08 November

अमेरीकेसाठी नोटबंदी

notbandi for amerika
By भागवत तावरे
  • 1366 View



अन मोदी  देशाला घेऊन फसले 
          नोटबंदी का ? चला समजून घेऊ , जानेवारी २०१५ ला बराक ओबामा भारतात आले होते , तेव्हा जन धन चे कौतुक करत ओबामा यांनी मोदी समवेत एक करारावर सह्या  केल्या . भारतीय वित्त विभाग अन अमेरिका मधील यु एस ए डी अंतर्गत एक करार झाला , ( कटलिस्ट ) त्यात एक ओळ होती की जगात बेटर दन कैश अलायन्स यंत्रणा उभी राहत आहे भारताने त्याचे सदस्य व्हावे . हुशार मोदींनी त्यास मान डोलावली अन इथेच नोटबंदी पक्की झाली . कशी ते पाहू , २०११ ला एक ट्रेड अमिरिकेत आलेला होता , विसा , मास्टर , सिटी या डेबिट अन क्रेडीट कार्ड देणाऱ्या अन यातून डिजिटल इकोनोमी निर्माण करणाऱ्या संस्था स्थिरावल्या होत्या , त्याचे कारण २०१० ला अमेरिकेत लेमन नावाची बँक बुडाली अन अमेरिकेत मंदी आली तेव्हा त्या देशात एक कायदा करण्यात आला , अमेरिका संसद "डोड फ्रंक अक्त ...... हा कायदा पारित केला ज्यात काही बदल तेथील खासदार सिनेटर डर्बन यांनी केला ज्यास डर्बीन अमीटमेंट म्हटले गेले , ज्यास अमेरिकेत प्रचंड प्रसिद्धी मिळाली . मूळ कायद्याप्रमाणे कैशलेस एका व्यवहाराचे कमिशन होते ४५ अमेरिकन  सेंट  मात्र डर्बीन अमीटमेंट २१ सेंट कमिशन झाले . त्या देशातील ४० लाख मध्यम व्यापऱ्यांना तक्रार नव्हती मात्र  विसा , मास्टर , सिटी या डेबिट अन क्रेडीट कार्ड देणाऱ्या कंपन्या नाराज झाल्या . कारण त्यांचे प्रतीव्यवहार २४ सेंट कमी झालेले होते . वाद न्यायलयात गेला अन २१ सेंट कायम राहिले . मग  विसा , मास्टर , सिटी या डेबिट अन क्रेडीट कार्ड देणाऱ्या कंपन्या अमेरिका सोडून दुसऱ्या अर्थव्यवस्था शोधू लागल्या ,चीन तर शक्य नव्हते मग त्यांच्या नजरेत आला भारत अन इथेच नोटबंदीचे बीज ओबामांनी पेरले . जागतिक अर्थव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याचे राजकारण अमेरिकेने उरकले मात्र मोदींनी त्यासाठी ९७ टक्के रोख व्यवहार करणाऱ्या भारताला रांगेत उभा केले . विशेष म्हणजे चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाने एक समिती नेमून या कार्ड व्यवहार बाबद अहवाल देण्याचे सांगितले , ज्या अहवालात डिजिटल व्यवहार कमिशन वजा करण्याची शिफारस करण्यात आली होती अशी माहिती आहे , मग सरकार ती माहिती का देत नाही , हजार अन पाचशे च्या नोटा परत देऊन लोकांना त्यांच्याच पैश्याला का रेंगाळत ठेवले , २० हजाराची मर्यादा का घातली ? लोकाकडे पैसे नसतील तर लोक नाईलाजाने कैशलेस कडे वळतील अन तसेच झाले दरम्यानच्या काळात पे टी एम सारखी पर्याय झपाट्याने वाढली , डिजिटल चे वारे वाहिले वा वाहवून घेतले ? देशात मोठे षडयंत्र तडीस गेले, देशाला  विसा , मास्टर , सिटी या डेबिट अन क्रेडीट कार्ड देणाऱ्या कंपन्याच्या हवाली करण्याचा कावा तडीस गेला ? 
८ नोव्हेंबर २०१६  संध्याकाळी ८ वाजता हजार अन पाचशे च्या नोटांचे वर्षश्राद्ध साजरे केले जाईल माफ करा शोक साजरा केला जाईल . तसे त्या दोन नोटांचे खूप परिणाम झाले नाहीत असे सरकारला वाटते फक्त १५० च्या आसपास लोक मयत झाले , देशात बेरोजगार वाढला , नौकऱ्या गेल्या , मध्यम व्यवसाय ढेपाळले अन सर्वसामान्य रांगेत उभा राहिले , असे लहान सहान तोटे सोडले तर सरकारच्या निर्णयाने देशात इतिहास घडला आहे ज्याचा हवाला बोकील नावाचे अर्थतज्ञ सुरवातीला देत होते , पुढे रघुराम राजन ते यशवंत सिन्हा यांनी सदरील निर्णय कसा अज्ञानी अन हवेत घेतल्याचे जाहीर म्हटले अन आरबीआयच्या आकड्यांनी देखील सिद्ध झाले. आज नोटबंदीला वर्ष पूर्ण झाले , मागे वळून पाहता हा निर्णय म्हणजे घोटाळा होता , का अज्ञान होते , का मोदींच्या सवंग राजकीय लोकप्रियतेचा आर्थिक निरक्षरतेचा तवंग होता याचा वेध घेतला पाहिजे . होय लोकाशा भारतातील त्या काही मोजक्या दैनिकापैकी एक आहे ज्यांनी नोटबंदी निर्णय घातकी ठरण्याची भीती व्यक्त केली होती . 
मोदी असे एकमेव मसीहा आहेत जे या देशाला वाचवू शकतात या धर्तीवर त्यांची राजकीय पर्याय म्हणून मार्केटिंग केली गेली . अन देशाने गुजराती मुख्यमंत्र्यांना दिल्लीची खुर्ची 
दिली . नमोजपाचा गजर देश ओलांडत असताना मोदींनी क्रीझ सोडून नोटबंदीतून षटकार खेचण्याच्या प्रयत्न केला मात्र त्यांचा डाव फसला अन आर्थिक अज्ञान अन राजकीय अनुभवाचा तुटवडा समोर आला . नरेंद्र मोदी मसीहाचे फेकू झाले अन गुगल मध्ये फेकू म्हणून सार्वजनिक झाले . नोटबंदीची घोषणा झाली तेव्हा संपूर्ण देश नरेंद्र मोदी यांच्यासमवेत जय हो म्हणत होता , आजचे चित्र वेगळे आहे . रिजर्व बँकेचे आकडे अन नोटबंदीचे दूशपरिणाम  यावर लोकाशाकडून ४२ विस्तृत लेख आलेले आहेत यावर आता पुन्हा खल नको . मात्र आम्हाला वर्षश्राद्धाच्या निमित्ताने  हे समजून घेतले पाहिजे कि नरेंद्र मोदी यांनी कुणी भुलवले का फसवले होते , म्हणून त्यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी  काळे धन , भृष्टाचार , आतंकवाद हे शब्द वापरून नोटबंदीचा निर्णय लादला ? प्रश्न हा तेव्हा उपस्थित होतो जेव्हा देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली  म्हणतात नोटबंदीचा मूळ उद्येश तर डीजीटायझेशन होता ? मग हा हेतू मोदींना माहित नव्हता का म्हणून देशाला भृष्टाचार मुक्तीसाठी नोटबदली असे सांगण्यात आले , का मग मोदी अनभिज्ञ होते का जागरूक ? याचा शोध घेतला पाहिजे कारण देशाला कळाले पाहिजे कि त्यांचा पंतप्रधान निर्णय घेताना कसे घेतो . परबुद्धीने निर्णय घेणारा पंतप्रधान म्हणजे बुजगावणे असले पाहिजे त्यान्वये नरेंद्र मोदी निव्वळ एक कलाकार ठरतात जे लिहून दिलेले भाषण बिनचूक करतात . कारण नोटबंदीच्या पातकाच्या बुडाला असणारे कावे देशाने आता समजून घेतले पाहिजे तरच नोटबंदीच्या पितराला कावळा शिवेल . 

ताजे लेख

अस्वस्थतेला जामीन 

  भुजबळसुटका आणि पुरोगामी महाराष्ट्राचे राजकीय भविष्य   

भगतसिंगाचा लेनिन अन बेईमान भाजप 

 त्रिपुरातील तांडव हा सत्तेचा स्तोम का विजयाचा उन्माद. वाजपेयी ते मोदी भाजपची ...

पंत गादीचा राजीनामा देताव का

  नैतिक जबाबदाऱ्या फक्त  पुढाऱ्यांना नसतात  , मोह अन माया - मन अन काया " विठ्ठल विठल ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

पत्रकारांनो जपून लिहा  तुमचा लोया होईल 

रक्तात माखलेल्या हातात सत्तेची सूत्रे ,  जर न्यायधीशाची हत्या तर त्याचा "शहा" कोण ?    ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king