05 November

मास्तुरे मस्तावली 

teachers strike
By भागवत तावरे
  • 312 View


 सैनिकांनी दुर्गम नाकारले तर कसे होईल शिक्षकांनो  
              चाणक्य असे म्हणतो कि कुठलेही राष्ट्र मागे अथवा पुढे जाते त्यास शिक्षक जबाबदार असतात . राष्ट्र अन समाज उभारणीचे काम शिक्षक करत असतात मात्र ते शिक्षक प्लोटीग करणारे नसतात , सावकारकी करणारे नसतात , धाब्यावर बसून बीअर ढोसणारे नसतात , शाळा सोडून गावकी हाकणारे शिक्षक राष्ट्र उभारणी नाही तर नेता उभारणी करत असतात , जिथे जाईल तिथे कर्तव्य बजावून निरक्षरांना साक्षर करणारा शिक्षक आता राहिले नाहीत , सोयीच्या जागी नौकरी मागणारे शिक्षकांना विचारले पाहिजे नौकरी स्वीकारताना असे काही ठरवून घेतले होते का इथे नौकरी करीन तिथे नाही . महाराष्ट्राच्या बाहेर तर जावे लागणार नाही ना , दुर्गम भागात काय माणसे राहत नाहीत काय ? शिक्षकापेक्षा कमी पगारीत देशाची सेवा करणारा सैनिक जर म्हटला मला पाकिस्तान सीमेवर नौकरी नको बीड मध्ये द्या तर कसे होईल . 
       जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या प्रशासकीय बदलीचा गोंधळ थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी अवघड आणि सोपे शाळांच्या यादीचा गोंधळ झाला अन काम सोडून राजकारणात सक्रीय झालेल्या संघटना गळा काढून रडू लागल्या . तसे पाहितले तर साने गुरुजीच्या वसा जपणाऱ्या शिक्षकांना दुर्गम काय सोपे काय , जिथे जाऊ तिथे ज्ञानदीप लाऊ असेच वाटायला हवे मात्र नौकरी शिवाय अनेक धंदे करणारा शिक्षक आता सोयीच्या ठिकाणी नौकरी मागताना चांगलेच हट्टी झाले आहेत अन रीसिला पेटले आहेत . अनेकांना शिक्षकातला मतदार खुणावत असेल म्हणून बोलत नसावेत  , मात्र शिक्षकांनी आपली गरिमा वसा पेशा समजून घ्यावा , सगळेच शिक्षक कर्तव्यात कसूर करतात असे नाही , मात्र बहुतांशी शिक्षक आता आपले जीवन फक्त विध्यार्थी घडवण्यात घालवत नाहीत तर त्यांच्या डोक्यात व्यवसाय , राजकारण , असे काही मकळ्या असतात .   विध्यार्थी घडवणे यावर त्यांचे किती लक्ष असते आणि गावातले राजकारण किती असते हा संशोधनाचा विषय आहे . ज्या शिक्षकाच्या डोक्यात एकाधा पक्ष वा नेता घर करून असेल तर मग दुसऱ्या पक्षाच्या पालकांच्या पाल्यावर त्याचे लक्ष कमी असणार आहे काय ? शिक्षक समाजाला संतुलित करत असतो तोच जर असा असंतुलित असेल तर येणाऱ्या पिढीचे काय ? याचा विचार झाला पाहिजे . ज्या कर्मचाऱ्यांची 31 मे 2017 पर्यंत चार वर्ष एकाच ठिकाणी सेवा पूर्ण झाली, असे कर्मचारी विनंती बदलीस पात्र राहणार आहेत. या बदली प्रक्रियामध्ये दररोज गोंधळ होत आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी यंदा नव्याने अवघड क्षेत्र आणि सोपे क्षेत्र या गावांची निवड केली. तालुकास्तरावरून निश्‍चित केलेल्या गावांमध्ये जिल्हा परिषद स्तरावर परस्पर फेरबदल झाल्याने गोंधळ उडाला आहे. उद्या स्वताचे घरदार बायका पोर सोडून सीमेवर लढणारा शिक्षक जर असे म्हटला कि मला माझ्या गावातच नौकरी द्या तर ते आम्ही मान्य करणार आहोत का ? मग सैनिका पेक्षा अधिक पैसे घेणारा , रोज आपल्या लेकरा बाळात जाणाऱ्या शिक्षकांना काय फरक पडतो टेकाड चढून पोर शिकवायला ? 
.............
त्या शिक्षकांना सलाम 
अनेक शिक्षक आहेत ज्यांनी स्वताचे पैसे खर्चून शाळा उभ्या केल्या ,डिजिटल केल्या त्यांना मात्र कामचुकार अन एकाच जाग्यावर बसलेल्या शिक्षकांचे पाप भोवनार आहे . डॉक्टर चुकला तर एक पेशंट जातो , इंजिनियर चुकला तर एक पूल जातो मात्र एक शिक्षक असंतुलित झाला तर संपूर्ण पिढी बरबाद होऊ शकते याचे भान सरकार अन शिक्षक संघटनाकडे असणे अपेक्षित आहे . जीवाचे रान करून गाव अन गावातला समाज उभी करणारी आदर्श गुरुजी कमी नाहीत मात्र जे शिक्षक कमी अन राजकारणी अन व्यवसाईक अधिक आहेत त्यांनी पेशाला स्वार्थाकडे गहाण ठेवले आहे . सरकारने देखील शाळेशिवाय इतर कामे त्यांच्या गळ्यात घातल्याने शिक्षक परिघाच्या बाहेर गेल्याचे निरक्षण आहे . 
...............
सरकारला पिढी बरबाद करायची आहे का ? 
शिक्षक कधी नाही तो मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहे , सरकारच्या विरोधात त्याच्या मनात संताप आहे , सरकार अन शिक्षक यांच्यातला तणाव मात्र विध्यार्थ्यांना घातक ठरत आहे . सरकारने देखील बदलीचे गुऱ्हाळ कुठपर्यंत चालू ठेवायचे हे ठरवून घेतले पाहिजे कारण शाळा भरतात मात्र ज्ञानाच्या नाही बदलीच्या , याचा विचार झाला पाहिजे .  

 

ताजे लेख

अस्वस्थतेला जामीन 

  भुजबळसुटका आणि पुरोगामी महाराष्ट्राचे राजकीय भविष्य   

भगतसिंगाचा लेनिन अन बेईमान भाजप 

 त्रिपुरातील तांडव हा सत्तेचा स्तोम का विजयाचा उन्माद. वाजपेयी ते मोदी भाजपची ...

पंत गादीचा राजीनामा देताव का

  नैतिक जबाबदाऱ्या फक्त  पुढाऱ्यांना नसतात  , मोह अन माया - मन अन काया " विठ्ठल विठल ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

पत्रकारांनो जपून लिहा  तुमचा लोया होईल 

रक्तात माखलेल्या हातात सत्तेची सूत्रे ,  जर न्यायधीशाची हत्या तर त्याचा "शहा" कोण ?    ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king