01 October

गर्दीचा घायटा

press for croud
By भागवत तावरे
  • 3489 View


गोपीनाथ गड ते सावरगाव , शक्ती प्रदर्शनाचा "घाट"
 
नोट .......लेख पूर्ण वाचुनच उद्विग्न वा आणखीन काही होणे त्यापूर्वी नाही , निष्पक्ष निर्भीड होऊन वाचा कारण त्याच भावाने लिहला आहे ...
    
             माझे एक निकटवर्तीय आहेत काल 4 वाजता त्यांचा फोन आला , हॅलो.... मी म्हटले बोला, तिकडून उत्तर आले, पंकजा जिंकली महंत हरले. मी म्हटले नेमके कसे, अहो एक लाख लोक असतील ?  म्हणजे हा सारा खेळ संख्येच्या शक्तीप्रदर्शनाचा होता तर. लेक- माहेर- बाबांची भेट-भगवान गड हे सारे भावनिक पंच होते तर ? तसे ते सर्वांनाच ठाऊक असते मात्र ना.पंकजा मुंडे यांच्या कडून नेहमी जो अध्यात्मिक पदर घेऊन जो हुंदका घेतला जातो म्हणूनच त्यांचा राजकीय बुरखा फाडणे अगत्याचे ठरते. याच साठी शब्दप्रपंच .             
      सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा पहिला दसरा मेळावा काल पार पडला . प्रचंड गर्दीत पंकजा मुंडे यांनी मेळाव्याच्या स्थानकाच्या स्थळाचे हस्तांतरण केले . पंकजा मुंडे यांनी आपल्यावर 'संघर्ष' करण्याचीच वेळ असल्याचे सांगत हस्तांतराची सल बोलून दाखवली.  'हेलिकॉप्टर' ने आलेल्या ना.पंकजा आणि 'ऑडी' गाडीत आलेल्या खा.प्रीतम या मुंडे भगिनीचे दुःख अन वेदना पाहून उपस्थित समाज गहिवरला असावा , मला पंकजा मुंडे यांचा मेळावा फेल गेला असा आरोप नक्कीच करायचा नाही. संख्येच्या पातळीवर म्हणाल तर  राजकीय सत्तेतील सर्व सरदारांनी नेमून दिलेले आकडे पूर्ण केल्याचे स्पष्ट दिसून आले.  कुठल्या आमदारांना किती टार्गेट होते अन त्यातले कुठले आमदार अपरात्री नगदी रोकड जुळवत होत्या .  याच्या खोलात मी वाचकांना घेऊन जाणार नाही मात्र मेळावा गर्दीच्या निकषावर पासच झाला हे मान्यच करून व्यक्त होणार आहे  .मात्र गर्दी सोडली तर पंकजा मुंडे यांचे काल न भरून निघणारे नुकसान झाले आहे. भगवान गड काल त्यांच्या परिघातून वजा झाला, ज्या गडावरून  स्व.मुंडे साहेबांनी मुंबई ,दिल्ली पाहितली.  सावरगाव घाट जन्मस्थळ म्हणून आहेच मात्र ते एवढे उंच नाही की, जिथून मुंबई दिल्ली दिसेल.  मेळावा- गड हा सारा सारीपाट त्यासाठीच होता . स्वतःला गडकन्या वदवून घेणाऱ्या ना.पंकजा यांनी भगवान बाबांच्या जन्मस्थळा वरून समाधीस्थळावरील महंताना दूषणे देत होत्या , पंकजा मुंडे अन त्यांच्या राजकीय काव्याचा इथेच पंच आहे.  कन्या ,माहेर ,बाबांनी बोलवले हे सारे भावनिक स्ट्रोक सोडले तर त्यात शाश्वत अन वास्तव कालच्या मेळाव्यात काय होते  ? सावरगाव च्या भाषणात बारकाईने ने पाहितले तर ना पंकजा यांनी जमलेल्या लोकांना काय दिले ?  या, मला सहकार्य करा, जात या निकषावर मागे उभे रहा , समाजातील भाऊ नावाच्या  पर्यायाचा त्यात धसका नव्हता काय ? उतावीळ फेसबुके  , राजकीय लाभार्थी साठी गर्दीचा आकडा ही मिळकत ,कमाई अन मेळावा यशस्वीतेचा माप दंड असू शकतो मात्र सर्व सामान्यासाठी घाटात काय मिळाले? महंतांना पत्र लिहून ज्या ऊर्जेचा विषय समोर आणला गेला होता ती ऊर्जा देण्यात आली काय ? उलट निरागस गर्दीतून स्वतःलाच राजकीय ऊर्जा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला नाही काय ?  सपशेल परळी गमावून बसलेल्या कन्येसाठी भविष्यकालीन राजकीय निर्वाह बनेल .  भगवान गडावर पहा- पहा गर्दी नाही म्हणणारे भगवान बाबांचे भक्त समाजाने काल पहिल्यांदा पाहितले , पाच पंचिसाच्या सोबतीने भगवी पताका रोवणारा *आमच्या भु चा लेक भगवान ,संतश्रेष्ठ भगवान बाबा बनतात ते संख्येच्या जोरावर नाही तर आपल्या नैतिक अन निर्भेळ अधिष्ठानावावर*. मला पंकजा मुंडे अन भगवान बाबा यांच्यात तुलना नाही करायची, फक्त संख्या अन दायीत्व याचा कसा संबंध नसतो एवढेच सांगायचे आहे . जर गर्दी हे ना.पंकजा यांचे यश आहे तर काल पंकजा मुंडे यांनी गोर गरीब समाजाला एक प्रकारे फसवले आहे , त्यांच्या उपस्थितीचे  राजकीय भांडवल करून. हा सर्व शक्तीप्रदर्शनाचा घाट होता जो गेली महिनाभर चालवला गेला हे काल सिद्ध झाले .
      ज्या समाजाचे भांडवल करून हेलिकॉप्टर चे पंखे झाप झाप करतात त्या समाजासाठी, ऊसतोड मजुरांसाठी काय करणार काहीच सांगितले नाही . मेळाव्यात कुली, फाटके, मळके कपडे घातलेले बांधवच ताईंना दिसले एखादा डॉक्टर इंजिनिअर का दिसला नाही , आम्ही ते बनवू शकलो नाही का बनू दिले नाहीत? ती पोर तशीच बेरोजगार ठेऊन मेळाव्यासाठी वापरायची आहेत काय  ?
    महंतावर आगपाखड केली पण स्व. मुंडे साहेब यांचे औरंगाबादला होणारे स्मारक 3 वर्ष झाले तरी सरकारला करता आले नाही, हे सरकारी सत्य भाषणात समोर का आणले नाही . ऊसतोड कामगार मजुरांच्या महामंडळाची घोषणा केली त्यालाही 3 वर्ष होत आली, परळी ला कार्यालय करणार होता. कुठे आहे महामंडळ ? किती ऊसतोड कामगारांना मदत केली हे नाही सांगितले.
          महंतांनी , " तुम्ही या"  उशीर झाल्याचे सांगून ना.पंकजांना दुखावले याची सल पंकजा मुंडे यांनी जाहीर सांगून अवमानाचे भांडवल केले.  मात्र कोण तिडके नावाचा नतदृष्ट पंकजा मुंडे यांचे नाव घेऊन आलम महाराष्ट्राच्या अस्मितेला नख लावू शकतो यावर त्या कुठल्या सामाजिक अवमानाची भाषा बोलत नाहीत , त्यांचे ते दायित्वच नव्हते काय ? जेव्हा कुणी सरफिरा छत्रपती शिवरायाना अपशब्द वापरत असेल तर त्यावर भाष्य करावे , मी का करू माझा काय संबंध असे तकलादू खाजगीत उत्तरे शोभतात,  तिडके यांनी केलेले कृत्य पंकजा मुंडे यांच्या अंधभक्तीतून झालेले नव्हते काय ? महंतांची  सुपारी द्या ,संपवतो असे म्हणणारा कोण सोमनाथ काल घाटात नव्हता काय ? भगवान बाबाची कन्या म्हणवून घेणाऱ्या पंकजा मुंडे यांनी त्याच बाबाच्या गादीवर बसलेल्या महंतांची सुपारी कुणी घेणार असेल अन ती पंकजा मुंडेंसाठी ,  तर त्यावर त्यांनी काल खुलासा करायला नको होता  काय? , स्वतःच्या कल्पित अवमानाचे भांडवल करायचे मात्र छत्रपती शिवाजी महाराज अवमान प्रकरण आणि भगवान गड महंत सुपारी वर गपगोळी,  हे राजकारण नाही काय ?  बीड जिल्ह्यातील कुपोषण बळी , शिरूर तालुक्यातील नग्न महिला धिंड , राज्यात अंगणवाडी ताईचा संप यावर बोलायचे नाही अन माझा संघर्ष ? काय विनोद आहे  .   
       राज्यातील प्रमुख खात्याच्या मंत्री , लहान बहीण खासदार , एक बहीण विदेशात एल.एल.एम. करते याच वेळी ऊस तोड कामगाराची लेकरं मात्र नीट पत्र्याच्या शाळेत नाहीत, १९४ मुले खायला अन्न नाही म्हणून आतड्याला पीळ देऊन बीड मध्ये यमसदनी गेले नाहीत काय ?  , बीड जिल्हा परिषद ताब्यात असलेल्या पंकजा मुंडे यांना हे माहीत नाही काय?  ऊस तोड कामगारांनी प्रत्येक दसऱ्याला पंकजा मुंडे यांच्या समोर येऊन बसायचे आणि त्यांच्या हेलिकॉप्टरचे  फक्त  इंधन व्हायचे काय , वडिलोपार्जित ?  
      गडावरून पायउतार अन पायथ्यावरून पसार.... होण्याची वेळ आलेल्या पंकजा मुंडे यांनी जी.प अध्यक्ष यांचे गाव बावी येथील बाबांच्या हरिनाम सप्ताहात भाकरी रोखण्यासाठी कुणी का प्रयत्न केले यावर बोलायचे होते . बाबांच्या सप्ताहावर बहिष्कार टाकण्याला कुणाचा वरद होता ? काल संख्येच्या जोरावर भगवान गडाला स्वत पेक्षा महान  दाखवून एक प्रकारे अवलक्षण करून घेतले आहे . गड, पायथा, घाट हे सर्व राजकारणासाठी होते हे आता स्वच्छ स्पष्ट आहे.   कारण पंकजा मुंडे ज्या जन्मस्थळी दंडवत घालत होत्या त्या बाबांच्या गडाला संख्येच्या जोरावर खिजवत नव्हत्या काय ? पित्याला अग्निडाग देऊन धर्मसंस्काराला दाह देणाऱ्या पंकजा मुंडे कुठल्या यदा यदा धर्मस्य ची गोष्ट करत होत्या? जन्मभूमीने बोलवले याला कुठला वैज्ञानिक निकष आहे , पंकजा मुंडे यांचे राजकीय हेलिकॉप्टर भरकटले आहे , शक्ती प्रदर्शन जरी यशस्वी झाले असले तरी दिशा घेण्यात प्रचंड फेल गेले आहे .अनेक भाऊ गमावून बसलेल्या पंकजा मुंडे यांच्या बाजूला बसलेले नामदार राम शिंदे,  ज्यांना काल हुररे ऐकावे लागले नाही काय ?  गहिनीनाथ गडाच्या परिघात मेळाव्याचे स्थित्यातंर करून पंकजा मुंडे यांनी वार्षिक तेढाची पेरणी केली नाही काय ? 144 कलम लागू असलेल्या गडावर कमी लोक असल्याचे दाखवून बापाला आपल्यापेक्षा गरीब दाखवण्याचे पातक काल लेकीने केलं नाही काय ? पंकजा मुंडे यांची स्थिती संख्येच्या मोहात पडलेल्या दुर्योधनासारखी नाही का ज्याने कुरुक्षेत्राच्या रणात एक कृष्ण नको म्हणून बारा योजन यादव सेना निवडली होती.  शेवटी जिंकण्याचा वकुब ,रीत माहीत असणारा मधूसुदन घेऊन अर्जुनाच्या गांडीवाने कोण कोण नाही निवर्तले ? एका  चाणक्याने शेंडीची गाठ बांधून कुठल्या सत्तेची इति स्वाहा केली होती हे वेगळे  सांगायला नको , समाधी स्थळावरून निघालेला शाप कुठल्या राजकीय परिघात कुठला परिणाम करेल अन कुठल्या चंद्रगुप्तला जन्म घालेल ? हे येणारा काल ठरवेल ......बाकी मेळावा यशस्वी झाला बर ..संख्येवरून .

ताजे लेख

अस्वस्थतेला जामीन 

  भुजबळसुटका आणि पुरोगामी महाराष्ट्राचे राजकीय भविष्य   

भगतसिंगाचा लेनिन अन बेईमान भाजप 

 त्रिपुरातील तांडव हा सत्तेचा स्तोम का विजयाचा उन्माद. वाजपेयी ते मोदी भाजपची ...

पंत गादीचा राजीनामा देताव का

  नैतिक जबाबदाऱ्या फक्त  पुढाऱ्यांना नसतात  , मोह अन माया - मन अन काया " विठ्ठल विठल ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

पत्रकारांनो जपून लिहा  तुमचा लोया होईल 

रक्तात माखलेल्या हातात सत्तेची सूत्रे ,  जर न्यायधीशाची हत्या तर त्याचा "शहा" कोण ?    ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king