07 March

भगतसिंगाचा लेनिन अन बेईमान भाजप 

bhagatsinhacha lenin an beiman bhajap
By भागवत तावरे
  • 1167 View


 त्रिपुरातील तांडव हा सत्तेचा स्तोम का विजयाचा उन्माद. वाजपेयी ते मोदी भाजपची दोन टोक 

                  त्रिपुरात कमळ फुलले अन दिल्लीत भाजपेयींचे कमल . नरेंद्र मोदी यांनी नियमितचा भावनिक सदगदीत सूर आवळला . भाषण चालू असताना नमाज कानावर आली अन त्यातून दोन मिनिट तोंड बंद ठेवणाऱ्या मोदींनी मुस्लिमांचा आदाब मिळवला . मात्र याच भाषणात नरेंद्र मोदींच्या अहंकाराची,  विध्वंसक स्तरावर घेऊन जाणाऱ्या प्रेरणेची लहानशी किनार होती जी त्रिपुरातील लेनिनच्या मुळावर उठली . ज्या भारतीय तरुणाईची जिवंत प्रेरणा म्हणून भगतसिंगाचा सन्मान केला जातो त्या भगतसिंगाचा प्रेरक उलथून टाकण्याचे पातक काल भाजपकडून घडले आहे . यातून भारताला रशियाच्या समोर कर्तघ्न्न सिद्ध करण्याचे महापातक देखील देवधरांच्या भाजपने केले आहे . लेनिन समोर झुकणारे वाजपेयी अन लेनिनला उखडून फेकणारे मोदींचे भाजपेयी  अशी दोन टोक काल समोर आली , जी सुन्न तर करतातच त्याहून अधिक देशाचा प्रवाह अन प्रवास कुठे जात आहे यावरून शंका वाढवतात. 
नरेंद्र मोदींचे त्रीपुरा लालमुक्त केल्यानंतर जे भाषण झाले ते कुणी ऐकले असेल तर त्यातला अविर्भाव कुठला तरी बदला घेतल्याचा होता . उगवणारा सूर्य केशरी रंगाचा तर मावळणारा लाल रंगाचा असल्याचे सांगत त्यांनी डाव्यावर निशाना साधला होता . याचवेळी या भागात कमळ फुलवण्यासाठी ज्यांनी जीव गमावला त्यांची आठवण काढताना पंतप्रधान मोदींना आपला हुंदका लपवता आलेला नव्हता . त्यांच्या रडक्या स्वरातले चिथावणारे पाखंड काल त्रिपुरात पोहचले . लेनिन चा पुतळा खाली पाडून त्या भाषणाचा रोख प्रत्यक्षात कृतीसिद्ध झाला . 
भगतसिंहाच्या फाशीच्या आदल्या दिवशी म्हणजे 23 मार्चला त्याचे वकील प्राण मेहता भेटायला आले, ते आल्या आल्या भगतसिंहाने त्यांच्याकडे त्याने आधी आणायला सांगितलेल्या पुस्तकाची मागणी केली आणि मिळाल्यावर लगेच वाचायला सुरुवात केली. बहुदा 'स्टेट अँड रिवोल्युशन' भगतसिंहाच्या फाशीची वेळ 11 तास आधी करण्यात आली, यावेळची एक आठवण मन्मथ नाथ गुप्ता भगत सिंगचे जवळचे मित्र यांनी सांगितली आहे ज्यावेळी जेल अधिकारी त्याला घेऊन जाण्यासाठी  आले त्यावेळी भगत सिंग लेनिन वाचत होता, फाशीची वेळ आधी झाल्याचे माहित नसणाऱ्या भगतसिंहाला काहीच पाने झाली होती, त्यावेळी आलेल्या अधिकाऱ्यांना भगतसिंग म्हणाला, 'थोडा वेळ थांबा एक क्रांतीकारक दुसऱ्या क्रांतीकारकाशी बोलत आहे'. वरील घटना यासाठी सांगितली कि भगतसिंगाचे कोट्यावधी चाहते जिवंत असताना भारतात लेनिन धारातीर्थी पडला . त्या रशियाचा लेनिन ज्या रशियाच्या उपकरणावर अन उपकारावर आमची उपग्रहे अन महासत्तेचा पूर्वग्रह प्रसूत झाला आहे . भारताला आंतराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात लेनिनच्या रशियाचे योगदान मोठे आहे यावरून काल आम्ही एहसान फरामोश ठरलो आहोत . ज्यास मराठीत कर्त्घन असे म्हटले जाते . 
१९७० ला लेनिन च्या जन्मशताब्दी निमित्त ज्या भारताने लेनिन कि शान मे लेनिन च्या चित्रासह पोष्ट तिकीट जारी केले त्याच भारतात आज लेनिनचा पुतळा शहीद होताना पहावा लागत आहे . जगात आदर्श असणाऱ्या भारतीय संस्कृतीचे मोदींच्या नेतृत्वात असे टोक जगाने पहिल्यांदा पाहितले असावे . 
      1978 च्या रशिया दौऱ्यावर असताना तत्कालीन विदेश मंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयी मॉस्को मधल्या रेड स्क्वेअर येथे असलेल्या लेनिनच्या समाधीला मानवंदना देतानाचा फोटो आम्ही आवर्जून आजच्या क्रॉस लाईन मध्ये टाकला आहे ज्यामुळे वाजपेयीची भाजप अन मोदींचे भाजपेयी यातला फरक समजून येईल . सत्तर साल मे  देश को लुटा म्हणणारे नरेंद्र भाई अन ५० साल मे तरीक्की नही हुई असे न म्हणणारे वाजपेयी म्हणजे भक्तांनी बुचकळ्यात पडावे असीच दोन टोक आहेत . 

ताजे लेख

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king