02 November

पुरोगाम्यांचा वामनदाह

waman burn of purogami
By भागवत तावरे
  • 479 View


दिवाळीचा मुहूर्त साधत काल महाराष्ट्रभर वामन दहनाचा खडा टाकण्यात आला त्यात हिरारीने सहभागी असणाऱ्या पुरोगामी मानसिकतेला काही प्रश्न विचारायची नाहीत तर उत्तरे मागायची आहेत म्हणून जाणीवपूर्वक लेख खरडून घेत आहे . ज्या हिंदुच्या रितीरिवाजाला कंटाळून आम्ही त्याचा त्याग केला आहे मग त्यातल्या रूढीवर आगपाखड करून नेमके काय सिद्ध करत आहोत याचा जाब पुरोगामी महंत लोकांना विचारलाच पाहिजे . समतेच्या  महाप्रवर्तक अनुयायी लोकांनी कुठल्या का होईना रूढीवरून समाजात तेढ निर्माण तरी का करावी . ज्यांना पोथी पुराण मान्य नाही त्यांना पुराणातला वामन मान्य वा आक्षेपाचा तरी का वाटावा . ज्या विष्णूला आपण मान्यच करत नाही अश्या लोकांनी विष्णूच्या वामन अवताराचा संदर्भ घेऊन त्यातला बळीचे वाली का व्हावे अन कशासाठी ? बळीच्या डोक्यावर पाय ठेऊन बळी पाताळात घातला या घटनेचा निषेध म्हणून काही लोकांनी वामनाचे दहन का करावे मग ? मला सरमाडाची पेंढी जाळून त्याचा फोटो काढला म्हणजे खूप सामाजिक कर्त्यव्य पार पाडले असे होत नाही उलट सामाजिक स्वास्थ्यास बाधक कर्त्य म्हणता येईल असे ते काम आहे . जगातल्या कुठल्याच दैववादास धम्म मान्य करत नाही तिथे बुद्ध अनुयायी म्हणवून घेणारांनी कुठल्या दैववादातील घटनेचे समर्थन करू नये अन निषेध देखील नाही . वामनदहनाची प्रतीकृती म्हणून इतर जात समुदायास चुचकारण्याचा हा प्रकार नाही का , वामन दहनात द्वेष मत्सर आकस नसेल तर खुशाल जाळपोळ चालू द्या मात्र ज्या ठिकाणी समाजाचा ५० टक्के पेक्षा अधिक भाग जी बाब करत आहे त्याला विरोध म्हणून वामन दहन उपक्रम राबवणे कितपत योग्य आहे याचा देखील विचार करायला पाहिजे . 
     हिंदू धर्मातील कर्मकांड अन अंधश्रद्धा झुगारून दिनांक १४.१०.१९५६ रोजी नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली व नंतर उपस्थित लाखो अनुयानांना त्यांनी दिक्षा घेऊन दिली. दुसर्‍या दिवशी दिनांक १५.१०.१९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत त्यांनी धम्माचे विवेचन व समाजबांधवांना मार्गदर्शन करणारे ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण दिले. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की " आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५ पासून येवले येथे एक ठराव करुन हाती घेतली. मी.हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा मी मागेच  केली होती आणि काल मी ती खरी करुन दाखविली. मला इतका आनंद झाला की- हर्षवायुच झाला आहे. नरकांतून सुटलो असे मला वाटते.  काय आपण सुध्दा पुर्णपणे हिंदू धर्माच्या संकृतीचा, रितीरिवाजाचा त्याग केला आहे कां? असा प्रश्‍न आम्ही स्वत:ला विचारायला नको कां?   पुढे बाबासाहेब म्हणतात की, मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द धर्मात यावयाचे आहे, त्यांनी जाणीवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे. बाबासाहेब पुढे म्हणतात की, “मात्र तूमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्द‍ल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौध्द धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शुन्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे हो‍ऊ नये, म्हणून आपण दृढ निश्‍चय केला पाहिजे.
   वरील शब्द डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत  बारकाईने वाचल्यास हे लक्ष्यात येईल की हिंदू धर्माच्या संकृतीचा त्याग करूनच धम्म वाटेवर चालणारा पुढे चालत असावा अशी त्यांची अपेक्षा होती.मात्र आज वर्तमान काळात अनेक जन धम्म वाटेवर चालतात का नाही माहित नाही मात्र हिंदू धर्माच्या रितीरीवाजावर मात्र मिळेल त्या संधीत आगपाखड करून घेतात यातून बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी समता आकाराला येते का जात धर्मातली असमानता याचा विचार देखील होणे गरजेचे आहे . कारण कुठले समर्थन करताना निषेद , विरोध करताना सामाजिक स्वास्थ्य बाधित होईल हे कायद्याला अभिप्रेत नाही .ब्राम्हण्यवादाचा आकस जर सामाजिक विभागणी करत असेल तर तो थांबू नये काय ? ब्राम्हण विरोध म्हणजे जर पुरोगामित्व समजले जात असेल तर खोडून काढले पाहिजे , मत मतांतरे असू शकतात मात्र ते सिद्ध करण्यासाठी असुरी हास्य दाखवत कुठल्या प्रतिकृती जाळल्या जात असतील तर सामाजीक अराजकता का माजणार नाही ?   
   अलीकडे पुरोगामी असणाऱ्यांना हिंदूंच्या रीतीरीवाजाचा खुरपूस समाचार घेणे त्यावर प्रसिद्धी मिळवणे हा चळवळीचा विषय वाटतो आहे. मात्र खऱ्या अर्थाने हे परिवर्तन नाही आपण हिंदू सोडून ज्या पथावर आहोत त्यावर किती मजबूत आहोत हे दाखवून परिवर्तन सिद्ध करावे असे माझे प्रांजळ मत आहे . जे चूक म्हणून सोडले त्यास दुषणे देऊन प्रसिद्ध होणे हे आपण चालत असलेल्या पथाला सोभते काय ? ज्या धर्तीवर हिंदूंना वस्तुनिष्ठ प्रश्नावरून घेरले जाते तसे प्रश्न धम्ममार्गावरील पादचारयाना देखील विचारले जाऊ शकतात. जसे आपण किती धम्म रिती पाळतो ? धम्माने सांगितलेले कुठले विचार आम्ही आत्मसात केले आहेत ? अष्टांग मार्ग आम्ही किती स्वीकारले अन अंगिकारले ? बुद्ध अन त्यांचा धम्म आम्हास या निषेधाची वा तत्सम उपक्रमाची परवानगी देतो का ? वा मग धम्माच्या विचारप्रवाहात इतर धर्मावर टीका टिप्पणीस काही वाव आहे का ? याची उत्तरे अनेकांना मिळवावी लागतील म्हणजे वर्तमान आयुष्य अन निर्णय याबाबद साश्वत काय ती पावले उचलायला पाहिजेत हे उमजेल.

Click he

ताजे लेख

जीओ मेरे लाल   

चर्चा फेल - मोर्चा फेल - खर्चा फेल  अ

नाझीवादाय नमो

 सूचना : सदरील लेख मोदी भक्तांना निर्णयाच्या विरोधात आहे असे वाटू शकते ...

भाजप विरुद्ध पंकजा मुंडे 

काल छगन भुजबळांच्या नाशिक मध्ये भाजपचे पूर्वीचे ...

पुरोगाम्यांचा वामनदाह

दिवाळीचा मुहूर्त साधत काल महाराष्ट्रभर वामन दहनाचा खडा ...

हु तू तू भारता

कालची गोष्ट आहे, रविवार असल्याने मी जरा निवांत होतो . किती ही काम असली तरी रविवार ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

काय चुकले आमिरचे 

काय चुकले आमिरचे ?  मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत ...

Close

satta king