19 October

 भाई मुझे भी आना है

brother i want come with u
By भागवत तावरे
  • 51 View

लहान पनीची आठवण आहे , तसे सर्वांच्याच भूतकाळाचा हा भाग असावा , गल्लीत गारीगार विकणारा , भंगार घेणारा , केसावर फुगे देणारा  , शहरातील गल्लीत गाड्यावर भाजीपाला विकणारा ते केळी फळे विकणारा , डोक्यावर टोपी असणारा मामू सर्वांनाच आठवत असेल . आज त्याची पुढची पिढी हक्क मागत आहे , शिक्षणासाठी पेन वही अन बरोबरीने वर्गात जागा मागत आहे कारण त्या मामूच्या पोराला शिकून सायेब व्हायचेय अन का नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साविधांनाने सर्वांना मुख्यप्रवाहात येण्याचा अधिकार सांगितला आहे आज त्याच नियमावर बोट ठेऊन हातावर पोट असणारा मुस्लीम समाज आज हक्क मागत आहे प्रवाहात येण्याच्या संधीचे. आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के अन मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला जो सहा महिन्यात विधानसभेच्या सभागृहात पास करून घेणे गरजेचा होता . १६ अन ५ असे २१ टक्के अन पूर्वीचे ५२ टक्के आरक्षण मिळून ७३ टक्के आरक्षण होत असल्याने केतन तिरोडकर यांनी उच्य न्यायालयात याचिका दाखल करून आक्षेप घेतला ज्यातून  २४ डिसेंबर २०१४ रोजी फडणवीस सरकार ने आघाडीचा अध्यादेश परत घेतला अन मराठे अन मुस्लीम आरक्षणातून बाहेर पडले . तेव्हा पासून मराठा अन मुस्लीम समाज आरक्षणाची मागणी लाऊन धरत आहे. मराठ्यांचे क्रांती मोर्चे आकाशाला गवसणी घालत असताना अन शाषनाच्या उरात धडकी भरवत असताना आता मुस्लीम समाजाने देखील भाया सारल्याचे चित्र असून जंग ए-आरक्षण ही टोकाची लढाई लढण्यास सज्ज झाला आहे . ३१ मार्च २०१५ पर्यंत आघाडी सरकार ने दिलेले मुस्लीम आरक्षण कायम राहणार असल्याचे २४ डिसेंबर २०१४ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.अध्यादेश व्यपगत झाला असून हेच कारण पुढे करत २ मार्च रोजी शासन आदेश काढून सरकारने मुस्लिमांना आरक्षण देणारा २४ जुलै २०१३ चा मूल निर्णय रद्दबातल केला आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती असताना विधेयक मंजूर करून मध्यंतरीच्या काळात ज्यांना याचा लाभ मिळाला त्यांना सरकारने संरक्षण दिले आहे. पण मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश व्यपगत झाल्यावर याबाबतचा मुळ शासनादेश रद्द केल्याने मध्यंतरीच्या काळात ज्यांना या निर्णयाचा लाभ मिळाला त्यांच्यावर आता गंडांतर आल्याने अनेकांचे शैक्षणिक आयुष्य धस्त झाले ?
  मुस्लीम समाज आता १० टक्के आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. आम्हालाही सरकारकडून योग्य न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी समोर आली . आम्ही मराठय़ांच्या विरोधात मोर्चा काढणार नाही. आम्हाला आमचे हक्क पाहिजे. येणा-या काही दिवसांत आम्हीही मूक मोर्चा काढू. असा पवित्रा घेतला दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मराठा, मुस्लिम आरक्षणाला स्थगिती देत चांगलाच दणका दिला असून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला असून उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असल्याने मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला आहे . मुस्लीम समाजाला आज आपला पारंपारिक परवड उखडून टाकायची आहे , गारीगार चा डब्बा नाही तर मुलांच्या हातात पेन वही द्यायची आहे. म्हणून त्याचा बाप आज उन्हा तान्हात रस्त्यावर नारे देत फिरत आहे , त्याला त्याचे मनगट आता आपल्या  नंन्ह्या साठी वापरायचे आहे , पाच वक्त ची नमाज अदा करून तो अस्मानी च्या नंतर सुलतानीला हक्क मागत आहे . अन त्याला देणे गरजचे आहे . मागे एकदा बीड च्या बार्शीनाका भागातील असुदोद्दिन ओवेसी यांची सभा झाली होती . त्यावेळी अगदी पुढे सभेत मी उपस्थित होतो त्यांचे वाक्य होते " हम मजलूम लोग है ,पढना चाहते आहे भाई " मला आश्वासक वाटले आणी आज मुस्लीम समाज तोच आवाज रस्त्यावर घेऊन उतरला आहे . त्यावेळी महाराष्ट्र सरकार मुस्लिम आरक्षणावरुन दुजाभाव करत आहे. मुस्लिम आरक्षण हा हक्क आहे. जर तो भाजपशासित कर्नाटकात आहे तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल ओवेसींनी राज्यसरकारला केला होता . अन त्याच वेळी यातला तत्ववाद मला भावला होता . आज त्याच भावनेचा उद्रेक होऊ घातला आहे . त्यांच्या न्याय्य हक्कास सर्वसमावेशक पाठींबा देखील मिळत आहे 

ताजे लेख

जीओ मेरे लाल   

चर्चा फेल - मोर्चा फेल - खर्चा फेल  अ

नाझीवादाय नमो

 सूचना : सदरील लेख मोदी भक्तांना निर्णयाच्या विरोधात आहे असे वाटू शकते ...

भाजप विरुद्ध पंकजा मुंडे 

काल छगन भुजबळांच्या नाशिक मध्ये भाजपचे पूर्वीचे ...

पुरोगाम्यांचा वामनदाह

दिवाळीचा मुहूर्त साधत काल महाराष्ट्रभर वामन दहनाचा खडा ...

हु तू तू भारता

कालची गोष्ट आहे, रविवार असल्याने मी जरा निवांत होतो . किती ही काम असली तरी रविवार ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

काय चुकले आमिरचे 

काय चुकले आमिरचे ?  मिसुळ  फुटली नसतील त्या वयात त्याचा कयामत ...

Close

satta king