27 February

पंत गादीचा राजीनामा देताव का

pant rajinama deta ka
By भागवत तावरे
  • 1393 View

 

नैतिक जबाबदाऱ्या फक्त  पुढाऱ्यांना नसतात  , मोह अन माया - मन अन काया " विठ्ठल विठल " 

लेकराला रुपया देताना दहा येळेस इचार करणारा बाप गडावर गेला कि खिसा रिता करतोय. सप्ता म्हणू नग , वारी म्हणू नग , पुण्यतिथीच्या गर्दीत जाऊन पुढाऱ्यांच भाषण ऐकतंय . सरकारी तिजोरीतून पैखा खर्चून तिथ पुढारी मत लाटत्यात अन गडावरचे संत- महंत -पंत  मानपान . 

      चला मुद्याच बोलू . वरील दोन ओळीतील भाव तुम्हाला लक्षात आलाच  असेल . राज्यातील वारकरी पताका खांद्यावर घेऊन संसाराची राख लाऊन घेणारी मात्र मुखी राम न थांबू देणारी मोठी संतपरंपरा आम्हास लाभली . त्यासाठी आम्ही भाग्यवानच मात्र ज्या धर्मासाठी  हिरण्यकश्यपुच्या पोटाला भक्त प्रल्हाद जन्मला त्याच धर्मात आज प्रल्हादाच्या वेशात हिरण्यकश्यपुचे वंशज आहेत की काय असा संशय का येऊ नये . भगवान बाबा , संत वामनभाऊ , नगदनारायण , या संतांनी आजीवन वैराग्य जोपासले . कुठला दबाव प्रलोभन , ऐहिक सुखाचे आकर्षण मनाला सुद्धा शिवू दिले  नाही शरीराला  तर खूप पुढची गोष्ट . संत वामन भाऊ अन भगवान बाबांनी अशिक्षित असणाऱ्या भोळ्या समाजाला धर्म अन मानवतेची शिकवण दिली . समाज जागता करताना भौतिक हव्यास कधी मनात येऊ दिला नाही . नव्हे नव्हे समाजमनाचा विश्वास अन निष्ठा हेच ऐश्वर्य समजत गेले. अवघी हयात समाज सृजन करण्यासाठी खर्चणाऱ्या संतांच्या गादीचे वारस त्यांच्या विचाराचे पाईक असावेत एवढी माफप सामाजिक अपेक्षा असते . मात्र ती देखील पुरी होत नसेल तर त्यांना गादीचे संचलन करण्याचा नैतिक अधिकार आहे काय याचा विचार झाला पाहिजे,  आणी नसेल तर त्यांनी देखील गादीचा राजीनामा दिला पाहिजे . 

         विलासराव देशमुख , आर . आर . पाटील , शिवराज पाटील चाकूरकर , यांनी  आरोप झाले अन राजीनामे दिल्याचे दाखले आमच्याकडे आहेत मात्र कुठल्या गादीवर असणारे पंत आरोप झाल्यावर आपले  निर्दोषत्व सिद्ध तर करत नाहीतच  , नैतिक जबाबदारी घेऊन पद सोडण्याचे तर सोडाच उलट चमच्यांच्या साह्याने आपला सन्मान उगळून दाखवतात . आपण ज्या गाद्या २०/२१ वर्षापासून सांभाळत आहात तिथे आपण काय काम केले , किती विध्यार्थी घडवले , समाजाला कुठली दिशा दिली याचा लेखा जोखा समाजाने घेतला पाहिजे . समाज म्हणजे ईश्वराचे रूप समजणारा सांप्रदाय समाजाला फसवणाऱ्या पंतांना कुठला महंत कसा मान्य करेल . कधी काळी नगर सेवक पदाची निवडणूक लढवली हा तक्रारीचा विषय नाही मात्र मग वैराग्य हा शब्द आपल्याला शोभेल कसा  . कुठली तरी महिला कुठल्या गादीवरच्या पंतांनी आपले शरीर भोगले म्हणत असेल तर या भारतात सीतेला परीक्षा चुकलेली नाही मग कुठल्या पंताची काय मिजाज ?  पंतांनी सिद्धता द्यावी,  याची कि काही लाख का दिले, जर आपण दोषी नव्हता ? काही लाख देता म्हणजे आपण दोषी होतात अन दोषी असताल तर गादी सोडावीच असा कयास का येऊ नये . राज्यात कीर्तने करत लाखोची माया कमावणारी महाराज मंडळी कमी नाहीत  मात्र ज्ञानेश्वरी अन गाथा पाठ असणारी त्यापैकी किती आहेत . ५० लाख मुस्लीम बांधवांचा परवा औरंगाबादला इज्तेमा झाला मात्र कुठल्या एका मौलानाचे नाव तरी समोर आले का, तर  नाही. वैराग्य ,त्यागाचे प्रतिक असणाऱ्या वारकरी सांप्रदायात मात्र सप्त्याच्या पोम्प्लेट मध्ये नाव कुठे छापले म्हणून नाराज होणारी महाराज मंडळी किती तरी आहे . 

       समाजाने आता विचार केला पाहिजे भक्तीचे भांडवल करून  " मोह अन माया  " " मन अन काया "  यांच्या अधीन होणाऱ्या महाराजांना किती पोसायचे . ज्यांनी वैराग्यासाठी ऐहिक सुखाचा त्याग करत  प्रपंच स्वाहा करून परमार्थ केला त्यांचा वारसा तस्याच हातात गेला पाहिजे . आकाशावर कधी जमीन चाटल्याचा आरोप होतो काय , मासे कधी जमिनीवर झोपलेत काय , वृक्षांनी कधी हवाई सफर करावी , तेव्हा कुठलाही आरोप होतो तेव्हा त्यास वास्तवाची झालर असतेच. नसेल तर सिद्ध केली पाहिजे नाहीतर नैतिक जबाबदारी फक्त पुढाऱ्यांना नसते ,आरोप झाला कि दी राजीनामा . पंत वा कुठल्या मठाधीपतींनी देखील काही लाखांचा हिसाब टाकावा अथवा गादीचा राजीनामा द्यावा . नाहीतरी काही फरक पडत नाही एखादी गादी सोडल्याने ,राम कृष्ण ही आले गेले म्हणोनी का जग ओसची पडले . 

.

भगवान बाबांचे विचार वाचा 

कुलगुरू राहिलेले के.पी.सोनवणे १९६१ ते १९६५ भगवान बाबांच्या शाळेवर मुख्यअध्यापक होते . त्यांना  भगवान बाबांचे सानिध्य लाभलेले आहे . त्यांच्याकडे बाबांचा विचार आचार अन आदर्श अनुभव आहेत . कुणी त्यांना विचारले तर ते सहज सांगतील की भगवान बाबांची धारणा काय होती . अधिकारी सत्ताधारी आणी राजकारणी गडापासून अंतरावर ठेवले पाहिजेत असे त्यांचे विचार असल्याचे बोलले जाते . मात्र आजचे संत पंत पुढाऱ्यांना बोलावून गर्दीचे भांडवल करत नाहीत काय ? ज्यांच्या जीवावर गड संपन्न असतात ते भाऊ - भक्त उन्हात अन पुढारी तक्के घेऊन रेलून भाषणे झोडतात . गडाचे अधिपती त्यांना पायघड्या घालणार असतील तर भगवान बाबा- वामन भाऊ  यांच्या विचाराला हे शोभणारे आहे काय याचा देखील विचार झाला पाहिजे . 

ताजे लेख

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

निमताळा आत्मघात

एकनाथी भारुडाने स्व राज्यातील गड धोक्यात ?       

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

पुन्हा निशब्द पंकजा

   " ती क्लिप चक्कर यावी अशीच आहे , ताई "        

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

< satta king