19 September

भय्यू महाराज अन मराठा मोर्चे 

 Bhayyu maharaj and  Maratha Front
By भागवत तावरे
  • 2612 View


एकामागून एक अन संख्येने एकमेकांशी चढाओढ असणारे मोर्चे फक्त प्रशाषण शाषणच नाहीतर लोकशाहीच्या उरात धडकी भरवणारे अन इतिहासाला तोंडात बोट घालायला लावणारे आहेत . ज्यांना मराठे एकत्र येत नाहीत यावर मोठा विश्वास आहे त्यांचा शिक्का या बाबद्तीत खोटा ठरवणारे ठरत आहेत. प्रयोजन अन नियोजन असल्याशिवाय कुठली कृती वा प्रतीकृती शक्य नाही म्हणून पलीकडे आपणास ठाऊक नाही मात्र अलीकडे मोर्च्याचे फलीत मलाच अश्या आवेशात वा प्रयत्नात ते अन त्यांचे सहकारी ( सर्व क्षेत्रातले ) तत्पर दिसत आहेत . चला एवढे कुट लिहले तर तुम्ही ते का वाचावे जरा मोकळे करून सांगतो . मोर्चे अन त्याच्यातली विशालता आपल्या पथ्यावर पडावी असे कयास वर्षानवर्षे राजकीय उपेक्षित असणाऱ्या अनेक घटकांना अपेक्षित आहे त्या अनुषंगाने त्यांचे यत्न चालू आहेत . मात्र सत्य या पलीकडचे आहे की मोर्चे कुणा एका संघटना वा पुढाऱ्याच्या कवेबाहेर गेलेले आहेत . मोर्च्यातले राजकारण त्यातल्या निरागसतेकडून परास्त होताना दिसत आहे . कुणाला हे मान्य नसेल की मोर्च्याच्या श्रेयातून कुणाला वावगे आहे मात्र याबाबद मी नक्की तेव्हा झालो जेव्हा भय्यू महाराज अन मराठा मोर्चे एकमेकास जोडले गेले अन काही लोकांनी भय्यू महाराज यांना रडार वर घेत खालची पातळी गाठली . भय्यू महाराज मोर्चा विषयी बोलतात त्यांनीच मोर्चे निघावेत ते मूक असावेत असी संकल्पना मांडली हा विषय मोर्च्यांनी जवळपास ५ जिल्हे मागे टाकल्यानंतर प्रकाश झोतात आली . अनेकांना  गर्दी वाढल्याने भय्यू महाराज समोर आले असे वाटले अनेकांना प्रसिद्धी साठीचा प्रयत्न वाटला . मात्र प्रसिद्धी अन गर्दी भय्यू महाराज यांना नवीन नाही. फार नाही मागील तीन महिन्याखाली बीड मध्ये जवळपास लाखभर लोकांसमोर मदतीचा महायज्ञ त्यांच्या सूर्योदय ने केला . सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तो उपक्रम होता . कोट्यावधी रुपय खर्चून अनेक लोकउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले . ज्यांनी ते करून घेतले ते भय्यू महाराज त्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते म्हणजे शक्य असताना त्यांनी केलेला लोकप्रीयतेचा तो त्याग आहे असे मान्य केले तर मराठा मोर्च्यात त्यांचा सहभाग प्रसिद्धीसाठी नाही हे सहज मान्य व्हावे . म्हणजे ज्यांना महाराज प्रसिद्धी साठी समोर येत आहेत असे वाटते त्यांची भीती वेगळी असली पाहिजे ? कुणास ठाऊक जेव्हा आपले साव जेव्हा हाताबाहेर जाते म्हणून त्यास जवळून जाणारा गुन्हेगार वाटतो.  ज्यांना कुणाला या गर्दीत आपले गळ टाकून मासेमारी करायची होती त्यांना आता भय्यू महाराज अडसर वाटू लागले असावेत म्हणून  मोर्चाचे शाश्वत सारथ्य महाराजांचे असल्याने अनेकांना तक्रार असावी . जनसामान्यास देखील असा मध्यस्थ हवाच होता जो निस्वार्थ असेल. कारण जी गर्दी येते आहे ती फक्त यासाठी की गर्दीचा नेता कुणी नसणार ? कुणास ठाऊक यातून याअगोदर नेत्रत्वाकडून मिळालेल्या आश्वासनांचा लोकांना कदर आला असेल . लोक उत्स्फूर्त व्यक्त झाले , भळभळनाऱ्या जखमा यासाठी रस्त्यावर दाखवायला आले की त्यांना पहिल्यांदा वाटले की होय शक्य आहे . विशेष बाब ही की नारेबाजी नाही मूक असणारे लाखांची मोर्चे कोटीचा आकडा मागे टाकू शकली कारण त्या सर्व नियोजनात भय्यू महाराज होते अन त्याच रेखाटनांची पुनरावृत्ती काल नांदेडपर्यंत निर्विघ्न होत आली आहे . म्हणून ज्याच्या रेखाटनात ते बीजरोपण झाले आहे तेव्हा त्याच कास्तकाराने जोमात आलेल्या पिकाचा भाव करावा अन हक्क अन अधिकार मिळवून द्यावेत अशी मराठा समाजाची भावना झाली तर वावगे नको . काहींना त्यावर आक्षेप असेल मात्र तो गर्दीत विरेल कारण लोकांना प्रसिद्धी नको आहे त्यांना हवा आहे कायमचा दिलासा वर्तमानपत्राची रकान्याच्या बाहेर अन टी व्ही वाल्यांच्या बोलक्या डब्ब्यात बसणार नाही येवढा समुद्र अन त्याच्या लाटा उसळत आहेत , भरतीवर असणारे मोर्चे ओहोटीचे नाव घेत नाहीत . यावरून सरकार गुडघ्यावर आलेलेच आहे . आता फक्त कसे अन केव्हा हा प्रश्न आहे . यावेळी एका अभ्यासू अन स्थिर निस्वार्थ लोकांची गरज लागणार आहे या अनुषंगाने चार लोक पुढे असावेत इथपर्यंत मराठा समाज येऊन ठेपला तर त्या यादीची सुरवात भय्यू महाराज यांच्यापासून सुरु होईल . मागच्या त्यांच्या ज्या मुलाखती वृत्तवाहीण्यावरून दाखवल्या त्यावरून भय्यू महाराजाकडे मराठा समाजाचे दुख वेदना अन मागणी याची पूर्ण माहिती अन त्यावरचे इलाजी नियोजन असल्याचे स्पष्ट होते . कुठली एक व्यक्ती सामजिक बांधिलकी म्हणून फक्त उपदेश नाही तर त्याला कृतीचा जोड देते हजारो मागासवर्गीय अन गरीब मुलांना उभा करते , ती व्यक्ती ज्ञान अन वीज्ञान यांच्या संजोगातून समाजनिर्मिती वस्तुनिष्ठ व्हावी यासाठी कायम तत्पर राहते त्या व्यक्तीला अश्या महाकुम्भाचा वाली का करू नये असे कुणास वाटले तर त्यात वावगे काय ? म्हणजे मला कुठल्या व्यक्ती संस्था वा व्यक्तिची पाठराखण वा तरफदारी करायची नाही मात्र भय्यू महाराज यांची कोपर्डी भेट ते त्या कुटुंबास सर्वोतपरी आधार देताना समाजाने उभा केलेला लढा , इथपर्यंत जो वेळ अन नियोजन भय्यू महाराजांनी आखले आहे त्या अनुषंगाने त्यांनीच यावेळी मध्यस्थी करावी. जो त्यांचा अधिकार अन कर्तव्य देखील असावे . बाकी मोर्चे आकाशाला गवसणी घालणारे निघत आहेत म्हणजे सत्तासूर्यास अंजनीचे पुत्रकर्माची आठवण करून देणारे ठरावेत असे  एवढेच ........ बोलूया तुम्ही वाचायचे थांबू नका मी लिहित आहेच .           

ताजे लेख

जीओ मेरे लाल   

चर्चा फेल - मोर्चा फेल - खर्चा फेल  अ

नाझीवादाय नमो

 सूचना : सदरील लेख मोदी भक्तांना निर्णयाच्या विरोधात आहे असे वाटू शकते ...

भाजप विरुद्ध पंकजा मुंडे 

काल छगन भुजबळांच्या नाशिक मध्ये भाजपचे पूर्वीचे ...

पुरोगाम्यांचा वामनदाह

दिवाळीचा मुहूर्त साधत काल महाराष्ट्रभर वामन दहनाचा खडा ...

हु तू तू भारता

कालची गोष्ट आहे, रविवार असल्याने मी जरा निवांत होतो . किती ही काम असली तरी रविवार ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

काय चुकले आमिरचे 

काय चुकले आमिरचे ?  मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत ...

Close

satta king