25 July
What is the purpose of changing the history by modi- shaha
By भागवत तावरे
  • 419 View

 

गांधी एक चतुर बनिया अन नेहरू लंपट कसे , इंदू सरकार विरुद्ध नथुराम सरकार 

 

हानपणी २६ जानेवारी अन १५ ऑगस्ट ला प्रभातफेरी निघत असे अन त्यात एक घोषणा असायची , " एक रुपया चांदीचा अन सारा देश गांधीचा " अनेक वर्षे अबाधित असलेली ती घोषणा येणाऱ्या काळात बदलली जाऊ शकते , दोन हजाराच्या नोटांचा हवाला देऊन सारा देश मोडी शहांचा देखील होऊ शकतो . वाचताना अवाक होऊ नका त्यासाठी संपूर्ण भाजपा अन धर्मांध संघटना येणाऱ्या काळात एकवटतील आणि गांधी - नेहरू कसे चुकीचे होते अन हि जोडगोळी कशी मसीहा आहे हे भासवले अन ठसवले जाईल . ज्याची सुरवात इंदु सरकार या भांडारकरांच्या वी'कृती' मधून झाली . आहे एकूणच कॉंग्रेस द्वेषातून भारतीय इतिहास गांधी नेहरू गांधी विरहीत करण्याची तसदी सरकार कडून घेतली आहे . मिळेल त्या माध्यमांचा वापर करून गांधी बलिदान कफल्लक ठरवण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरल्या जात असतील सारा देश कुणाचा होणार " हे रामालाच ठाऊक " 

  १५ जुलै २०१६ रोजी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये अमुल्या गोपाल प्रसन्ना यांनी पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या विरोधात चालवल्या गेलेल्या फेक न्यूज मोहिमेवर भांडा फोड केली आहे , नेहरू अय्याशी असणारे पंतप्रधान असल्याचे सांगणारा एक व्हीडीवो जगातील ४० लाख लोकांनी पाहितला , कधी नेहरूंना एड्सग्रस्त म्हणून हिणवण्यात आले तर कधी त्यांचे फोटो मृणाली साराभाई यांच्यासमवेत चे व्हायरल करून त्यांच्या विषयी दुर्मत करवून घेतले . तर कधी नेहरू यांच्या वडिलाचे नाव मोतीलाल नेहरू नाही तर गीयाझुद्दिन गाझी असल्याचे सांगण्यात आले . तर कधी त्यांनी एका कथ्लिक महिलेला गर्भवती केल्याचे देखील लोकांना सांगितले जाते . वाचकांना वाटत असेल असे का केले जाते . सरकार पक्षाकडून अस्या प्रकारांना फूस दिली जात आहे काय यावर देखील एका घटनेमुळे संशय बळावतो . सेंटर ऑफ इन्टरनेट चे प्रणेश प्रकाश यांनी स्पष्ट सांगितले कि नेहरू विरोधात अस्या अफवा पसरवताना सरकारी आय पी अड्रेस वापरले गेले आहे . म्हणजे सरकारला भारतीय राजकारणातील मापदंड निश्चित करणारे मापदंड संपवून टाकायचे आहेत , त्यांना कुठले मापदंड प्रस्थापित करायचे आहेत किवा असू शकतात यावर अधिक खल करण्यापेक्षा त्यांना सर्वमान्य लोकमान्य व्यक्तीमत्व संपून टाकायचे आहेत काय ? हे चाचपले पाहिजे . गांधीच्या चरख्यासमोर एका पायावर दुसरा पाय ठेऊन फोटो काढला म्हणजे कुणी गांधीवादी होणार नाही असे निश्चित झालेनंतर आपण गांधीलाच संपवून टाकू असे तर काही ठरले नाही ? यावर देखील खल झाला पाहिजे . एकदा गांधीला जिवंत मारून देखील नथुराम चे वारस गांधीच्या अस्तित्वाचा वध करू इच्छित आहेत असे म्हणायला वाव आहे , जर आपण गेल्या दोन वर्षातील भाजप प्रणीत मोदींच्या नेतृत्वात काम करत असलेल्या सरकारच्या  कारवाया नीट चाचपून घेतल्या तर . खादी मधील चरख्यातून गायब झालेले राष्ट्रपिता आम्हाला शाबूत ठेवण्यासाठी कायम यत्नशील रहावे लागणार आहे , तसे ते दुर्दैवी ठरावे असेच आहे . देशात फक्त राजकीय संघर्ष नाही तर एक सास्न्कृतिक बवंडर देशाला नवे मापदंड देऊ पाहत आहे , ज्याची हमी सरकार घेत आहे . इतिहासाने सन्मान दिलेले एक एक राष्ट्रपुरुष धारातीर्थी पाडून भाजपकडून  देशाला नाविन्याचा प्रसाद देऊन नवे मंदिरे अन त्यातले देव सुपूर्द करावयाची आहेत . 

       भाजपच्या ताब्यात दिल्लीच्या चाव्या जेव्हा गेल्या तेव्हापासून देशात जे संशयाचे जंजाळ तयार झाले आहे ते कुणालाही नाकारता येणार नाही . मुस्लीम तरुणांना दहशतवादाच्या सावटाखाली आपली देशभक्ती सिध्द करावी लागत आहे . हिंदुस्तान जिंदाबाद म्हणणारा मुसलमान आम्हाला चालत नाही त्याने भारत माता कि जय म्हणावे असा आणखी वेगळा हट्ट त्यास वेगळा दाखवणे अन टाकण्यासाठी केला जात आहे . यातच लोकांच्या मनात घर करून असलेले गांधी नेहरुचे औदार्य नुसते डागाळतील नाही तर त्यांच्या बलिदानाचे अस्तित्व संपून जावे यासाठी देशातील तल्लख डोकी कामाला लागली आहेत . 

हे बलिदान नाही का ? 

पंडित नेहरू यांना परराष्ट्र धोरणाचा जनक म्हटले जाते . जगाने स्वीकारलेले पंचसूत्रे हे नेहुरुंचे आहे . नवजात भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी देश उभा करताना मृणाली साराभाई यांच्या सोबतचा फोटो सोडून आणखी काही केले असेल मात्र भाजप ला फक्त नेहुरुंचा तो फोटो दाखवून इतिहास मोडीत काढायचा असेल ? 

इंदिरा गांधी : भारताची आयर्न लेडी असणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत राष्ट्रपती राजवट हा अध्याय तक्रार करण्यास वाव देतो म्हणून त्यांनी या देशाला एक धाडसी अन राष्ट्रवाद जोपासणारा पंतप्रधान दिला आहे हे नाकारता येईल का , देशाला एक ठेवण्यासाठी सुवर्ण मंदिरात सैनिक घुसवणाऱ्या इंदिरा त्याच साठी किहान सिंगच्या गोळ्यांनी जीव गमावून बसल्या नाहीत काय , एका पहाडी धाडसाच्या गंगोत्री म्हणून इंदिरा यांचे प्रशंसक स्व अटलबिहारी वाजपेयी राहिलेले आहेत . असे असताना भांडारकर  इंदू सरकार चित्रपट कशाला काढत असावेत . यावर वेगळे सांगायला नको . ज्या राजीव गांधींनी लंकेत शांतता नांदावी म्हणून स्वतच्या शरीराचे तुकडे करून घेतले त्या राजीव गांधींच्या पूर्वजांची हत्या रामभक्तांना का बर करायची आहे ? 

ताजे लेख

ताई हा जातीवाद कुणाचा 

 माधव नावाचा राजकीय कावा ?  लेखक - नवनाथ राठोड वडवणी 

स्वप्नाचे राजकारण 

 मृगजळाची झुक झुक , फक्त आवाज  दत्ता प्र्भाळे बीड 

धर्म भाजपची अपरिहार्यता 

लोकांच्या घशात  जातीचा काढा                 राजकारणाचा एक धर्म आहे ...

निवडणूक निर्वाणीची 

लोकांनीच करायची आता लोकशाहीची चौकीदारी        ...

डी .एम. द नेपोलियन ....

कार्य कर्त्या नेतृत्वाची दैदीप्य वाटचाल 

लोकप्रिय लेख

लाहोर भेटीतच पठाणकोट ची 'निरंजनी' विझली 

लाहोर भेटीतच पठाणकोट ची निरंजनी विझली  २६ डिसेंबर २०१५ रोजी मी 'कालचा राष्ट्रद्रोह ...

गडावरून महंतांची कोंडी

गडावरून महंतांची कोंडी आजच्या  विषयावर  वेगळे काही ...

ना " लायक " निखील वागळेला दंगली घडवायच्या आहेत काय 

 मराठयांना का डिवचता  भारतीय राज्यघटनेच्या भाषेत ...

 संघर्षकन्येवर संघाचा रामबाण

कधी काळी चहा विकणारे नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर ...

दुरुस्त शास्त्री आणि एबीपी च्या पोटात गोळा 

 भगवान गड आणि तिथल्या सवांद आणि वादावरून अनेक चर्चासत्रे झडतात, चार चौघात तर कधी २१ ...

Close

satta king