08 November

मग राम शिंदे ओबीसीचे मंत्री कसे 

ram shinde how can possible ministor of obc
By भागवत तावरे
  • 651 View


आरक्षणाच्या घोंगडीत मताची लोकर 
देवेंद्र फडणवीसांची राजकीय लबाडी आणी राजकीय हातोटी समजून घेतली पाहिजे . ज्या धनगर समाजाला ओबीसी सोडून एस.टी . मध्ये जायचे आहे त्या धनगर समाजाच्या राम शिंदेंना ओबीसी मंत्रालय का देण्यात आले?   धनगरांना तुमचे घर ओबीसीच असल्याचे अन एस.टी. शक्य नसल्याचे  स्पष्ट संकेत इथेच देवेन्द्रांनी दिलेले आहेत . ओबीसी च्या नेत्या म्हणून लोकमान्यता असलेल्या ना. पंकजा मुंडे ओबीसी मंत्रालय न देऊन मुख्यमंत्र्यांनी जो राजकीय कावा साधला आहे तो काही निव्वळ अनाकलनीय नाही . धनगर समाजाच्या शिंदेंना ओबीसी मंत्री करून धनगर समाजाला इथेच रहाण्याचा आणी ना. पंकजा मुंडे यांच्या राजकीय परिघाला शह  देण्याचा जो मुत्सद्दीपणा नागपुरी चाव्याने साधला आहे तो समजून घेतला पाहिजे . शिंदेंना मंत्रालय देणे यातच  गमक आहे कि आरक्षण शक्य नाही ? दुर्दैव , हे सत्य सांगायला नेता नाही त्रिदेव  सत्तेच्या लाभात मश्गुल आहेत ? त्यात त्यागी जानकर देखील आले, त्यांची अगतिकता त्यांनाच ठाऊक असावी ?  
           देवेंद्र फडणवीस कुणाला नदी मंजूर करतील , कुणाला ढग अथवा चंद्रावर भूखंड देखील देतील ,होय हे शक्य यामुळे आहे की एका घटनात्मक पदावर असताना घटनाबाह्य मागणीस होकार देण्याचे धाडस फक्त त्यांनीच दाखवलेले आहे . तीन वर्षापूर्वी बारामतीच्या पटांगणात अन परवा नागपूरच्या रेशीम बागेच्या समोर धनगरांना एसटीत  आरक्षण देण्याचा वायदा करणारे मुख्यमंत्री किती मोठी लबाडी करतात हे सगळ्यांनी  समजून घेतले पाहिजे . धनगरांना झुलवत ठेवण्याचे कसब अन कर्तब वर्तमान मुख्यमंत्री कमाल पातळीवर जाऊन तडीस नेत आहेत, आश्चर्य तर याचे की खा.महात्मे ना.जानकर अन ना.शिंदे या त्यागी धनगर नेत्यांना हे सर्व अमान्य नाही . 
      काल धनगर समाजाने कमालच केली , नागपूरच्या धनगर मेळाव्यात मुख्यमंत्री डायस वर येईपर्यंत सुगावा लागू न देता थेट चिमटा नाही तर बुचकुरा ओढला . क्या हुवा तेरा वादा  हे गाणे वाजवून मुख्यमंत्र्यांना थेट जाब विचारण्याचा येळकोट साधला . यावर खजील झालेले मुख्यमंत्री वादा पक्का असल्याचे सांगत वेळ मारून नेण्यात यशस्वी झाले . वरून अधिक वातावरण बिघडू नये यासाठी यळकोट यळकोट करून मुख्यमंत्र्यांनी वेळ साधली . झालेली तारांबळ अन हशा महाराष्ट्राने पाहितला मात्र यातले राजकारण मात्र काहींना तरी कळले असेल तर धन्य ? कारण ज्या आरक्षणाचा वायदा पक्का असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत ते आरक्षण कसे देता येईल यावर मात्र बोलत नाहीत . सत्तेत येण्यापूर्वी बारामतीत देवेंद्रजी बोलून गेले कि  सरकारच्या पहिल्या बैठकीत आरक्षणाचा प्रश्न सोडवू मात्र सरकार आले हि अन  १४४ पेक्षा अधिक बैठका झाल्याही  असतील मात्र आरक्षणाचे घोंगडे फक्त भिजत नाही तर चीम्भत ठेवले आहे . ५ जानेवारी २०१५ ला पंधरा दिवसात धनगरांना आरक्षण मुद्दा निकाली काढण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री अजून पंधरा दिवसाची वाटच पाहत आहेत .  घटनात्मक पदावर बसून घटनाबाह्य आश्वासन देण्याचे राजपातक मुख्यमंत्री करत आहेत . धनगरांना झुलवत ठेवण्याचा राजकीय कावा त्यांच्याकडून तडीस जात आहे , धनगर समाजाचे दुर्दैव हे की समाजाचे तीन नेते जे सत्तेचे लाभार्थी आहेत त्यांना यात काही गैर वाटत नाही.खा.महात्मे ना.जानकर अन ना.शिंदे या तिन्ही सामाजिक महात्म्यांना सामाजिक फसवणूक मान्य असावी ? 

ज्या रेशीम बागेला आरक्षण मान्य नाही त्या बागेच्या समोर आरक्षणाचा वायदा मुख्यमंत्री म्हणूनच करू शकतात जेव्हा ते देता येत नसेल , नसता त्यांची ती मजाल दुरापास्तच  . फडणवीस वरील राजकीय लबाडी करू शकतात कशी याचा खल झाला पाहिजे . आरक्षण मागणीचे प्रणेते खासदार महात्मे , वाहते मंत्री महादेव जानकर आणि चोंडीचे सुभेदार मंत्री राम शिंदे मुग गिळून का गप्प आहेत . कायदेशीर पूर्ण करता येईल असी संभावना नसणाऱ्या मागण्या मुख्यमंत्री मान्य करत आहेत ,  तीन महात्मे म्हणजे  गांधीजींचे तीन प्राणी असे  सामाजिक विधाते समजून घेतले पाहिजेत. शरद पवारांच्या बारामतीत जाऊन आरक्षणाचा भंडारा उधळवणारे मुख्यमंत्री आज ही धनगरांच्या डोळ्यात हळद फेकून त्यांना येळकोट येळकोट म्हणून फसवत आहेत ?  ओबीसी सोडून ज्या एस टी मध्ये धनगरांना जायचे आहे त्या एस टी मधील ८० टक्के आदिवासी लोकशाहीच्या लाभापासून आधीच दूर असताना शहरीकरण झालेला धनगर समाज एस टी मध्ये घेऊन जाने घटनेच्या परवानगीत बसते का हे देखील कुणी तपासले पाहिजे . मताची लोकर गोळा करताना फडणविसांनी आरक्षणाचे घोंगडे जाणीवपूर्वक भिजत ठेवलेले आहे ?

              मध्य भारत, बंगाल व इतर प्रदेशांमध्ये धनगर समाज हा आदिवासी अनुसूचित जमातीत समाविष्ट आहे. केंद्रीय मागास वर्ग आयोगाने ३ डिसंबर २०१२ साली दिलेला निर्णय उत्तर प्रदेशच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करुन तसे प्रमाणपत्र देऊ केले. यामुळे वरीलप्रमाणे सर्व पाचही निकष धनगर समाज पूर्ण करत असल्याने या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये घेतलेले असून, आता राज्य सरकारने या सर्व बाबी पडताळण्यात अथवा हे आरक्षण लागू करण्यात कुठलीही हालचाल अद्यापही केलेली नाही. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ३६ व्या क्रमांकावर महाराष्ट्रातील धनगर समाजाचा स्पष्टपणे समावेश केलेला आहे. नुकताच राज्य सरकारने धनगर समाजाला तिसऱ्या सूचित घेण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर हा मोठा अन्याय आहे या समाजासाठी.अनुसूचित जमातीच्या इंग्रजी यादीतील धनगड व महाराष्ट्रातील धनगर समाजाला गेल्या ६४ वर्षांपासून 'धनगड' व धनगर हा शब्द एकच असून, केवळ 'ड' चा 'र' झाल्यामुळे या एका चुकीच्या शब्दामुळे इतके वर्षे या समाजाला आपल्या हक्काच्या आदिवासी सवलतीपासून वंचित रहावे लागले. वास्तविक मराठी व हिंदी यादीत धनगर असे नमुद केले आहे. याबाबतचे अनेक पुरावे सरकार दरबारी उपलब्ध आहेत. असे असताना धनगर नेते सत्तेच्या पक्षात असून समाजाचे प्रश्न सोडवू शकत नसल्याची शोकांतिका वेदनादाई आहे . 

ताजे लेख

अस्वस्थतेला जामीन 

  भुजबळसुटका आणि पुरोगामी महाराष्ट्राचे राजकीय भविष्य   

भगतसिंगाचा लेनिन अन बेईमान भाजप 

 त्रिपुरातील तांडव हा सत्तेचा स्तोम का विजयाचा उन्माद. वाजपेयी ते मोदी भाजपची ...

पंत गादीचा राजीनामा देताव का

  नैतिक जबाबदाऱ्या फक्त  पुढाऱ्यांना नसतात  , मोह अन माया - मन अन काया " विठ्ठल विठल ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

पत्रकारांनो जपून लिहा  तुमचा लोया होईल 

रक्तात माखलेल्या हातात सत्तेची सूत्रे ,  जर न्यायधीशाची हत्या तर त्याचा "शहा" कोण ?    ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king