01 April

निवडणूक निर्वाणीची 

election 2019
By भागवत तावरे
  • 1325 View

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी 

         लोकसभा म्हणजे लोकशाहीचे महाकुंभ यात जो तो आपआपल्या पद्धतीने डुबकी लगावतो अन हवे तो मागतो , काहींना मिळते काहींचे स्वप्न जळते अन निवडणुकीच्या रणांगणात निकालाचे नगारे वाजतात . गेली ७० वर्षे आम्ही लोकशाहीचे हे सोहळे साजरे करत करत नेहरु - इंदिरा - जेपी - राजीव - अटल  भारत मोदीपर्यंत आला . मोंदीच्या पुढे भारत सरकत असताना आजवर कधी न समोर आलेले पेच भारतीय लोकशाहीला पहावे लागत आहेत . कधी नव्हे ते कुठले एक नेतृत्व देशातील स्वायत्त संस्थेवर वरचढ ठरताना व्यक्तीकेंद्रित शासन आणि प्रशासन अंग धरत आहे . त्यामुळे २०१९ ची निवडणूक २०२४ डोळ्यासमोर ठेऊन मतदारांना मागे टाकावी लागणार आहे . कधी नव्हे त्या घटना गत पाच वर्षात घडल्याने बुद्धीप्र्माण्यवादी लोकांसाठी मोदी नेतृत्व म्हणजे कुठला तरी हिमनग वाटू लागला आहे . नरेंद्र मोदी यांचे २०१४ चे भाषण पाहता त्यांनी दिलेले अभिवचने आणि त्याची अपूर्ती मोदींच्या गारुडाला मोठा प्रश्नकर्ता ठरणार आहे .
 ज्या महिन्यात भारतीय स्वातंत्र्याचे सोहळे होतात त्या ऑगस्ट मध्ये संविधान जाळले गेले . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून लिखित घटनेचे पहिले वाक्य we the people विसरून जर कुठली शक्ती अन त्या शक्तीची भक्ती आम्हाला विचारणार असेल कि who the people तर मात्र लोकांनी आपला परिचय देणे अपरिहार्य ठरून जाते . त्यामुळे २०१९ ची लोकसभा लोकांना स्वतचे मत अजमावण्याची आणि सिद्ध करण्याची शेवटची संधी ठरू नये . 
       काल ट्वीटर वर नरेंद्र मोदी यांनी आपल्या नावाच्या पूर्वी चौकीदार हे नाव वाढवले अन त्यांच्या अनुयायांनी आपण देखील चौकीदार असल्याचे दाखवण्यात डोळे झाकून उड्या घेतल्या . चला आता गम्मत समजून घेऊ . सर्वात अगोदर हे माहित करून घेतले पाहिजे कि चौकीदार हा काय प्रकार आहे . २०१४ च्या निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी मुझे प्रधान मंत्री मत बनाईये मुझे चौकीदार बनाईये असे आवाहन करून टाळ्या अन मते लाटली . त्या लाटेत नरेंद्र मोदी राजीव गांधी नंतर पहिले असे पंतप्रधान बनले ज्यांना बंपर बहुमत मिळाले . संपूर्ण ५ वर्षे नरेंद्र मोदी यांना अनिर्बंद व स्वायत्त सत्तेची कमान लाभली . या पाच वर्षात देश चौकीदाराच्या मजबूत हातात होता . मात्र १४ च्या प्रचार सभातील एकही आश्वासन पूर्ण झाले नाही वरून फ्रांस कडून विमान खरेदीत विरोधी पक्षाने मोदी सरकारला घेरले . रेडीवो पासून टीव्ही पर्यंत सर्व माध्यमातून भाषण देणारे नेतृत्व राफेल वर मुग गिळून गप्प बसले वरून सरकार कडून चक्क सर्वोच्य न्यायलयाची दिशाभूल करण्याची अपूर्व व अक्षम्य चूक घडली . द हिंदू कडे असलेली माहिती देताना फाईल हरवल्याची साक्ष सरकार पक्षाने न्यायलयात दिली तर राफेल प्रकरणी क्लीन चीट घेण्यासाठी चुकीचे शपथपत्र देण्याची हास्यास्पद चूक देखील केंद्र सरकार कडून झालेली आहे . यामुळे राहुल गांधी यांनी चौकीदार हि चोर है हि घोषणा दिली अन रातोरात देशात चौकीदार ही चोर है असे लोक मिश्कील टीकेतून बोलू लागले . यावर मोदी मित्र अनिल अंबांनी यांनी राहुल गांधी यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला मात्र राजीवपुत्र निश्चल उभा राहिला अन पहिल्यांदा देशाला देखील वाटले कि मोदी सरकारची चूक आहे . तेव्हा मोदींनी आरोप तर खोडले नाही मात्र आरोपांनाच आपली ढाल करण्याची त्यांनी राजकीय किमया साधली . मात्र निवडणुकीच्या तोंडावर हे सोंग आणि ढोंग असल्याचे वाटू लागले आहे . भाजपला मते देणारा २०१४ चा मतदार १९ ला पुन्हा मते देईल का अन का द्यावीत अश्या द्विधेत आहे . कारण स्वतच्या तोंडचे चौकीदार हे नाव त्यांनी आपल्या आय डी च्या पाठीशी लावत आश्वासनाना पाठीशी घालण्याचे राजकारण साधले जात आहे काय ? हा देखील प्रश्न आहे. 
मोदी है तो मुमकिन है वाल्या लोकांनी चक्क स्वतच्या मागे चौकीदार हा शब्द लावून सत्तेसाठीचा केविलवाणा प्रयत्न केला आहे . तसे मोदींना जुनी सवय आहे ते आरोपांना उत्तर देण्याऐवजी त्याची ढाल कसी करता येईल व लोकांना भावनिक पेचात घेऊन त्यांनी नेहमीच आपला स्वार्थ साधलेला आहे . मागे कॉंग्रेसचा स्वैर दिग्गीराजा म्हटले मोदी प्रधानमंत्री बन सकता है क्या ...झाले लगेच मोदींनी मैने चाय बेची है म्हणत गरिबीचा काढा देशाला पाजला अन चाय चाय करत लोकसभेची पायरी गाठली . आता अजून कुणाला माहित नाही कि मोदींनी नेमकी कुठे चहा विकली . याचा अर्थ मोदींनी आपण कधीच चहा विकलेला नाही हे सत्य नाही सांगितले उलट आरोपाचे राजकारण केले अन मते लाटली . 
       आता स्वतला चौकीदार म्हणवून घेत मोदींनी त्या सर्व चौकीदारांचा कसा अपमान केला आहे . कारण चौकीदार हा इमानदार असतो तो इमानदारीने रखवाली करतो मात्र इथे मोदी सत्तेत आल्या पासून देशातले मोठे कर्जबाजारी पळून गेले आहेत . तेव्हा स्वतला चौकीदार म्हणणारे मोदी झोपले होते का असे अजिबात म्हणू नये का ? चौकीदार या शब्दाची भूमिका नाही मात्र मार्केटिंग करून मोदी व त्यांच्या अनुयायी खासदारांनी राजकीय पंच साधला आहे . खरे म्हणजे चौकीदारी या शब्दाचे कर्तव्य पाहितले तर विजय मल्ल्या , निरव मोदी , चोक्सी यांचे पलायन चौकीदाराचे अपयश समजले पाहिजे . २०१४ च्या घोषणांची साधी आठवण केली तरी मोदी सरकार यशस्वी झाले का अयशस्वी हे सहज लक्ष्यात यावे . मात्र देशाच्या विकासावर चर्चा करण्यात स्वारस्य न दाखवता सत्ता धारी भावनिक राजकारण करतात . जेव्हा आपण काम कलेले असते तेव्हा आपल्याला बोलण्याची गरज लागत नाही हा सर्वमान्य व सर्वकष नियम आहे . याच नियमाने जर मोदी सरकारने काम केलेच असेल तर या सर्व सोंग ढोंगाची गरज का पडावी . आपण केलेले सोंग उघडी पडू नयेत किवात्यांची राखण व्हावी या साठी पुन्हा सोंगे रचावीत असा हा प्रकार नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी खासदार करत आहेत . आता काही खासदारांनी चौकीदार लावले नसेल त्यांना नेमकी काय तक्रार असावी त्यांनाच ठाऊक . अमित शहा यांनी चौकीदार नाव लावणे म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नातीच्या वक्तव्याची आठवण व्हावी . त्या असे म्हटल्या होत्या कि मोदी आणि शहा हे गुंड आहेत . कुठल्याही भूमिकेची समीक्षा होणे हे लोकशाहीचे कर्तव्य आहे मात्र ते करणारे देशद्रोही असू शकत नाहीत हे बहुदा मोदी सरकार सोडता कुणाला सांगण्याची गरज भासली नाही . नरेंद्र मोदी या भूमिकेने देशास जो विश्वास २०१४ ला दिलेला होता तो २०१९ मध्ये चौकीदार सारख्या नौटंकीने फोल ठरत आहे .  सत्तेला प्रश्नविचारणे खटकने सुरु झाले कि असेसमजण्यास अजिबात  हरकत नसते कि लोकशाहीला आव्हान आहे . 

हीच का चौकीदाराची राखण 

१ ) ४५ वर्षात सर्वाधिक बेरोजगारी ( nsso डेटा ) 

२ ) प्रदूषित शहरात भारत १० देशात ( who डेटा ) 

३ ) ३० वर्षात सर्वाधिक भारतीय सैनिक शहीद झालेले सरकार ( वाशिंग्टन पोष्ट ) 

४ ) ८० वर्षातील सर्वात मोठी आर्थिक विषमता (क्रेडीट सुइस रिपोर्ट ) 

५ ) मोदी काळात महिला साठी सर्वात खराब देश ( थोमस रोयट्रस सर्व्हे ) 

६ ) दहशतवादात कश्मीरी युवक मोदी काळात वाढले ( सैनिक प्रशासन आकडे ) 

७ ) गेल्या १८ वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या मालास कमी भाव ( wpiडेटा ) 

८ ) मोदी पंतप्रधान झालेपासून सर्वाधिक गोरक्षेवरून तणाव व दंगली ( इंडिया स्पेंड डेटा ) 

९ ) जगातला दुसरा असमानता असणारा देश ( ग्लोबल वेल्थ रिपोर्ट ) 

१० ) भारताचा रुपया आशियावातील सर्वाधिक खाली असणारे चलन आहे ( मार्केट डेटा ) 

११ ) पर्यावरणात भारत सर्वात खराब असणारा देश आहे ( epi२०१८ ) 

१२ ) विदेशी धनास व भूष्टचारातील धनास वैध करणारे सरकार ( वित्त विधयक २०१ in ) 

१३ ) एक हि पत्रकार परिषद न घेणारे मोदी एकमेव पंतप्रधान 

१४ ) पहिल्यांदा cbiविरुद्ध cbi , rbi विरुद्ध सरकार , न्यायालय विरुद्ध सरकार प्रकरणे पाहता देशातील स्वायत्त यंत्रणेवर पहिल्यांदा सरकारी हस्तक्षेप . 

१५ ) लोकशाही धोक्यात असल्याचे सर्वोच्य न्यायलयातील न्यायधीशांनी पहिल्यांदा समोर येऊन सांगितले . 

१६ ) मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदा रक्षा मंत्रालयात फाईल चोरीला गेली 

१७ ) प्रश्न उपस्थित करणारे देशद्रोही ठरवण्याचा रिवाज पहिल्यांदाच 

ताजे लेख

मोदी-शहांचा गांधीकोट लोक गायब शाही शिल्लक, जुगाराचा संघ

एकाच वेळी अनेक जागांवर जुगार खेळण्याचा अवसानघातकी खेळ मोदी खेळत आहेत , पेशंट थेट ओटीला घेण्याचा ...

जोगव्यासाठी ‘भगवा’ राज मुद्रेत मोदीशाहीचा नवा भोई

मुंबईत काल दोन राजमुद्रा होत्या एक ध्वजावर आणि एक डायसवर, सेक्युलर इंजिन बाजूला काढून ‘कृष्णकुंज’ने एक रंग ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king