14 July

प्रतीमुंडे 

next munde
By भागवत तावरे


भगवान गडाच्या बाहूकडे भाऊ 
         गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले संघर्षाचा परिचय आणि आदर्श देणारे पान , विरोधी पक्षात राहूनच लोकनेता होता येते याचा परिपाठ म्हणजे गोपीनाथ मुंडे , वंजारा समाज उघडच बोलायचे झाले तर मतदार सजग व जागृत करून राजकीय दबाव निर्माण करण्याचा श्रीगणेशा गोपीनाथ मुंडेंनी केला , १६ लोकसभा आणि तब्बल ५४ विधान सभा मतदार संघात निर्णायक किंबहुना गुलालाच्या चाव्या हातात असलेली मतदार संख्या स्वअधीन करून घेण्याचे आणि दाखवून देण्याचे कसब स्व मुंडेनी सिद्ध केले . गोदावरीच्या तटापासून कृष्णेच्या घाटा पर्यंत समाज राजकीय दृष्ट्या स्वाभिमानी करण्याचे यशस्वी राजकारण मुंडेनी साधले , बबनराव ढाकणे तसे या समाजातले थोरले सजग नेते मात्र महाजन त्यांच्या कुंडलीत नसल्याने स्व मुंडेंना जे लाभले तत्पूर्वी कुणाला नाही , भगवानगड , उसतोड कामगार आणि वंचित असलेली भावना याच मिश्रण मुंडेंच्या नजरेत मुंबई दिल्लीला आणून गेले , पक्षीय कोट्या उधळून लावत जय भगवान म्हणत स्व मुंडे भाजपचे गडकरी ठरले , चंद्रकांत दादाच्या भाषेत गोपीनाथ मुंडेनी कार्यालयातील भाजप रस्त्यावर आणली , शेठजी भटजी चा पक्ष वाडी वस्ती वरच्या बहुजनांचा केला , स्व.मुंडे ५ वर्षे उपमुख्यमंत्री सोडले तर कायम विरोधी बाकावर राहिले , म्हणूनच कि काय ते कायम लोकआवाजाचे प्रतिनिधित्व करताना लोकनेता म्हणून सिद्ध झाले , ते जातीचा चेहरा बनले नाही मात्र काही ठोस व धोरणी निर्णयाने त्यांनी वंजारा मतदार आपल्या जाकेटमध्ये मिळवला आणि यातून मुंडेंचा राजकीय रुबाब व समाजाचे राजकीय मूल्यांकन वाढले. 
 गोपीनाथ मुंडे यांनी सजग केलेल्या समाजाला मुंडेंच्या नंतर सक्षम वारस हवा होता , स्व.मुंडे यांच्या नंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी वारसाहक्क आरक्षित करण्याचा जोरदार प्रयत्न केला मात्र राजकारणात अनुवंश कमी आणि कार्यवंश अधिक चालतो , सावली सारखा मागे आणि येणाऱ्या काळात पुढे काम करेल या आशा अपेक्षेने थोरल्या भावाचा ज्येष्ठ धनंजय मुंडे स्व मुंडेच्या संघर्षाचा वारस ठरणारच तोवर सासरी गेलेल्या पंकजा माहेरी स्थिरावल्या आणि २००९ ला उमेदवार म्हणूनच समोर आल्या , भाऊ म्हणून पाठीसी राहिलेले धनंजय पाठी ठेवण्याचे नियतीने राजकारण साधले आणि उपेक्षित राजपुत्राचे बिरूद माथी बसले , मात्र संघर्ष हाच ज्याच्या कुळाचा पिंड आहे त्याने अन्याय व वर्तमान दोघांच्या समोर उभे राहण्याचे धारिष्ट्य आणि सिद्ध होण्याचे कसब दाखवले , प्रवाह वाट काढत असतो याच निसर्ग नियमाने परळीत उपेक्षित असलेल्या क्षमतांनी बारामतीच्या पीच वर फलंदाजी सुरु केली , राजकीय  फडातल्या सर डॉन ब्रेडमनने संघाच्या बाहेर ठेवलेल्या खेळाडूला ओपनर म्हणून उतरवले , राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून धनंजय मुंडेंनी संधीचे सोने केले , हल्ला बोल सारख्या यात्रा लोकआवाज बनल्या आणि धनंजय मुंडे यांच्यात लोकांना गोपीनाथ मुंडे दिसले . मात्र धनंजय व पंकजा असे दोन थेट दोन पर्याय समाजाच्या समोर आले , धनंजय मुंडे यांना एकही खुटान जाणार नाही याची तसदी पंकजा यांनी राजकीय वाटणी पत्रात घेतली मात्र ज्याने जाकेट मध्ये नसताना साहेबांना पाहिलेले त्याला अस्तित्व सिद्ध करायला जड जाणार नव्हतेच , संघर्ष मोठा ठरला मात्र बारामतीच्या सदरेवरून परळीला साद घालत मतदारांचा प्रतिसाद मिळवला आणि वैद्यनाथाच्या भूमीत लोकमत सिद्ध केले. 
     पंकजा मुंडे यांच्या राजकीय वाटचालीत अनेक वळणे आत्मघातकी आहेत , त्याचं अन त्यांच्या पक्षात सवांद कमी आणि वाद अधिक राहिलेला आहे , कमी वेळेत अधिकचा प्रवास करण्याची अतीव इच्छा असलेल्या पंकजा यांनी राजकीय चुका केल्या ज्यात फारसे चिंतेची बाब नाही मात्र त्यांनी थेट भगवान गडाला पर्याय देण्याच्या दोन चुका केल्या , एक गोपीनाथ गड आणि दुसरा सावरगाव चा भक्तीशक्ती गड , गोपीनाथ मुंडे यांनी समाज राजकीय सजग केला हे नाकारता येणार नाही मात्र त्यांच्या नावाचा गड स्थापन करणे  हे अध्यात्मिक निकषात बसत नव्हते ,हेच समाजातील अनेकांना भावले नाही , आणि भगवान गड गोपीनाथ गड असे दोन दुभंग समोर आले , न्यायाचार्यांनी न्याय साधत इथून पुढे भगवान गडावरून दिल्ली मुंबई पाहण्याचे मेळावे नाकारले , पंकजा यांना हे अपेक्षित नसावे आणि त्यांनी थेट भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेत वाद वाढवला , भाजप सोबत त्यांचे वितुष्ट टोकाला जात असल्याचे पाहून हक्काचा मतदार आरक्षित करण्यासाठी पंकजा पुन्हा एकदा भगवान गडाकडे पाहू लागल्या असल्या तरी कधी काळी भगवान गडावर लाठ्या काठ्या घेऊन गेलेला ताफा कुणाच्या अनुमोदनाने गेलेला होता हे औरंगाबाद विमानतळावरच्या लिक झालेल्या व्हिडीओतून सिद्ध झाला .   
 भगवान गडावरच्या भक्तात मतदार शोधणारे राजकारण महंतांनी नाकारले , मात्र धर्म आणि सत्ता यांच्यातला समन्वय देखील एक इतिहास आहे , शक्ती भक्तीच्या समयोगात समाजाचे उद्गोधन व प्रबोधन साधले जाते , कुटील राजकारण नाकारणे सयुक्तिक मात्र समन्वय स्वीकाराहार्य असतो आणि याच अन्वये भगवानगडाच्या पायथ्यावर धनंजय यांचा माथा दिसू शकणार आहे . 
 धनंजय मुंडे व भगवान गड हे उद्याच्या सामाजिक अभिसरणाचे सूत्र असू शकणार आहे , महातांच्या अध्यात्मिक प्रगतीच्या जोडणीला राजसत्ता घेऊन येण्याचे कार्य उद्या धनंजय करू शकतील तेव्हा स्वतवरून दूर गेलेल्या अनेकांना धनंजय यांचा गडावरचा कुर्निसात मान्य करावा लागेल . भगवान गडावर येणारा मावळ अनेक मतदार संघाच्या वाटा चालत येतो म्हणूनच गोपीनाथगडाच्या संस्थापिका भगवानगडाच्या आठवणीत वर्तमान आणत आहेत मात्र पंकजा मुंडे यांच्या स्वभाव दोषाने भगवान गडाचे दार त्यांच्यासाठी करकरकरतील असे वाटत नाही , या उपर धनंजय यांच्यासाठी गडावर चार पदरी असू शकणार आहे . राष्ट्रवादीच्या परिवार सवांद मध्ये धनंजय उस्मानाबाद लातूर हिंगोली परभणीत गेले तेव्हा वंजारा समाजातील असंख्य चेहऱ्यांनी त्यांची सेल्फी प्रगल्भ जाणवली . गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा व गरिमा धनंजय मुंडे यांच्यात पाहणाऱ्या मतदार व लोकांची संख्या वाढत आहे , येणारा काळ धनंजय मुंडे यांचा नामदार   आणि कामदार म्हणून सिद्ध होण्याचा पर्वकाळ असेल .  
  

ताजे लेख

प्रतीमुंडे 

भगवान गडाच्या बाहूकडे भाऊ           

  व्हाय नॉट मुंडे   

    गोपीनाथ गडावरच्या तोफा अंगलट        

पवार बुराडी घाटावर 

दिल्लीच्या नादात मुंबई अरबीत  शरद पवार म्हणजे ...

साईड टू पंकजा

  भाजपच्या चित्रातली पूजा -  एक चक्रव्यूह      

विषयांतर व वेशांतर बस तुम यही कर सकते हो

एक...दो....तीन...पास वा रे सरकार , डोनाल्ड अमेरिकेचे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांना तेथील प्रेस कोर्ट ने ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king