05 May

अस्वस्थतेला जामीन 

bail of bhujbal
By भागवत तावरे
  • 813 View

 

भुजबळसुटका आणि पुरोगामी महाराष्ट्राचे राजकीय भविष्य 

 

                         २६ महिन्यानंतर अदालत उस नतीजे पर पहुच गयी ज्यासाठी शरद पवारांच्या पत्राने आर्जवे केली होती . कुठला आरोप झाला कि त्या व्यक्तीचे बाहूबळ कमजोर पडतात अन त्या व्यक्तीचा लोकाश्रय पाठबळ संपू लागते . मात्र भुजबळ त्या नियमास अपवाद ठरले . आरोप असताना कुठल्या व्यक्तीसाठी लोक रस्त्यावर उतरतात अन कायम संघर्षात राहतात असे भाग्यवान म्हणून ओबीसीचे नेते छगन भुजबळ हे एकमेव असावेत . असो आता भुजबळ सुटलेच आहेत म्हटल्यावर त्याचे परिणाम येणारच आहेत ज्यावर आज खल करत आहोत . राज ठाकरे यांचे मान्य केले तर त्यांची सुटका भाजप इच्छेने झाली असेल तर भुजबळांची जामीन राजकीय नफा तोट्याच्या गणिताची बेरीज असावी . पवारांच्या पत्रातील त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाले तर त्यास मुख्यमंत्री जबाबदार असतील या एका ओळीने अटकपर्व संपुष्टात आले असावे ? पवारांच्या भीतीचे कल्पनाचित्र केले तर कुणाचीही धांदल उडावी , भाजप तर बुद्धीजीवीचा संघ .  जामीन प्रकरण म्हणजे  भाजपसाठी  कमीत कमी नुकसान कसे होईल तर राष्ट्रवादी जास्तीत जास्त लाभ कसा होईल असे प्रकरण आहे .

     भुजबळ चार भिंतीच्या बाहेर येत नाही तोच राष्ट्रवादीच्या साखर पेरणीतून त्यांची पुन्हा अटक झाल्याचे चित्र आहे . निकाल बाहेर येण्यासोबत धाकले पवार , खा. सुप्रिया सुळे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील , धनंजय मुंडे , नवाब मलिक , चित्रा वाघ यांनी साहेब अश्या बिरुदाने राष्ट्रवादीने साखरवेढा टाकला . साहेबांचा लढा ते बाहेर आल्यावर सर्वांचा म्हणजे सर्व राष्ट्रवादीचा झालेला आहे . असो, राष्ट्रवादीसाठी छगन भुजबळ जे कधीकाळी खासकरून अजित पवारांसाठी स्पर्धक होते ते राष्ट्रवादीचा मुख्य विषय झालेले आहेत . भुजबळ बाहेर येऊन अटकेवर बोलताना नुसते षडयंत्र येवढा एक शब्द जरी उच्चारून पुन्हा आराम करू लागले तरी  त्या एका शब्दाचा बदला घेणारा मोठा मतदार भुजबळांच्या अधीन आहे . तो मतदार भुजबळ समर्थक तर आहेच सोबतच मोदीभक्त नाही .अश्या दुहेरी बाण्याचा मतदार राष्ट्रवादीला भुजबळ बाहूंनी आपल्या कवेत घ्यायचा आहे अन तो भुजबळ असलेल्या कुठल्याही राजकीय पक्षाचा प्राथमिक कार्यक्रम असता . राष्ट्रवादी हा फक्त मराठ्यांचा पक्ष नसल्याचा निर्वाळा नवे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी नेमक्या जामीन वेळी देणे नुसतीच समयसूचकता नाही .भुजबळ बाहेर येणे या एका घटनेचे राजकारण ज्या काही टप्प्यावर परिणाम होणार आहेत ते सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांचे लोकमत , एकूण महाराष्ट्रातील ओबीसी राजकारण , अन राष्ट्रवादी अंतर्गत नेतृत्व संघर्ष . 

    भुजबळ बाहेर आले येवढ्या एकाच वाक्यावर त्यांचा लाभ अपकार कुणाला किती होईल यावर कयास लावणे घाईचे ठरेल . मात्र भुजबळ तुरुंगात गेल्या नंतर राज्यात,  ओबीसी राजकारणात प्रामुख्याने जी पोकळी निर्माण झाली होती त्या रित्या जागेची पूर्तता करण्याचा प्रयत्न माळी समाजातून अन राजकीय परिघातील अनेक नेतृत्वाने केलेला आहे . भुजबळांचा विसर अन उपयुक्तता भरून काढण्याची उंची मिळाली नसली तरी ओबीसी चेहरा म्हणून चांगले काम केलेले काही नेते स्थिरावलेले आहेत . त्यात दोन्ही मुंडे बहिण भाऊ आहेतच . भुजबळांची उंची वा पोकळी कुणाला भरून काढता आली नाही हे सिद्ध करण्यासाठी भुजबळांची जामीन अन त्यानंतरच्या प्रतिक्रिया काफी आहेत . भुजबळ आत राहणे राष्ट्रवादी वा पुरोगामी मतदारांसाठी निकड अन खेदाचा विषय होताच , सोबतच भाजपसाठी भुजबळ समर्थकांचा संताप चिंतेचा विषय होता . दरम्यानच्या काळात ना. पंकजा दवाखान्यात भुजबळ भेट घेऊन आल्या त्या उगाच नाहीत . नैतिक मूल्य अन राजकीय व्यवहार अश्या दोन अपरिहार्य टोकावर व त्यांच्या संतुलनावर राजकारणी आपला समतोल अन यशाचा आलेख रेखित असतात . याच धर्तीवर आरोपी भुजबळ राजकीय परिघात प्रत्येकाचे साहेब राहिले . भुजबळ बाहेर आल्यावर सरकारच्या नावाने बोटे मोडणारच आहेत मात्र बरे वाईट झाले तर आपला टांग्या पलटी हि भीती देखील असावी . आता राजकीय परिघातील भूमिका जर अटक अन जामिनासाठी कारणी लागत असतील तर ती सर्वात मोठी शोकांतिका ठरते मात्र तो आजचा विषय नाही . भुजबळ जामीन भाजप होकारातून झालेली असेल तर त्याची जाणीव भाजप भुजबळांना करून देईल अन देत राहिल , अन याच धर्तीवर राष्ट्रवादी भुजबळांचे भांडवल करण्याची कुठलीही संधी सोडणार नाही ज्यात भुजबळांचा जीर्नोधार देखील पर्यायाने येईल . भुजबळाकडे शिल्लक उमेद पाहता ते कुणाचे स्पर्धक असण्याचे कारण नाही त्यामुळे जेवढे शक्य तेवढे त्यांचे उदात्तीकरण करण्यात येईल . शरद पवार यांच्यासोबत पुरोगामी नाळ जुळवून घेणारे भुजबळ राष्ट्रवादीच्या भुजात ओबीसी मतदारांचा संताप आणतील अन त्या भूजबळाच्या जोरावर राष्ट्रवादीचे सत्तारोहण अन भाजपचे सत्तापतन राजकीय भविष्याची नांदी ठरेल . 

मागे निखील वागळे आय.बी.एन. ला मुख्य संपादक असताना त्यांचा ग्रेट भेट नावाचा एक कार्यक्रम असायचा यात त्यांनी दोन भागात भाजी विकणारे ते उपमुख्यमंत्री असा प्रवास शब्दबद्ध अन कमेराकैद केला . ज्यातून कुठल्याही सामान्य मनाला स्वप्नांची पंख देणारी ती मुलाखत त्यांच्या संघर्षाची साक्ष तर देऊन गेलीच, वरून त्यांची  सामजिक परिघातील कारकिर्द विसरता येत नाही . सत्ता अन संघटन असे दुहेरी यश मिळवणे अन टिकवणे यावर त्यांची पकड कौतुकास्पद राहिलेली आहे . वर्तमान त्यांना आरोपी हि ओळख असली तरी राजकारणात मताचे राजकारण महत्वाचे असते यावरून भुजबळ आज देखील साहेबच आहेत . 

   भुजबळांनी 40 वर्षांपूर्वी ज्या भायखळा मंडईतून सुरूवात केली होती. त्या मंडईत सोमवारी हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर मेळाव्यात आपली भूमिका मांडतील. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही या मेळाव्याची जोरदार तयारी केलीये. अशी बातमी वाचताना राजकीय भविष्यात होणारा घमासान किती कडवा असेल याचा कयास लागतो. 

या मेळाव्यात भाषण केल्यानंतर ते संध्याकाळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतील. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते घरी येतील. त्यावेळी काही कार्यकर्त्यांना भेटतील. मंगळवारी घरी आराम केल्यानंतर बुधवारी लिलावती रूग्णालयात त्यांच छोटं आॅपरेशन करण्यात येईल. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मग ते मैदानात उतरतील. हा क्रम अभ्यासला तर भाजप देखील आपला गृहपाठ करत नसेल तर तो पक्ष कसला . ज्या अस्वस्थतेला नियतीने जामीन दिलाय त्यातून काय निपजते याकडे पुरोगामी राज्याचे लक्ष नसेल तर आश्चर्य . 

ताजे लेख

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king