12 November
सुरक्षा हवी तर आक्रमणाची तयारी ठेवा
Security must be prepared attack
By भागवत तावरे
  • 1332 View

आंतराष्ट्रीय राजकारणावर प्रकाश टाकणारा हा प्रयत्न करत आहे . ब्लॉग आणि अग्रलेखाच्या खोल प्रदेशातला मी उथळ मनाचा निर्मळ भागवत तावरे … शिकत आहे …. अपेक्षा आहे आपण सोबत द्याल .....................
        आपली संस्कृती आणि धर्म यांचा प्रसार करण्याकरता भारतीय जगभर गेले होते. आज एकविसाव्या शतकात ही सीमोल्लंघनाची परंपरा परत पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. शत्रू सरहद्द ओलांडून पानिपतपर्यंत पोहोचेपर्यंत वाट पाहण्याच्या प्रवृत्तीने आपल्या देशाचे मोठे नुकसान केलेे. सीमोल्लंघन म्हणजे आक्रमण करून युद्धशत्रूच्या देशात पोहोचणे. दसर्‍याच्या निमित्ताने हा महत्त्वाचा धडा आजही मोलाचा ठरतो
        आपल्या देशात दसर्‍याचा सण हा सर्व परीने क्षात्रवृत्ती किंवा क्षत्रिय धर्म या पुरुषार्थाशी जोडलेला आहे. आपल्या परंपरेत क्षात्रधर्माला उच्च स्थान दिले गेले आहे. अर्थातच दसरा हा रामाचा रावणावर विजय आणि महिषासुरमर्दिनीने केलेला महिषासुराचा वध याच्याशी निगडित आहे. एका लष्करी इतिहासकाराच्या दृष्टिकोनातून पाहिले असता महाराष्ट्रात दसरा हा सीमोल्लंघन म्हणून साजरा केला जातो. तो देशाच्या इतर भागात साजर्‍या होणार्‍या उत्सवापेक्षा फार वेगळा आहे. सीमोल्लंघनाची ही परंपरा तारीख-वारानिशी कधी सुरू झाली हा एक संशोधनाचा विषय ठरावा. परंतु भारताच्या शेकडो वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली असता इ.स. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आणि मुघल आक्रमणाचा यशस्वी मुकाबला केल्यानंतर मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा महाराष्ट्राच्या पलीकडे वाढवायला सुरुवात केली. त्यानंतर दर दसर्‍याच्या दिवशी सैन्य दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रयाण करत असे. भारताच्या इतिहासात अगदी चौथ्या शतकानंतर म्हणजे चालुक्य साम्राज्यानंतर सर्वसाधारणपणे महाराष्ट्राला उत्तरेकडून आक्रमणांचा सामना करावा लागला. परंतु अठराव्या शतकात मात्र हे चित्र पालटले आणि मराठ्यांनीउत्तरेकडे स्वार्‍या करायला सुरुवात केली. संरक्षणासाठी आपल्या प्रदेशात शत्रूची वाट पाहत बसण्याऐवजी शत्रूच्या प्रदेशावर चाल करून जाऊन त्याला त्याच्याच प्रदेशात नेस्तनाबूत करणे ही मराठ्यांची रणनीती जवळजवळ दोन शतके म्हणजे इंग्रज येईपर्यंत कायम होती. याचेच फलस्वरूप म्हणजे अगदी उत्तरेकडे ग्वाल्हेर, झाशी, इंदोरपर्यंत मराठी संस्थाने निर्माण झाली.
या सर्व इतिहासाच्या संदर्भात एक विरोधाभास असा, की एकीकडे सीमोल्लंघन दिसायचे तर दुसरीकडे अटक नदी पार करायची नाही किंवा समुद्र पार करायचा नाही अशा प्रकारच्या अनेक रूढी अस्तित्वात आल्या. लोकमान्य टिळक आपला खटला लढायला इंग्लंडला गेले होते तेव्हा त्यांना परत आल्यानंतर प्रायश्‍चित्त करावे लागले होते. अर्थातच या सर्व प्रतिगामी रूढी अस्तित्वात कशा, कधी आणि का आल्या हे सांगणे कठीण आहे. दक्षिण पूर्व आशियामध्ये भारतीय व्यापारी आणि नाविक सैन्य अगदी दूरवर इंडोनेशियाच्या वेगवेगळ्या बेटांपर्यंत पोहोचले होते. आजदेखील इथे या संदर्भातील प्राचीन शिलालेख सापडतात. त्यात इथे पोहोचलेल्या भारतीयांचे कर्तृत्व लिहिले आहे. अशा प्रकारे आपली संस्कृती आणि धर्म यांचा जगभर प्रसार करण्यासाठी भारतीय समुद्रापार गेले होते. आज एकविसाव्या शतकात सीमोल्लंघनाची ही परंपरा पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. शत्रू सरहद्द पार करून अगदी पानिपतपर्यंत पोहोचेपर्यंत वाट पाहण्याच्या प्रवृत्तीने आपल्या देशाचे फार मोठे नुकसान केले आहे. आपल्याच देशात सीमेच्या आत बसून आक्रमणाचा मुकाबला करता येत नाही हा पूर्वजांचा धडा आपण विसरलो आहोत. कोणतेही युद्ध केवळ बचावात्मक डावपेचांनी लढता येत नाही. सीमोल्लंघन म्हणजे आक्रमण करून युद्ध शत्रूच्या देशात पोहोचवणे गरजेचे आहे. दसर्‍याच्या निमित्ताने हा एक मोठा धडा आपण आजसुद्धा शिकू शकतो.
       केवळ आपल्याला पाहिजे म्हणून शांतता मिळत नसते. त्यासाठी शत्रूसुद्धा शांतीप्रिय असला पाहिजे. तसे असेल तरच हे शक्य आहे. परंतु आज भारताच्या पश्‍चिम आणि उत्तर या दोन्ही सीमांवर असणार्‍या देशांनी आपल्या देशाच्या मोठ्या भूभागावर हक्क सांगितला आहे. पाकिस्तानला काश्मीर हवे तर चीनला अरुणाचल प्रदेश हवा आहे. अशा परिस्थितीत केवळ आपल्या सीमेच्या आत राहून देशाचे रक्षण होऊ शकेल अशी भाकड कल्पना करणे अयोग्य आहे. दसर्‍याच्या सणाच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी या वास्तवाचा अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. भारताच्या इतिहासावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असे आढळून येते, की या देशाच्या ज्या सीमांवर म्हणजे अफगाणिस्तान आणि सध्याचा पाकिस्तान यांच्यावर परकीय आक्रमणे झाली तिथे बौद्ध धर्म प्रचलित होता. बौद्ध धर्माच्या शिकवणीत अहिंसेला मोठे महत्त्व आहे. त्या शिकवणीत क्षात्रधर्माला थारा नाही. त्यामुळे अफगाणिस्तानसारखा प्रदेश तेराव्या शतकात परकीय आक्रमणाला बळी पडला आणि तिथली स्थिती आमूलाग्र बदलली. ही काही पुराणातील भाकडकथा नव्हे; तर आजसुद्धा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये जागोजागी बौद्धकालीन स्तुपे आणि बुद्धाच्या मूर्ती मुबलक प्रमाणात आढळतात. असे असूनही या राष्ट्रांची मानसिकता आक्रमकाचीच राहिली आहे. एकदा शत्रूने हिंदूकूश पर्वत पार करून मैदानी भागात प्रवेश केल्यानंतर या आक्रमणाच्या लोंढ्याला सपाट मैदानी प्रदेशात थोपवणे अशक्यप्राय ठरते. फलस्वरूप गेली सुमारे 600 वर्षे उत्तर हिंदुस्थान परकीयांच्या साम्राज्याखाली भरडला गेला.
       दक्षिणेकडे मात्र कठीण भौगोलिक परिस्थितीचा मराठ्यांनी पूर्ण फायदा घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्य स्थापन केले. कठीण परिस्थितीतसुद्धा शिवाजी महाराजांनी कधीही बचावात्मक धोरण स्वीकारले नाही. शत्रूचे कच्चे दुवे शोधून काढून, तिथे वारंवार हल्ले करून शिवाजी महाराजांनी आपल्यापेक्षा संख्येने मोठ्या असणार्‍या सैन्यांना युद्धात पराजित केले. या सर्व यशामागे आक्रमक धोरण हेच संरक्षणाचे सर्वोत्तम साधन आहे ही धारणा होती.छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आक्रमक हालचालींद्वारे संख्येने मोठ्या शत्रूला कसे नेस्तनाबूत करता येते हे बाजीरावाने दाखवून दिले. महाराष्ट्राच्या इतिहासावर एक नजर टाकली तर अगदी 1761 च्या पानीपतच्या युद्धापर्यंत मराठ्यांचे लष्करी धोरण आक्रमक होते. परंतु पानिपतच्या युद्धातील अपयशानंतर यात बदल झाला आणि मराठ्यांनी बचावात्मक धोरण अंमलात आणले. 19 व्या शतकात इंग्रजांच्या आव्हानाला तोंड देण्याची वेळ आली तेव्हा एक-दोन अपवाद वगळता मराठे बचावाच्या लढायाच लढले. अखेरीस औद्योगिक क्रांती आणि आधुनिक शस्त्रे बाळगणार्‍या इंग्रजी फौजांपुढे मराठ्यांचा टिकाव लागला नाही. अर्थात काही अंशी युद्ध धोरणातील बदल या अपयशाला कारणीभूत होता.आज एकविसाव्या शतकात भारताने आपल्या धोरणात बदल करून संरक्षणासाठी आक्रमक धोरण अवलंबायचे ठरवले आहे असे वाटते. त्याचा प्रत्यक्ष पुरावा आणि होणारा परिणाम थोड्या प्रमाणात दिसायला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षभरात देशामध्ये शत्रूकडून होणारे हल्ले नक्कीच कमी झाले आहेत. आपल्या शत्रूत्वाच्या कारवायांची किंमत चुकवावी लागते, हे शत्रूला कळेल तेव्हा त्याच्या आक्रमक कारवायांना आपोआपच पायबंद बसेल. अर्थातच या नव्या धोरणाचा अनेक तथाकथित शांतीवाद्यांकडून विरोध होत आहे. या संदर्भात राष्ट्रपिता महात्मा गांधींजींचा एक किस्सा मोठा बोलका आहे. 27 ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय सैन्य काश्मीरमध्ये उतरले तेव्हा तत्कालीन ब्रिगेडियर सेन यांना त्या मोहिमेचे अधिपत्य देण्यात आले होते. काश्मीरमध्ये जाण्याआधी ब्रिगेडियर सेन गांधीजींना भेटले आणि त्यांचा आशीर्वाद मागितला. तेव्हा गांधीजींनी ब्रिगेडियन सेनना सांगितले, हिंसेला विरोध किंवा अहिंसा हा माझा व्यक्तिगत विचार आणि प्रश्‍न आहे. राष्ट्रहितासाठी हिंसाचाराचा वापर करावा लागला तर तो योग्यच आहे. ब्रिगेडियर सेन यांनी स्लेंडर वॉज दि थ्रेड या आपल्या आत्मचरित्रात या भेटीबद्दल लिहिले आहे. थोडक्यात, योग्य उद्दिष्टाकरता हिंसाचार किंवा बलप्रयोग म्हणजे अधर्म नव्हे तर ते राष्ट्राचे कर्तव्यच आहे. दसर्‍याच्या निमित्ताने आजसुद्धा हा धडा अंमलात आणण्याची तितकीच आवश्यकता आहे.

ताजे लेख

बारामतीच्या मळ्यात देवेंद्र फुलले 

परवा राम कदम कलागौरव  पुरस्कार प्रदान करताना गाडगीळांनी शरद पवारांची मुलाखत घेतली ...

शिवसेनेला ते उमजले आहे  

स्व बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला ज्या शिवसेनेचे रोपटे लावले होते त्याचे बीज ...

बाबांच्या लेकीचे पुन्हा पतन 

दोन संघर्ष यात्रा काढून मतदारांना लोकनेत्याचा वारसा पुरवण्याची हमी देणाऱ्या ...

तर राज ठाकरेंचे  दिवस पुन्हा येतील

जबाबदारीने लिहतोय,  त्याबाबद विश्वसाहार्य नसलो तरी एकूण पक्षांची राजकीय वाटचाल ...

रयतेचा राजा आहे तुमचा इव्हेंट नाही 

शिवाजी हे फक्त कुठल्या राजा - व्यक्तीचे नाव नसून ते एक लोककल्याणकारी राज्यनिर्मितीस ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

काय चुकले आमिरचे 

काय चुकले आमिरचे ?  मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत ...

Close

satta king