19 July

बलात्काऱ्या तुला हव तरी काय 
 

what you want raper from us
By भागवत तावरे
  • 326 View


पाच वर्षाची मुलगी क्षणभर डोळ्याआड गेली तरी बापाच्या काळजाचा ठोका चुकावा अन त्याने चिमुकली कुठे गेली म्हणून शोधावी असा काळ महासत्ता बनू पाहत असलेल्या देशात आहेत . म्हणजे जर ६ वर्षाच्या मुलीवर नराधमाला आपल्या वासनेचा आसूड ओढायचा असेल तर आम्ही लेकी जन्माला काय यांच्या भक्ष होण्यासाठी घालायच्या , असाच अर्थ होतो . सरकार अन समाजातील बोलते सुधारक जिजा सावित्रा अहिल्या अन भिमाईचा दाखला देऊन स्त्री जन्माचे स्वागत करा म्हणून सांगते , मात्र जेव्हा आम्ही मुलीच्या जन्माची जिलबी हत्तीवरून वाटतो  अन तिला वाढवू लागतो तेव्हा तिचा लाड करणारा समाज अन सरकार तिचे लचके तुटत असताना कसे काय पाहू शकतो . कायद्याचा दरारा संपला कि समाजाची नैतिकता हा प्रश्न आहे ,  महिला असुरुक्षित आहेत, एकटी दिसली कि तिचा भोग घेतलाच पाहिजे असे समजून जर समाजातील नराधम मोकाट वावरणार असतील तर मात्र अमीर खान सारखे मत मांडले पाहिजे , आता भारतात राहणे नाही .... 
          जुहू मध्ये एका ३ वर्षाच्या मुलीवर शाळेच्या बस मध्ये बलात्कार,  नागपुर मध्ये दरडेखोरांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार "ता. कोपर्डी कर्जत येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार." रोज नुसते बलात्कार बलात्कार आणि बलात्कारच  या वासनांध  राक्षसांपासुन आपला शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र देखील वाचू शकला नाही.काहींनी तर याला मुलींना जबाबदार धरले ,मुलींचे तोकडे कपडे. सुंदर मुलगी रस्त्यावरून नग्न देखील जात असेल तरी इतरांना तिच्यावर बलात्कार करण्याचा काय अधिकार असतो काय ?  अनेकांनी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या असा हट्ट धरला  पण खरेच फाशी देऊन हा प्रश्न सुटणार आहे ? अर्थात आम्ही देखील या नराधमाना फाशीच व्हावी याच भावनेचे मात्र   प्रश्न हा आहे , की यांना किंवा इतर बलात्कार्‍यांना फाशी देवून असे गुन्हे थांबवता येतील काय ?  यासाठी कारणीभूत दोनच गोष्टी एक म्हणजे स्त्रियांचा कमजोरपणा आणि पुरुषांची लैगिकता किंवा वासना ,बलात्कार टाळण्यासाठी स्त्रियांना अधिक सक्षम होण्याची गरज आहे. कोणत्याही हत्यारा शिवाय,  अस्या  गुन्हयांसाठी सगळ्यात जास्त प्रमाणात जबाबदार असते ती म्हणजे पुरुषांची लैगिकता किंवा वासना ,वासना म्हणजे एक प्रकारची भुखच आहे ,जशी अन्नाची ,तशी ही वासनेची ,स्त्रियांना जसे सक्षम करण्याची गरज आहे त्याच वेळी पुरुषांची ही वासनेची  भूक देखील कमी होणे गरजेचे आहे . म्हणून आता लग्न होई पर्यंत वाट नको पाहायला असी तरुणाई वावरत आहे , त्यास अधिक उत्सुक करू पाहणाऱ्या सर्व यंत्रणा अवतीभवती आहेत . खिशात असलेला स्मार्ट फोन पोर्न दाखवून तरुणात वासना जागृत करणार असेल तर त्यावर प्रतिबंध मर्यादा येणे गरजेच्या आहेत ?  ही भूक जेव्हा अनावर होते आणि समोर एखादी कमजोर स्त्री आढळते ,तेव्हा हा वासनान्ध पुरुष काय करून बसतो हे त्याचे त्यालाच कळत नाही , अश्यातच जर अश्या वासनान्ध पुरुषांची टोळीच असेल तर अवघड आहे . ही भूक अगदी रस्त्यावर असणार्‍या रोड रोमिओ पासून प्रौढ नराधमापर्यंत आहे .  स्वताला विचारून बघा ,तुमच्याच मित्रपरिवारात अस भुकेला आणि डोळ्यांनी बलात्कार करणारा एखादा असतोच ,ही वृत्ती बदलण्याची गरज आहे. स्त्रियांना पुन्हा एकदा रानी लक्ष्मि बाई बनण्याची गरज आहे. त्रास देणारा कोणीही असेल रोड रोमिओ किंवा तुमचा बॉस त्याच्या या कृतीला कधीच नजर अंदाज करू नका. वेळीच त्यांच्यातील अश्या भावना संपवून टाका,नाहीतर त्या भावना वाढतच राहतात ,अश्या गुन्हेगारापासून तुम्ही स्वताच स्वताचे रक्षण करू शकता ,शेवटी एकच, जर कायदा तोडुन ते तुमच्या वर बलात्कार करु शकतात तर तुम्हि स्वताचि अभ्रु वाचवण्यासाठी कायदा हातात नाही का घेऊ शकत का असे म्हटले तर आधीक चुकीचे कसे म्हणाल ? 
.
 

महिलांसाठी 35 कायदे पण त्याच्या अंमलबजावणीचे काय ?
महिलांसाठी सध्या 35 कायदे अस्तित्वात आहेत. या कायदय़ान्वये महिलांना संरक्षण देण्यात येते किंवा तिच्यावर अत्याचार झाला तर तो करणाऱयांच्यावर कडक कारवाई करण्यात येते पण या 35 कायदय़ांची प्रभावी अशी अंमलबजावणी करण्यात येत नाही त्यामुळे महिलांच्यावर अन्याय होत आहे. राज्य महिला आयोगाकडे महिला तक्रारीचे कित्येक प्रकरण निकालाभावी प्रलंबित आहेत 

                                                                                       बलात्काऱ्यास पत्र 
    एकीकडे प्रगती , सबका साथ सबका विकास , स्त्री पुरुष समानता अस्या आधुनिक जगाची बिरुदावली अन एकीकडे तुम्ही म्हणजे सारा देश मेणबत्त्या पेटवत असताना तुमच्या ,मनातली काजळी गेल्या जात नाही . नेमकी तुमची अडचण काय आहे , तुमच्या घरी तुमची आई असेल बहिण असेल जश्या आम्ही मग तुमच्या बहिणीवर तुमच्यासारख्या कुणी बलात्कार केला तर तुम्ही काय करताल ? कल्पना करा तुमची बहिण बाहेर जाताना तिला कुणी उचलून नेले तिचे कपडे काढले , तिला नग्न केले तुमच्या बहिणीला अन मग आळी पाळीने त्या सर्वांनी तुमच्या बहिणीच्या शरीरावर बलात्कार केला तर , बर तेवढ्यावरच न थांबता तुमच्या नग्न बहिणीच्या शरीराची विटंबना केली तर काय वाटेल तुम्हाला , प्रचंड राग येतोय ना , नराधमांना या जगात राहण्याचा अधिकार नाही संपवून टाकील हरामखोरांना , जगातला दुर्बल भाऊ देखील पेटून उटेल जेव्हा त्याच्या बहिणीवर असा प्रसंग येईल . मग कोपर्डी मधील देखील कुणाची तरी बहिण होती , दिल्लीतली निर्भया देखील घरी असलेल्या छोट्या भावाकडे जात होती , जुहू वरील समुद्र बघायला गेलेल्या बहिणीला पाहून ज्यांचा समुद्र खवळला त्यांना हे माहित नव्हते का ती तुमच्या आई अन बहिणीसारखी नाही का , अहो परवा तुम्ही तिघांनी त्या ४५ वर्षीय महिलेवर स्वार झालात तसे तुमच्या आईवर कुणी झाले तर कसे वाटेल तुम्हाला ? जगातल्या कुठल्याच स्त्रीवर कुणी आपली वासना थोपवू नये या मताची मी आहे मात्र दुसऱ्यांच्या आया बहिणी जश्या भोग वस्तू वाटतात तसे आपल्या घरी असणारे स्त्री रत्न का आठवणीत  ठेवले पाहिजेत .  तू मोबाईल मध्ये पाहून चेकाळत असशील म्हणून तू आम्हा लेकींची इज्जत लुटावी का , मला जन्माला घालून माझ्या बापाने काही पाप केले नाही , तू खूप माताळला असेल तर लग्न कर भाऊ मात्र आमचे आयुष्य नको बरबाद करू , मोठ्या युगानंतर हा समाज मुलींना आकाशात उडू देत आहे , तुज्या सारख्या नराधमांनी त्यांना भयभीत केले आहे , आता त्यांना त्यांची लेक बहिण पत्नी सात च्या आत घरात हवी आहे , त्यांचे तरी काय चूक हाताच्या फोडाप्रमाणे जपतात ते आम्हाला , ते काय तुमच्यासाठी ,का तुमची शिकार होण्यासाठी. भाऊ जरा इचार कर नकोस आमचे आयुष्य बरबाद करू ......... 
   - तुझी पण बहिण  

ताजे लेख

  गांधी एक चतुर बनिया अन नेहरू लंपट कसे , इंदू सरकार विरुद्ध नथुराम ...

  पंकजा मुंडे आणि राजीनामा  छे छे

  १ मे वाल्या महाराष्ट्राचे अन त्यापूर्वीच्या ...

बलात्काऱ्या तुला हव तरी काय   

पाच वर्षाची मुलगी क्षणभर डोळ्याआड गेली तरी बापाच्या काळजाचा ठोका चुकावा अन त्याने चिमुकली ...

मराठे , शक्तीचे प्रदर्शन करणार का वापर 

आम्हाला पक्के लक्ष्यात आहे,  १६ जुलै २०१६ रोजी दैनिक लोकाशाने कोपर्डीची घटना पान एक ...

हिटलर अभी जिंदा है 

मोदी- ट्रम्प -पुतीन किम जोंग  निर्धास्त अन बिन्दास्त असलेल्या मानवाची झोप ...

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

 मराठो को भाजपा नजरअंदाज ना करे  

   मराठो के सैलाब और दिल्ली का तख्त  फिर एकबार मराठा इतिहास कि उस कगार पर खडा है ...

Close

satta king