31 March

झेंडा जातीवादाचा का निषेदाचा

flag of cast or strike
By भागवत तावरे
  • 996 View

 
छत्रपती संभाजीच्या हत्येत बोटे कुणा -कुणाची रक्ताळली 
तिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते ,वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात. १ फेब्रुवारी १६८९ ते ११ मार्च १६८९ या कालातील छ. संभाजी महाराजांबदल मराठी इतिहास असाच मौन पाळुन बसला आहे. ढोबळ व संक्षिप्त माहिती व्यतिरिक्त हातात इतिहास काही लागू देत नाही . एका सार्वभौम राजाची अटक ते निघृण हत्या घडल्याची अति-अपवादात्मक घटना घडली असतांनाही असे घडावे याचे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. असो. तरीही आपल्याला कालक्रमानुसार ही संपुर्ण घटना नजरेखालुन घालायची आहे यासाठी की हत्येचा उत्सव म्हणून गुढी उभारली जाते असा प्रचार केला गेला , अन त्याचा निषेध म्हणून गुढी नाकारत भगवी पताका घरावर फडकावली. मराठा समाज कमालीचा निरागस दिसून येत आहे , शोर्य पराक्रमाची परंपरा असल्याने कायम बाहुबंद असलेला समाज कुठल्या अपप्रचाराला बळी पडू नये यासाठी काही प्रश्नांची  उकल आज करत आहोत . यातून अजुन काही प्रश्न निर्माण होतील याची आम्हाला जाणीव आहे...पण उत्तरे शोधण्याचा प्रयत्न एक अभ्यासक म्हणुन निकोपपणे करणे आवश्यक वाटले त्यातून हा शब्दप्रपंच 
         परवा गुढी पाढवा येऊन गेला , मराठा समाजाने गुढीचा धिक्कार करत घरावर भगवे ध्वज फडकावले . कथीत  विचारवंताच्या सादेला  मराठा समाजाने दिलेला प्रतिसाद कमालीचा अन ऐक्य दाखवणारा होता . त्यासाठी मराठा समाजाचे कौतुकच व्हावे.  मात्र काही प्रश्न आहेत ,त्यांना जिवंत ठेवले तर  कालचा प्रकार धाधांत गुमराह करणारा ठरावा . ज्यांना  छत्रपती शिवरायांची जयंती तिथी प्रमाणे मान्य नसताना  तिथीचा गुढी पाडवा अन त्यावरूनचा वाद त्यांनी करावा हे अतार्किक अन विनाकारणच नाही का ? अनेकांना गुढी पाढवा हा संभाजी महाराजाची हत्येचा आनंद उत्सव वाटतो   , म्हणून गुढी उभारू नये असा प्रचार अनेकदा ऐकलेला आहे . मात्र यावर्षी त्यास मोठा प्रतिसाद  मिळाला अन त्यास  परिवर्तन चळवळ म्हणून प्रसिद्धी अन समर्थन मिळाले .  मात्र गुढी पाढवा खरच हत्येचा उत्सव आहे का यावर कुणाकडे शास्वत पुरावे नाहीत . हे आम्ही सहज विसरलो .  
  कुणी काय बोलावे याचे आणी  उपासनेचे स्वातंत्र्य घटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेले आहे . तरीही यावर देखील आक्षेप घेणे , त्यासाठी आवश्यक असणारा बुद्धिभेद करणे, हे काही लोकांना आपले कर्तव्य वाटते अन का , कश्यासाठी  हा आमचा  भाबडा प्रश्न आहे . मात्र त्यावर कुणी उत्तर देण्यापेक्षा त्याचा निषेद वा संस्काराचे प्रदर्शन करण्यात अनेक जन धन्यता मानतील . मला मात्र सत्य सांगायचे आहे अन विचारायचे देखील . कुठल्याही मराठी कोषात झेंडा फडकावणे याचा अर्थ शोधला तर यश , मोहीम फतेह होणे , विजय साजरा करणे याची प्रचीती म्हणजे झेंडा फडकावण्यात होते .  कालच्या झेंड्याची गुढी उभारणारांना आमचा प्रश्न आहे  , आपला कुठला विजय झाला होता ?, संभाजी राजे यांची हत्या निंदनियच ज्यास जगात आक्षेप नाही , मात्र हत्येचा संबंद गुढीशी जोडून  जातीय आवाहने करणेपेक्षा  ,गुढी मान्य नाही तर उभारू नये, कर्मकांड, पूजा, वेदांचा जसा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धिक्कार केला तसे सर्वच झुगारून द्यावे . मात्र झेंडा उभारून , घरी पुरण पोळीचा गोडधोड बेत करून आम्ही कसला हत्येचा निषेध व्यक्त केला ? याचे उत्तर कुणी देणार आहे काय ? मराठा समाजाला कुणीही जातीसाठी अमुक करा असे आवाहन केले की,  मराठे माती आपोआप खातात. असेच दिसून आलेले आहे,  प्रश्न हा होऊ शकतो कि जातीसाठी मातीच का खायची ? जातीसाठी शिक्षण अन तंत्रज्ञानाची दारे का उघडू नयेत ? एखाद्या वृतीला विरोध होऊ शकेल , समाजाला अज्ञानी ठेवनाऱ्या वा समाज तसाच खिपचत पडावा यासाठी यत्न करणाराचा निषेद, धिक्कार व्हावाच मात्र याच वेळी समाजाने निषेद वा समर्थनाची निकष काय ते नक्की करावीत. म्हणजे जो मराठा तो उत्तम अन जो ब्राम्हण तो वैरी असे जर सूत्र असेल तर मग मात्र मला हे सांगावे लागेल की संभाजी महाराज यांना संगमेश्वरी गाठून देणारे सख्खे मेव्हणे गणोजी शिर्के श्याहंनो कुळी मराठेच होते अन  संभाजी राजा जेव्हा मृत्यूला कवटाळत होता तेव्हा त्याच्या हातात हात देऊन औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून शंभू राजाचे गुण गान करणारा कवी ब्राम्हण होता . म्हणून  वीरत्व , श्रेष्ठत्व , महानता जात नाही तर कर्म पाहून प्राप्त होते .  
      गुढी पाढवा काही प्रत्येक वर्षी त्याच तारखेला येत नाही कधी फेब्रुवारीच्या महिन्यात देखील येतो , यावेळी तो २८ मार्च ला  होता . मग संभाजी राजाची हत्या त्यादिवशी झालेली आहे असे समजण्यास कुठे वाव आहे ? मराठा समाजाला गुमराह करण्यात अन ठेवण्यात अनेकांना आपले पांडित्य चारीधामाला पोहोचल्याचा आनंद वाटणे शक्य आहे मात्र त्यासाठी समाजाला अज्ञानाच्या खाईत लोटावे काय ?   देखील अशी आवाहने करून आपली विद्वत्ता पर्दर्षित करणारांना मराठा समाजाने किती वाव द्यायचा ते ठरवावे .  कारण असे विद्वान आपल्या राजकीय सामाजिक सोयीसाठी सतरा उंबरे झिजवून , समाजाची दलाली घेऊन रिते हात समोर करून पुन्हा समाजाची सौदेबाजी करणेकरिता बुद्धिभेद करत असतात अन असे मराठा समाजातच नाही इतर जमातीत देखील आहेत . मात्र इंतर समाजात अस्या बांडगुळांना धडा शिकवला जातो. दुर्दैवाने मराठा समाजात लाड पुरवले जातात ?  कालचा झेंड्याचा प्रकार निव्वळ खुळचट प्रकार यामुळे की त्यास संभाजी राजाच्या हत्येसोबत जोडले . समाज संघर्ष करण्यास सज्ज असला म्हणून त्यास अशी फूस द्यावी काय ज्यातून प्रगती नाही तर अधोगती होईल . हा प्रश्न अंतर्मुख करणारा होऊ शकेल . 
...................

छत्रपतीं  फक्त मराठ्यांचे का बहुजनांचे ? 
"अठरा पगड मावळ खर्ची पडला तेव्हा शिवा बहुजनप्रतीपालक छत्रपती जाहला" कालच्या गुढ्या सर्वाधिक मराठ्यांनी उभ्या करून कुठला झेंडा गाढला , जातीवादाचा ? छत्रपती रयतेचा राजा होता सर्वांना घेऊन उभे होता म्हणून , स्वराज्य बुडवण्यासाठी कोण कोण मेव्हण्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली हे मला सांगण्याची गरज काय ? छ. संभाजी राजा  संगमेश्वरपासुन  राजांना घेवून मुकर्रबखान बहादुरगड्ला (पेडगांव, जि. अहमदनगर) पोहोचला तो १५ फेब्रुवारीला. हे अंतर पार करण्यासाठी  त्याला तब्बल पंधरा दिवस लागले. हा प्रवास त्याने चिपळुन, खेळना, पन्हाळा ते बहादुरगड असा पुर्ण केला. या मार्गावर मराठ्यांच्या ताब्यात अनेक किल्ले होते. सह्याद्री घाटात तर मराठ्यांना मुकर्रबखानावर हल्ला चढवण्याची संधी होतीच. पण असा एकही प्रयत्न झाला नाही. त्यांनी तसा काही प्रयत्न करु नये याचे उत्तर मराठा तरुणानी मिळवावीत अन मग खुशाल गुढी नाकारून झेंडे उभे करावेत.  नसता विज्ञानाचे पुस्तके वाचावीत ,शिकावे पुढे जावे ,मुलेबाळे कमवावीत . माणूस बनून . 
................

शिवधर्माचे झाले ते मराठा जातीचे होऊ नये . 
मराठा जातीला मोठा सन्मान आहे , जगात सर्वाधिक लढवय्यी जमात म्हणून मराठा सर्वसम्मत आहे . मराठ्यांचे हे शौर्य पहायला रुस्तुम ( इस्लाम नोंदी मधील  मोठा वीर ) असायला पाहिजे होते , त्यांनी तोंडात बोटे घातली असती , असे वक्तव्य पानिपत वर अहमदशहा अब्दाली ने मराठ्यांना पाहून केले होते . अठरापगड जाती स्वताचा  "आम्ही मराठी " असा उल्लेख करून मोठा सन्मान मराठा समाजाला देतात . मात्र  मराठा समाज जर इतर जात समुदायांना खिजवत असेल वा त्याअनुशंगाने वागत असेल तर त्यातून सामाजिक आदर मराठा समाज गमावून बसेल . कमळाच्या आमदारक्या खिशात टाकून घेणारे खेडेकर सारखी मंडळी  जातीची शेकोटी पेटवत असतील तर मात्र मराठा तरुणांनी सावध होणे गरजेचे आहे . असेच मागे शिवधर्म नावाची संकल्पना समोर आली होती  ? काय झाले वो त्या धर्माचे , आमच्या युवकांना छत्रपतीचे माणूसपण शिकवा त्यांची जात नाही , कारण शिवरायांनी जात बघून ना  न्याय केला ना लढाई .
..................

यांचा निषेध कोण करणार ...
इतिहासात डोकावले तर कसल्याही परिस्थितीत ही अटक अपरिहार्यपणे अटळ बनली होती , अन कुणासाठी हे देखील सहज लक्ष्यात येते . संभाजी महाराजांना सापळ्यात तर अडकावले गेले नाही ना हाच प्रश्न उपस्थित होतो.या  प्रश्नाकडॆ निकोपपणे पहायला हवे. खरे तर रायगडावर व सह्याद्रीच्या रांगांतील किल्यांच्या किल्लेदारांपर्यंत कैदेची  ही बातमी अवघ्या  दोन  दिवसात पोहोचली असनार. मुकर्रबखानाचे एकुण सैन्य होते फक्त तीन हजार. बादशहा त्यावेळी होता चारशे किमी  दुर अकलुजला ,  संगमेश्वरपासुन  राजांना घेवून मुकर्रबखान बहादुरगड्ला (पेडगांव, जि. अहमदनगर) पोहोचला ,तो १५ फेब्रुवारीला. हे अंतर काटायला त्याला तब्बल पंधरा दिवस लागले. हा प्रवास त्याने चिपळुन, खेळना, पन्हाळा ते बहादुरगड असा पुर्ण केला. या मार्गावर मराठ्यांच्या ताब्यात अनेक किल्ले होते. सह्याद्री घाटात तर मराठ्यांना मुकर्रबखानावर हल्ला चढवण्याची संधी देखील होती . मग  असा एकही प्रयत्न का झाला नाही. त्यांनी तसा काही प्रयत्न करु नये अशी कुणाची आज्ञा तर नसेल,  अशी माझी शंका आहे . जर ती खरी ठरली तर संभाजी राजे यांच्या हत्येस जबाबदार लोकांचा निषेध कुणी करणार आहे का ? का फक्त गुढी झुगारूनच द्वेष वाढवणार आहोत . याचा विचार करणे गरजेचे आहे . 
 आपल्या  राजाचे सर्वतोपरी रक्षण करणे व त्याला योग्य ते संरक्षण पुरवणे ही जबादारी प्रधानमंडळाची असते. बखरी विश्वसनीय मानल्या तर सेनापती म्हाळोजी (मालोजीराजे) राजांसोबतच होते...आणि फक्त चार-पाचशे भालाइत ( मावळे ) ? तेही ते शिर्क्यांचा तंटा सोडवायला गेलेले असतांना ? छ. शिवाजी महाराजांचे स्वत:चेच अंगरक्षक दल हे दोन हजार कसलेल्या सैनिकांचे असायचे. यातुन दोनच तर्कनिष्ठ अर्थ निघू शकतात...एक म्हणजे संभाजी महाराजांना मुकर्रबखान चालुन येतो आहे ही बातमीच एरवी चाणाक्ष व तरबेज असलेल्या हेरखात्याने लपवली  ? अरण्यातुन कितीही लपत प्रवास केला तरी  हा प्रवास तीन हजार शत्रूसैन्याचा होता...तोही तीन दिवस चाललेला....त्यांचे अस्तित्व हालचाल कोणाच्याही लक्षात का आली नाही अन लक्ष्यात येणार नाही हे मला तरी संभवनीय वाटत नाही. म्हणजे तीन हजार लोक संभाजी महाराजांना पकडून चालले आहेत अन कुणालाच दिसले नाही कसे शक्य आहे ? संताप येण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे संभाजी महाराज पकडले जावेत हीच सरदार-मंत्रीगणाची इच्छा होती म्हणुन हा घटनाक्रम घडवण्यात आला होता काय ? कारण , असे समजायला बराच वाव आहे. अगदी समजा कुणाच्या मते  जरी संभाजी महाराज  अंमलामुळे बेसावध राहिले ...पण त्यांचे हेरखाते वा सरदार वा अगदी भालाइतही अचानक हल्ला होईपर्यंत बेसावध होते हे मान्य होत नाही .  राजाराम महाराजांनी तात्काळ सिंहासनावर बसणे, अधिकार वापरायला सुरुवात करणे मात्र संभाजी राजांच्या सुटकेसाठी एकही युद्धाची आज्ञा जारी न करणे, औरंगजेबाकडे एकही मुत्सद्दी व वकील तडजोड/तहासाठी न पाठवणे या गोष्टी काय सुचवतात ? राजाराम महाराज ५ एप्रिल १६८९ रोजी झुल्फीकारखानच्या वेढ्यातुन निसटतात पण महाराणी येसुबाईं व संभाजीपुत्र बाल शिवाजी (शाहु महाराजांचे मुळ नांव) मात्र झुल्फिकारखानाने रायगड जिंकल्यावर ३ नोव्हेंबर १६८९ पर्यंत रायगडावरच अडकुन पडतात व शेवटी मोगलांचे कैदी होतात. त्यांना मात्र आधीच किल्ल्याबाहेर काढले जात नाही वा तसा एकही प्रयत्न होत नाही याचाही अर्थ कसा लावायचा ? अन जर या चुका मराठी रक्ताने केल्या असतील त्याचा निषेध कुणी का म्हणून करायचा नाही ? काही प्रश्नांचे व तर्कांचे अजुनही काही पैलु असावेत . आम्ही मात्र फक्त वर्तमान असूयेतून गुढीचा निषेध करत आहोत . आम्ही हजारो गणोजी शिर्के मोकाट सोडले आहेत ज्यांनी हत्येचा जल्लोषच नाही तर हत्येस तडीस नेले . 
........... 

गुढी तेराव्या शतकातून 
आज विज्ञानाची कास धरणाऱ्या पोरांना हत्येचा मागसोस घ्यायचाच असेल तर जेधे शकावली ,जेधे करीना ,मराठी रियासत वाचावी अन शोधावे हत्या काळात कुठे गुढी उभारली होती का ? कारण हत्येच्या पूर्वीपासून गुढी उभारली जाते याचे उत्तर इसवी सन १३ व्या शतकातील संत चोखामेळा याचा अभंगात आहे .
टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीची ॥धृ॥ 
पंढरीची हाट कौलाची पेठ | मिळाले चतुष्ठ वारकरी ॥१॥
पताकांचे भार मिळाले अपार | होतो जयजयकार भिमातीरी ॥२॥ 

.............................
सदरील लेख दै लोकाशातून पूर्वप्रसिद्ध आहे . 


 

ताजे लेख

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

सॉरी महाराज  आज किडक्यासाठी टकमक टोक नाही 

पारतंत्र्य वाढले कि गुलामीची भावना वाढते अन अधिकचे स्वातंत्र्य ...

चोळीबंद  मोदी 

शेतीच्या बांधापासून ते दिल्लीच्या कनॉट प्लेसपर्यंत ...

आमच्यात सुद्धा दानवे आहेत 

व्यापारी  रावसाहेब , नौकरदार रावसाहेब , पाच रुपयाची कोतमिर थेट रुपयाला मागणारा रावसाहेब , शेतकरी ...

 भृष्ट  न्यायधीश आणी मरणासन्न लोकशाही   

कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला जेल होण्याची ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

Close

satta king