17 October

कॉपी  पेस्ट 
दलितांचा आत्मघात 

Dalits harm
By भागवत तावरे
  • 1509 View


काल बीड मध्ये दलितांचा मोठा जनसागर रस्त्यावर उसळला , नेत्यांच्या हाकेला ओ देत रस्त्यावर धावलेला दलित मावळ अभिनंदन करावा असाच होता .  त्याची बातमी वेगळा विषय आहे अन त्याचे विश्लेषण वेगळे . म्हणून आज विषय जरा उलगडून घेतो आहे . हा सगळा शब्दप्रपंच समजून घेण्यासाठी आम्हाला हे लक्ष्यात घ्यावे लागेल की निघालेले अन निघू शकणारे दलित-ओबीसी मोर्चे हे मराठ्यांचे मोर्चे पाहून निघू लागली आहेत . तो आकस म्हणून मला म्हणायचे नाही मात्र दलित ओबीसी मोर्चे हे मराठा मोर्च्यातल्या प्रेरणास्त्रोतातून मूर्त झाली अन होणार आहेत हे कुणाला नाकारता देखील येणार नाही . मराठा मोर्चे निघाले तेव्हा ती निरागस अन उत्स्फूर्त होती , त्यांच्या रस्त्यावर उतरण्यामागे त्यांच्या चार दशकाच्या वेदना होत्या , त्यात कमालीची शिस्त होती , सर्वात महत्वाचे म्हणजे मराठ्यांनी  कुठला प्रस्थापित मोर्च्यात अग्रभागी यासाठीच  येऊ दिला नव्हता की त्यात राजकारण होऊ नये . आणखी एक  महत्वाचे म्हणजे मराठा मोर्चा कुठल्या एका जिल्ह्यात यशस्वी झाला अन दुसऱ्या जिल्ह्यात अपयशी झाला असे नाही यातून अधोरेखीत होणारी बाब म्हणजे दुख कुठल्या एक जिल्ह्यात नसून ते राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यात आहे.  मराठ्यांच्या मोर्चाचा आकस वा रोष वाटण्याचे काही कारण नाही . दलित-मराठा जो काही थोडा बहुत तणाव निर्माण झाला आहे त्यात कळीचा मुद्दा एट्रॉसिटी हा ठरला. एट्रॉसिटीचा गैरवापर होऊ नये यासाठी मराठ्यांनी दुरुस्तीची मागणी केली अन दलितांना त्यांच्यावरील अन्यायावर जालीम इलाज असणारा एट्रॉसिटी रद्द होतो की काय अशी भीती पेरण्यात आली . अश्या तणावमध्यबिंदूवर दलित मोर्चाचे पहिले पाउल बीड अन दुसरे नांदेड येथे पडले . खरे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर अन त्यांच्या सविधानावर विश्वास असणाऱ्या कुठल्याच समाज, व्यक्ती अन संघटनेला गांगरून वा घाबरून जायचे कारण नव्हते अन कुणी घाबरले असेल असे मला वाटत देखील नाही . मात्र मराठ्यांच्या त्या मागणीने काही निवडक अन समाजाच्या राजकीय दलालीची मूल्य उपसलेली मंडळी आपली पोळी घेऊन भावनेच्या तव्यावर शेकायला बाहेर पडली. त्यातल्या प्रयत्नातून  आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली मात्र माझा प्रश्न आता त्या मोर्च्याच्या आयोजकांना आहे की आलेल्या आंबेडकरी जनतेला कुठला कार्यक्रम दिला ? कारण मराठ्यांनी मागणी केली म्हणून एट्रॉसिटी काही रद्द झाली नाही अन होणार नव्हतीच विशेष हे की   सदरील मागणी केंद्रशासन कडील आहे म्हणून राज्यातल्या मोर्च्याने दलितांनी भयभीत होण्याचे काही कारण नव्हते . मला या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचे निवेदन सांगितले पाहिजे ज्यांनी अस्या प्रतीमोर्चाला समर्थन दिले नव्हते . यावर आपल्याला प्रकाश आंबेडकर यांचे मत लक्ष्यात घेतले तर अनेक बाबींचा उलगडा होईल .  दलित मोर्चे  निघाले याबाबद तक्रार नाहीच मात्र यातून मराठा दलित तणावाला जी फुंकर मिळाली त्याची काळजी करावी तेवढी थोडीच आहे . जिथे जातीअंताचे पोवाडे गायले जात आहेत तिथे जातनिष्टीत विभाजने केली जात आहेत .
        प्रत्येक जातीच्या तथाकथित नेत्यांनीच त्या जातीसमुहाला जितके फ़सवले किंवा नाडलेले आहे, तितका भीषण अन्याय इतर कोणी त्यांच्यावर केला नसेल. आपापल्या स्वार्थाला जातीवरचा अन्याय ठरवण्याचे जे राजकारण दिर्घकाळ महाराष्ट्रात झालेले आहे, त्यावरची मराठा मोर्चे ही प्रतिक्रीया होती . फ़ुले शाहू आंबेडकर ही भाषा वापरताना मराठा प्रस्थापितांनी कधीच मराठ्यांच्या दुखण्यावर फ़ुंकर घातली नाही. उलट त्याच शब्दावलीचा बोळा मराठ्यांच्या तोंडात खुपसून एट्रॉसिटीचे बुक्के खायला लावले . त्यावरची ही संतप्त प्रतिक्रीया म्हणजे मराठा क्रांती मोर्चे होते .  पण या निमीत्ताने नुसत्या एट्रॉसिटी कायद्यावर घसरूनही चालणार नाही. ह्या कायद्याच्या अनेक तरतुदी गुंतागुंतीच्या व जाचक आहेत. पण अशा जाचक अटींचा जो गैरवापर राजकारणासाठी होत राहिला, त्याचे खापर फ़क्त दलितांवर किंवा तक्रारदारावर फ़ोडूनही चालणार नाही. अशा तक्रारींच्या मागची प्रेरणाही तपासून बघावी लागेल. मोर्च्यातला उद्रेक त्याच दडपेगिरीच्या विरोधात होता . आम्ही क्षात्रधर्मिय मराठे आहोत. आम्ही क्षत्रिय आहोत, असे ठामपणे या मूकमोर्चाही नजर होती , ते समजून घ्यायचे असेल तर त्यातली वेदना ओळखता आली पाहिजे. त्यातला हमदम शोधण्यापेक्षा त्यातले दु:ख समजून घेता आले पाहिजे. पुरोगामी उदारमतवादाने पिचलेला मराठा असह्य झालेले थोतांड व दांभिकपणा झिडकारून मैदानाता आला होता . माणुस म्हणून सन्मानाने सुखवस्तु जगण्याचा जन्मदत्त हक्क ही त्याची अपेक्षा, म्हणूनच मागणी करत होता . त्याला कुठल्याही प्रगतीशील औदार्याचे बिरूद वा खोटी प्रतिष्ठा त्याला नको होती . तो कोणाच्या विरोधात नाही, पण कोणाच्या दबावाखालीही खितपत पडून रहाण्याचा त्याचा संयमही संपला होता म्हणून मराठ्यांचे मोर्चे पर्चंड गर्दीत हत्तीची चाल चालत असताना त्यावरून वा त्याचीच नक्कल करताना कुणी आपली राजकीय शक्कल तडीस नेण्याचा यत्न करत असेल तर ते थांबवले पाहिजे. कारण त्यातून जो जातीय वीसवांद निर्माण होईल त्यातला तणाव सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवील काय ? याबाबद शंका वाटते .कालच्या बीड येथील दलित मोर्च्या झाल्यानंतर सोशल मीडियात जो कोल्हापूर येथील मोर्च्यावरून चर्चा झडल्या त्यावरून दलित मराठा तणाव निर्माण झालेला आहे हेच सिद्ध होते . दलितांनी एकत्र येणे सयुक्तिक नाही असे म्हणता येणार नाही मात्र तत्कालीन असे कुठले कारण होते ज्यासाठी लाख भर भिमाई खेड्यापाड्यातून मोर्च्यात आणली गेली  .मराठा मोर्चा देखील स्वतच्या जखमा अन त्यावरील मलम मागताना दिसत होता त्याने दलित वा तत्सम कुठल्या जात समुदायाचा  आकस वा तिरस्कार केला नाही मग दलितांना त्यातून प्रतीमोर्चे काढायची गरज काय होती . काही दलित नेत्यांना प्रतीमोर्चे गरजेचे वाटतात आता त्यांना हे शक्तीप्रदर्शन कुठे कामी आणायचे आहे अन भोळ्या भाबड्या जनतेला यासाठी भांडवल म्हणून कसे अन का वापरायचे हा त्यांचा प्रश्न आहे .मला आणखी एक प्रश्न महत्वाचा वाटतो तो हा की जातीअंताच्या लढ्याचा महानायक असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मांननाऱ्या जनतेने जात पुढे करावी काय ? याच धर्तीवर हा प्रश्न मराठ्यांना विचारायचे झाल्यास त्यांनी जातीची ढाल नाही केली त्यांनी फक्त जात म्हणून झालेली हानी जात म्हणून दाखवली. म्हणून मराठा म्हणून त्यांच्या मोर्च्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. हीच बाब बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांना देखील मान्य होती ज्याबाबद मी यापूर्वी देखील मत मांडले आहे. ज्या रामदास आठवले यांना भीम के नाम पर खून बहावयाचा आहे त्यांनी याच मराठ्यांच्या जीवावर पांडुरंगाच्या पवित्र धर्तीवर खासदारकीचे मुक्ताफळे चाखलेली आहेत म्हणून सत्ताशिरी अन उरी असणाऱ्या आठवले यांनीतरी समन्वय राखावा अशी माफक अपेक्षा व्यवस्थेला आहे .काल परवा कुठले मंत्री पैस्याने मोर्चे यशस्वी होतात असे म्हणतात काय अन त्याची पाठराखण रामदास आठवलेच का करतात ? हा प्रश्न सर्वसामान्य आहे .  यातून मराठा समाजाला जे खिजवण्याचे प्रकार होत आहेत ते एका वैमनस्याचे बीजारोपण करत असल्याचे माझे स्पष्ट मत आहे . आज गावागावात दलित मराठा हा वाद उफाळला तर इनशर्ट मधले वा कुठले जाकेट मधले दलित नेते त्यांना आधार देणार नाहीत त्यामुळे गावागावात तणाव पेरण्याचे काम करू नये . मराठ्यांचे मोर्चे सह्याद्रीच्या दुर्गाप्रमाणे भव्य दिव्य असताना देखील ते कुणास भीती देत नाहीत हेच मराठा मोर्च्याचे यश आहे मात्र दलितांचा एक मोर्चा तणावाची वा अराजकतेची नांदी का वाटत आहे कारण ती प्रतिक्रिया आहे मराठ्यांच्या मोर्च्यानंतर उमटलेली . मला अधिक खोलात जायचे नाही मात्र जिथे शंका असतील थोड्या बहुत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे विश्लेषण वाचावे . बाकी दलितांचे मोर्चे निघताना ओबीसीचे घोंगडे कुठल्या सुप्त उद्देश्यात आपले आखाडे बांधत आहे त्यांचे त्यांनाच ठाऊक , मराठ्यांचे मोर्चे निरागस असताना प्रतीमोर्चे निघाले तर मराठ्यांना ते सहन होतील एवढे प्रतीमोर्चे  निरागस आहेत वा असतील असे मला वाटत नाही . यात निरागस असनाऱ्या गरीब दलितांना उगाच मराठ्यांच्या तोफेला देण्याचे काही कारण नव्हते  कारण मराठे दलित एका ताटात जेवतात हे त्या  लोकांना पाहवत नाही का अशी शंका येते . यातून कुठला तणाव निर्माण झाला तर त्याची भरपाई करण्यास तेल ओतणारे कमी पडतील अन आग भडकलेली असेल . मराठ्यांच्या ऐरावतास टोचणारे  प्रतीकर्त्य कुणी केले तर ते क्षत्रीय मराठ्यांना  अन त्यातून कुठला तणाव वा वितुष्टवाद  प्रस्तुतीस खोडा घातला तर सयुक्तिक असणार नाही  मराठ्यांचे मोर्चे त्यांच्या वेदनेचे प्रतिक आहेत अन त्याच वेदनेच्या नाहीतर मराठा समजासोबत असणाऱ्या विश्वासाचा तो आत्मघात ठरेल .मला याठिकाणी एक प्रश्न पडतो आहे कालच्या दलित मोर्च्याचे फलित काय ? दलिताने एकत्र येऊ नये असे नाही मात्र त्यासाठी कुठल्या इतर जातीचा द्वेष जर भांडवल म्हणून वापरला जात असेल तर मात्र दुर्दैवी म्हणावे लागेल . मी जिथपर्यंत दलित मोर्च्यावर लक्ष ठेऊन होतो तो पर्यंत प्रत्येक जन किती लाख लोक होते यावर चर्चा करत होते मला संख्येचे विश्लेषण करणारे अनेक भेटले मात्र कालच्या मोर्च्याचे फलित काय वा त्यातून बाहेर पडलेले निष्कर्ष कोणते यावर कुणी चर्चा करताना दिसले नाही . दुसरा विषय एक असा आहे ओबीसी दलित अन मराठे असे बहुजनाचे  तीन प्रभाग पडले आहेत आता बहुजनांची ज्यांची अडसर असू शकेल त्यांच्यासाठी कवाड लावून नाचायचा सुवर्णकाळ आहे . भाजपला मराठे मोर्चे जर जड जात असतील तर दलित मोर्चे त्यावरील मात्रा म्हणून भाजपला आवश्यक वाटतात काय ? रामदास आठवले त्यासाठी दिल्लीतून नेमले आहेत काय ? वा मग या प्रतीमोर्च्यात कुठला संघ आपले मनसुबे साकारून घेत आहे का ? बाळासाहेब आंबेडकर यांच्या निष्कर्षानुसार. याचा देखील दलितांनी विचार करणे गरजेचे आहे बाकी जातीय तणावात कुणाचे राजकारण कसे उभे राहते हे राज्याला नवे नाही , म्हणून गोर गरीब दलित लोकांच्या खांद्यावर दलित पुढारी जर आपल्या राजकीय बंदुकी तैनात करत असतील तर याचा देखील भांडाफोड गरजेचा आहे . मराठ्यांची दुखे अन त्यांची निघत असलेली मोर्चे स्पर्धा करण्यापलीकडे केव्हाच पोहचली आहेत . कुणी स्पर्धा करत  नसून हि ऐक्याची हाक आहे असे देखील म्हणले जात आहे मात्र यावेळी दलित ऐक्याची हाक मराठ्यांच्या गाड्याला उटी म्हणून समोर येत आहेत , हे सत्यच .  
    

 

ताजे लेख

जीओ मेरे लाल   

चर्चा फेल - मोर्चा फेल - खर्चा फेल  अ

नाझीवादाय नमो

 सूचना : सदरील लेख मोदी भक्तांना निर्णयाच्या विरोधात आहे असे वाटू शकते ...

भाजप विरुद्ध पंकजा मुंडे 

काल छगन भुजबळांच्या नाशिक मध्ये भाजपचे पूर्वीचे ...

पुरोगाम्यांचा वामनदाह

दिवाळीचा मुहूर्त साधत काल महाराष्ट्रभर वामन दहनाचा खडा ...

हु तू तू भारता

कालची गोष्ट आहे, रविवार असल्याने मी जरा निवांत होतो . किती ही काम असली तरी रविवार ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

काय चुकले आमिरचे 

काय चुकले आमिरचे ?  मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत ...

Close

satta king