16 January

डी .एम. द नेपोलियन ....

dm the nepoliyan
By भागवत तावरे
  • 2507 View


कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 
राज्यात सी .एम विरुद्ध डी.एम.च असे चित्र आहे , सरकारला विरोध करणाऱ्या प्रत्येक यात्रेचा कासरा लहान मोठ्या दोन्ही पवारांनी डोळे मिटून धनंजय यांच्यात हातात दिलेला आहे . संघर्ष यात्रा ते परिवर्तन यात्रेतला हल्लाबोल पाहता लाभलेल्या संधीची चकाकी राज्य पाहत आहे . उर्जा अन उर्मीने भरलेले नाथाच्या मुशीतले व कुशीतले हे नेतृत्व राज्यात गाजते आहे याचा बीड करांना अभिमान स्वाभिमानच असेल . परळीची सभा गमावून पवार सभा जिंकणारा हा हुन्नर वर्तमान  नेपोलियन ठरतो, कारण ज्या पैरीसने नेपोलियन हरला तेव्हा त्याची  हेटाळनी केली , तो संपला असे मथळे छापून आले , त्याच पैरीसला जेव्हा नेपोलियनने जिंकले तेव्हा सकाळचा सूर्य उगवत असताना नेपोलियन चा घोडा पैरीसच्या वेशीवर धडकला अन सकाळचे दैनिक विकणारा मुलगा समोर आला  . तलवारीच्या टोकाने नेपोलियन ने पेपर घेतला , अन मुख्य मथळा होता " वेलकम नेपोलियन धिस इज युवर किंग्डम " कुणास ठाऊक कधी काळी परळीने नाकारलेला नेपोलियन उद्या परळीच्या वेशीवर विजयी अश्व घेऊन उभा राहील अन परळी म्हणेल वेलकम डी.एम.धिस इज युवर किंग्डम
 राष्ट्रवादीने गेली सहा दिवस अर्धा महाराष्ट्र ढवळून काढला आहे.  परिवर्तनाच्या आवाहनाची धुरा बीडच्या नेतृत्वाकडे थोरल्या पवारांनी दिलेली आहे . हल्लाबोल करणारा हा संघर्षसुत सभे मागून सभा जिंकू लागला आहे . आम्हाला धनुभाऊची सभा हवी असा नेत्याचा होरा सांगली ते नाशिक या शहरी पट्यातून ऐकीव आहे . ग्रामीण बाज व नेमक्या सटीक शब्द्फेकीने फड जिंकणारा वाकमल्ल राज्यात मागणी असलेला फर्डा वक्ता जिल्ह्याचा आहे . पवारांनी दिलेला स्पेस भरभरून वापरणारा हा कार्यकर्ता नेत्यांचा नेता झालेला आहे . जेव्हा तुमच्यात प्रतिभा असते तेव्हा ते स्वयंभू उचमळत अस्तिस्त निर्माण करतच असते फक्त निमित्त ते कशाचे हा नियतीचे धोरण व नियोजन असते . शरद पवारांना संधी देणारे वसंतदादा यांना तरी माहित असावे काय कि कधी शरदराव  देशाचे नेते होतील , मात्र संधी च्या नंतर कस असतो तो प्रतिभेचा जो ज्याचा त्याने सिद्ध करावा लागतो ज्यात धनंजय पुरते उतरले आहेत . राष्ट्रवादी पक्षाच्या सरकार विरोधी मोहिमेच्या सभा असो अथवा निवडणुकींचे फड , धनंजय मुंडे यांनी ते जिंकताना कुठलीच कसर सोडलेली नाही . गर्दीच्या आखाड्यात आपले गाव अन माणसे सांभाळत राज्यात ओळख निर्माण करण्यात या पुतण्याला दांडगी ओळख मिळाली आहे. परळी विधानसभा सोडता सर्व स्थानिक संस्था जिंकताना सदरेवर वकूब निर्माण करणारा हा नेता जनतेत देखील खासा लोकप्रिय ठरला आहे जे त्यांच्या विरोधकांना देखील नाकारता येईल काय ? थेट मतदारात संपर्क . मतदार संघच नाही तर इतरांच्या परिघात नफ्याचा संपर्क ठेवणारा हा नेता आज राष्ट्रवादीची निकड बनलेला आहे . शरद पवारांच्या मागे ज्या मोजक्या लोकांच्या हातात पक्षाची ध्येय धोरणे आहेत त्यात धनंजय आहेत . सरकारच्या विरोधात सर्वाधिक लोकप्रिय व लोकसंमत असलेला आवाज धनंजय मुंडेंचा आहे . ऐकणारे फक्त खिळवून नाही तर मान देखील डोलावतात हे चित्र सर्वांनाच आश्वासक आहे . राष्ट्रवादीतच नाही तर कॉंग्रेस मधल्या थोरल्या फळीत देखील धनंजय यांना " गुड गोइंग " चा शेरा छापायचे नाही या बेस वर अनेक जन बोलून दाखवतात . 
      धनंजय मुंडे यांच्या वर्तमान स्थितीचे साधर्म्य थेट नेपोलियन बोनापार्ट याच्या सोबत जोडता येऊ शकेल . फ्रेंचमधील त्या स्वाभिमानी रामोलीनो नावाच्या स्त्रीने आपल्या मुलाचे नाव लायन ( सिह ) असलेले नेपोलियन का ठेवले असावे याची अंदाज नेपोलियनचा भविष्यकाळ देतो . ब्रिनी च्या लष्करी शाळेत शिकणारा छोटा बोनापार्ट उच्य श्रीमंत लेकरांच्या शाळेत होता मात्र सन्मानात नव्हता अगदी तद्वत धनंजय मुंडे यांच्या राजकीय इतिहासाची पाने आहेत .
राजकीय कुळ एक असताना सिहासन वर्ज्य झालेला हा अभागी पुढे पवारांच्या साम्राज्यात वजीर बनला व त्या बिरबल चातुर्याने लोकमनाचा राजा . आज देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सर्वात उत्तम युक्तिवाद करणारा विरोधी पक्षनेता बनलेला हा चेहरा बीड साठी स्वाभिमानाची जिवंत परिपाठ ठरतो  . नेतृत्वाचे कौतुक करताना त्याचे निकष मापदंड दिले तर त्या शब्दबद्ध बंधास लोकमान्यता मिळत असते . मोदींची भाषणे म्हणजे काल्पनिक असतात, त्यांचा वास्तवाशी काहीच संबंध नसतो. ना खाऊंगा, ना खाने दूंगा म्हणणाऱ्यांनीच दिवसा-ढवळ्या लूट केली. त्यात भाजपा-सेनेची भांडणं म्हणजे गल्लीतल्या कुत्र्यांपेक्षाही वाईट. यांचा आपापसात काहीच ताळमेळ नाही.
                 सरकारमधील 16 मंत्र्यांचा 90 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार, खोटे बोलत असेल तर भर चौकात फाशी द्या असे सरकारला जाहीर आव्हान कधी स्व. गोपीनाथ मुंडेंनी तरी केले होते काय ? स्व. मुंडेंच्या मुशीत कुशीत घडलेला हा पुतण्या लोकनेत्याचा संघर्षाचा राजकीय वारस ठरतो आहे . ना . पंकजा मुंडे सत्तेत असल्याने त्यांच्या सभोवतालचे मोहळ त्यांचे नेमके राजकीय परीमापन होऊ देत नाही मात्र सत्ता नसताना धनंजय मुंडे यांना मिळणारी लोकमान्यता थेट स्व . गोपीनाथ मुंडेच्या राजकीय उत्कर्षाशी समतोल साधते . 

ताजे लेख

मोदी-शहांचा गांधीकोट लोक गायब शाही शिल्लक, जुगाराचा संघ

एकाच वेळी अनेक जागांवर जुगार खेळण्याचा अवसानघातकी खेळ मोदी खेळत आहेत , पेशंट थेट ओटीला घेण्याचा ...

जोगव्यासाठी ‘भगवा’ राज मुद्रेत मोदीशाहीचा नवा भोई

मुंबईत काल दोन राजमुद्रा होत्या एक ध्वजावर आणि एक डायसवर, सेक्युलर इंजिन बाजूला काढून ‘कृष्णकुंज’ने एक रंग ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king