08 October

दसऱ्याचे सिमोलंघन

cross of dasra
By भागवत तावरे
  • 1270 View

 

पुरोगामी नेतृत्वाला अध्यात्माचा गड लागतोच कशाला ?
भक्तीचा भाव का राजकीय डाव?

जे आपणास ठाऊक आहे त्याबाबद  मी फारसे बोलत नाही  कुठली तरी एक पंकजा मुंडे यांची  क्लीप  काल पासून राज्यात धुमाकूळ घालत आहे ज्यात पंकजा मुंडे या  महाराजांना दसरा झाल्यावर पाहू असे म्हणत आहेत , आपण गुन्हे दाखल करून कसे कुणाला तडीपार करू शकतो याची सरळच वाछ्य्ता करताना दिसत आहे , वाडवडिलांच्या पुण्याईने त्यांचा वारसा मिळतो मात्र आयुष्य हे अनुभव नावाच्या गुरुकडून टप्प्याटप्प्यानेच घ्यावे लागते. मात्र कुठलाही टप्पा मान्य नसणाऱ्या पंकजा मुंडे यांचे पक्षात अन सर्वत्र विरोधक पेरून बसल्याचे समोर आले आहे . आज त्याची कणव असणाऱ्यांना देखील कुठली आयुध घेऊन ताईच्या बाजूने उभा रहावे असा प्रश्न आहे . पंकजा मुंडे यांनी तडीपार चा किस्सा सांगून तर बीड ,नगर च्या एस .पी .ना घामच फोडला आहे कारण तेच अन त्यांच्या खाकीचा वापर सत्ताधीश म्हणून पंकजा मुंडे करत आहेत काय ? हा प्रश्न आहे  म्हणूनच आ धनंजय मुंडे यांची मागणी तार्किक अन सयुक्तिक अशीच आहे की ...मंत्री महोदयांनी राजीनामा द्यावा , मला याठिकाणी शास्त्री खरच महंत वाटले कारण त्यांनी ही क्लिप राज्यभरात दवंडली जात असताना  पंकजा  मोठी व्हावी असी मनीषा असल्याचे  जाहीर केले . कुठली तक्रार न करता  पंकजा मुंडे यांनी त्यांचे कार्यकर्ते कसे अडचणीत  आणतात हे लक्ष्यात आणून दिले . मला जरा त्याच्या पुढे जायचे आहे  नामदेव शास्त्री  पंकजा  मुंडे यांना माफ करतील  त्यांच्या त्या मानसकन्या  आहेत  म्हणून  मात्र  राज्याने  पंकजा मुंडे यांना  कुठल्या  धर्तीवर समजून घ्यावे अन का ? महाराष्ट्र  राज्याच्या  विद्दमान  मंत्री  जर खोटे गुन्हे दाखल करून चक्क तडीपार  ची भाषा करत असतील तर  त्यास सहन केले जाऊच शकत नाही . पंकजा मुंडे यांच्यामुळे भाजप अडचणीत  आले  तर वावगे नाही , स्थानिक निवडणुकीच्या  धर्तीवर भोवणारे कोलीत  त्यांनी आघाडीवाल्यांना दिले  आहे . खटकणाऱ्या  लोकांना पंकजा मुंडे  खोटे  गुन्हे  दाखल करून असे  तडीपार  करणार  असतील  तर  त्या जिजाऊ सावित्रा  अहिल्येच्या  वारसदार आहेत  का  हुकुमशाही वृत्तीच्या ? जो आपला नाही, तो तुरुंगात. असे धोरण  असेल तर  मग भाजपने अन राज्याने विचारच  करावा  असा  प्रसंग आहे . नेहमी भावनेचा  गळ  टाकून  राजकीय मासेमारी  कायमचा पर्याय नसतो आपणास शाश्वत अन  लोक उपयोगी कार्यक्रम द्यावा  लागतो  तरच  आपला  लोकमतात  निभाव  लागतो  दुर्दैवाने तूर्तास पंकजा  मुंडे  यांच्याकडे  असा कुठलाही कार्यक्रम  नाही फक्त उपक्रम आहेत  जे  त्यांची टीम  चालवते  त्यांच्याच  सूचनेवरून  ( त्यांनीच  हे  काल  बोलताना  सांगितलेले  आहे )

स्व गोपीनाथ मुंडे साहेब इहलोक सोडून गेल्यानंतर च्या काळात त्यांच्या ज्येष्ठ कन्या ना. पंकजा मुंडे जेवढ्या निरागस वाटल्या तेवढ्या त्या आज वाटत नाहीत . (विषय मांडण्या अगोदर यासाठी सांगत आहे की मी त्यांच्या राजकीय पोक्तगिरीवर प्रकाश टाकणार आहे , फसलेल्या वा फसू शकणाऱ्या त्यांच्या राजकीय डावांची वा काव्यांची चर्चा करणार आहे म्हणून ) भगवान गड हा अठरा पगड जातीचा गड हे पुस्तकी शब्द आहेत. तसे हजारो वारीकरी विविध जातीचे असले तरी पाथर्डी तालुक्यातील भगवानगड वंजारी समाजाचाच राजकीय अन धार्मिक अभिसरणाचा रायगड ठरलेला आहे हे नाकारता येत नाही . इथला राजकीय फायदा आकर्षित करावा असाच आहे म्हणून इथल्या महिम्याचे राजकीयकरण करण्याचे बाळकडू मिळालेल्या पंकजा मुंडे म्हणून गड सोडणारच नव्हत्या , त्यासाठी वाट्टेल ते करण्याच्या तयारीत त्यांच्या आकांक्षा गेल्या काही दिवसात व्यस्त दिसून आल्या, अगदी मराठ्यांच्या आरक्षणाचा ठराव मांडण्याचे भाग्य डावलण्याइतपत.
असो हल्ली  पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास कुणाच्या क्रिया-प्रतिक्रिया लक्ष्यात घेऊन चालत नसावा त्यासाठी त्यांचा आत्मविश्वास कमालीचा बळावल्याचे सुतोवाच आहेत.
दरम्यान च्या काळात टिव्ही वाल्यांनी तेल ओतून गडखलाचा चांगलाच भडका उडवला आहे म्हणून त्यामागे धावताना आम्हालाही वेध घ्यावा वाटला अन त्यातून हा शब्द प्रपंच मांडतो आहे . गुलालधारी गडकरी मंडळींनी गेल्या आठवड्यात पंकजा मुंडे यांच्या धाडलेल्या सांगाव्याचा चांगलाच खुरपूस समाचार घेतला गडकरी म्हणजे गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी घेतल्याचे समजले . ( काही बाबी अधिक स्पष्ट करता येत नाहीत  मात्र सत्य हे आहे की दसरा मेळावा होऊ द्या अशी दमवजा विनवणी करण्यासाठी गेलेल्या मुराळ्यांना चांगलाच महाप्रसाद गुलाल लाऊन मिळाला अशी माहिती आहे ) त्यातूनच  आज गडाचा वाद धर्मसत्ता विरुद्ध राजसत्ता असा समोर आला आहे.  धर्माचे अन राजकारणातले असे दोन भिन्न मतप्रवाह वंजारी समाजात परस्पर विरुद्ध तयार झाले आहेत, अन हाच सर्वात मोठा पंकजा मुंडे यांचा पराभव आहे , ज्यांच्या त्या वारस आहेत त्यांनी जे साधले ते त्यांना जमणारच नव्हते मात्र ते खोडून काढण्याचे पातक त्यांच्या कन्या करतील हे अपेक्षित नव्हते . थोडे मोकळे करून सांगतो . स्व गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडाच्या टेकडीवरून दिल्ली मुंबई पाहितली, मिळवली मात्र समाजाचे व्यासपीठ कुठल्याच मुद्द्यावर दुभंगू दिले नाही मात्र त्यांच्या कन्या  पंकजा मुंडे इथे सपशेल अनुउत्तीर्ण झालेल्या आहेत. सर्वात महत्वाची बाब ही की ज्या नामदेव शास्त्री यांची मठावर वर्णी स्व मुंडेंच्या अनुमोद्नावर झालेली आहे अशी चर्चा त्या महंतावर टाच करणारे शब्दावलीचे सरदार पंकजा मुंडे यांनी मोकाट सोडायला नको होते .
अखंड भारतात असणाऱ्या फक्त ५ न्यायाचार्यापैकी एक असणारे सानपांचे रत्न वंजारी भूषण म्हणून गौरवले जावे, असे असताना त्यांचा एकेरी नावाची लाखोली अन त्याच्यासाठी आसारामाची कोठडी वाहिली जात असेल तर हा सामाजिक गुन्हाच आहे . खरे पाहता स्व गोपीनाथ मुंडे हे राजकीय प्रस्थ उभे राहण्यास गडाचा कोट मोठा कामी आलेला आहे. आज त्याच कोटातून उभ्या राहिलेल्या अन सवर्धनीत झालेल्या प्रस्थाच्या वारसदार म्हणून संघर्षाच्या अनेक कड्या सहज पार करत त्यांच्या कन्या मुंबईत रॉयल स्टोन घेऊन आहेत . यांनतर गडावर येणारच म्हणून आपली राजकीय चेतावणी अन तुम्ही ही या ही राजकीय चिथावणी देऊन ना पंकजा मुंडे यांनी वंजारा समाजातील एक मोठा वर्ग गमावला आहे. ज्यात वडिलकीचे व अनुभवाचे सल्ले अन सहकार्य देखील आहे. कधीकाळी शनिवर तेल ओतून रूढी परंपरा झुगारून देणाऱ्या पंकजा मुंडे यांना आता भगवानगडावरच्या परंपरेचे एवढी काळजी कशाला हवी , हे न कळण्याइतपत समाज दुधखुळा राहिलेला नाही , भगवानगडावरचा समाज हा खरा सावज आहे जो त्यांना हवा आहे , ना मुंडे यांना हे मान्यच करावे लागेल की भक्तीच्या बुरख्यात त्यांचा राजकीय डाव आहे. अन त्यांनी तो मान्यच केला नाही तर तो त्या दिवशीच्या प्रसाद घेऊन परतलेल्या ताईभक्तांनी सिद्धच केलेला आहे. एकीकडे रीतीरिवाज तोडायचे वारसदार व्हायचे अन तिथेच कुठल्या रिती गिरवत तणावशिरा ताणायच्या अन त्याच्या कंपनात सर्व लोक माध्यमांना झिंगायला लावायचे या लोकनेत्याला शोभन्याऱ्या गोष्टी नाहीत . आता त्यांना राजकीय सल्ले अन मार्गदर्शन देणाऱ्या संघ अन त्याच्या प्रमुखास ही बाब लक्ष्यात येत नसावी का ? का मग असेच तर व्हावे या जमातीतले ते असतीनचे सोयरे आहेत काय ? हे देखील समजून घेतले पाहिजे ?  हा प्रश्न अन त्याचे उत्तर हा पंकजा मुंडे यांच्या अखत्यारीतला विषय आहे.
 हल्ली पंकजा मुंडे या राज्यभरातल्या टीकाकारांच्या रडारवर आहेत अन  त्यासाठी त्या अन त्यांचे राजकारण जबाबदार आहे .  याच निर्णयप्रक्रियेतून अन ताठर भूमिकेतून त्यांच्या मार्गात सराटे वाढले आहेत , 'बाबांचा वारसा चालतो मात्र बाबांचे माणसे नकोत'  अश्या धर्तीवर त्यांनी जी कार्यकर्ते कपात मोहीम  आपल्या ताफ्यात अवलंबली आहे ती त्यांच्या राजकीय प्रवासाला एकटे पाडणारी आहे . आता ही वेळ नाही मात्र
साहेब दिल्लीत असताना देखील बीड मधल्या एका अतिसामान्य दैनिकाच्या साध्या बिटाच्या पत्रकाराला फोन करायचे अन विचारायचे काय रे कसा आहेस , बरा आहे ना तुजा मुलगा सुहास अन समोरचा पत्रकार आहे तिथे रडायचा , आयुष्यभर ज्या शिवाजी मुंडे यांनी आयुष्य स्व मुंडे यांच्यासाठी घातले जेव्हा त्याच्या घरी दुखद घटना घडली तेव्हा शिराळातल्या हाकेच्या अंतरावर असताना दोन मिनिट न भेटणाऱ्या पंकजा मुंडे शरद पवार यांची वाट तासभर पाहू शकतात,हे बीड जिल्ह्यातील तेलगाव सहकारी साखर कारखाना अन भोगलवाडीचे अंतर जो जाणतो त्यास स्व मुंडे अन ना ताई यांच्यातला फरक चांगला उमजणार नाही काय ?  नारळी सप्ताहाच्या महाप्रसादाला डावलून कुठले आहार घेणाऱ्यांनी गड अन गडाच्या भक्तीची भाकिते का करावीत असा प्रश्न उभा केला तर रिती रिवाज काय असतात हे सांगायला महंताची  गरज पडणार नाही , त्यागाचे परमोच्य आदर्श असणाऱ्या भगवान बाबांच्या भक्ताला नारळी सप्ताहाचा महाप्रसाद त्याग करता आला मात्र बिर्याणी नाही असे कुणी म्हटले तर आपण अफवा म्हणून सोडून देऊ मात्र अफवेला देखील सुईच्या टोकाचा आधार असतोच असे समजणार्यांची कमी नाही ?   म्हणून ताई साहेब ...साहेबांचे वारसे मिळतील पण ते पेलतील का याचा विचार करा , कारण एखादी गोष्ट मिळणे अन ती टिकवणे वा वाढवणे यात कमालीचा नाही तर पराकोटीचा फरक असतो. खरे तर हे समजण्याचा वारसा तुम्हाला का मिळू नये याची खंत आता अनेकांना वाटते . ज्या समाजाचे प्रतिनधी म्हणून आपण मुंबई दिल्ली काबीज केले आहे त्या समाजाचे नामदेव शास्त्री राज्यातले एकमेव न्यायाचार्य आहेत मग समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपण वा आपले पाठीराखे त्यांचा काय तो सन्मान करत आहे? हे तुमचे पुरोगामी राज्य पाहत आहे.असे कुणी म्हटले तर पंकजा मुंडे यांना निरुत्तरित होण्यापलीकडे विलाज नसेल . भगवान बाबा संत हे  काय वंजारी म्हणून काम करत नव्हते  ते पंढरपूरच्या विठ्लाच्या वैष्णव धर्माचे वारकरी होते ज्यांच्या बाबदित कुठली तरी पोस्ट पंकजा मुंडे यांनी  फेसबुक वर केली होती अन काही डाव्या आरोळ्या आल्या कि तत्काळ डीलेट केली होती अश्या पुरोगामी पंकजा मुंडे यांनी भक्ती श्रद्धा अन परंपरा ही शब्दावली पुढे करून गडावर सोने लुटायचा हट्ट धरावा का ? हा प्रश्न त्या समाजाला पडलेला आहे ज्या समाजाच्या अनेक पिढ्या तिथल्या गर्दीत विरल्या आहेत.
 गोपीनाथ गड हा स्थापन करून पंकजा मुंडे यांनी जे साध्य केले ते त्यांनाच ठाऊक मात्र त्या निमित्ताने पडलेली ठिणगी आज समाजात मोठीच अग्निरेषा ओढत नाहीत काय ? अनेकांचे युक्तिवाद आहेत शास्त्रींना गादीवर कुणी बसवले म्हणजे यातून स्व मुंडे साहेब यांच्या निष्पक्षपणावर ताईसमर्थक प्रश्न उपस्थित करत असतील तर ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
   
...... असो जागर चालूच आहे जोपर्यंत आपण इथे आहात अन होय इथेच खाली प्रतिक्रिया द्या ........ आपला

ताजे लेख

बारामतीच्या मळ्यात देवेंद्र फुलले 

परवा राम कदम कलागौरव  पुरस्कार प्रदान करताना गाडगीळांनी शरद पवारांची मुलाखत घेतली ...

शिवसेनेला ते उमजले आहे  

स्व बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला ज्या शिवसेनेचे रोपटे लावले होते त्याचे बीज ...

बाबांच्या लेकीचे पुन्हा पतन 

दोन संघर्ष यात्रा काढून मतदारांना लोकनेत्याचा वारसा पुरवण्याची हमी देणाऱ्या ...

तर राज ठाकरेंचे  दिवस पुन्हा येतील

जबाबदारीने लिहतोय,  त्याबाबद विश्वसाहार्य नसलो तरी एकूण पक्षांची राजकीय वाटचाल ...

रयतेचा राजा आहे तुमचा इव्हेंट नाही 

शिवाजी हे फक्त कुठल्या राजा - व्यक्तीचे नाव नसून ते एक लोककल्याणकारी राज्यनिर्मितीस ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

काय चुकले आमिरचे 

काय चुकले आमिरचे ?  मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत ...

Close

satta king