08 November

भाजप विरुद्ध पंकजा मुंडे 

pankja agaianst bjp
By भागवत तावरे
  • 701 View


काल छगन भुजबळांच्या नाशिक मध्ये भाजपचे पूर्वीचे गडकरी अन मोदी वर्गातील पहिल्या डेस्क वरचे विश्वासू नितीन गडकरी यांनी जलस्वराज्य योजनेचे अपयश अधोरेखित केले .पंकजा मुंडे ज्या यशाचा दाखला देऊन द्विवर्षीय  समाधानोत्सव साजरा करत आहेत त्यास त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी खोडा घातला . जलस्वराज्य योजनेत त्रुटी होत्या अन त्या दूर करण्याची वडीलकीची भाषा करून नागपुरी फना गडकरींनी परळीकडे अंगुलीनिर्देश करत दाखवला . गतकाळात होत असलेल्या राजकीय घडामोडी पाहताना हे प्रकर्षाने समोर येत आहे की भाजप विरुद्ध पंकजा मुंडे असे खेळ हल्ली सुरु असतात. कधी ते भगवानगडाच्या पायथ्याला रंगतात तर कधी नाशिक च्या गोदाकाठेवर.कुणाचे सत्य असत्य यापेक्षा बेबनाव आहे अन त्यातून पंकजा मुंडे यांचे राजकीय भविष्य संकटाकडे जात आहे असे म्हणता येईल अशी वर्तमान परिस्थिती आहे. 
     जगातल्या सर्वात मोठ्या संघटन असणाऱ्या संघाचे राजकीय अपत्य म्हणूनच भाजपकडे पाहितले जाते  . संघ वा भाजप हे तत्वनिष्ठ राजकीय नियमात आपले  मार्गक्रमन करणारे संघटन आहेत , व्यक्तीवलय नेहमी दूर ठेवताना कार्यकर्ता पक्ष अन पक्षाच्या विचाराशी कसा संघवादी बनेल यास त्यांची प्राथमिकता राहिलेली आहे . मात्र यासर्व नियमांना अन मर्यादांना नको तितक्या धडका मारणाऱ्या ना पंकजा मुंडे वेगळ्याच अडचणीचे रोपण करत आहेत  . हल्लीच्या राजकीय कोलाहलात अन गतकाळातील त्यांच्या राजकीय मोहिमात जी गडकिल्ले त्यांनी गमावली आहेत त्यावरून त्यांचा राजकीय परीघ आकुंचन पावत असल्याचे अन दृष्टीकोन संकुचित होत असल्याचे समोर येत आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या  पंकजा मुंडे यांच्या साऱ्या महत्वकांक्षा या परळीत येऊन ठेपल्या आहेत . फक्त परळीच्या मंत्री अन पालकमंत्री असल्यागत १०० कोटी परळीच्याच मंदिरांना  अन परळीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना जिल्हा वाऱ्यावर  सोडताना पंकजा मुंडे राजकीय भावकीत अत्यंत संकुचित झालेल्या आहेत ? बीड जिल्ह्यातील इतर ५ नगर परिषदा वाऱ्यावर सोडणाऱ्या पंकजा मुंडे यांनी पालकाच्या भूमिकेतून जिल्ह्यातील इतर नगरपरिषदेत चालू असलेले युतीचे तंटे सोडणे अपेक्षित होते मात्र त्यांनी परळीचे गणित सोडवून घेताना ती तसदी घेतली नाही अन तीच बाब त्यांना राजकीय खुजेपणाकडे घेऊन जाणारी आहे. 
   
असाच एक राजकीय पक्षीय अपराध पंकजा मुंडे यांनी २०१४ च्या विधानसभेच्या आखाड्यात केला होता, तसी ती  उद्धव ठाकरे यांच्या  कसलेल्या राजकीय अनुभवाची यशस्वी चाल देखील म्हणता येईल. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत परळीला उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही , पंकजा यांना बहिण संबोदत थेट वंजारी मते मिळवताना ठाकरेंनी भाजपचे तीन गडी टिपले अन ते पंकजा मुंडे यांच्याच कृपेने ?  म्हणूनच तो पंकजा मुंडे यांचा भाजपविरोधातील  गुन्हा ठरतो जो परळीच्या स्वार्थात घडलेला आहे . शिंदखेडराजा येथील भाजपच्या डॉ मानटेंचा पराभव झाला . जवळपास ६० हजार वंजारा मतदार असताना पंकजा मुंडे तिकडे फिरकल्या नाहीत अन त्यात ठाकरेंनी शशिकांत खेडेकरांना निवडून आणले. वंजारी समाजातील तोताराम कायंदे जे गेली १० वर्ष अपक्ष आमदार होते त्यांना डॉ मानटें यांचे सत्तारोहन मान्य नव्हते कारण त्यांना वंजारा समाजात दुसरी आसामी सिंदखेडराजात नको होती , त्यास पंकजा मुंडे यांची मूकसंमती होती काय अशी शंका तेव्हा आली जेव्हा पंकजा मुंडे यांनी तोताराम कायंदे यांचे चिरंजीव डॉ सुनील कायंदे यांना मागच्या आठवड्यात भाजपप्रवेश दिला. विशेष हे की त्यासाठी पंकजा मुंडे यांनी स्व गोपीनाथ मुंडे यांचे मोठे 'अर्थ'बळ ठरलेले घुगेंचे जावई डॉ मानटेंचा राजकीय बळी दीला ? असाच प्रकार सिन्नर येथे झाला जिथे माणिकराव कोकाटे यांचा राजकीय घात झाला असे त्यांचे समर्थक म्हणतात तिथे सेनेचे  तुकारामजी निवडून आले , याठिकाणी देखील पंकजा मुंडे यांनी काही कानपिचक्यास बळी पडून परळीच्या साठी बंधू झालेले उद्धवजींना दुसरी बक्षिसी सैल केली. तिसरा प्रकार कंदहार लोहा जिल्हा नांदेड येथील उदाहरण म्हणून  घेता येईल. केशवराव धोंडगे यांचा मुलगा वकील मुक्तेश्वर धोंडगे यांना भाजपचे तिकीट होते ज्यात त्यांचा पराभव झाला. त्याठिकाणी पंकजा मुंडे यांनी लक्ष दिले असते तर फरक दिसला असता असे काही लोकांचे म्हणने आहे , जिथे शिवसेनेचे प्रतापपाटील चीखलीकर निवडून आले . पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या मतदार संघातील तिसरा बाण होता , त्यांच्याकडून भाजप संदर्भात चौथी चूक लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे झाली असे देखील वावड्या आहेत , तिथे नितीन गडकरी यांनी गणेश होके यांना उमेदवारी दिली मात्र पंकजा मुंडे यांना इथे जानकरांची सोय करायची होती अन ते शक्य होते कारण ५० हजाराच्या  जवळपास वंजारी मतदार याठिकाणी आहे अन नंबर दोन चा मतदार धनगर समजाचा आहे . यामुळे त्यांना शक्य होते मात्र भाजपने धनगर समाजाचेच गणेश हाके यांना उमेदवारी दिली . जिथे गणेशरावांचा पराभव झाला मात्र तिथे भाजपचा विजय होऊ शकला असता जर परळीच्या वैधनाथाचा कृपा आशीर्वाद लाभला असता . परळीची ओवाळणी टाकताना उद्धव ठाकरे यांनी बहिणीकडून तीन कमळाचे फुल खुडायला मदत घेतली , पंकजा मुंडे यांनी ती प्रत्यक्ष केली नसली तरी वंजारा मते असणाऱ्या विधानसभा संघात पंकजा मुंडे यांचा बहिण म्हणून उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी  परळी सोडल्याचे सांगत नेमका वेध उद्धव ठाकरे यांच्याकडून साधला गेला. जिथे भाजपचे नुकसान झाले ज्याच्याशी पंकजा मुंडे यांना काही देणे नव्हते कारण त्यांना फक्त परळी दिसत होती, ज्या प्रमाणे त्यांना नगर परिषदा निवडणुका लागल्या की दिसू लागली आहे , यावेळी मात्र त्यांच्या परळी हट्टात दूरचे नाही तर जिल्ह्यातीलच राजकीय बळी जाणार आहेत ? अशी शंका समोर येत आहे .       
    भाजप सोबत संघर्ष यात्रेपासून पंकजा मुंडे यांचा  संघर्ष राहिलेला आहे कधी तो मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावरून असतो तर कधी मंत्रीमंडळातील विस्तरावरून तर कधी खांदेपालटावरून, अन  त्यांचा संघर्ष शब्दबद्द देखील झालेला आहे . उलट भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या अनेक राजकीय चुका म्हणता येतील अश्या घटना नजरअंदाज करण्यात आलेल्या आहेत. राजकीय वैर जोपासताना मुंबईच्या रॉयल स्टोन चे लक्ष कायम परळीवर असल्याचे समोर येत आहे .परळीचा विकास करू नये असे म्हणता येणार नाही मात्र राज्याच्या मंत्र्याने फक्त त्यासाठीच आपले राजकीय कसब पणाला लावावे याबाबद राजकीय तक्रार होऊ शकेल. 
ज्या भगवानगडाच्या वादात भाजप पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभा होता त्याच भाजपला भगवानगडाच्या पायथ्याला आपल्या भावाकडून जी चिमटे  पंकजा मुंडे यांनी काढले ते त्यांच्या राजकीय प्रवासाचे अडसर ठरणार नाही असे कुणाला म्हणता येणार नाही . महादेव जानकर लॉयल भाषण करताना ज्या पातळीवर खाली आले होते  त्यावरून मुख्यमंत्र्याला जे ओरखांडे त्यांनी काढले होते त्याचे तत्कालीन प्रयोजन असण्याचे काही कारण नव्हते. समोर जमलेल्या जनक्षोभासमोर पक्ष वगळून जे 'स्व'स्तवन करून घेण्यात आले त्यातून पंकजा मुंडे यांनी बारामती अन नागपूर असे दुहेरी राजकीय आव्हाने अंगलट करून घेतली आहेत. त्यांनी वेळीच सावध व्हावे माघार त्यांना ठाऊक नाही मात्र राजकारणात कदम कदम जे मिळते तेच टिकते हे समझुन घेतले पाहिजे , हेच सत्य . 

ताजे लेख

जीओ मेरे लाल   

चर्चा फेल - मोर्चा फेल - खर्चा फेल  अ

नाझीवादाय नमो

 सूचना : सदरील लेख मोदी भक्तांना निर्णयाच्या विरोधात आहे असे वाटू शकते ...

भाजप विरुद्ध पंकजा मुंडे 

काल छगन भुजबळांच्या नाशिक मध्ये भाजपचे पूर्वीचे ...

पुरोगाम्यांचा वामनदाह

दिवाळीचा मुहूर्त साधत काल महाराष्ट्रभर वामन दहनाचा खडा ...

हु तू तू भारता

कालची गोष्ट आहे, रविवार असल्याने मी जरा निवांत होतो . किती ही काम असली तरी रविवार ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

काय चुकले आमिरचे 

काय चुकले आमिरचे ?  मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत ...

Close

satta king