शहरात राहणाऱ्या कुणालाही विचारा तुम्हाला अडचण आल्यावर काय करता अर्ध्यापेक्षा अधिक लोक सांगतील की माझा गावाकडे अमुक अमुक आहे त्याला सांगतो अन मग अडचण सुटते . किती आश्चर्याचे गोष्ट आहे नाही प्रगतीच्या नावाखाली सिमेंट चे जंगले वाढवली इमल्यावर इमले रिचवली मात्र चार चौघातला माणूस एकटा केला येवढा कि तो मेल्यावर खांद्यावर घेऊन जाणारे चार सोडाच इथे त्या शरीराला अपार्टमेंट मध्ये घेऊन येऊन नका आमची वास्तू शांती झालेली नाही , मुल भितील असा मज्जाव केला गेला .  पुरोगामी महाराष्ट्राला अस्या लोकांची लाज का वाटू नये . आज हि गावाकडे माणूस गेला तर सारा गाव हातची काम सोडतो , मयताच्या कुटुंबाला आधार देतो , हळहळतो किमान ५ दिवस मृत व्यक्तीच्या दुखात गाव असते . त्यांची लेकरे भीत नाहीत ना त्यांची वास्तू शांती रखडते . मृत्यू हे अंतिम सत्य शहरातली माणसे काय मरणार नाहीत अशी वागत असतील तर गड्या तुज्या शहरापेक्षा गावच बरा. गावाकडच्या लोकामध्ये देवान घेवाण चालते ज्यास उसनवारी म्हणतात , चुलीतला विस्तव साऱ्या गावाची भूक भागवतो तर अवचकली आलेल्या पाहुण्याला चहा करायचा झाला तर रखुमा मावशीकडून एक कप साखऱ्या चटकन मिळून जातो , जो बेगडी शहरात मिळत नाही . 
                                  जानदार मौत करणारे गावे म्हणूनच अमर व्हावेत 
हरातील कुठल्याही यशस्वी माणसाचा परिवेश मोजा खूप खूप तर १०० लोक त्यांच्या संपर्कात असतात म्हणजे जर दुर्दैवाने आपला मृत्यू झालाच तर वेळेत वेळ काढून कितीजण आपल्या मौतीला येतील सी दोनशे त्यात देखील अर्धे कवटी फुटायच्या आत पसार , गावाकडे चला सरमाडाच्या पेंढ्या दोन लाकडावर सुतल्यांनी बांधण्यापासून ते मृत व्यक्तीला अंघोळ घालून त्यास तटकीवर झोपवण्यापर्यंत सारा गाव गल्लीत बसलेला असतो . नंतर कोसभर सरण रचणारे त्यासाठी लाकडे जमा करणारे , चंदनाचा पाला पळत जाऊन आननारे , ओळख असू नसो गावातला माणूस गेला म्हणून हंबरडा फोडणाऱ्या आया बहिणी तर शहरात पाहायला पण मिळत नाहीत . कुठलीही घाई गरबड न  करता सारा गाव मयत व्यक्तीला वाटे लावताना सवडीने हजर असतो , अग्निडाग देणाऱ्याच्या दोन अंघोळी , पाच राउंड पुन्हा गाडग्याचे तुकडे नंतर कवटीचा आवाज मग महिला मंडळ सर्वात पुढे पाठीमागून पुरुष वर्ग एक एक मृत व्यक्तीच्या जळत्या सरणाला पाया पडून जड पावलाने परततो . मृत व्यक्तीच्या घरी घेऊन हात पाय धुवून लिंबाचा पाला तोंडात टाकून गुळणा करून सावडायचा ठेपा घेऊन परततो . १० दिवस घटना घडलेल्या कुटुंबाला गाव भाकरी पुरवते , भाकर म्हणजे एकसंघ भावना आहे ज्यातून मने सांधली जातात . गाव हे करत असताना मयत आपल्या किती कामाला आलेला होता हा हिशोब करत नसते तर माणुसकी म्हणजे एकमेकांच्या दुखात सहभागी होणे हे माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपले कर्तव्य असते हे जाणून गावकरी हे सर्व मनोभावे करत असतो . शहरात माणूस मात्र कसा स्वार्थी होतो प्रगत होऊन समाजापासून दूर जातो याचाच प्रत्यय जो परवा बीड मध्ये आला तो म्हणूनच शहराला खाली बघायला लावणारा आहे . 
                     आपण देखील हाडामासाचेच असतो पण ते मातीचेही असतात
गावकरी देखील बिथरतात नाही असे नाही  भावकी अन गावकीचा विषय सोडून बोल म्हणतील. कुठेतरी कधीतरी कोणी दुखावलेले असते त्याचा राग वर्षानुवर्षे मनात धरून ठेवलेला असतो त्याचा वचपा यांनाही काढायचा असतो. शेवटी ही देखील हाडा मासाचीच माणसे, फक्त फरक इतकाच की आपणदेखील हाडामासाचेच असतो पण ते मातीचेही असतात. त्यांची मातीशी नाळ घट्ट असते. आपल्यापैकी काहींची तर आपल्या जन्मदात्या मायबापाशीदेखील नाळ घट्ट राहत नाही. आपला राग पोटात ठेवून माया लोभ मात्र ते खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करतील. "अरे त्याने माझी गाय कापली म्हणून का मी त्याचे वासरू मारू ? देव अक्कल वाटत असताना तो शेण खायला गेला असेल म्हणून का मी त्याच्या गतीला येऊ ? त्याने त्याचा जिम्मा निभावला नाही म्हणून काय झाले ? देवाने मला मोप दिलया, मी समाधानी आहे. त्याचे कर्म त्याचे त्याच्यापाशी. त्येला पांडुरंग बघून घेईल." असे म्हणत म्हणत त्यांची प्रत्येकाची गाडी विठू चरणी येऊन विसावते. राग कितीही असला तरी ते कोणाचे वाटोळे व्हावे म्हणून प्रार्थना करणार नाहीत, मात्र एखाद्या वेळेस अडचणीत सापडलेल्याला अशा माणसाला चार गोष्टी ऐकवूनच मदत करतील, पण त्याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाणार नाहीत,आपआपली सुखदुखे अन स्वप्ने काळजातल्या कपारीत ठेवून आपल्याच ढंगात चालणारी ही माणसे. कोणी धोतर तर कोणी पायजमा घालून असतो आजकाल क्वचित कोणी जीन्सवाला तरणा पोरही येथेहटकून दिसतो..नऊ वारीचा डोक्यावरून पदर घेऊन वेस चुकवून बारीक कुजबुज करत लगबगीनेचालत जाणारया बायका पाहताना लाल,हिरवे,पिवळे.तांबडे ठिपके थवा करून चालल्यासारखे वाटते.पायात फुफुटा उडवत जाणारा रस्ता अन त्यावर तळपायाला चिरा पडलेली काळपट चपला घालून चालणारी चालणारी माणसे. सावलीचे ज्ञान याना अधिक उत्तम ठावूक, पर्यावरण पर्यावरण म्हणून छाती बडवत बसण्याऐवजी हे झाडाझुडपातच देव शोधतात अन पानाफुलात आयुष्य घालवतात.गाव म्हणजे मातीतल्या माणसांचा जथ्था जो दुःखाचे अवडंबर करत नाही अन सुखाचे उत्श्रुंखल बाजार भरवत नाही. देवळातल्या मुक्या खांबातही गावाची कहाणी ऐकायला येते, ओढ्यातल्या पाण्यातही गावाचे अश्रू ओळखायला येतात. गाव असतो एक चिरंतन आनंदाचा चैतन्यमय सोहळा, मक्याच्या सोनेरी कणसासारखा अस्सल सोनेरी बीज वाढवणारा . गाव असतो माणुसपणाचा उरूस, देणारया हातांचे हात घेणारा अन त्या हातांना आपल्या मस्तकी धारण करणारा . गाव म्हणजे जन्मापासून ते मरणापर्यंत साथ देणारी अखंड उर्जा देणारी सावली.गाव म्हणजे मातीतल्या माणसांची मायेची सावली. गाव म्हणजे काही वस्ती,वाडी वा घरे नव्हे गाव म्हणजे मातीच्या काळजाचे अनंत तुकडे जे भूमीपुत्रांच्या ठायी विसावलेले. गाव म्हणजे आई, गाव म्हणजे बाप, गाव म्हणजेच विठ्ठल रुखमाई, गाव म्हणजे आकाशाची निळाई अन निसर्गाची हिरवाई, गाव म्हणजे डोळ्यात पाझरणारा खारट झरा. सरते शेवटी गाव म्हणजे फाटक्या कपड्यात दुख लपवून, जमीन गहाण टाकून जीवाला जीव देऊन आईबापाची सेवा करणारया अन मातीच्या ऋणात राहून कोरभर भाकर पोटाला खाऊन तिथल्याच मातीत जगून आपला स्वाभिमान धरणीच्या  चरणी अर्पण करणाऱ्या  शेकडो माणसांचा एकसंध देह असतो . 
             वाजत गाजत मृत्युचा सोहळा अन मुर्दंड अपार्टमेंट 
बीड जिल्ह्यातील बनसारोळा सारखी अनेक गावे आहेत जिथे व्यक्तीचे निधन झाले कि त्याची अंत्ययात्रा वाजत गाजत निघते अथवा भजनी मंडळाकडून भजन म्हणत त्याला निरोप दिला जातो . मृत्यु हा जीवनाचा अंतिम सोहळा आहे नाकारल्याने मृत्यू कुणाला चुकत नाही म्हणून अंतिम सत्य मानून त्यास उदार मनोवृतीने स्वीकारणे गावकडच्या माणसांना ठाऊक आहे शहरातल्या भित्रे लेकरे असणाऱ्या लोकांच्या तर वास्तूशांती रोखतात हा विषय वेगळा . ( ते शव याचसाठी रोखले होते . ) 

ताजे लेख

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

सॉरी महाराज  आज किडक्यासाठी टकमक टोक नाही 

पारतंत्र्य वाढले कि गुलामीची भावना वाढते अन अधिकचे स्वातंत्र्य ...

चोळीबंद  मोदी 

शेतीच्या बांधापासून ते दिल्लीच्या कनॉट प्लेसपर्यंत ...

आमच्यात सुद्धा दानवे आहेत 

व्यापारी  रावसाहेब , नौकरदार रावसाहेब , पाच रुपयाची कोतमिर थेट रुपयाला मागणारा रावसाहेब , शेतकरी ...

 भृष्ट  न्यायधीश आणी मरणासन्न लोकशाही   

कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला जेल होण्याची ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

Close

satta king