24 October

हु तू तू भाता

hu tu tu india
By भागवत तावरे
  • 498 View


कालची गोष्ट आहे, रविवार असल्याने मी जरा निवांत होतो . किती ही काम असली तरी रविवार माणसाला जरा हलके हलके फील देतोच , लहानपणी पासून रविवार म्हणजे बिनफायद्याचे मात्र आवडणारे प्रकार करून घ्यायचा दिवस . रविवारी गावाकडे नदीत डुबक्या मारणारे आम्ही हल्ली फेसबुक व्हात्स अप्प च्या डोहात डुबक्या मारत असतो . असाच काल फेसबुक नावाच्या नदीत विहार करताना वाहत वाहत एक गोष्ट लक्ष्यात आली की नट नट्यांचे लफडे , त्यांचे फाटलेले कपडे , क्रिकेट च्या अनेक सामन्यातली बारीक सारीक गोष्टीवरून आम्ही अभिमान स्वाभिमान बाळगून पोष्ट करत असतो. मात्र आम्ही सच्चे भारतीय काही बाबी दुर्लक्षित करतो अन उगाच तान होतो . भारताने कब्बडीत विश्वचषक जिंकला अन कुणी फेसबुक वर ते टाकले नाही वा अधिक प्रमाणात त्याचा उहापोह झाला नाही याची तक्रार आज मी करत आहे .तसा कुणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे . पाहितले तर अत्यंत सामान्य बाब मात्र त्यातले गांभीर्य देखील तेवढेच आहे अन त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . आम्हाला पाकिस्तान चे कलाकार चालत नाहीत आम्हाला चीन च्या खेळण्या चालत नाहीत मग आम्हाला भारताचे काय चालते ? साहेबांच्या क्रिकेट चे वेड चालते मात्र आमच्या मातीतला कब्बडी का चालत नाही यावरून मात्र मला हेच म्हणावे लागेल की आम्ही सोयीचे राष्ट्रअभिमानी देशभक्त आहोत . पुढे जावून बोलायचे झाले तर आम्ही स्वार्थी अन ढोंगी देखील असे म्हणता यावेत असे भारतीय आहोत , कब्बडी हा विषय निमित्त आहे  मला मात्र मुळात अनेकांचा राष्ट्रभाव हा कसा बेगडी असतो हे सांगायचे आहे . आम्हाला क्रिकेट मधला विजय जसा भारताचा वाटतो त्यावरून आमचे हात कॉलर ला जातात, आम्ही त्यावर पैजा लावतो, आपल्याच देशबांधवाचे पैसे लुटतो माफ करा मला जिंकतो असे म्हणायचे होते मात्र असो त्यात देशप्रेम बदनाम होण्याची शक्यता असते. आम्ही इतर देशाचे अनेक बाबी वर्ज्य करतो भारतीय म्हणून माझा प्रश्न हा आहे कि आम्ही भारतीय म्हणून भारताचे काय स्वीकारतो , त्याचा गाजावाजा त्याला अंगाखांद्यावर उचलतो का , बाब फक्त फेसबुक वर पोस्ट टाकण्याची नाही बाब आपण भारतीय म्हणून देशाच्या यश अपयशावर सम गंभीर असतो का ? का आपणास जे आवडते त्यातच देश शोधत असतो ? यावरून हेच निष्पन्न होते की ज्यात आम्हाला रस आहे ते कुठलेही चालते मात्र ज्यात रस नाही मग ते भारतीय असले तरी आम्हाला त्याचे देणे घेणे नाही, तसेच कब्बडी चे आहे ? आम्हाला रस नाही म्हणून भारताने विश्वचषक जिंकला तरी देणेघेणे नाही इकडे सनी लिवोनि आमच्या रडारवर असते . मला त्याची शिकायत नाही मात्र मग इथले राजकीय पक्ष, माध्यम देशभक्तीच्या आड मानवतेचा गळा का कापतात. मग पाकिस्तान च्या कलाकारांना करूद्या ना काम , हम्म ..मात्र नाही आम्हाला त्यात राजकारण करायचे आहे अन आमच्या सारख्या सोयीच्या भारतीयांना तेच हवे आहे , एकीकडे सार्वभौम अन सर्वधर्मसहिष्णुता संविधानाच्या गप्पा अन दुसरीकडे मात्र निवडणुकीच्या तिकीटापासून ते मतदान करेपर्यंत जातीचे निकष ? मजा आहे नाही ? कुठली प्रगती साधतोय हे भारतालाच ठाऊक , आम्ही भारतीय बेगडी बनलो आहोत , पोटात एक ओठात एक यापुढे जाऊन डोक्यात तिसरेच ठेवणारे भारतीय , शाळेतल्या प्रतीज्ञा पासून ते मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेपर्यंत सगळ काही एक सोपस्कार आहे . वास्तविक जीवनात त्याचा लवलेश नसतो अन असणे फारसे लाभदायक नसते हे सांगून पुढची पिढी देखील दांभिक करण्याचे पातक करून बसलेलो आम्ही लाचार अन बोगस भारतीय आहोत ? लेख वाचताना राष्ट्रप्रेम जागे होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र हा उमाळा टिकवून ठेवा फक्त कब्बडी ची पोस्ट टाकूयात असे म्हणून प्रश्न सुटणार नाही . पोस्ट टाकू नका मात्र विचारा स्वताला खरच आम्ही बोलणारे अन वागणारे भारतीय सारखे आहोत का ? का आमची कृती आमच्या वाणीला धोका देते ? कसे आहे जाऊ द्या म्हणून सोयीने सोयीचे देशभक्त आम्ही फक्त देशाला नाही तर स्वताला देखील फसवत आहोत . सवंग अन तवंग आम्हाला हल्ली खूप भावते , कब्बडी खो खो हॉकी यातल्या खेळाडूंच्या बातम्या आम्ही छापत नाहीत कारण त्या कुणी वाचत नाही मात्र क्रिकेट मधला विराट अन त्याची प्रियसी दिसले अमुक अमुक समुद्रकिनाऱ्यावर वा कुठल्या विमानतळावर मग अंधुक दिसणारे त्याचे फोटो न्ह्याहळत असतो . आम्हाला सनी कुठे आहे तिचे हल्ली काय चालू आहे यासाठी अवधानस्पेस असतो ? हे सारे आवडी सवडी चा भाग आहे मला त्याचे वावगे नाही मात्र आवडी सवडी ला देशप्रेमाचे निकष लावून कला संगीत यांना मर्यादित करणे तरी का करावे . कुणी दिलसे काम करत असेल तर त्याला मनसे विरोध चुकीचा आहे . लोकांना सांगे ब्रम्हज्ञान अन .. असा हा प्रकार आहे . क्रिकेट मध्ये लफडी झाली तरी चालतात , खेळाडूंनी शेन खाऊन देशाचा विजय विकला तरी चालतो आमचे क्रिकेट याड तसूभर कमी होत नाही कारण आम्हाला क्रिकेट आवडते. बीसीसी आय देशाचे अर्थकारण करेल एवढी गडगंज श्रीमंत यामुळे आहे कि डोळे झाकून त्या खेळावर अन खेळाडूवर लोक प्रेम करतात म्हणून त्यांच्या प्रेमाचा लिलाव जाहिरात बाजीतून केला जात आहे . कब्बडीत लबाडी नाही तरी आम्ही त्याकडे पाहत नाहीत कारण आम्हाला कब्बडी आवडत नाही असे असेल तर मग आमची आवड महत्वाची आहे त्यात राष्ट्रवाद यायलाच नको. कारण तसे असते तर साहेबांचा क्रिकेट भारताच्या कब्बडी ला आमच्या पसंतीक्रमांकनुसार खाली नसता गेला . म्हणून क्रिकेट वा कुठल्या कलाकार वादाला आम्ही यापुढे देश अन देश भावनेशी जोडू नये . पैस्याचा खेळ आहे जिथे भावनेचा संबंद नसावा . माज्या साठी क्लेअर आहे फक्त टपरीवर टाचा वर करून एक एक बॉल पाहणाऱ्या अन अनुष्काचा ड्रेस पाहणाऱ्या विराट भक्ताला कधी समजणार याची वाट पहातोय . बाकी सुभेच्या भारताने कब्बडीचा विश्वचषक जिंकलाय , आम्ही देखील सदरील बातमी पान दोन वर छापली कारण तुम्हाला त्याचे महत्व तेवढेच आहे .

ताजे लेख

जीओ मेरे लाल   

चर्चा फेल - मोर्चा फेल - खर्चा फेल  अ

नाझीवादाय नमो

 सूचना : सदरील लेख मोदी भक्तांना निर्णयाच्या विरोधात आहे असे वाटू शकते ...

भाजप विरुद्ध पंकजा मुंडे 

काल छगन भुजबळांच्या नाशिक मध्ये भाजपचे पूर्वीचे ...

पुरोगाम्यांचा वामनदाह

दिवाळीचा मुहूर्त साधत काल महाराष्ट्रभर वामन दहनाचा खडा ...

हु तू तू भारता

कालची गोष्ट आहे, रविवार असल्याने मी जरा निवांत होतो . किती ही काम असली तरी रविवार ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

काय चुकले आमिरचे 

काय चुकले आमिरचे ?  मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत ...

Close

satta king