19 November
तर भारताचा तालिबान
If the Taliban 's
By भागवत तावरे
  • 2787 View

                          तर भारताचा तालिबान

आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करुन घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक भीती निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यानी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय. गेल्या काही महिन्यात दहशतवाद सिरीया मार्गे युरोपात मोठ्या दिमाखात दाखल झाल्याने जगासमोर आता एकमेव समस्या बनून समोर आली आहे .

         ज्याप्रमाणे अमेरिकेने अल् कायदाचा बीमोड करण्यासाठी कंबर कसली त्याचप्रमाणे आयसिसच्या नाडय़ा आवळण्यासाठी अमेरिकेस सर्व ताकदीनिशी मदानात उतरावे लागेल. ती त्या देशाची जबाबदारीदेखील आहे. याचे कारण २००३ साली अमेरिकेने इराकमधून सद्दाम हुसेन याचे उच्चाटन केल्यामुळेच आयसिस जन्माला आली, हे नाकारता येणार नाही. तेव्हा आयसिसच्या जन्मास कारणीभूत असणाऱ्या अमेरिकेनेच आता या संघटनेस आवरण्याची जबाबदारी घ्यावी. असा हा आतंकवादाचा चेहरा जगासमोर आ वासून उभा असताना प्रत्येक देश आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे . देशातले वातावरण पाहता भारताचा तालिबान होणार नाही यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत . मला माहित आहे मी थोडे पुढे जाऊन लिहित आहे परंतु भारतातील परिस्थिती पाहता देशातल्या शांततेला धोका का नसावा , देशात धर्म हा निकष बनत आहे , शाषन निर्णय हे धर्म भावनेशी जोडून होत आहेत हे कुणाला विचारले तर मान्य होईल अथवा नाही परंतु ज्यावेळी असहिष्णू वादाचा चीकार शब्द देखील निघत नवता त्यावेळी महासतेचा प्रमुख देशात येऊन बोलून गेला आपण ते आले आणि त्यांनी जिंकले असे गान गाण्यात दंग राहिलेलो आपण सोयीने काही बाबी बाजूला ठेवल्या . २६ जानेवारी २०१५ रोजी अमिरीकेचे प्रमुख बराक ओबामा देशात आले त्यांनी मोदी सोबत चहा घेतला दोन प्रमुख गार्डन मध्ये फिरले , मोदी यांच्या महागड्या कोटाची चर्चा झाली मात्र भारताविषयी ओबामा यांनी व्यक्त केलेली खंत आपल्या माध्यमांनी सोयीने बाजूने सारली , २७ जानेवारी २०१५ रोजी श्री फोर्ट याठिकाणी बोलताना ओबामा यांनी सरळ सांगितलेले आहे कि भारत असहिष्णू वातावरणात जात आहे आणि या परीस्थितीत भारत कुठलीच प्रगती साधू शकत नाही , ज्यानंतर मायदेशी परतल्यावर" भारतातील असहिष्णू वातावरण पाहून गांधीजीनी देखील खाली मान घातली असती " असा सणसणीत लाऊन दिला ज्याकडे त्यावेळी आपण दुर्लक्ष केले मात्र काही लेखकांनी पुरस्कार परत केल्याने जो मुद्दा अदोरेखीत झाला आहे तो ओबामांचा आहे , जर आतंकवाद हा धार्मिक तेड मधून जन्म घेत असेल तर त्यासाठी आतंकवादाची माय भारतात गरोधर राहत आहे काय ? याचा विचार करण्याची गरज आहे . कारण देशात धर्म आणि जातीच्या निकषावरून सामाजिक विभागणी सुरु झाली नाही काय ? देशात एम आय एम आणि संघ यासारखी संघटन स्वताला बळकट करताना देशातली एकता अशक्त करत नाही काय ?जगातल्या कुठल्याही देशाचे घ्या तिथे आज घातपात हिंसाचाराची घोषणा ‘अल्ला हो अकबर’ अशीच का असते ? याचा विचार कुणी करणार आहे काय ? . पण त्याकडे सवाल विचारण्याची इच्छा वा हिंमत कुणातका नाही ? असती तर युरोपवर चाल करून आलेल्या निर्वासितांच्यामधून आलेले जिहादी युरोपच्या जीवावर उठतील, असे तिथले सुजन बोलले असते. कारण त्या गर्दीतून आपण प्रशिक्षित जिहादी युरोपात पाठवल्याचा इशारा इसिस ने दिला होता, पण बेडूक झालेल्या युरोपियन जाणिवा ते ऐकायला कुठे तयार होत्या? कोणी तुम्हाला हातपाय बांधून मृत्यूच्या जबड्यात ढकललेले नाही. त्यापासून सुटका करून घ्यायला तुम्ही मोकळे आहात, त्या बेडका इतकेच! तापणार्‍या पाण्यातून उडी घेणे तुमच्या हाती आहे. सवाल इच्छेचा आहे. आजही जगातल्या कुठल्याही देशात जिहादींनी नागरिकांचे हातपाय बांधलेले नाहीत, की निरपराधांना कुठल्या कोंडवाड्यात टाकलेले नाही. आपल्या नागरिकांना कोंडवाड्यात टाकले आहे, त्या त्या देशाच्या जाचक कायद्यांनी व त्यांचा अंमल करणार्‍या सत्ताधीशांनी! हे जाचक कायदे मोडून सुरक्षेची हमी देणारे व मारेकरी वृत्तीच्या मुसक्या बांधणारे कायदे आपापल्या देशात जारी करणार्‍यांना सत्ता देण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना आहे ना? असला प्रकार निर्दयपणे मोडून काढणार्‍या अरबी देशात कुठला जिहाद होत नाही. मात्र मानवाधिकाराचे थोतांड माजलेल्या देशातच माणुस किडामुंगीसारखा मारला जातो आहे. आणि आपण त्या बेडकासारखे सुस्त मस्त आहोत, आपापल्या मरणाची प्रतिक्षा करीत! उदारमतवाद, पुरोगामीत्व, मानवता अशा गोष्टींनी आपल्या उपजत सुरक्षेच्या जाणिवाच बोथट केल्यात. त्याचा लाभ जिहादी घेत असतील. पण खरे गुन्हेगार ते मारेकरी नाहीत. मानवाधिकारवादी त्यांचे पोषिंदे म्हणून पहिले आरोपी आणि त्यांच्या कारवायांनी निष्क्रीय झालेले आपण दुसरे आरोपी आहोत. जगातल्या कुठल्याही देशाचे घ्या तिथे आज घातपात हिंसाचाराची घोषणा ‘अल्ला हो अकबर’ अशीच का असते ? याचा विचार कुणी करणार आहे काय ? . पण त्याकडे सवाल विचारण्याची इच्छा वा हिंमत कुणातका नाही ? असती तर युरोपवर चाल करून आलेल्या निर्वासितांच्यामधून आलेले जिहादी युरोपच्या जीवावर उठतील, असे तिथले सुजन बोलले असते. कारण त्या गर्दीतून आपण प्रशिक्षित जिहादी युरोपात पाठवल्याचा इशारा इसिस ने दिला होता, पण बेडूक झालेल्या युरोपियन जाणिवा ते ऐकायला कुठे तयार होत्या? कोणी तुम्हाला हातपाय बांधून मृत्यूच्या जबड्यात ढकललेले नाही. त्यापासून सुटका करून घ्यायला तुम्ही मोकळे आहात, त्या बेडका इतकेच! तापणार्‍या पाण्यातून उडी घेणे तुमच्या हाती आहे. सवाल इच्छेचा आहे. आजही जगातल्या कुठल्याही देशात जिहादींनी नागरिकांचे हातपाय बांधलेले नाहीत, की निरपराधांना कुठल्या कोंडवाड्यात टाकलेले नाही. आपल्या नागरिकांना कोंडवाड्यात टाकले आहे, त्या त्या देशाच्या जाचक कायद्यांनी व त्यांचा अंमल करणार्‍या सत्ताधीशांनी! हे जाचक कायदे मोडून सुरक्षेची हमी देणारे व मारेकरी वृत्तीच्या मुसक्या बांधणारे कायदे आपापल्या देशात जारी करणार्‍यांना सत्ता देण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना आहे ना? असला प्रकार निर्दयपणे मोडून काढणार्‍या अरबी देशात कुठला जिहाद होत नाही. मात्र मानवाधिकाराचे थोतांड माजलेल्या देशातच माणुस किडामुंगीसारखा मारला जातो आहे. आणि आपण निर्लज्ज सुस्त मस्त आहोत, मरणाची वाट पाहत ! उदारमतवाद, , मानवता अशा गोष्टींनी आपल्या उपजत सुरक्षेच्या जाणिवाच बोथट केल्यात. त्याचा लाभ जिहादी घेत असतील. पण खरे गुन्हेगार ते मारेकरी नाहीत. मानवाधिकारवादी त्यांचे पोषिंदे म्हणून पहिले आरोपी आणि त्यांच्या कारवायांनी निष्क्रीय झालेले आपण दुसरे आरोपी आहोत. आपण अनेकदा हे म्हणतो कि कुण्या चूक माणसाच्या कारवाया मुळे जग बिगडत नाही तर चांगले माणसे गप्प राहिल्याने ते बिगडते , विषय गहन आहे त्यासाठी एक छोटेसे उदाहरण देतो , ज्यावेळी एका आई चे दोन मुल भांडताना आई गुन्हा असो अथवा नसो परंतु मोठ्या मुलास ती आई सांगते , तू मोठा आहे न मग तू गप्प रहा म्हणजे भांडणे होणार नाहीत , अगदी तद्वत भारतात संघ अश्या भूमिकेत आहे ज्यातून धर्मांध शक्तींना केंद्रीकरण करता येते म्हणजे मला एक असा मुद्दा अधोरेखित करायचा आहे , हल्लीच्या परीस्थित मध्ये याकुब च्या जनाज्याची गर्दी याकुब साठी नाही तर ती कुणाला तरी खिजवण्यासाठी नवती काय ? मग जर असे असेल तर भारत तालिबान का बनणार नाही ? त्यासाठी जिहादी मानसिकतेचे प्राणी आमची व्यवस्था तयार करण्यासाठी आवश्यक ते वातावरण तयार करत नाही काय ? मोदी सरकार किती हि हात झड्कत असेल तरीही हे त्यांना मान्यच करावे लागेल कि त्यांच्या सत्तारोह्नानंतरच असहिष्णूतेला अच्छे दिन आलेले आहेत . आता महत्वाचा मुद्दा हा कि भारताचा तालिबान कसा , तालिबानच्या इतिहासात डोकावताना गेल्या २० वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती आज भारतात उभी राहत नाही काय ?वैश्विक पातळीवर आतंकवाद संपवण्यासाठी कुणी प्रयत्न केले पाहिजेत हा विषय पुन्हा कधीतरी घेऊ मात्र आज एवढेच सांगेल हा देश गांधींचा आहे तो गांधींचा राहू द्या कारण अहिंसा याच मातीतून जन्मली आणि लढाऊ अशोकाने स्वीकारत धम्म होऊन स्थिरावली ............ ११ जुलै २००६ चा मुंबईवरील बॉम्बहल्ला १३ जुलै, इ.स. २०११ चा मुंबईवरील बाँबहल्ला या घटना पैरीस पूर्वीच्या आहेत म्हणून आपण विचार करायलाच पाहिजे

ABU Azraelया नावाचे फेसबुक वर पेज आहे त्याच्यावर जाऊन पाहितले कि समजते आज आतंकवाद कुठल्या चरणसीमेवर आहे .

या बाबीवर आम्हाला लक्ष द्यावे लागेल 

 मानवतावादी तत्त्वज्ञानामुळे जागतिक शांतता स्थापण्यासाठी प्रयत्‍न करणे.  धार्मिक तेढ कमी करणे.. काळ्या पैशाच्या निर्मितीवर प्रतिबंधक उपाययोजना करणे.  दहशतवाद संपविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र प्रयत्‍न करणे. शस्त्रास्त्राचा खणखणाट अर्थपूर्ण राजकीय धोरणाला पर्याय ठरू शकत नाही हे समजूत आचरणात आणणे. दशतवादाविरुद्ध कडक कायदे व नियम बनविणे व त्यांची कठोर अंमलबजावणी करणे.. दहशतवादास खतपाणी घालण्याच्या देशांतर्गत व्यवस्था नष्ट करणे.  सरकाने व नागरिकांनी एकत्र लढा उभारणे.

भारतातील दहशतवादी संघटना

सिमि इंडियन मुजाहिदीन उल्फा: –  जम्मू – काश्मीरमधील दहशतवादी संघटना, लष्कर ए तोयबा मुस्लिम मुजाहिद्दीन ,काश्मीर जिहाद फोर्स इक्खान उल मुस्लिम मुजाहिदीन जिहाद कौन्सिल, जम्मू – काश्मीर लिबरेशन फ्रंट, जम्मू – काश्मीर नॅशनल लिबरेशन आर्मी ,अल मुजाहिदीन फोर्स, अस जिहाद, फोर्स अल बदर

 

 

ताजे लेख

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

सॉरी महाराज  आज किडक्यासाठी टकमक टोक नाही 

पारतंत्र्य वाढले कि गुलामीची भावना वाढते अन अधिकचे स्वातंत्र्य ...

चोळीबंद  मोदी 

शेतीच्या बांधापासून ते दिल्लीच्या कनॉट प्लेसपर्यंत ...

आमच्यात सुद्धा दानवे आहेत 

व्यापारी  रावसाहेब , नौकरदार रावसाहेब , पाच रुपयाची कोतमिर थेट रुपयाला मागणारा रावसाहेब , शेतकरी ...

 भृष्ट  न्यायधीश आणी मरणासन्न लोकशाही   

कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला जेल होण्याची ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

Close

satta king